म्हातारी माणसे पाहुणे म्हणून आली तरी नकोशी वाटतात...असे का..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • म्हातारी माणसे पाहुणे म्हणून आली तरी नकोशी वाटतात...असे का
    #afterage60
    #म्हातारपण
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 371

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 8 หลายเดือนก่อน +16

    खूप मोठी मार्मिक गोष्ट सांगितली तुम्ही डॉक्टर.जेष्ठ नागरिक असं वागायला लागतात तेव्हा खरंच फार मोठी पंचाईत होते सगळ्यांची.

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 8 หลายเดือนก่อน +28

    सध्याच्या काळात कोणी काका मामा मावशी हे सगळे कोणीही कोणाकडे जात नाहीत. ज्याला त्याला आपापली घरं आहेत त्यांची आपापली माणसं आहेत त्यांची काळजी घेणारी.

  • @nandathakur440
    @nandathakur440 8 หลายเดือนก่อน +37

    मॅडम! अगदी बरोबर,मी माझ्या सासू चे
    सर्व काही बेड वरच करत होते ,तरी देखील माझी ननंद मला टोमणे मारायची
    ती एक दिवसा साठी यायची पण
    मी माझ्या सासू बईची दहा वर्ष सेवा केली तरीही घरातील जाऊ , दिर,नणंद एक दिवस पण स्वतःच्या घरी त्यांना नेले
    नाही ,दुसऱ्यांच्या काष्टा ची काही किंमतच नसते ,असो.,ईश्वर पाहतोच आहे

  • @swatikelkar6340
    @swatikelkar6340 7 หลายเดือนก่อน +8

    पूर्वी आपली मावशी आत्यां जवळ खूप जवळीक असते.पण आता आपल्या मुलाचा संसार चालू झाला आहे. आणि आपली आत्या मावशी काकू मामी आपल्या कडे रहायला आली. तर आपल्याला त्यांच्या बद्दल प्रेम वाटते.आपल्याला त्यांनी रहावं आपल्याकडे असं वाटतं. पण पुढच्या पिढीला त्यांच आदरातिथ्य करणं फार अवघड जाते.त्यात मावशा आत्यांची म्हणजे आपल्या आधीची पिढी. म्हणजे खाण्यात पथ्य असतात.मग आपल्याला अवघड होऊन जातं.आणि किती दिवस रहाणार.हे विचारता पण येत नाही. त्या मुळे आपण आपल्या पासूनच सुधारणा करावी.आपणच पाहुणे म्हणून दोन दिवसाच्या वर कोणाकडे जाऊ नये

  • @VeenaMahajan-iy5qx
    @VeenaMahajan-iy5qx 8 หลายเดือนก่อน +45

    कटू वास्तव प्रांजळ पणे सांगण्याची हिंमत तुमच्याकडे आहे. अवघड विषय सुद्धा सोपा करता. 😊

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 8 หลายเดือนก่อน +40

    पण जर म्हातारं माणूस चांगले वागून राहिले तर त्यांचा आधार असतो आपल्यासाठी

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 8 หลายเดือนก่อน +15

    हल्ली एका विशिष्ट वया नंतर पोटची मुल सुद्धा जड होतात,म्हातारी माणसे पण एका जागी कंटाळतात,पण कामा शिवाय घर सोडू नये .आणि जिथे जातोय त्यांनी जा म्हणे पर्यंत राहू नये.बाकी सगळ परिस्थितीवर अवलंबून असते.

  • @ujwaladhuldhar4730
    @ujwaladhuldhar4730 8 หลายเดือนก่อน +13

    खुप छान विषय आहे madam
    खुप वाईट वाटt डोळे भरून आले.आज मला ही असच वाटत प्रेमाने दोन शब्द बोलावे हिक अपेक्षा असते.😢😢

  • @sujatalathkar3447
    @sujatalathkar3447 8 หลายเดือนก่อน +11

    प्रत्येकाच्याच आयुष्याशी निगडीत असा हा विषय आहे. आणि खूप विचार करण्यासारखाच आहे. फारच सुंदर पध्दतीने मांडलात. त्यामूळे खरच स्वतःचे पुढील नियोजनही लावणे याचे महत्व कळले.
    खूप खूप सुंदर.

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru 8 หลายเดือนก่อน +24

    विषय उत्तम आहे, आणि एक दिवस प्रतेकाला ही अवस्था प्राप्त होणार आहे आणि यावर आपण आज जसे व्यक्त होतोय तसे आपल्यावर वेळ येऊ शकते त्यामुळं मातृ देवो भव, पितृ देवो भव.

    • @kanchanashriram8536
      @kanchanashriram8536 8 หลายเดือนก่อน

      ताई ,खूप छान माहिती दिली आहे❤❤

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 8 หลายเดือนก่อน +11

    हे मी गेल्या एकूण ६७ वर्षे जीवनाच्या लहान पणा पासूनच असाच अनुभवले आहे आणि कोणाच्याही घरी वस्ती राहिलो नाही

  • @jayganesh1078
    @jayganesh1078 8 หลายเดือนก่อน +13

    आजचा विषय खूप वास्तव, नाजूक आहे, पण खूप योग्य पद्धतीने मांडलात. म्हातारपणी फक्त दोन आपुलकीच्या शब्दांची गरज असते. त्यांचा सगळीकडून कोंडमारा होत असतो म्हणून ते कोणाशी स्पष्ट बोलू शकत नाहीत आणिपुढच्या पिढीत गैरसमज होतात

    • @shobhajagzap4753
      @shobhajagzap4753 8 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर आहे. कोण तरी समजून घेणारी माणसं हवी असतात.

    • @kanchanandhere1916
      @kanchanandhere1916 8 หลายเดือนก่อน

      ​@@shobhajagzap47532:57

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 8 หลายเดือนก่อน +49

    साठी नंतर मी व माझी पत्नी स्वतः च्या मुलांच्या घरी जाणे सोडले म्हणून एकदम सुखी आहोत. हौस म्हणून मी पुण्यात स्वतः ची व पत्नीची व्यवस्था केली.ही संस्कृती ठराविक गटाने आणली.

