ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Anagha Modak : Building a vision for life | Swayam Talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2018
  • करियर ऐन भरात असताना डेंग्यूचं निमित्त झालं आणि अनघाची दृष्टी गेली. निराशा झटकून पुढील सहा महिन्यात अनघाने आकाशवाणीवर निवेदन करून आपल्या करियरला पुन्हा सुरुवात केली. आज दूरचित्रवाणी, आकाशवाणी व कार्यक्रम या तिन्ही माध्यमात अनघाने एक सुप्रसिद्ध निवेदिका अशी ओळख प्राप्त केली आहे.
    ऐकुया, जगण्याची एक नवीन उमेद देणारा अनघाच्या जिद्दीचा प्रवास !
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
    २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
    Connect With Us
    Instagram - talksswayam
    Facebook - SwayamTalks
    Twitter - SwayamTalks
    LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
    Subscribe on our Website swayamtalks.org/register/
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #Marathiinspiration #SwayamTalks #passion

ความคิดเห็น • 195

  • @snehalkale9741
    @snehalkale9741 3 ปีที่แล้ว +3

    अनघा ताई,खूपच प्रेरणादायी बोलते तू, स्फूर्ती मिळाली तुझे अप्रतिम बोलणे ऐकून,देव तुला लवकर ही सृष्टी पाहणासाठी दृष्टी देवो,खूप खूप शुभेच्छा ताई🌷🌷🌷

  • @vinashinde7897
    @vinashinde7897 5 ปีที่แล้ว +27

    अनघा ,खूप कौतुक तुझ, काय शब्द सुचत नाही , डोळे उघडणारे स्पीच ,हॅट्स ऑफ यू

    • @sudhakarraopanchavate5470
      @sudhakarraopanchavate5470 5 ปีที่แล้ว +3

      अनधा, काय बोलू ़अगदी ईश्वरीय अनुभव ़ कान तृप्त झालेत तुझी वाचा ऐकून ़ तु अशीच बोलत राहा़ ़
      God bless you.

  • @madhurijadhav6662
    @madhurijadhav6662 5 ปีที่แล้ว +14

    अनघा सलाम तुमच्या जिद्दीला, तुमचेडोळे नक्की परत येतील.ही सदगुरु चरणी प्रार्थना

  • @rohankarkare7493
    @rohankarkare7493 4 ปีที่แล้ว +1

    You tube वर ऐकून सुद्धा standing ovation दिले इतके भारदस्त व्यक्तिमत्व आहे तुमचे.

  • @madhurijoshi2434
    @madhurijoshi2434 5 ปีที่แล้ว +2

    शब्दांची, विचारांची ताकद किती अफाट असू शकते याचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. कोणत्याही प्रसंगात जेव्हा नाती घट्ट असतात आणि ठामपणे आपल्याला साथ देतात, तेव्हाच सगळे शक्य होत, हे अनघाने आवर्जुन सांगितल. आजच्या काळासाठी अत्यंत महत्वाचे विचार अप्रतिम शब्दात मांडले. स्वानुभवाने जी परिपक्वता येते, त्याच यथार्थ वर्णन तिच्या शब्दात ऐकले. प्रत्येक व्यक्तिला कधीनाकधी आकस्मित दुःखदायक अनुभवातूनच जावं लागतं, अशा प्रसंगात कसे वागावे याचा विचार या videotun मिळाला.

  • @swatibhosle8562
    @swatibhosle8562 4 ปีที่แล้ว +1

    मी स्वाती भोसले. अनघा मोडक याची मुलाखत ऐकून मन भारावून गेले डोळे पाणावले. लिखाण आणि बोलणं दोन्ही अप्रतिम. अनघाला व त्यांच्या जिद्दीला, उर्जेला सलाम. पुढील वाटचालीसाठी व यशासाठी शुभेच्छा,अनेक आशीर्वाद.

  • @avghanekar123
    @avghanekar123 5 ปีที่แล้ว +24

    जबरदस्त! याहून जास्त सकारात्मक दृष्टिकोन असूच शकतच नाही

  • @yashwantpatil1298
    @yashwantpatil1298 5 ปีที่แล้ว +16

    नुसती द्रुष्टी असुन उपयोग नाही , तर अंतरद्रुष्टी असावी लागते.
    द्रुष्टी अनेकांना आहे पण आपल्या सारखी अंतरद्रुष्टीचीच वानवा आहे. ती ज्या दिवशी सर्वांना येईल त्या दिवशी भारत सुजलाम सुफलाम होईल.

