आमच्या संग्रहातून - मराठी नभोनाट्य - वाटसरू - लेखन - व्यंकटेश माडगूळकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2020
  • काशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मराठी नभोनाट्य - वाटसरू
    लेखन - व्यंकटेश माडगूळकर
    कलाकार - नंदकुमार कारखानीस, पुरुषोत्तम जोशी, शोभा चितळे
    सादरकर्ते - पुरुषोत्तम जोशी
    आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा NewsOnAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
    • Android App - play.google.com/store/apps/de...
    • IoS App - apps.apple.com/in/app/newsona...
    #MarathiNatak #Vatsaru
    #VyankateshMadgulkar #AkashvaniPune
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 98

  • @nitinsonawane1811
    @nitinsonawane1811 3 ปีที่แล้ว +14

    मी 5वी ला (1985) असताना हे नभोनाट्य खूप वेळ ऐकलं आहे , त्या वेळी खूप भीती वाटायची पण खूप मस्त वाटत होतं तेव्हा, मी गुगल व you tube वर खूप वेळा शोधलं पण सापडत नव्हते, आपण ते 9 महिन्या पूर्वी अपलोड केल्या बद्दल आपला खूप खूप आभारी आहे .
    धन्यवाद आकाशवाणी ..

    • @aniljoshi5133
      @aniljoshi5133 2 ปีที่แล้ว

      मी सुद्धा तेव्हाच ऐकलंय.

    • @purushottampeshave317
      @purushottampeshave317 10 หลายเดือนก่อน

      वाटसरु च्या. बायकोच काम कुणी केलेय

  • @nilkanthbhadsawle7978
    @nilkanthbhadsawle7978 3 ปีที่แล้ว +9

    फारच सुंदर..!40 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. पुरषोत्तम जोशी यांचा धीर गंभीर आवाज आणि छान सादरीकरण..!आणि व्यंकटेश माडगूळकर यांचे अप्रतिम लेखन..!

    • @rajupandit3077
      @rajupandit3077 ปีที่แล้ว +1

      खूपच छान पुरुषोत्तम जोशी यांचा आवाज 40 वर्षा पूर्वी ऐकलेले नाटक आज मोबाईल ॲप वरुन ऐकायला मिळाले धन्यवाद 🙏🙏

  • @patilpramodg
    @patilpramodg 3 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर
    रात्रीचे साडे नऊ वाजलेत
    सादर करत आहोत व्यंकटेश माडगुळकर लिखित नाटक वाटसरु सादरकर्ते पुरुषोत्तम जोशी .... वाटसरु ..वाटसरु
    आणि तो वार्याचा बेफान आवाज़..
    अंगावरची वाकळ अंगाशी जोरात ओडुन घेऊन
    कीती वेळा एकलं हे नाटक.. प्रत्येक वेळी तीच भीती तोच थर्रार...
    पुनः तो आनंदयुक्त थरार अनुभव दिलात
    अप्रतिम
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaidevmadgulkar9211
    @jaidevmadgulkar9211 3 ปีที่แล้ว +17

    Very nice to hear this again. The voice of "Bhalya Dhangar" is that of my late father Vyankatesh Madgulkar himself!

    • @pawarsatish07
      @pawarsatish07 2 ปีที่แล้ว

      Great

    • @harish22135
      @harish22135 2 ปีที่แล้ว

      Kya baat hai..!
      Jabardast 💥

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 ปีที่แล้ว

      Yes,very nice to hear the entire play again....Inspector-Purushottam Joshi and Bhalya Dhangar-Vyanktesh Madgulkar ji...Tribute to team💐🙏

    • @swapniljadhav3249
      @swapniljadhav3249 10 หลายเดือนก่อน

      नमस्कार साहेब, फार फार आनंद झाला मला मी ही माडगूळ जवळील बलवडी या गावात जन्माला आलो.
      माझं आजोळ आहे ते आणि माडगूळ मध्ये माझी मावशी राहते.
      माझी आपणास विनंती आहे 🙏कृपया आपल्याकडे दस्तूरखुद्द माडगूळकर साहेबांच्या आवाजातील आणखी कथा कथन असेल you tube वर अपलोड करावे 🙏

    • @jaidevmadgulkar9211
      @jaidevmadgulkar9211 10 หลายเดือนก่อน

      @@swapniljadhav3249 very nice to hear from you. It is always good to hear from people who have some connection to Madgule. My father used to mention Balavdi, along with a few other towns in the vicinity, such as Sangola, Vita, Kharsundi to name a few.
      Your request is duly noted, and I will be making attempts in that direction.