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 หลายเดือนก่อน +9

    माहीत असतं हे सगळं पण तूमी छान शांतपणे आणि स्पष्ट बोलल्यामूळे समजावून सांगितल्या सारखे अगदी बरोबर वाटले विषय चांगला आहे

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 8 หลายเดือนก่อน +11

    हेच खरं तर बोलण्या सारखे विषय आहेत आणि बोललेच पाहिजेत .
    म्हातारपणीही Strong रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे .

  • @mrunaldeshpande7298
    @mrunaldeshpande7298 8 หลายเดือนก่อน +13

    खरं आहे, पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी रावणा, तिसऱ्या दिवशी राही त्याची अक्कल जाई

  • @nirmalaghuge1392
    @nirmalaghuge1392 8 หลายเดือนก่อน +12

    मॅडम आजची परिस्थिती अशीच आहे त्यामुळे म्हाताऱ्या माणसांनी आपली तबेत सांभळने आणि आपलयाच घरात राहणे जरी कुठे गेलात तरी दोन दिवस राहून परत आपलया घरी येणे दुसऱ्याच्या घरात त्याना त्रास होईपर्यंत राहू नये हाच उपाय आहे आणि तुमचा प्रतेक शब्द खराच आहे मॅडम. 👍🙏🙏

    • @sandhyachinchwadkar9317
      @sandhyachinchwadkar9317 8 หลายเดือนก่อน

      अहो काही कार्यक्रम आहे आणि तो अगदी जवळच्या नात्यातला आहे म्हणून जवळच्याच नात्यातल्या व्यक्तीकडे येऊ का असं विचारलं तरी लोकांना नको असतं.बोलण्यातून टाळाटाळ दिसून येते .मग घर सोडून रुसून नातेवाईकांकडे जाणं आता शक्यच नाही. फोनवर गोड गोड बोलणं मेसेज पाठवण एवढी संकुचित नाती झाली आहेत सध्या

    • @surekhaalurkar8396
      @surekhaalurkar8396 8 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरं

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok 3 หลายเดือนก่อน +1

    ताई आज खरच खूप छान विषय छेडलात गरज आहे या विषयावर बोलण्याची प्रत्येकाला वाटतं हे माझ्याकडे घडत आहे म्हणून लोक मूग गिळून गप्प बसून राहिलो राहिलो तर प्रश्न सुटत नाहीत

  • @user-kk1de9by8t
    @user-kk1de9by8t 8 หลายเดือนก่อน +29

    म्हातारं पणी माणूस लहान मला सारखं वागते. त्याचं मन समजून घेण्याची गरज आहे.

  • @shashikantgaimar7929
    @shashikantgaimar7929 8 หลายเดือนก่อน +5

    व्यक्ती तितक्या प्रकृति , सर्वानाच सदा सर्वकाळ सौख्य लाभेल असे नाही, सुदैवाने मी हि ७७ वर्षांचा एकटाच मस्त आयुष्य जगत असलेला रिटायर आहे. अगदी शेजारी, जवळचे नातेवाईकहि वेळोवेळी संवाद साधणारे आणि मदतीला धावणारे आहेत. माझे जीवन सफल असल्याचे मला वाटतं. योगायोग ईश्वरकृपा.😊

  • @pranotishinde3987
    @pranotishinde3987 8 หลายเดือนก่อน +7

    Tai तुम्ही बोलता ते अगदी खरे आहे. खरंच छान सांगितले . सगळे अनुभव मी घेतले आहे

  • @seekertruth72
    @seekertruth72 7 หลายเดือนก่อน +1

    या विषयाला कोणीही हात लावला नाही, धन्यवाद तुम्ही अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडले आहे

  • @sadashivsalgaonkar4346
    @sadashivsalgaonkar4346 8 หลายเดือนก่อน +6

    कसं आहे,आजच्या घडीला घरात 4 माणसं,2मुलं आणि आई वडील.प्रत्येक जण आपल्या कामात,पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांच्या दिनचर्येंत एकदम फरक पडतो,त्यांनाही अवघडल्या सारखं होतं.मग आपल्यासाठी जेवण बनवा,तेच असले तर जे असेल त्यात भगवून घेतात ते.मागे असं वाटत पाहुणे म्हणून न जाणच बरं.

  • @rameshpatil3673
    @rameshpatil3673 8 หลายเดือนก่อน +15

    मॅडम अगदी अगदी बरोबर बोललात. आम्हाला पण हे अनुभव आलेले आहेत.

  • @surekharanade270
    @surekharanade270 8 หลายเดือนก่อน +6

    मॅडम, मला या विषयाबद्दल काही बोलायचे नाही । पण पाहुण्यांच्या बाबत जे एक तत्व [ किंवा बोलण्याचा प्रघात ] आपण सांगितला त्याच्या पुढील जोड मी माझ्या आईकडून ऐकला होता तो असा ,.....
    पहिल्या दिवशी पाहुणा ,दुसर्‍या दिवशी पै ,
    तिसऱ्या दिवशी अक्कल गयी [ गै ]
    चवथ्या दिवशी लाथा खाई ।

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 8 หลายเดือนก่อน +20

    लौकिक जगात कोणी कुणाचंही नसतं, फार काय आपण आपले सुध्दा नसतो, हे समजून घेतले तर निसर्गावस्थे प्रमाणे मार्ग सूचत जातो .

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 8 หลายเดือนก่อน +85

    मॅडम, केवळ म्हातारं माणूसच नव्हे हो..... तर अगदी कुणीही स्वतः च्या घराशिवाय दुसरीकडे फार काळ मानाने राहू शकत नाही.... किंबहुना त्याला रहायला अवघडल्यासारखं वाटतं. देवा, असं कुणाच्याही बाबतीत होऊ देऊ नकोस.