  • @orpearnav7260
    @orpearnav7260 5 ปีที่แล้ว +1

    I thanks to u... तुझ्यासारखी दृष्टी देवाने मला ही द्यावी ...
    तुझ्यासारखी कविता ita मला ही सुचावी ..
    आयोजकांची आभार...

  • @varshaunntirane7890
    @varshaunntirane7890 5 ปีที่แล้ว +16

    अनघा,तुला पुढच्या आयुष्यासाठी माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
    तुझी प्रगती होत राहो हीच प्रार्थना
    God bless you

    • @anushkasane6684
      @anushkasane6684 5 ปีที่แล้ว

      Khup chan Anagha tai tumala god bless you

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 11 หลายเดือนก่อน +1

    अनघा, खरंच बाह्य दृष्टीने मिळतं त्यापेक्षाही अंतर्दृष्टीनं मिळणारं ज्ञान आतपर्यंत पोचतं। तुझी काही वाक्य कायम लक्षात ठेवावी अशी आहेत। 😊

  • @ashapunde2772
    @ashapunde2772 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम. सुंदर किती ही विशेषण लावली तरी कमीच. कमाल आहेस गं अनघा. वक्तृत्व सुरेख ओघवती भाषा. सलाम

  • @NITESHPATIL-ue8us
    @NITESHPATIL-ue8us 5 ปีที่แล้ว +2

    काहीच शब्द नाही बोलण्याकडे....सलाम तुम्हाला

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane7105 5 ปีที่แล้ว +2

    काय बोलावे.. भावना व्यक्त नाही करता येत आहेत.. खुप छान प्रग्रती व्हावी.. हीच सदिच्छा.. स्पष्ट शब्द confident विचार आणि उच्चार. Afarmative behaviour, .. सर्व म्हणजे अनघा..

  • @prasadkshirsagar6570
    @prasadkshirsagar6570 5 ปีที่แล้ว +32

    केवळ अप्रतिम! अनघा, तुमच्याकडे पाहून आम्हाला अभिमान वाटतो! आपल्या या कारकिर्दीत ज्या सज्जनांनी आपल्याला साथ दिली त्यांना सलाम! आपण अनेकांना स्फूर्ती देणार आहात! आपल्याला ऐकून एक वेगळीच दृष्टी मिळत आहे! ...

  • @sunetragavankar1366
    @sunetragavankar1366 5 ปีที่แล้ว

    खुप खुप छान
    अशी प्रेरणा अजुनही आमच्यासारख्या डोळस माणसांची मने जिवंत ठेवतात आणि अजुन नविन काहितरी करुन दाखवायची उमेद वाढवतात अनघा किती छान गं जिवनाचा भावार्थ तुझ्या शब्दसुमनांनी तु उलगडुन दाखवलास
    तु तर प्रत्येकाची प्रेरणास्थान आहेस

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 5 ปีที่แล้ว +1

    काय सुंदर काय प्रेरक विचार ....खुप धन्यवाद

  • @manjirikhot8348
    @manjirikhot8348 5 ปีที่แล้ว +3

    GOD Bless u . U vl get back ur eyesight sureshot shree swami samarth🌷

  • @manojsuradkar3813
    @manojsuradkar3813 5 ปีที่แล้ว +2

    अनघा. अनोखी आहेस. प्रतिभेचा कळसच. तुझ्यातली ऊर्जा, सर्वांच्या सहकार्याची जाणीव, सकारात्मकता आणि जिद्द निराशेने भेदरलेल्या आमच्यासारख्या अनेकांना प्रोत्साहित करणारी आणि प्रेरणादायी नियतीने निर्मिलेली एक अद्वितीय शक्ती तू. तुझ्या करतो तू आला आणि व्यक्तिमत्वाला सलाम व तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @freebk161
    @freebk161 5 ปีที่แล้ว +4

    अनघा ,
    तू आज मला आणि इतरांना दिव्य दृष्टी दिलीस.
    तुझ्या मुखातून प्रत्येक शब्द मोत्यासारखे बाहेर पडत होते. ते वेचता वेचता काही मोती राहून गेले कारण सुरवातीपासून डोळे पाणवल्यामुळे मोती दिसेचनात. परत परत विडिओ बघावा लागणार !!!

