एक लोकपरंपरा ती म्हणजे "भोवाडा."

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025
  • नमस्कार मित्रानो ....तर आज आपण बघणार आहोत एक गाव व तेथील वर्षानुवर्षे चालत असलेली एक लोकपरंपरा ती म्हणजे "भोवाडा."
    खर तर भोवाडा हा शब्द ऐकायला बोलायला तुम्हाला नवीन जरी वाटत असेल तरिहि हि लोक परंपरा खूप जुनि आहे ,अन याला जपणार अन अजून ही जिवंत ठेवणार गाव म्हणजेच टेहेरे गाव . टेहेरे हे गाव नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातिल nh 3 हायवे जवळ असलेलं अन गिरणा नदीच्या तिराजवळ वसलेलं अस सुंदर गाव ..
    चैत्र वैशाख महिना म्हंटल की उन्हाळा .पूर्वी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना फारशी कामे नसायची म्हणून रात्रीच्या थंड हवेत बऱ्याच गावांत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या भोवाड्याची सुरुवात व्हायची अन तिच प्रथा आजही या गांवात टिकून आहे .. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडीओ ची सुरुवात करूया...
    भोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावकर्‍यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असतो . चैत पुनवेला गावातून भोवाड्याची दांडी मिरवून भोवाड्याच्या नियोजित ठिकाणी पूजा- अर्चा करून ही दांडी रोवली जात असते.
    भोवाड्याच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरूवात होण्याच्या दोन दिवस आधी गावात सोंगं आणली जातात्. सोंग याचा अर्थ मुखवटा. कागदाचा भिजलेला लगदा आणि त्याला चिकटपणा येण्यासाठी मेथीचं पीठ एकत्र कालवून सोंगं तयार केली जात. काही सोंगांना मोठमोठ्या ताट्याही असतात. ह्या ताट्या टोकराच्या म्हणजे बांबूच्या कामट्यांपासून बनवलेल्या असतात्. रावण, आग्यावेताळ अशा सोंगांना मोठ्या आकाराच्या ताट्या असतात.
    यामध्ये धोंड्या, गणपती, सरस्वती,खंडेराव, रावण,मारूती, बिभिषण, आग्यावेताळ, दैत्य, चंद्र, सूर्य अशी सोंगं यांचा समावेश असतो. पूर्वी गल्लीच्या दोघं बाजूच्या ओट्यांवर, जमिनीवर खाटा टाकून, गोणपाट अंथरून संपूर्ण गाव आपल्या लेकराबाळांसह भोवाडा पाहण्यासाठी गर्दी करत असत. बाया-माणसं, म्हातारी-कोतारी, लहान सहान पोरं अशी ही गर्दी असे.रात्रभर संपूर्ण गाव जागरण करून हा भोवाडा बघत असे. भोवाडा पाहण्यासाठी आजूबाजूच्या दूरदूरच्या गावाची माणसंही येत असतात.
    प्रत्येक सोंगाच्या मागे-पुढे टेंभे घेतलेली दोन दोन माणसं असतात. परंतु आग्यावेताळ सारख्या सोंगाला बरेच टेंभे लावले जातात्. टेंभा म्हणजे मशाल. टेंभ्याच्या उजेडातच सोंगं पहावी लागतात. त्यासाठी बत्ती किवा कंदील लावण्याची पध्दत नसते . कापडांच्या चिंध्या बांधून ते रॉकेलमध्ये बुडवून पेटवतात. त्याला टेंभा म्हणतात. टेंभ्यांबरोबर एकजण रॉकेलचे उघडं डबं किंवा लोखंडी कढई अन त्यात रॉकेल घेऊन चालतो. टेंभ्याचं रॉकेल संपत आलं की टेंभावाला जळता टेंभा रॉकेलच्या कढई बुडवून पुन्हा टेंभा चांगल्या पध्दतीने पेटवतो. अशा ह्या टेंभ्याच्या प्रकाशात रात्रभर भोवाडा चालतो.
    जवळजवळ मध्यरात्रीच्या आसपास आग्या वेताळाचं सोंग निघत् असतं. कंबरेला कांबटीच रिंगन तयार करून त्याला चोहोबाजूंनी टेंभे लावलेले असतात.
    संध्याकाळची जेवणं आटोपल्यावर भोवाडा सुरू झाला की सकाळी सूर्योदयाच्या वेळी होत होतो. रात्र संपूनही सोंगं मात्र संपत नाहीत, म्हणूनच ‘रात्र् थोडी सोंगं फार’ अशी म्हण रूढ आहे. ही म्हण मराठीतही रूढ झाली आहे. म्हण ही लोकपरंपरेंकडूनच भाषेला मिळालेली देणगी असते. अशा प्रकारच्या अनेक म्हणी/ वाक्प्रचार भाषेत लोकपरंपरेतून आले आहेत.तर तुम्हाला ही लोकपरंपरा कशी वाटली व हा भोवाडा कसा वाटला नक्की सांगा .... अखिल मोरे...
    -----Akhilmorevlog #marathisanskruti #lokkala #marathi #gramikatv

ความคิดเห็น • 21