    • @prabhakhursange4604
      @prabhakhursange4604 8 หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे मॅडम पण मला सूधा घरात कटांळा येतो कारण मूलानां काही बोललेले सहन होत नाही तरी घरात पुर्ण आर्थिक बाजू साभांळतो असे कुठे तरी जाऊन सेवा करावी

    • @Happiness394
      @Happiness394 8 หลายเดือนก่อน +2

      *हो अगदी बरोबर आहे....हे मी स्वतः अनुभवलेय* 😢😢

    • @mp-vy2pz
      @mp-vy2pz 8 หลายเดือนก่อน +4

      स्वतःचे घर ते घर दुसरेचा घरी फक्त 2 किंवा 3। किंवा जास्तीत जास्त 1 हफ्ता बस मग बघा नंतर

    • @shrirangkatre8467
      @shrirangkatre8467 8 หลายเดือนก่อน +1

      Old .age is a big problam to the old persons.

    • @hemabhandare9223
      @hemabhandare9223 8 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @sandhyakamble7750
    @sandhyakamble7750 8 หลายเดือนก่อน +9

    ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती .पुढील आयुष्यात हा विचार मार्गदर्शक ठरेल

  • @hemabhandare9223
    @hemabhandare9223 8 หลายเดือนก่อน +6

    मॅडम , द्या की त्यांना आसरा . काय बिघडतं? मन मोठं करा . आपल्यावर विश्वास असल्याने येतात मोठे लोक आपल्याकडे.

    • @jayathange1196
      @jayathange1196 8 หลายเดือนก่อน

      U right 👌

    • @user-jh2xg2wd9k
      @user-jh2xg2wd9k 7 หลายเดือนก่อน

      हो अगदी बरोबर आहे प्रत्येक घरातील माणसांनी एकमेकांना साथ आधार प्रेम आपुलकी माया जिव्हाळा कुणी पाहुणे राहिला आल्यावर दिला पाहिजे त्यांना देवाच्या कृपेने कधी काही कमी पडणार नाही त्यांना देव सुध्दा भरभरून सुख देईल त्यांना म्हणून कुणीही कुणाच्या घरी राहायला गेले तर प्रेमाने मायेने करा सगळे कारण जे आपण देतो तेच परत मिळते आपल्याला कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ म्हातारपण येणार आहे प्रत्येकालाच असे म्हणतात कि म्हातारपण हे दुसरे बालपण असते 🙏

  • @sayalithakare6366
    @sayalithakare6366 8 หลายเดือนก่อน +28

    प्रत्येकाला हा अनुभव आलेलाच आहे...त्यामुळे लवकर relate होतो...आणि डोळ्यात पाणी ❤

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 8 หลายเดือนก่อน

      पहिल्या दिवशी पाहुणा दुसऱ्या दिवशी पई तिसऱ्या दिवशी जाई

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 7 หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही मनता ते बरोबर आहे पण वयवरध मानसांनचा कंटाळा येण्याच कारण हे जेवनाच नसून घरातील स्वछतेच आहे कारण खेड्यातील महतारे आलेले पाहुणे हे सवछ वागत नाहीत घरामध्ये बिड्या सिगारेट तंबाखू वगी खातात घरात अंगनात ते बुरकुंड टाकतात कुठेही थुकतात बाथरूम संडास चा प्राबलम होतो ते गावात रीकामी जागेत जाऊन संडासला जातात टायलेंट आहेत त्यांना त्यात बसता येत नाही बसलेतरी पाणी टाकत नाहीत त्यामुळे आताच्या मुला मुलींना ते अस्वच्छता आवडत नाही असे अनेक प्रश्न आहेत महतारे मांनसांना बोलत बसल की बर वाटते पण आता अंगनवाडी पासून मुलांच शिक्षण चालू झाले आहे संपर्ण घर लेकरांच्या शिक्षण आणि कामधंदा हे धावळीच जिवन झाले आहे त्यामुळे त्यांना बोलत बसण्याला वेळ मीळत नसते तेव्हा मला बोलत नाहीत म्हणून ते नाराज होतात तसेच त्यांच्या आरोग्याचा देखील प्रश्न आहे त्यामुळे हे आता प्रश्न बंनला आहे

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 8 หลายเดือนก่อน +8

    म्हणूनच prtekane ज्यांच्या घरात म्हातारी मानस आहेत त्या त्या सर्वांनी हा विचार करा की त्याच म्हाताऱ्या माणसांनी तुम्हाला इथ parent तुम्हाला आणलेले असते आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालेला असतो ते सहन करुन करुन त्यांची ही अवस्था झाली असते म्हणून त्यांना नीट सांभाळा

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 8 หลายเดือนก่อน +17

    वय वर्ष 60नंतर चे जीवनाचे व्यवस्थापन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे , ते ही स्वतः चे घरात , अगदी मुले मुली सुना यांना कोणताही त्रास न देता , तरच उर्वरित जीवन सुखाचे जाते , पाहुणे म्हणून श्यक तो न गेलेले बरे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 8 หลายเดือนก่อน +4

    किती सुंदर हा विषय हतळला तुम्ही. माझी आई ८६ वर्षांची. तिला दृष्टी नाही. तिला २४ तास बायका २ ठेवल्यात. परावलंबी नाजूक आहे. पण बायकांना फार त्रास देते. खूप करून घेते बसू देत नाही. ते ही चालेल हरकत नाही. पण नको त्या चौकश्या घरच्यांची त्यांचा करत बसते. थोडक्यात तिचा वेळ घालवते. पण महिनाभरात सगळ्या बातम्या मिळाल्या की त्रास देते बायकांना चिडचिड करते. तिला मनोरंजनासाठी नवीन बाई हवी असते. म्हणजे नवीन खेळणे हवे असते. पण सारख्या बायका बदलणे फार त्रास होतो भावजय ला माझ्या. नवीन शोधा बाई तिला कामे समजावून सांगा. थोडक्यात काय तर बायका टिकू देत नाही आई. काय करावे बर सांगाल का उपाय?

    • @meghalonkar9029
      @meghalonkar9029 8 หลายเดือนก่อน +3

      आपले कर्तव्य आहे असे समजून करा..त्यांचे आशीर्वाद लागतात ..आणि नाही केले तर नंतर फार वाईट वाटते..मला अनुभव आहे..