    तुझे आईवडील, आणि इतर नातेवाईक यांना माझा साष्टांग नमस्कार. तुझ्यावर मुळचे संस्कार आणि विचार घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तुझी अध्यात्मिक बैठक आणि विचारांची भरारी पाहून तू जगातील इतर अंध आणि डोळस लोकांना दृष्टी देऊ शकशील इतकी प्रचंड ताकद तुझ्यामध्ये आहे.
    तुला मी नक्की भेटायला येणार आहे.

  • @atul6700
    @atul6700 4 ปีที่แล้ว +3

    हाय अनघा मी अनघा हिरे 8 महिन्यांपूर्वी माझे मिस्टर गेले. पहिले थोडी खचली होती पण नवरा गेल्या नंतर 18 व्या दिवसापासून त्याचा बिझनेस संभाळतेय. एक हाऊस वाइफ ते बिझनेस वूमन हा प्रवास खूप खडतर होता. पण न डगमगता माझ्या मुलींच्या भविष्या साठी उभी राहिली. देवाने माझे नुकसान केले असे म्हणत बसण्यापेक्षा आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहायला सुरवात केली. घरच्या लोकांनी आधार नाही दिला पण ते माझी ताकद बनून माझ्या मागे उभे राहिले. आधाराचे हात मिळाले असते तर कधीच माझ्या पंखात बळ आले नसते.
    तुझे भाषण मनाला स्पर्श करून गेले आणि खरच जगण्यासाठी खूप ताकद देऊन गेले.
    तू अशीच नेहेमी आनंदी रहा.

  • @MaheshJoshi_wellington
    @MaheshJoshi_wellington 5 ปีที่แล้ว

    Salute ! Anagha 🙏 amhi dole Asun andhale ahot ani tumhi nasun dolas ahat.Lavkarat lavkar drushti yeude heech ishwarcharani prarthana 🙏

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 4 ปีที่แล้ว

    वाह वाह सुंदर... अप्रतिम...!!! 👌🏼👌🏼👏🏼👏🏼

  • @deepakpatel4186
    @deepakpatel4186 5 ปีที่แล้ว +4

    Sister you are very very superb...
    Hats of to your family

  • @user-qr9tx9rb5h
    @user-qr9tx9rb5h 5 ปีที่แล้ว

    सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे आपलं कुटुंब असतं आणि समाज आपल्याला स्वीकारण्याआधी कुटुंबाने स्वीकारणेही तेवढंच महत्त्वाचं असतं.
    तुला तुझ्या घरातल्यांनी या परिस्थितीमध्ये देखील स्वीकारलं माझ्या मते ती सर्वात मोठी गोष्ट आहे.
    आणि दुसरी गोष्ट अशी की तुला तुझ्या गुरूंनी दिलेला सल्ला मला फार आवडला,जगात फार कमी लोकांना असे गुरू मिळतात.
    तुझ्या या सांगण्यामुळे फक्त डोळ्यांनी डोळस असणाऱ्या लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर मला नक्की आनंद होईल.
    मी उलटसुलट लिहिलं आहे परंतु हे मनापासून लिहिलं आहे.
    Sudam pandule Fergusson College Pune

  • @kishorepatki8884
    @kishorepatki8884 5 ปีที่แล้ว +5

    Truly inspiring Anaghaji.God bless you.

  • @sunitakeni6281
    @sunitakeni6281 5 ปีที่แล้ว +1

    मनस्वी .. मनोवेधक .. नमन माझे या तेजस्वी शलाकेला

  • @aaratiyeole1365
    @aaratiyeole1365 4 ปีที่แล้ว

    अनघा तुझा प्रवास खुपच प्रेरणा देणारा आहे. तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत.

  • @sunitpendse
    @sunitpendse 5 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त. तुमच्या भाषेतून अनेक गोष्टी शिकवून गेलात. तुम्हांला सलाम!

