संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे २०२४ 🚩🙏🏻 माऊली 🥹 डोळे भरून आले !!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शहरात रविवारी 30 जून २०२४ उत्साहात आगमन झाले. आठशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा असलेल्या पंढरपूर वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात दाखल झाले आहेत..
    ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात संपूर्ण अलंकापुरी दुमदुमली
    दरम्यान, काल (29 जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. सायंकाळी 7.08 मिनिटांच्या दरम्यान पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी मानाच्या 48 दिंड्यांनी माऊलींच्या पादुका मार्गस्थ होताना जय हरी विठ्ठलाचा जल्लोष केल्याचे पाहायला मिळालं. तिन्ही संजेच्या वेळी माऊलींनी प्रस्थान ठेवलं आणि यावेळी संपूर्ण अलंकापुरी दुमदुमली होती. त्यानंतर पालखी मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घातली. रात्री पालखीचा मुक्काम हा परंपरेनुसार माऊलींच्या आजोळघरी झाला.
    वारकरी आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर असा साधारण 250 किलोमीटरचा पल्ला पायी पार करतात. मात्र, या वारकऱ्यांना ना कुठे शीण येत ना वारकरी दमतात. कारण वारकरी नाचत गात टाळ वाजवत आणि हरिनामाचा गजर करत पुढे चालतात. फुगडी भजन करत मजल दर मजल करत पंढरपूर गाठत असतात. वारीत शेतकरी मंडळी जास्त प्रमाणात सहभागी होतात. तसेच नोकरदार, सामाजिक क्षेत्रात काम करणारे तरुण तरुणी देखील मोठ्या प्रमाणात या वारीत सहभागी होतात.

ความคิดเห็น • 1

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 หลายเดือนก่อน +1

    .....Swargiy. sundar....🚩