  • @MrAvinashmahajan
    @MrAvinashmahajan 3 ปีที่แล้ว +10

    उदंड उदंड धन्यवाद.
    खूप वर्षांपूर्वी,
    पावसाळ्यात गडद अंधारल्या रात्री ऐकलेली आठवते

  • @ajaypatil5921
    @ajaypatil5921 3 ปีที่แล้ว +12

    1982 I have listened this natak on Akashvani Jalgaon, 9.30 pm Sunday.... Remember golden years Thanks You Tube 😊

    • @dhirajjoshi96981
      @dhirajjoshi96981 2 ปีที่แล้ว

      मी सुद्धा लहानपणी ऐकले होते. जळगाव केंद्र.

  • @VijayJadhav-vj6pd
    @VijayJadhav-vj6pd 2 ปีที่แล้ว +2

    सांगली आकाशवाणीनेसुद्धा प्रसारित केले होते. अतिउत्कृष्ट सादरीकरण.

  • @SansoVoice
    @SansoVoice 3 ปีที่แล้ว +6

    बाप रे, चाळीस एक वर्षे झाली असतील हे नभोनाट्य ऐकून.
    कित्येक वर्षे जुन्या मित्रां बरोबर हमखास आठवण निघायची.
    हा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल आकाशवाणीचे मनापासून धन्यवाद.
    असेच इन्स्पेक्टर प्रधान, टेकाडे भाऊजी ऐकायला फार आवडेल...

  • @anilshinde5200
    @anilshinde5200 3 ปีที่แล้ว +3

    सगळ्यात आवडते नाटक होते

  • @vijaysisal6303
    @vijaysisal6303 4 ปีที่แล้ว +10

    माझा जन्म 92 चा आहे, मी आजोळी चिकुर्डे ता. वाळवा इथं राहायला होतो वयाच्या 3 ऱ्या वर्षांपासून कारण माझे वडील दारू पीत होते.
    आजोळी घरात light नव्हती त्यामुळं TV असण्याचा विषयच नाही त्यामुळे आकाशवाणी ही एकमेव आमची मनोरंजनाची वाहिनी. मी जातीनं धनगर तसं घरात रांगडेपणा, वयाच्या 5व्या वर्षांपासून माझ्याकडे 4 म्हशींची जबाबदारी त्यांना दिवसभर फिरवून आणणं हे माझं काम.
    दिवसभर एकटा असणं आणि संध्याकाळी आकाशवाणी वरची ही अस्सल नाटकं दर गुरुवारी (अंदाजे, आता नेमका वार आठवत नाही ) 9:30 वाजता भाताच्या मोठया टोपल्यावर असणारा रेडिओ जो निप्पो सेल वर चालायचा यावर ही नाटकं ऐकताना मनोविकास एवढा झाला की ऐकत असायचो पण चित्र डोळ्यासमोर त्या काळ्याकुट्ठ अंधारात समोर तारळायची.
    मेंदूची कल्पनाशक्ती इतकी अफाट तर आहे याचं कौतुक तर आता वाटतंच पण अभिवाचन करणारे कौशल्याने नक्कीच भरलेले असावेत.
    आज त्या दिवसांची खूप आठवण येते. आत्ताची माझी आर्थिक परिस्थिती इतकी मजबूत असताना सुद्धा का कुणास ठाऊक ते अंधारातल्या रात्री अजून साद घालतात.
    (आणखी काही आठवणी - रविवारी 10 वाजता चला हसुया, दुपारी 12 वाजल्यानंतर आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम झाल्यानंतर ती एक धून एकसारखी वाजत राहायची, संध्याकाळी लोकसंगीत, सातच्या बातम्या, सोमवारी लहान मुलांचे शाळेचे कार्यक्रम आणि बरंच काही )
    विजय sisal (postal assistant kolhapur 9049501268)

    • @NPatil-eq8in
      @NPatil-eq8in 3 ปีที่แล้ว

      Khup chhan vatal.kiti sundar athvni.

    • @NPatil-eq8in
      @NPatil-eq8in 3 ปีที่แล้ว

      Khup chhan vatal.kiti sundar athvni.

