Preparing for Brooding of Chicks | चुजे आने से पहले का दिन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • ब्रूडींग व्यवस्थापन
    1)पक्षी येण्याअगोदर एक तास सर्व बु्रडर चालु करावेत.
    2)1000 पक्षांसाठी 6 लीटर पाणी व 500 ग्रॅम गुळ घेऊन एकत्र करावे व प्रती डींकर 300 मीली. पाणी पक्षी येण्याअगोदर शेडमध्ये ठेवावे.
    3)गुळ पाणी पक्षांना फक्त दोन तासच द्यावे.दोन तासानंतर पिल्लांबरोबर आलेली औषधे वापरावीत.
    4)पिल्लांबरोबर आलेले पातळ औषध समान तीन भाग करून रोज सकाळी पक्षांना द्यावे. तसेच पिल्लांबरोबर आलेली बी.पी.एफ.पावडर समान तीन भाग करून रोज संध्याकाळी पक्षांना तीन दिवस दयावी.
    5)चिक्स् डिंकर पहिले तीन दिवस अर्धा भरावा त्यासाठी प्रती 1000 पक्षांना 10 लीटर पाणी वापरावे.
    6)पक्षी आल्यानंतर लगेचच अर्धा तासानंतर पेपरवरती खादय दयावे.तसेच प्लेटामध्ये थोडे खादय घेऊन प्लेटा पेपरवरती ठेवाव्या.पक्षांना खादय देण्यास उशिर करू नये.
    7)प्रात्येक गोलामध्ये पाच प्लेट व पाच पाण्यांची भांडी ठेवावीत.
    8)राऊड बनविताना पत्रा तीस फुटाचा वापरावा व त्याची उंची पाऊन ते 1 फुट असावी.
    9)प्रात्येक वेळी औषधे बनविताना वरील टाकीतुन पाणी घ्यावे.त्यासाठी टाकीमध्ये 500 लिटर पाणी घेऊन 50 मीली अॅसिटीक अॅसीड किंवा एच प्लस व 1 गोळी टाकुन 15 ते 20 मिनीटानंतर ड्रममध्ये पाणी घ्यावे व त्यात औषधे बनवावी.
    10)दुसऱ्या दिवशी पेपर काढुन पेपर जाळुन टाकावे.
    11)तिसऱ्यादिवशी जागा वाढविताना दोन्ही गोलचे एक गोल करणे.व प्रत्येक राऊंडमध्ये 5 फिडर वाढावावेत . 50 टक्के फिडर वाढवावेत.
    12)तिसऱ्यादिवशी जागा वाढविल्यानंतर लगेच अॅटो ड्रिंकर चालु करावेत व पाण्याची टाकी 10 दिवस अर्धी भरणे.
    13)पाचव्या दिवशी लसीकरण सकाळी 6 वाजता डोळयातुन करावे व लसीकरण झाल्यानंतर जागा 50 टक्के वाढवावी.जागा वाढविताना गोल फोडावे पार्टीशन टाकुन जागा वाढवावी.
    14)सहाव्या दिवशी फिडर ड्रम जोडुन घेणे आवश्यक आहे कारण खाद्य जास्त प्रमाणात वाया जात आहे.
    15)सहाव्या दिवशी पाण्यातुन डुऑक्स 50 मीली. पाणी 900 मिली व अॅक्टीवेटर 50 मीली घेऊन औषध तयार करावे. तयार केलेले 1 लिटर औषध 1000 लिटर पाण्यासाटी वापरणे. औषध 5 लीटर कॅनमध्ये औषध तयार करावे. औषधे तयार करून टाकीत टाकल्यानंतर लगेच औषधे तयार करून ठेवावीत.सोबत एच प्लस 100 मीली. 1000 लिटर पाण्यासाठी वापरणे.
    16)सातव्या दिवशी 70 टक्के जागा वाढवावी. व सर्व प्लेटा बाहेर काढुन ठेवाव्यात.
    17)नवव्या दिवशी 90 टक्के जागा वाढवणे आवश्यक आहे.
    18)बाराव्या दिवशी लसीकरण डोळयातुन सकाळी 6 वाजता करून घ्यावे. 100 टक्के जागा वाढवावी.
    ब्रूडींग व्यवस्थापनातील खालील महत्वाचे मुददे.
    1)उन्हाळी व्यवस्थापनामध्ये जागा वाढविण्याचे दिवस. (तिर्सयादिवशी अंडाÌती, 5व्या दिवशी 50 टक्के, 7 व्या दिवशी 70 टक्के, 9 व्या दिवशी90 टक्के व 11 व्या दिवशी 100 टक्के जागा देणे.)
    2)हिवाळी व पावसाळी व्यवस्थापनामध्ये जागा वाढविण्याचे दिवस. (4थ्या दिवशी अंडाÌती, 7 व्या दिवशी50 टक्के, 9 व्या दिवशी 60 टक्के,11 व्या दिवशी 80 टक्के व 14व्या दिवशी 100 टक्के जागा देणे.)
    3)जागा वाढवताना तुस कोरडी असेल तर तुसावर पाणी मारावे.
    4) हिवाळयामध्ये पाणी थंड असल्यास कोमट पाणी पक्षांसाठी देणे.
    5)ब्रूडींग व्यवस्थापनासाठी उष्णता देणे आवश्यक असते. त्यासाठी तेलाचे डबे (शेगडी) वापरावेत.प्रत्यकी 250 पक्षांसाठी एक शेगडी असावी.
    6)1000 पक्षांसाठी 100 किलो लाकुड किंवा 100 किलो दगडी कोळसा वापरावा.1500 पक्षांसाठी एक बॅलर असणे आवश्यक आहे.
    7)हवामानातील बदलानुसार शेतकयांनी पडद्याची उघडछाप स्वत: करावी.
    8)ब्रूडींग व्यवस्थापनामध्ये तुस जास्त वापरण्यात यावी.प्रती 1000 पक्षांसाठी 300 किलो तुस वापरावी

ความคิดเห็น • 4