    • @seekertruth72
      @seekertruth72 7 หลายเดือนก่อน

      जर ती तुम्हाला साथ देत असेल तर ठीक आहे. पण ती नीट वागत नाही आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडत असेल तर तुम्ही वृद्धाश्रमाचा पर्याय विचार करावा. कारण एका पातळीनंतर सर्वांची सहनशीलता संपते
      घरातही तिची काळजी दोन स्त्रिया घेतात मग तीच सोय वृद्धाश्रमात केली तर काय हरकत आहे.
      हे प्रशिक्षित व्यक्तींच्या देखरेखीखाली हाताळले पाहिजे

  • @pallavipatil5560
    @pallavipatil5560 8 หลายเดือนก่อน +15

    तुमच्या आतापर्यंतच्या सर्व व्हिडिओ पैकी आजचा व्हिडिओ चा विषय इतका सटीक आणि ज्वलंत आहे की अंतर्मुख झाल्याशिवाय राहवत नाही...असे बरेच अनुभव आहेत म्हणून जास्त relate झाला.

  • @mansikhasnis4093
    @mansikhasnis4093 8 หลายเดือนก่อน +5

    आपले सगळे व्हिडिओ अतिशय छान असतात,खूप गोष्टी समजावून सांगितल्या जातात, मनापासून धन्यवाद

  • @shirishsonalkar6216
    @shirishsonalkar6216 8 หลายเดือนก่อน +6

    तुमचे विचार फारच बरोबर वाटतात, माहीत असतात, म्हणून लगेच एकदम पटतात, रोज एकच पोस्ट ऐकतो, उत्तम

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 8 หลายเดือนก่อน +6

    साठी नंतर बायकांना इतक्या वर्षांचा नवऱ्यावरचा साठलेला राग काढायचा असतो म्हणून त्या असं वागत असतील पण त्या हे कुणाशी बोलू शकत नाहीत आणि कुणी त्यांना या बाबतीत साथ देत नाहीत.

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 8 หลายเดือนก่อน +5

    आपले विचार हे अप्रतिम आहे आणि प्रत्येक काला हा अनुभव कधी तरी एकदा येत असतो , कोणाचे मन दुखावले तर अश्या घटना होत राहतात ते पूर्वी पण असायचे आणि आज सुध्धा चालू आहे आणि भविष्यात सुध्धा राहणार आहे आणि हे शहरी भागात जास्त प्रमाणात आहे गावच्या वातावरणात आजी आजोबा आपले उर्वरीत जीवन चागले जगतात आणि आजच्या शहरी जीवनात बनावट दिखावा करून स्वतःला प्रतिष्ठित दाखवण्याचा प्रयत्न केला जातो , एकसत्य गोष्ट
    मुलगा ऑफिसर झाला मोठ्या सिटी मध्ये नोकरी ,बायको हायफाय घराण्यातील मिळाली गावातून वडील चार दिवस मुला कडे जाऊन राहावे या विचाराने वडील मुलाच्या घरी आले त्यांची parsanality बघून सून बाईने त्यांची ओळख शेजाऱ्यांना नोकर आहे असे सांगून आपली इज्जत कमी होऊ न देता त्या सासऱ्याची अशी इज्जत दिली हे ऐकून तो सासरा n सांगता गावात वापस आला तो कधीही मुलाच्या घरी गेला नाही

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 8 หลายเดือนก่อน +5

    चांगला विषय अन व्यवहारी जगात आस घडत..छान सांगितलंत

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 8 หลายเดือนก่อน +3

    कितीही प्रेमाचे असले तरी परिस्थिती आणि वातावरण तसे वागायला भाग पाडते. म्हणून ऐकत्र कुटुंब पद्धती चांगली होती, आहे, आणि राहणार हा ऊपाय.

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 8 หลายเดือนก่อน +28

    माझी आई होती तोपर्यंत तिला मी संरक्षण दिले म्हणजे मझ्या आईची अकाच मोठी प्रॉपर्टी म्हणजे तिचा बंगलो ती भोळसट असल्यामुळे ती जिवंत असेपर्यंत मी ती विकू दिली नाही त्यामुळे मरेपर्यंत ती छान रहीलिकरण चार भाऊ आणि चार भावजया या दणक्यात तीलाराहायचे होते पण मी तिचे पूर्ण संरक्षण केले याचे समाधान मला आहे😊🎉

  • @mukundwalawalkar570
    @mukundwalawalkar570 8 หลายเดือนก่อน +3

    Me kanchan lihite
    वेळ आहे पण आम्ही घरचे त्याचा बाऊ करतात
    शनिवार रविवार सुट्टी असते
    तेव्हा आपला वडील आई
    बरोबर थोडावेळ गप्पा मारायलाकाही हरकत नाही
    तर त्यांनाही बरे वाटेल
    त्यांना हीच अपेशा असत

  • @supriyasathe5350
    @supriyasathe5350 8 หลายเดือนก่อน +4

    अगदी खरे बोललात
    Aplya घरात रहावे he उत्तम

  • @milannamle3551
    @milannamle3551 8 หลายเดือนก่อน +9

    खूप छान विषय आणि छान सविस्तर सांगितला आहे... खूप आवडलं...

  • @dilippandit595
    @dilippandit595 7 หลายเดือนก่อน

    खूप छान वास्तव सांगितले आहे. स्वतःच्या आई बद्दल सांगितलेला प्रसंग ऐकून डोळ्यात पाणी आले. खूप हृदयस्पर्शी विषय आहे

  • @pradeepbhosekar3023
    @pradeepbhosekar3023 8 หลายเดือนก่อน +4

    वानप्रस्थाश्रमाची कल्पना त्या मुळेच आली असावी !

  • @ilajoshi1169
    @ilajoshi1169 8 หลายเดือนก่อน +8

    आपण देखील म्हातारे होणार आहेत.