    • @vijaysisal6303
      @vijaysisal6303 3 ปีที่แล้ว

      Thank u

    • @sbn864
      @sbn864 2 ปีที่แล้ว +1

      लहानपणाची आठवण

    • @vijaysisal6303
      @vijaysisal6303 2 ปีที่แล้ว

      @@sbn864 thank you.

  • @arunkumbhar
    @arunkumbhar 3 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम जवळपास 15 ते 20 वर्षानंतर हे नभोनात्य ऐकले जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद..

  • @sbn864
    @sbn864 3 หลายเดือนก่อน

    आकाशवाणी सांगली केन्द्रावरुन लहानपणी ऐकले होते अप्रतिम सादरीकरण

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 2 ปีที่แล้ว +3

    कुमार वयात ऐकलेले नभोनाट्य आज सहज आठवण आली व सर्च केलं अन काय आश्चर्य ते मिळालं सुध्दा.

  • @rajmohanshinde6392
    @rajmohanshinde6392 4 ปีที่แล้ว +4

    पुर्वी दर सोमवारी रात्री 9.30 वाजता आकाशवाणी वर नभोनाट्य लागायचे. वाटसरु, नभोनाट्य कितीतरी वेळा ऐकलं आहे. खरंच अप्रतिम ऐकीव. खूप वर्षांनी मोबाईल वर ऐकलं आहे. खूप छान वाटले.

  • @SanjayJoshivlogs
    @SanjayJoshivlogs 3 หลายเดือนก่อน

    मी खूप लहानपणी हे नभोनाट्य ऐकल्याचे आठवतंय ..मस्त

  • @amrutaarjunwadkar1225
    @amrutaarjunwadkar1225 7 หลายเดือนก่อน

    लहानपणी आईवडिलांबरोबर रात्री 9.30 वा. हे नभोनाट्याच्या कार्यक्रमात हे नाटक ऐकले होते. आज पुन्हा ऐकताना मज्जा आली.

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 2 ปีที่แล้ว +1

    खुप लहान असताना एकली होती आज मी 50 पार केली पण अजूनही ऐकताना अंगावर शहारे येतात
    खुप छान 🌹🙏🏻 धन्यवाद

  • @atulmulay7945
    @atulmulay7945 ปีที่แล้ว

    माझ्या लहानपणीची आठवण परत ताजी झाली ऐकून खूप खूप बरं वाटलं

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 ปีที่แล้ว

    मी 47वर्षापूर्वी रात्री 9वाजून30मिंटानी ऐकलेले नाटक आज जुन्या आठवणींना उजाळा दिला

  • @sunandachavan250
    @sunandachavan250 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर.अलभ्य लाभ.पुन्हा ऐकायला मिळाले

  • @dhananjayghadge3029
    @dhananjayghadge3029 4 ปีที่แล้ว +3

    खुप वर्षे झाली ऐकुन आजही तितक्याच तन्मयतेने ऐकलं खुप खुप समाधान झाले
    रात्री ९.३० ला आकाशवाणी वर अधूनमधून लागायची घरातील सर्व आम्ही ऐकायचे .

    • @sidhharthgaikwad7226
      @sidhharthgaikwad7226 2 ปีที่แล้ว +1

      अतिशय सुरेख लेखन आणिआवाज

    • @ravindrapalange2011
      @ravindrapalange2011 2 ปีที่แล้ว

      @@sidhharthgaikwad7226 very nice

  • @dipakkale3325
    @dipakkale3325 ปีที่แล้ว

    कीतीही वेळा ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा एकत रहावं असं नाटक.जुन्या आठवणी व भुतकाळ आठवला.दर सोमवारी रात्री ठीक ९.३०वा.रेडीओ समोर बसून आज कोणतं नभोनाट्य सादर होणार याची उत्सुकता असायची.सदर कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्रास धन्यवाद.

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम असे हे नाटक होते..

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 ปีที่แล้ว

    42 वर्षांपूर्वी ऐकलेलं 😃👍👌great thanks

    • @shubhangijoshi6130
      @shubhangijoshi6130 ปีที่แล้ว

      रात्री 10 वाजता हि श्रुतिका लागायची रेडिओ समोर सगळं ऐकायला बसायचो 👍😃

  • @arvindphale9589
    @arvindphale9589 4 ปีที่แล้ว +6

    I used to here, when I was in school, After long time, listed the same. Remembered the days when there was no TV, and we used to sit close to the radio and listen Carefully at night 9.30.