  • @rahideshpande5694
    @rahideshpande5694 3 ปีที่แล้ว

    खुप सकारत्मक विचार 🙏🙏🙌🙌👍👍

  • @deepakgundaye4084
    @deepakgundaye4084 5 ปีที่แล้ว +14

    फारच सुंदर, प्रेरणादायी... निशब्द.. डोळे पाणावले...
    सुरुवातीची बटरस्काॅच आईस्क्रीमची जी गोष्ट अनघाने सांगितली ती माझ्या एका लेखक मित्राची आहे. विकास चव्हाण यांची...
    *"बटरस्कॉच आइस्क्रिम"*
    टीचरने शिट्टी वाजवली तशी चिमुकल्या पावलांचा ५० मुलामुलींचा गट शाळेच्या मैदानावर धावू लागला.
    एकच लक्ष. पलिकडच्या टोकाला टच करुन लवकर परत यायचं.
    पहिल्या तिघांना बक्षिस. पहिल्या तीनसाठी सगळ्यांची चढाओढ.
    बघायला सगळ्यांचे आईबाबा म्हणुन उत्साह जरा जास्तच होता.
    पावले परत फिरली. गर्दीतुन बघ्यांचे "पळ पळ" म्हणून आवाज वाढू लागले.
    पहिल्या तिघांनी हात वर करत आनंदाने पालकांकडे पाहिलं.
    चौथे, पाचवे काठावर बक्षिस हुकले म्हणुन नाराज झालेले. काही पालकही नाराज झालेले.
    आणि नंतरचे आता बक्षिस मिळणार नाही, आता कशाला पळा म्हणत चालू लागले.
    त्यांच्यासोबत दमलेले, मनापासुन शर्यतीत नसणारे सगळेच.
    ५ व्या आलेल्या मुलीने नाराजीनेच बाबाकडे धाव घेतली.
    बाबानेच आनंदाने पळत पुढे जाऊन तिला उचलून घेतले आणि म्हणाला,
    " वेल डन बच्चा. चल कुठले आइस्क्रिम खाणार?".
    " पण बाबा माझा नंबर कुठे आलाय ? मुलीनं आश्चर्याने विचारलं.
    " आलाय की. पहिला नंबर आलाय तुझा बेटा. "
    " कसा काय बाबा. ५ वा आला ना ?" मुलगी गोंधळलेली.
    "अगं, तुझ्या मागे कितीजण होते ?".
    थोडीशी आकडेमोड करत ती म्हणाली ,
    " ४५ जण".
    " म्हणजे उरलेल्या ४५ जणात तू पहिली आलीस. म्हणून तुला आइस्क्रिम."
    " आणि पुढचे चार जण ?". गोंधळ वाढला तिचा.
    " त्यांच्याशी आपली शर्यत नव्हतीच यावेळी".
    "का ?".
    " कारण त्यांनी जास्त तयारी केलेली. आता आपण
    परत चांगली तयारी करायची. मग पुढल्यावेळी तु
    ४८ जणात पहिली येणार. त्यानंतर ५० जणात."
    "असं असतंय बाबा ?".
    " होय बेटा असंच असतंय ".
    "मग पुढल्यावेळी शेवटी एकदम मोठी उडी मारुन पहिली येते की ?". आता मुलीला उत्साह आलेला.
    " एवढी घाई कशाला बेटा ? पाय मजबूत होऊ देत की. आणि आपण आपल्यापुढे जायचं. दुस-यांच्या नाही".
    तिला फार काही समजलं नाही पण विश्वासानं म्हणाली, " तुम्ही म्हणाल तसं ".
    "आता आइस्क्रिम सांगा की हो ". - बाबा.
    मग मात्र नवीन आनंद गवसावा तशी, मुलगी ४५ जणात पहिली आल्याच्या आनंदात बाबाच्या खांद्यावर हसत मान ठेऊन जोरात ओरडली,
    " मला बटरस्कॉच आइस्क्रिम पाहिजे".
    विकास चव्हाण
    कोल्हापुर
    ९४२२७४८२७१

  • @nanduinamdar935
    @nanduinamdar935 5 ปีที่แล้ว +2

    अनघा यांची तिसरी दृष्टी जागृत झाली आहे . Third eye sight ! श्रद्धा व चिकाटी चे उत्तम प्रेरणादायी उदाहरण !

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 5 ปีที่แล้ว

    जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमचे कार्य संपले तरी टाळ्या वाजतच राहील्या पाहिजेत... अप्रतिम... मंत्रमुग्ध झालो.

  • @gaurichavan7981
    @gaurichavan7981 5 ปีที่แล้ว +3

    Ur a big inspiration to all of us. Thanks for sharing ur experience bcz it will always help to motivate us. May God always bless you.

  • @prajaktashah3887
    @prajaktashah3887 5 ปีที่แล้ว +2

    such a inspiration you are! amaizing ! god bless you!