    • @ishikachannawar984
      @ishikachannawar984 4 หลายเดือนก่อน

      Ho pn amcha ghari veglach h
      Jyancha ghari h tyanach kadta

  • @urmilaphadnis7842
    @urmilaphadnis7842 8 หลายเดือนก่อน +3

    मी आजही अशी कुटुंब पहिली आणि अनुभवली आहेतः की कितीही दिवस रहा कोणीही जा म्हणत नाहि ठाणे नाशिक त्रांबकेस्वर गावी

  • @malatilokhande5013
    @malatilokhande5013 8 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार, म्हातारी माणसे, छान माहिती दिली आहे.म्हातारी होईपर्यंत जर तुम्हाला माणूस समजून घेता येत नाही तर काय अर्थ?आपली मणसे ही आपलीच असतात हे न समजल्यामुळे लोकांना त्रास देतात तो सर्वस्वी चुकीचा होय

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 8 หลายเดือนก่อน +3

    खरोखर विचार करण्यासारखा मुद्दा आपण मांडला मॅडम.धन्यवाद!

  • @vijayabadve2380
    @vijayabadve2380 8 หลายเดือนก่อน +2

    म्हातारपणात दोन वेळेस जेवण
    आणि दोन आपुलकीचे शब्द एवढंच पुरे असत

  • @seemashirodkar7959
    @seemashirodkar7959 8 หลายเดือนก่อน +8

    राम राम ताई नात्यात तुमचे विचार खुप छान असतात तुमचा अनुभव दांडगा आहे सांगण्याची पद्धत खुप अप्रतीम आहे आपले विचार व्यक्त छान करता मी वीडीओची वाट पहात पहात असते आपण कुठे राहता? जरुर कळवा धन्यवाद

    • @vidhyashinde2337
      @vidhyashinde2337 8 หลายเดือนก่อน

      😢 वास्तव आहे.

  • @SaralaHiremath
    @SaralaHiremath 8 หลายเดือนก่อน +2

    विषय खूप छान मांडला विचार व चर्चा सर्वाना करणे काळाची गरज आहे.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 8 หลายเดือนก่อน +3

    अतिशय नाजुक विषयावर अगदी खरे बोललात!आजचा ड्रेस व दागिने छान आहे,तुम्हाला शोभून दिसले.

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 8 หลายเดือนก่อน +1

    मॅडम आपण फार सुंदर अनुभवी वाचन आत्ता प्रत्येक घरात असाच प्रकार मी असं म्हणेन प्रत्येक गावात व शहरात आनंद आश्रम असावा एकटी पडलेली स्री व पुरुष राहील

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 8 หลายเดือนก่อน +1

    खूप बरोबर आणि स्पष्ट बोललात तुम्ही.आवडले.तुमचे विश्लेषण उत्तम आहे,शैली छान आहे.

  • @shubhangisahasrabudhe5050
    @shubhangisahasrabudhe5050 8 หลายเดือนก่อน +2

    खरे आहे!* पहिल्या दिवशी पाहुणा ,दुसर्‍या दिवशी मेव्हणा व तिसर्‍या दिवशी राहिल तो लाजिरवाणा *.माझी आई नेहमी म्हणायची. पण तुमचा वाक्प्रचार *पहिल्यांदाच ऐकला.अनुभव मात्र सर्वांना येणारेच आहेत .

    • @SavitaGawad-em6fm
      @SavitaGawad-em6fm 8 หลายเดือนก่อน

      पहिल्या दिवशी पाहुणा , दुसऱ्या दिवशी मेव्हणा तिसऱ्या दिवशी राहिल तो लाजिरवाणा

  • @vinataupponi
    @vinataupponi 8 หลายเดือนก่อน

    Dr.
    Nmskar.
    म्हातारी माणसं जेव्हा स्वतः आनंदी राहतात व इतरांनाही आनंदात ठेवतात , इतरांना हसवतात छान गप्पा गोष्टी करतात , त्यांच्या तब्येतीची व कामकाज बी चौकशी करतात त्यांच्या घरच्यांची आवर्जून चौकशी करतात त्यांनाआपोआपच मान मिळतो प्रेम मिळत, आता तर पूर्वीपेक्षा तरुणांची आयुष्य अधिक धाकाधकीच झालेलं आहे. पूर्वीपेक्षा जीवन पद्धती बदललेली आहे.
    अशावेळी आपणच ज्येष्ठानी संयम बाळगला पाहिजे.

    • @radhikasansare505
      @radhikasansare505 8 หลายเดือนก่อน

      हल्ली म्हातारी माणसंच नव्हे तर माणसाला माणूसच नकोसा झाला आहे. आलेल्या पाहुण्यासाठी आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये बदल करणे, तडजोड करणे कुणाला मान्य नसते. म्हातारी माणसं जर घरात आली किंवा असतील तर घरातील इतर माणसांच्या हिंडण्या-फिरण्यावर बंधने येतात. घरात अडकून पडावे लागते. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींचा ताण सतत मनावर येतो. म्हणून म्हातारी माणसे नकोत असे होत असावे. आजकाल प्रत्येकाला आयुष्य पूर्णांशाने जगायचे असते. फिरायचे असते. बाहेरील नवनवीन पदार्थ चाखायचे असतात. आपापल्या मर्जीनुसार वागायचे असते. म्हाताऱ्या माणसांमुळे या सर्व गोष्टींवर बंधने येतात आणि म्हणूनच ती नकोशी होतात. तरुणाईच्या म्हातारपणाविषयी म्हणाल तर त्या पिढीची वृद्धाश्रमात जाऊन रहाण्याची तयारी असते. आपल्या पुढील पिढीची आपल्यामुळे कुचंबणा होऊ नये असा विचार ती पिढी करुच शकते. त्यात कुणालाच काही गैर वाटण्याचे कारण नाही. काळाबरोबर माणसांमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये बदल होणे अपरिहार्य आहे. तो स्विकारला पाहिजे. तुम्हीही जगा व तुमच्या जिवलगांनाही जगू द्या. आपला आनंद आपणच शोधायचा. त्यासाठी मुलाबाळांना वेठीला कशाला धरायचे ? अपेक्षांचे ओझेच ठेवायचे नाही. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःखही पदरी पडत नाही. आपल्याला जमेल तेवढे करायचे व गप्प बसायचे. हो की नाही ?

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 8 หลายเดือนก่อน +6

    मला असे वाटते की म्हातारं पणी 40 ते 50नंतर आपण vegitrain व्हावं त्यामुळे थोडी शांत होतील माणसं

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 8 หลายเดือนก่อน +1

      हे खर नाही. Vegetarian लोक शांत असतातच नाही.