  • @sharadwayadande631
    @sharadwayadande631 16 วันที่ผ่านมา

    खूप छान 👌🏻 जुन्या आठवनी ताज्या झाल्या 😃

  • @abhijitpatil470
    @abhijitpatil470 ปีที่แล้ว

    लहानपणी मी हे नाटक ऐकलं होतं....
    आपले मनःपूर्वक धन्यवाद!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @hanmantsonawane9102
    @hanmantsonawane9102 3 ปีที่แล้ว +2

    Very nice drama and Thanks for Akashwani Pune.
    I learned before 40 years ago and this is my dream once again I learned it

  • @bhagavangherade823
    @bhagavangherade823 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @bhalchandramhatre3516
    @bhalchandramhatre3516 3 ปีที่แล้ว +3

    Childhood memory.

  • @vijaybamane8866
    @vijaybamane8866 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान नाटक!

  • @Build_Nation
    @Build_Nation 8 หลายเดือนก่อน

    जवळ पास ४५ वर्षांनी आज पहिल्यांदा हे नभोनाट्य ऐकले आणि जुना काळ समोरुन एकदम निघून गेल्याची जाणीव झाली. माझ्या माहिती प्रमाणे भल्याची भुमिका साकारणारे स्वतः लेखक व्यंकटेश माड़गुळकर आहेत आणि फौजदाराची भुमिका साकारणारे पुरुषोत्तम जोशी.

  • @prepareobjectiveenglish3743
    @prepareobjectiveenglish3743 3 ปีที่แล้ว +4

    Brain works more intellectually by reading or listening stories than seeing TV serials

  • @chandrakantbarsawade6085
    @chandrakantbarsawade6085 ปีที่แล้ว

    छान आठवण
    कसलेल्या कलाकारांची शब्दफेक

  • @sunandachavan250
    @sunandachavan250 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @d.m.7096
    @d.m.7096 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरीकरण! जवळपास ४० वर्षांनंतर पुन्हा ही श्रुतिका ऐकण्याचे भाग्य लाभले.

  • @raghunathyadav7960
    @raghunathyadav7960 ปีที่แล้ว

    खुपचं छान जयश्रीराम.

  • @user-xd4wm7iy1p
    @user-xd4wm7iy1p 26 วันที่ผ่านมา

    वैकटेश माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरले ले व त्या नचा अभिनयाने नटलेले हे नभोनाट्य १९८३ साली रेडिओ वर ऐकले होते आता ऐकून आईवडिलांची आठवण आली

  • @nitinsarnaik9589
    @nitinsarnaik9589 3 ปีที่แล้ว +3

    That is best play i have heard At my age of fifteen

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 ปีที่แล้ว

    आम्ही ही कथा आकाशवाणीच्या सांगली केंद्रातून कोल्हापूर मध्ये आमच्या गावी आयकायचो ऐकताना खूप भीती वाटायची जुन्या आठवणी जाग्या झाल्या तो व्ह्हॉल्व चा रेडिओ🥺

  • @The-earh
    @The-earh ปีที่แล้ว

    सुंदर 👌👌👌

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 ปีที่แล้ว

    आठवणीतली श्रुतिका ...
    कितीतरी वर्षे झाली , पण बऱ्यापैकी आठवते कथासूत्र ... धन्यवाद

  • @rajendraswami2069
    @rajendraswami2069 ปีที่แล้ว

    Khup chan 🙌🏼

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरीकरण! खुपचं छान! आत्ता च्या काळात तो भल्या सारखे दरोडेखोर देखील नाहीत, आणि आपला जीव धोक्यात घालून कारवाई करणारी यंत्रणा देखील नाही..

  • @umeshjim3434
    @umeshjim3434 4 ปีที่แล้ว +1

    Khup divsani aaikla . khup chan 👍👌👌

  • @pradippawar934
    @pradippawar934 3 ปีที่แล้ว +1

    thanx lot of

  • @kalpanakhaire1719
    @kalpanakhaire1719 4 ปีที่แล้ว +1

    Chan watale lahanpanichi athavan aali Thank you daha pandhara Varsha purvi kavitancha ek karyakram lagayacha Aruna Dhere Pratima Kulkarni yancha to pan aaikayachi khup divasanchi ichha aahe pl to pan lava ithe Anandgani kinva Aanandyatri ase kahitari nav hote tya programme che Kadhi dukhate hruday kadhi sukhane bharate ashi survat hote tya programme chi.