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 5 ปีที่แล้ว +17

    अनघा जी तुमची कहाणी ऐकून मनात निर्माण झालेल्या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे..
    तुमच्या जिद्दीला सलाम..
    तुमच्या कष्टांना सलाम..
    तुमच्या कार्याला सलाम..
    सरस्वती मातेचा वरदहस्त आहे तुमच्यावर..
    खूप मोठ्या व्हा..तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा..
    मी खरेच भाग्यवान आहे कि तुमच्या सोबत काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकलो..

    • @rajendrakhanorkar5279
      @rajendrakhanorkar5279 5 ปีที่แล้ว

      अनघा तुमच्या जिद्दीला मानाचा मुजरा

    • @vijaymahajan9138
      @vijaymahajan9138 5 ปีที่แล้ว

      Awesome

  • @AsawariChandorkar
    @AsawariChandorkar 11 หลายเดือนก่อน

    शब्द कमी पडतील मी तुम्हाला बघीतले नाही पण तुमचय वाणीने वषॅ वषॅ ओळख ते असे वाटतेय डोळ्यात लेख पाणी थांबतच नाही खुप काही शिकले त्रिवार सलाम ❤

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 5 ปีที่แล้ว

    वा अनघा वा! सलाम तुझ्या जिद्दीला व दृष्टीकोनाला!

  • @prajaktaupasham4431
    @prajaktaupasham4431 5 ปีที่แล้ว +1

    Very proud of you Anagha. You have opened a new perspective of life towards me 🙏

  • @prakashjadhav9912
    @prakashjadhav9912 5 ปีที่แล้ว

    सलाम तुझ्या जिद्दीला ,दृष्टिकोणाला

  • @priyabodke8966
    @priyabodke8966 5 ปีที่แล้ว

    Khup Chan Anagha tai...

  • @alkafunde7982
    @alkafunde7982 5 ปีที่แล้ว

    खरचं खुप छान ** अनघा खुप खुप अभिनंदन ****👌👌👌💐💐💐

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds 5 ปีที่แล้ว +1

    Waaaaa kya bat hai anagha 👌 👌 👌 anek anek abhinandan 🙏🙏🙏

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 5 ปีที่แล้ว +1

    जगण्याची सकारात्मक दृष्टी देणारे विचार.सलाम.

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 5 ปีที่แล้ว +1

    God bless you dear !! You are a rare gem !!!! 🙏

  • @laxmichhayahule9069
    @laxmichhayahule9069 5 ปีที่แล้ว

    जय गुरु देव...अनघा......तुझ्या सदूगुरूना...माझा..प्रणाम.....

  • @divineashish9385
    @divineashish9385 5 ปีที่แล้ว

    अप्रतिम प्रेरणादायी वक्तृत्व 💐👌

  • @sanjivanimatey7088
    @sanjivanimatey7088 5 ปีที่แล้ว +2

    Wa khup chan ek dolas drustikon

  • @vishakhakambli3706
    @vishakhakambli3706 5 ปีที่แล้ว

    फारच सुंदर अप्रतिम

  • @ajaydeshpande9558
    @ajaydeshpande9558 5 ปีที่แล้ว +1

    Really Inspiring !!! God Bless you Dear !!!

  • @Shriketankulkarni
    @Shriketankulkarni 5 ปีที่แล้ว

    खरंच khup Chan

  • @radhakrishnamuli3356
    @radhakrishnamuli3356 5 ปีที่แล้ว

    अनघाताई , आपले मनापासून अभिनंदन....

  • @ishwardasmungusmare1564
    @ishwardasmungusmare1564 4 ปีที่แล้ว +1

    Bohot hard

  • @shreya5124
    @shreya5124 11 หลายเดือนก่อน

    Hats off to you Anagha n each and every member of your family...God bless you always!

  • @madhuram.6771
    @madhuram.6771 4 ปีที่แล้ว

    अनघा तुझ्या सकारात्मक विचारांनी मला दिशा मिळाली.माझ्या मुलाला ४महिन्यापुर्वी अपघातामुळे उजव्या डोळ्याची दृष्टी गेली व मी हि अनेक उपचार केले राहावत नाहि म्हणुन सुचवत आहे.लक्ष्मी रोडवरील (कुलकर्णी पेट्रोलपंपा जवळ)डॉ.साठे आहेत त्यांच्याकडे जा.खुप अनुभवी आहेत ते.