  • @jayshreeinamdar3609
    @jayshreeinamdar3609 8 หลายเดือนก่อน +3

    मॅडम तुम्ही खूपच छान पद्धतीने सत्य परिस्थिती म्हाताऱ्या व्यक्तींच्या वागणूक विषयी सांगितले आहे धन्यवाद

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 8 หลายเดือนก่อน +5

    खरंच वास्तव आहे आजचे..... छान विश्लेषण

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 7 หลายเดือนก่อน +1

    अहो, एखादी गोष्ट सांगताना संगणाराने कुठे थांबायचे हे सुध्दा महत्वाचे आहे.
    माझं वय 80 वर्षे आहे. माझी सहधर्म charini जावून 4.5 वर्षे झाली. मी गेल्या चार वर्षांत माझे घर सोडून एक दिवस सुध्धा कुठे गेलो नाही. घरात मी आणि अविवाहित 28 वर्षांचा मुलगा आहे. बाहेरून डबा येतो.
    म्हातारी/वयस्कर मंडळी सर्वांना आवडतात असे नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येते, तरी त्या दृष्टीने बघावे.

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 8 หลายเดือนก่อน

    सध्याचं वास्तव खूपच सविस्तरपणे सांगितलं आहे. यांसाठी एकच लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट अगदी लहानपणी रोज आपल्याकडून संध्याकाळी म्हणून घ्यायचे "आरोग्यम धनसंपदा". पण सध्या उलटे झाले आहे "धनसंपदा आरोग्यम ". ही गोष्ट लक्षांत घेऊन प्रत्येकानं आपलं आरोग्य कसं व्यवस्थीत राहील ? ते कटाक्षानं सांभाळावं की जेणे करून आपल्या ला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही.

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार ताई, खुप छान वाटले. मी मुलगी असल्यामुळे आईवडिलान साठी काही कर्तव्य करता आले नाही. हे मनात शल्य आहे. माझे भाऊ, भावजया माझ्या आईवडिलाची सेवा केली.

  • @sumedhakavade9963
    @sumedhakavade9963 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सांगितले, आपल्या घरात पाणी पिउन रहावे, आपण आपल्या घरातच मोकळा श्वास घेउ शकतो माझ्या सासुबाई गावातल्या गावात हि रहात नसत

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 8 หลายเดือนก่อน +5

    हो आसे घडतय तूमच्या सांगन्या मुळे खूप जनीना आधार वाटत असेल आणी अशी परिसतीथी आली तर शांत राहन हे उतर मला व्हीडीवो बघून खूप उतर मुळतात धनवाद😊

  • @shankargujargujar1652
    @shankargujargujar1652 8 หลายเดือนก่อน +2

    ताई . खूप वस्तुस्थिती व वास्तव वादी विश्लेषण . बहुतेक कुटुंबात असा विषय असतो . ऊतार वयात . राईचा पर्वत व पराचा कावळा होतो . अशा परिस्थिती मध्ये काय करावे ही मोठी कसरत असते

  • @bharatdeglurkar5986
    @bharatdeglurkar5986 8 หลายเดือนก่อน +2

    पाहुणा आणि मच्छी तीन दिवसानंतर वास मारायला लागतात अशी कोकणीत एक म्हण आहे.

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 8 หลายเดือนก่อน

      निसर्गसंपन्न कोकण आणि कोकणी माणूस , मालवणी भाषा ... सारेच भावणारे 🎉 🎉 ❤

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 8 หลายเดือนก่อน +19

    नात्यातली जवळीक.. वास्तविक तुमच्याकडून ऐकायला आवडतो 🌹.. Thanks मावशी 🙏🌹

    • @priyaathavale
      @priyaathavale 8 หลายเดือนก่อน +1

      Pun jaychach kashala aple ghar sodun dusryakade rahayla ?

  • @sulbhakulkarni1798
    @sulbhakulkarni1798 5 วันที่ผ่านมา

    खरय खूपच छान सांगितले अनघा ताई तुम्ही

  • @shubhasambare2340
    @shubhasambare2340 8 หลายเดือนก่อน +6

    खूप चांगला विषय !

  • @ashutoshsonawane647
    @ashutoshsonawane647 8 หลายเดือนก่อน +5

    Gharchya lokani thodi ladies chi sycology samjun ghyawi asa nahi ka watat ti khup rabaleli asate tya chya sathi

  • @user-up4jp9xm2e
    @user-up4jp9xm2e 8 หลายเดือนก่อน +4

    Mala mhatarya mansanche wagane agdi yogyach watate.Apan tyana samajun ghyayla kami padato.

  • @sanjaymane-ge2og
    @sanjaymane-ge2og 8 หลายเดือนก่อน +3

    मॅडम तुमचे अनुभव सत्य आहेत पण सत्य काय आहे तर आपण सगळे पाहुणे आहोत हे जगातील प्रत्येक जण विसरून गेलेत एक म्हण आहे माझे मला होईना आलेला पाहुणा दळून खाईना किंवा घरचं झालं थोडं व्याह्यानी धाडलं घोड असे टोमणे शाल जोडीतले मरण्या इतकी वाईट परिस्थिती नाही .प्रत्येकाने आपला दोन घडीचा डाव आनंदाने कसा घालवायचा पाहुणे म्हणून पृथ्वीवर आलो छोटीशी विजिट एकमेकांना मदत करून घालवू माझे तुझे काही नाही हे नात्यांचं लेबल काढून जगू जागवू यासाठी तेजग्यांन फाउंडेशन चे शिबिर करून जगाला जागं करू
    पटलं तर नक्की comment करा happy thoughts

  • @anildeo8544
    @anildeo8544 8 หลายเดือนก่อน +6

    खूपच छान विश्लेषण

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 8 หลายเดือนก่อน +18

    डोळे भरून आले ऐकताच

  • @shubhangidani7480
    @shubhangidani7480 8 หลายเดือนก่อน +4

    खरे आहे..आमचेकडेही झाले आहेअसे..सासरच्यांना बाबतीत..