  • @rajankulkarni3069
    @rajankulkarni3069 2 ปีที่แล้ว

    After 35 years I have listened to this shrutika on Akashwani. Nostalgic

  • @shivprasadjoshi5280
    @shivprasadjoshi5280 ปีที่แล้ว

    Amazing! Thanks a million! My childhood memories of seventies....

  • @drsanjaychilbule
    @drsanjaychilbule 2 ปีที่แล้ว

    व्यंकटेश माडगूळकर यांचा आवाज ही यात आहे पण त्यांचे नाव फक्त लेखक म्हणूनच दिलेले आहे.....

  • @nareshshinde7840
    @nareshshinde7840 3 ปีที่แล้ว +1

    LAHAN ASTANA DOKYAVAR PANGHRUN GHEUN AIKALEL ..............GREAT

  • @radhikasathye8467
    @radhikasathye8467 ปีที่แล้ว

    Chan

  • @satishrajput3458
    @satishrajput3458 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान अाहे..

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 ปีที่แล้ว

    आता सुध्दा भिती वाटते

  • @ameyaghatpande9938
    @ameyaghatpande9938 2 ปีที่แล้ว

    Nice to hear this Nabhonatya after 40 years

  • @pv7573
    @pv7573 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम...thank you so much for uploading 👌🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 2 ปีที่แล้ว

    खूप छान नाटक ......

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 4 ปีที่แล้ว +2

    अमुल्य खजिना .ऱेडीओ डोक्यापाशी ठेवुन हि नाटकं ऐकली जुन्या आठवणी ताज्या झाल्या .आणखी हि भरपुर नाटकं ऐकली आहेत.ती परत ऐकला मिळाली तर बरं होईल

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सादरीकरण

  • @kirannetare7955
    @kirannetare7955 2 ปีที่แล้ว

    खूपच छान👌👌

  • @Raviraj-tu5un
    @Raviraj-tu5un 2 ปีที่แล้ว

    Childhood memories ❤

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 3 ปีที่แล้ว +1

    Pl upload other programs of venkatesh madgulkar if available

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @NEVASKARSIRSPHYSICSththscience
    @NEVASKARSIRSPHYSICSththscience 2 ปีที่แล้ว

    Superb and memory reminder

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 2 ปีที่แล้ว

    लोभ असावा हे नाटक कुठे ऐकायला मिळेल

  • @hanmantsonawane9102
    @hanmantsonawane9102 3 ปีที่แล้ว

    Me Harshu.
    I like this very good

  • @laxmanbhujadi5198
    @laxmanbhujadi5198 3 ปีที่แล้ว +1

    Please mahiti pathwa

  • @deepakwalekar1705
    @deepakwalekar1705 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या वडिलांनी एकांकिका केली होती

  • @user-gj6vc2bl6y
    @user-gj6vc2bl6y 3 หลายเดือนก่อน

    😂❤

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 3 ปีที่แล้ว

    नारायण धारप लिखित आरसा हे नभोनाट्य अपलोड करा.

  • @ganeshgodase1347
    @ganeshgodase1347 4 ปีที่แล้ว +2

    माडगूळकरांच्या एका नितांतसुंदर कथेची लिंक येथे देत आहे.
    दर्दी लोकांनी जरूर ऐकावी. मला खूप आवडली.
    th-cam.com/video/6Srr_E1g3zs/w-d-xo.html

  • @harshvardhanpatil9081
    @harshvardhanpatil9081 2 ปีที่แล้ว

    Too overacting

    • @padmakarpathakji6720
      @padmakarpathakji6720 2 ปีที่แล้ว

      खूप वर्षांनी हे नभोनाट्य ऐकले.गत काळातील ते दिवस आठवले. आकाशवाणी, पुरुषोत्तम देशपांडे, सारे आठवणींच्या राज्यात आबाद आहेत. आज पुन्हा एकदा तो थरार अनुभवला.मनःपूर्वक धन्यवाद.

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 4 ปีที่แล้ว +12

    अमुल्य खजिना .ऱेडीओ डोक्यापाशी ठेवुन हि नाटकं ऐकली जुन्या आठवणी ताज्या झाल्या .आणखी हि भरपुर नाटकं ऐकली आहेत.ती परत ऐकला मिळाली तर बरं होईल

    • @dipeekarawal5982
      @dipeekarawal5982 4 ปีที่แล้ว

      कथा छान आहे.आणि एकुला खूप मजा आली. धन्यवाद.