Foody Ashish | Chitale Bakarwadi | Bakarwadi Recipe | चितळेंची बाकरवडी कशी बनते | चितळे बंधू बाकरवडी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • ‘लवंगी मिरची’ यूटयूब चॅनेल सर्व खवय्यांसाठी घेऊन आले आहे, चितळ्यांची बाकरवडी बनविण्याची रेसिपी. अथपासून इतिपर्यंत... दर्जेदार कच्च्या मालाच्या निवडीपासून ते अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पॅकिंग करण्यापर्यंत. आणि ही सर्व रंगतदार माहिती आपल्याला देत आहेत ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे भागीदार इंद्रनील चितळे. 'फूड आशिष'मध्ये यावेळी आपण चितळेंची बाकरवडी कशी तयार होते, हे थेट त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जाऊन पाहणार आहोत.
    माध्यमांमधील ट्रेंड सध्या झपाट्याने बदलतोय. पारंपरिक माध्यमांऐवजी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग करणारे चॅनेल्स, पेजेस नि व्यक्तींच्या माध्यमातून नव्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच लोकप्रिय आहे. हे लक्षत घेऊन ‘लवंगी मिरची’ यूटयूब चॅनेलने ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे इंद्रनील चितळे य़ांच्याशी संपर्क साधला नि खेड-शिवापूर येथील चितळेंच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील अत्याधुनिक पॅकिंग यंत्रणा तसेच बाकरवडीची संपूर्ण प्रक्रिया शूट करण्यासंदर्भात विचारणा केली. इंद्रनील यांनीही कोणताही वेळ न दवडता लगेच त्याला परवानगी दिली आणि शूटिंग यथासांग पार पडले.
    इंद्रनील चितळे हे व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आम्हाला भेटले आणि सर्व प्रक्रिया त्यांनी सविस्तर समजावून सांगितली. याबद्दल लवंगी मिरचीकडून त्यांचे मनःपूर्वक आभार...
    Bakarwadi,bhakarwadi recipe,bakarwadi recipe in marathi,how to make bakarwadi,marathi padarth,chitale bhakarwadi,how to make bhakarwadi,चितळे बंधू स्टाइल बाकरवडी,maharashtrian padarth,chitale bakarwadi,कुरकुरीत बाकरवडी,bakarwadi recipe,bakarvadi recipe,chitale bhakarwadi recipe in marathi,chitale bakarwadi review,chitale bakarwadi recipe,chitale bakarwadi pune,chitale bakarwadi ingredients,chitale bakarwadi factory,bhakarwadi recipe marathi,marathi recipe

ความคิดเห็น • 348