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 8 หลายเดือนก่อน +3

    मॅडम तुमच्या विचारांशी मी सहमत आहे.खरोखर वयक्सर काय मध्यम वयाचे काय वाद हे प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतात.अशा लोकांनी खरंतर घरात वाद झाले.तर नातेवाईकांन कडे न जाता.गावी आपलं स्वतःचे छोटे घर असेल तर सर्व सुखसोयी असतील तर गावी जाऊन रहाणे कधीही चांगले आहे.नाहीतर वयक्सर होण्या अगोदर स्वतः आपली रहाण्याची व्यवस्था केली पाहिजे. नातेवाईकांना त्रास नाही दिला पाहिजे.म्हणून आपलं स्वतःचे छोटंसं कुठे तरी घर असायला पाहिजे.तेच आपले घर आपल्याला किती ही कोणाचा राग आला तर आपण आपल्या घरात जाऊन राहू शकतो.आणि ते घर आपले टेन्शन दूर करते.घरच आपल्याला साथ देते.त्या घराच्या जुन्या आठवणी काही शिकवून जातात.

    • @PMahalle07
      @PMahalle07 8 หลายเดือนก่อน

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 8 หลายเดือนก่อน +8

    जवाबदारी मुलाची आणि मुलींची आहे, निस्त्ते हिसा घेण्यासाठी नसावी, हिस्सा नाही घेतला तर मुलांची जवाबदारी आहे,ते टाळत असतील तर मुलींनी हस्तक्षेप करावा,,कधी वाटते ज्येष्ठ नागरिकांच्या सभेला जाव आणि म्हतारपन कसं जगावं सांगावं छोट्या छोट्या गोष्टी कशा टाळाव्यात दिवसभर कसे वागावे पाहुण्यांकडे कसे जावे यावे ,,आज त्यांना समजून घेण्याची गरज आहे,ताई आपण खूप मोकळे पणाने संवाद केला धन्यवाद,,,,

    • @anuradhakulkarni1440
      @anuradhakulkarni1440 8 หลายเดือนก่อน +4

      आत्ता असे काही नाही बर्‍याच मुली मुला पेक्षा मुलीच जवाबदारी घेतात आम्ही तिघी बहिणी I नि आई आणि वडिलांची पूर्ण जवाबदारी घेतली जेंव्हा की आम्हाला आमच्या पेक्षा दोन मोठे भाऊ होते, असेच अजुन एका metrniche ही होते बर्‍याच मुली आई वडिलांची जवाबदारी घेतात

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 8 หลายเดือนก่อน +2

      @@anuradhakulkarni1440 खूप सुंदर धन्यवाद

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 8 หลายเดือนก่อน +7

    आजच्या विडीओने रडवल हो डॉ 😭😭अगदी बरोबर योग्य विडीओ👌👌

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 8 หลายเดือนก่อน +1

    Agadi barobar anubhav sangitala.mazya mami 85 varshachya hotya toparyant tyani swatahachi kalaji ghetali tyana aptya nahi zale mamani mla v mazya bahinila shikshanakarita javl thevle. Mothe zalo lagnn zali mama varlyanantar mami ekatya hotya tyana tyanchya maheri kunihi thevayala tayar navhate v sasari sarv savtra putne hote.tyancyakade shikasha n zalyamule me tyana mazekade aanle parantu gharachya lokana vatayache he kay aahe.tya 1-1/2 varsh rahilya nantar c.ot varun khali padlyamule tyanchya halchali kami hot gelya nantar annpani jat navhate v tya varlya.tyanchya aathavanila ujala milala . Dhanyawad Madam anubhavachi gost sangitali. Mama Professor hote Mami P.hd zalelya hotya pn gruhini hotya.Dhanyawad Madam .

  • @ramchandrajoshi3999
    @ramchandrajoshi3999 8 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही बोलता छान! त्या शैलीने ,मी फॅन झालो आहे.दिसायला ही ! विषय जरा वेगळं घ्या.अनुभव असल्याने चांगला हाताळणी कराल! ❤❤

    • @pradnyatamhankar1231
      @pradnyatamhankar1231 8 หลายเดือนก่อน

      Madam ही फक्त वृद्धांची बाजू झाली.माझ्या सासूबाई वय वर्षे 90 गेली 14/15 वर्षे बेड वर आहेत. आम्हीही वृद्ध झालो आहोत.आम्हाला दोघांना एकावेळी आमच्या लग्न झालेल्या मुलीकडे सुद्धा जाता येत नाही.पर्यटन तर आजिबताच झाले नाही
      दिवसेंदिवस त्यांची सेवा करणे आमच्या शारीरिक दृष्ट्या कठीण होतेय. असिस्टंट ठेवणं आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.त्यांची memory चांगली आहे.त्यामुळे वृद्धाश्रमात ठेवणे आमच्या मनाला पटत नाही.इतक्या वर्षांची सेवा वाया जाईल असे वाटते. आमचेही आयुष्य निरस व्ह्यायला लागलेय

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

  • @gururao2930
    @gururao2930 7 หลายเดือนก่อน

    Nice video made on elderly people visiting other places and what problem could cause to host.