  • @s.s.k3210
    @s.s.k3210 5 ปีที่แล้ว +3

    MAY GOD BLESS YOU

  • @sarangthemdeo1182
    @sarangthemdeo1182 5 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणादायी...👌👌👌

  • @r.kdeshpande1734
    @r.kdeshpande1734 5 ปีที่แล้ว

    Great.... Nice inspiring... Anaghatai....

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 5 ปีที่แล้ว +1

    Great anagha tu khup great ahes.
    All the best tula jivanasathi...😍❣

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 5 ปีที่แล้ว

    खूपच छान आणि प्रेरणादायी🙏🙏👏👏

  • @vandanathete2156
    @vandanathete2156 4 ปีที่แล้ว

    Very nice Anagha hats of to you.....

  • @bhushangiratkar3
    @bhushangiratkar3 5 ปีที่แล้ว

    Grate inspiration... thanks a lot

  • @pankajmandwe1
    @pankajmandwe1 5 ปีที่แล้ว

    Chan... Khup chan...

  • @abhijitraut376
    @abhijitraut376 5 ปีที่แล้ว +19

    Hats off👌👌👌
    आणि आपण साध्या साध्या गोष्टीवर रडत असतो/बसतो.

  • @priyajadhav7000
    @priyajadhav7000 4 ปีที่แล้ว

    Khup ch sunder....

  • @bujgavna
    @bujgavna 5 ปีที่แล้ว

    Best of best. Ultimate.....thank you for the great inspiration.....

    • @alkapatil2925
      @alkapatil2925 4 ปีที่แล้ว

      Angha Salam tuzya jiddila

  • @drmrunalmahajan3509
    @drmrunalmahajan3509 5 ปีที่แล้ว +1

    Very inspiring 👌👌

  • @bharatisudame8929
    @bharatisudame8929 4 ปีที่แล้ว

    अनघा ग्रेट आहेस.

  • @vishalbugale4656
    @vishalbugale4656 5 ปีที่แล้ว

    शब्द अपुरे आहेत ताई..... U r great...

  • @prakashkumarsantara7647
    @prakashkumarsantara7647 4 ปีที่แล้ว

    Hello Anagha Ji Shree Swamy Samarth 🙏. Nakki tumchi drusti parat yetil hi majhi khatri aahe v hi Swamy Charani prarthana. Pan Swamin cha niyojan kay asel konach thauk tyani tumhala manachi divya drushti dili aahe. You are one of my role model of my life. Tumhi far sunder dista pan, ho pan tumche shabda tumcha peksha hi jast sunder aani anmol aahet. Manala bana sarkha tar nahich pan phulan sarkha aanand detat v det rahnar. Thank you for such lovely n emotional speech. God Bless you 🙏.

  • @sumatisumati1229
    @sumatisumati1229 4 ปีที่แล้ว

    Quite Inspiring Anagha .. Hats off to you....

  • @alpanajadhav5691
    @alpanajadhav5691 5 ปีที่แล้ว +1

    Best of luck dear anagha....God is with u dear.....U r great

  • @sunitavishwarupe5005
    @sunitavishwarupe5005 5 ปีที่แล้ว +1

    Great. God bless u.

  • @aparnajagadale8145
    @aparnajagadale8145 5 ปีที่แล้ว

    Great tai...... god bless you......

  • @pratikshapatil0108
    @pratikshapatil0108 3 ปีที่แล้ว

    Ekch number👍👌

  • @ravinazirkar3166
    @ravinazirkar3166 3 ปีที่แล้ว

    Sunder khup chan ahe video

  • @kalpanadhavale5290
    @kalpanadhavale5290 5 ปีที่แล้ว

    U can definitely see this world... No doubts in it...

  • @uragendongre4046
    @uragendongre4046 5 ปีที่แล้ว

    This an excellent inspiring talk , Hats up to her !

  • @grow2infinity803
    @grow2infinity803 5 ปีที่แล้ว

    Khupach chhaan

  • @mceducationist1488
    @mceducationist1488 4 ปีที่แล้ว

    Khup khup mast shbdach nahit mazyakde pan jidd kamalichi ahe sarvani eakav ani sarvani yatun shiknysarkhach ahe ani mee punha punha hi jiddichi gosht eakte jyani mala fakt urja milte khup mothe ahet te sarv jyani pathimba dila ya tai la

  • @vikaschavan4792
    @vikaschavan4792 5 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम, जबरदस्त....खूप छान. खूप प्रेरणादायी.
    भाषण ऐकणं स्वर्गीय अनुभव होता.
    सुरुवातीला माझ्या बटरस्कॉच कथेचा उल्लेख करून कथेचा सन्मान वाढवला याबद्दल आभार.
    विकास चव्हाण कोल्हापूर 9422748271

  • @ranjitgholve6359
    @ranjitgholve6359 5 ปีที่แล้ว +1

    Really motivational # change the looking in looking in life...

  • @dikshaswami2408
    @dikshaswami2408 5 ปีที่แล้ว +1

    Great personality.

  • @avghanekar123
    @avghanekar123 5 ปีที่แล้ว +3

    बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचां डोळां पाहों गेलें तंव । भीतरीं पालटु झाला ॥६॥ याचा अर्थ आज कळला

  • @maithilidalvi105
    @maithilidalvi105 5 ปีที่แล้ว

    This was the best inspirational thoughts I have heard till now...Thank u so much for giving me a different vision to my life nd not looking at the bad part which everyone has in their life but we have to overcome that bad to good to achieve success

  • @prashantd.dagadkhair2540
    @prashantd.dagadkhair2540 5 ปีที่แล้ว

    अप्रतिम ...

  • @shilambarijamdale3793
    @shilambarijamdale3793 5 ปีที่แล้ว

    अनघा सलाम तुझया जिंदीला अग १ महीनया पुवीँ माझया मुल्ला डेंगु झाला होता डोळयात रक्त उतरल होत१० दिवस रूबीला पुनयाला अँडमीट होता तुझ बो लनऐकुन माझया डोळयात पाऩी

  • @rajeshribhalerao4333
    @rajeshribhalerao4333 5 ปีที่แล้ว +1

    Very very inspiring

  • @bhushangiratkar3
    @bhushangiratkar3 5 ปีที่แล้ว

    Superb and Superb only

  • @mahendrakhairnar3707
    @mahendrakhairnar3707 3 ปีที่แล้ว +1

    Nice mam ✋😎😇👍👍😘

  • @dattatrayak.nimbhorkar4872
    @dattatrayak.nimbhorkar4872 5 ปีที่แล้ว +1

    खूप खूप शुभेच्छा।

    • @anamika9
      @anamika9 5 ปีที่แล้ว

      Tuzya pratibhecha gabhara akhand ujlat raho
      Khup khup shubbhechha

    • @RanjanaLatkar2021
      @RanjanaLatkar2021 5 ปีที่แล้ว

      अनघा, तुझ्या द्रुष्टिकोनाने नवीन द्रुष्टी मला मिळाली. धन्यवाद !

  • @janhavi23
    @janhavi23 4 ปีที่แล้ว

    Anagha tula khup khup salam👏👏

  • @sujataparanjape1468
    @sujataparanjape1468 5 ปีที่แล้ว +1

    अनघा तूला पूढिल आयूषयासाठी खूप खूप शूभेचछा तूझ सकारात्मक थिंकिग तूझ्या सदैव पाठिशी राहिल आंणि आमहा सर्वाच्या शूभेशचचा

  • @shraddhachaudhary3285
    @shraddhachaudhary3285 5 ปีที่แล้ว

    Inspirational 👏👏👏

  • @sanchitakokate4270
    @sanchitakokate4270 5 ปีที่แล้ว

    Great. Speechless

  • @akashtupare7177
    @akashtupare7177 5 ปีที่แล้ว

    Wordless experience of mind using your mind-blowing voice 🙌🙏🙏🙏🙏🙏

  • @something3248
    @something3248 5 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम ...👌🙏
    मंजिले उन्हीको मिलती है जिनकी सपनो मैं जान होती है
    सिर्फ हात पैर आँख शरीर होने से काफी नही हौसला मेहनत से होती है
    या ओळी आपल्या कर्तुत्वाला साजेसा आहे👍👌👌👌🙏

  • @madhurajoshidance7112
    @madhurajoshidance7112 4 ปีที่แล้ว +1

    Heartuching 😭😭😭😭

  • @tanmaynankar8776
    @tanmaynankar8776 5 ปีที่แล้ว

    So inspired mam...

  • @mamatapai480
    @mamatapai480 5 ปีที่แล้ว +1

    Anagha Tula Salam. God bless you dear.