  • @ujwalagaikwad1544
    @ujwalagaikwad1544 8 หลายเดือนก่อน +2

    अशा गोष्टी प्रत्येकाच्या घरी होत असतात कारण प्रत्येकाच्या घरी वृद्ध स्वताच्या घरी असतात. त्यांना पूर्ण वेळ द्यावा लागतो त्यांची सेवा मनासारखी करावीच लागते त्यातून सुटका नाही आपण किती दिवस जगणार आहोत त्याची पण गॅरंटी नाही तरुण असु दे किंवा वृद्ध kon कसे मरेल माहीत नाही कोणाला कुणाच्या मदतीची गरज लागेल सांगता येत नाही. स्वतःलाही जागेवर शेवटचे पोहोचविण्यासाठी नातेवाईकांची मित्राचा शेजार्‍यांची गरजच लागेल म्हणुन कधी कधी डोळे असून बघायचे नाही कान असून ऐकू येत नाही व तोंड असून बोलता येत नाही असे wagave लागते शक्यतो वृद्ध आनि मरे पर्यंत पैसा स्वतः जवळ ठेवावं त्यामुळे स्वतंत्र राहते पैशासाठी लोक सेवा करतात आपलीही वेळ निघून जाते. मी सुधा माझ्या आईला 2 वर्षे खूप छान सेवा केली ते ती सुद्धा मान्य करते पण माझा जीव माझ्या आईकडे v माझ्या आईचा जीव माझ्या मोठ्या बहिणीकडे v तिच्या मुलांकडे कारण लहान असल्या पासुन माझी आई त्यांना सांभाळते आहे व भावाकडे जगातला कोणताही मुलगा आपल्या आईची सेवा करणार नाही ईतकी भाऊ आईची आईची सेवा करतो पण कधी कधी बहीण आईच पाणउतारा करते ते पाहवत नाही पण मला वाईट वाटते pan बोलू शकत नाही कारण आई la कधी काय होईल तर बहीण तिच्या जवळ आहे मी दूर आहे ती मला फोन तरी करून आईची खुशाली कळवेल असे वाटते. माझी आई 90 च्या जवळ आहे ती 100 पर्यंत जाईल असे माझी खात्री आहे pan तीला शांतता पाहिजे is तिने कोणाचीही काळजी केली नाही तर आई la कामाची सवय असल्याने ती सारखीच किचन मध्ये भांडी घासायला जाते येक t नाही v भांडी चांगली धुतली जात नाही तिच्या अंगात ताकत नाही त्यामुळे सतत चिडचीड होते हट्टी स्वभाव आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 8 หลายเดือนก่อน +1

      Khar Mhanje Mhatar pn Ek Shapach Aahe
      Aajapn Aal Bedrden Zalo Tr
      Kalpana Karvat Naahi
      Janm bhar Anek Dukh Kasht Bhogun Mhatarpan Shanti ne Jagav Pn Devpn Dagad Zaalela Kay karnar
      Mi Mhante Ichhamaran Cha Kayda Yava
      Vinadainen Jeevanm Anayasen Maranam
      Shree Ram Nam Smaranam Chiranter 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar8626 8 หลายเดือนก่อน +10

    Today subject is very interesting 😊❤

  • @krantidhage436
    @krantidhage436 8 หลายเดือนก่อน +2

    अगदी खरी परिस्थिती सांगितली काकू.

  • @sanjanadrid4279
    @sanjanadrid4279 7 หลายเดือนก่อน

    Madam tumhi he storysangile shambartakke kariahe khup thsnks

  • @jyotimodak8569
    @jyotimodak8569 7 หลายเดือนก่อน

    आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे.

  • @ashasubhedar6797
    @ashasubhedar6797 8 หลายเดือนก่อน +2

    Khup chan vishay ahe majha gharatla saddhyacha anubhav ahe 😢

  • @smitakulkarni6562
    @smitakulkarni6562 8 หลายเดือนก่อน +6

    चांगला विषय

  • @prabhadhandore5427
    @prabhadhandore5427 2 หลายเดือนก่อน

    किती वर्षाची व्यक्ती म्हातारी???
    काहिही आजार नसलेले लोक वयस्कर असतात.मुलाबाळाकडे तर आईवडिलांनी जायलाच हवे ऐवजी माया करणारे दुसरे कोणीही नसते... मुले कितीही मोठी असू दे आई वडिलांची माया ज्याला मिळते तो भाग्यवान....

  • @DeepaliJathar
    @DeepaliJathar 8 หลายเดือนก่อน +3

    Aai wat bagat hoti mulacha phone chi, udya yetiye ki Raja he aiklyawar mazahi angawar kata ala

  • @shardashingare2384
    @shardashingare2384 8 หลายเดือนก่อน

    खरचं, अगदी असे अनुभव आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात.

  • @supriyasathe5350
    @supriyasathe5350 8 หลายเดือนก่อน +1

    आणखी ek point rahola ahe madam
    ओल्ड माणसाची kahi तंत्र असतात thyana ठराविक वेळे ही aushade घ्यायला लागतात kahi पदार्थच khave लागतात सरसकट जेवता yet नाही त्याचा वेळ sambalavi लागते va तसेच पदार्थ बनवावे लागतात
    आजच्या पिढी जवळ तेवढा वेळ नाही
    त्याचे कितीही prem असले तरी ते javal yean बसू शकत नाहीत
    प्रेमाने 4 शब्द बोलू. शकत नाहीत
    Thychyaua मुलांसाठी सुध्दा vel काढण अवघड आहे tar म्हातार्‍या mansathi कधी कसा वेळ काढणार
    लाइफ ईतके फास्ट झाले आहे

  • @RUHUKUHU
    @RUHUKUHU 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार
    गेले दोन दिवस सतत हा विचार मनात येतोय की एकत्र कुटुंब पद्धती का संपली? माणसाला स्रवात जास्ती गरज माणसाची असते हो. आयुष्य मान देत, सेवा करत नेकीनं घालवल्यानंतर एका क्षणात नकोसं होणं, गरज सरो.....
    ही अवस्था खूप लाजिरवाणी होते. पण तुम्ही म्हणता तसं स्वत: चे अनुभव वापरून मानानं जगणं आत्मसात करता आलं पाहिजे हेच खरं. म्हतारपणची पेरणी तरूणपणीच करायला हवी.

  • @prakashkale9731
    @prakashkale9731 7 หลายเดือนก่อน

    खरच ताई तुमचे अनुभवाचे बोल ऐकायला फार बरे वाटते असे वाटते की ऐकतच रहावे
    स्पट व खरे बोलणे वा वा

    • @veenajoshi3932
      @veenajoshi3932 7 หลายเดือนก่อน

      He sagale khre pan upay Pana sanga. 19:05

  • @uttamkamkhedkar1603
    @uttamkamkhedkar1603 8 หลายเดือนก่อน +1

    आज काल कोणीही कोणा कडे परवानगी घेतल्या शीवाय जात नाहीत. ते दिवस केव्हाच संपले.तुम्ही तर नातेवाईक बद्दल सांगितले. आता तर मुलाकडे देखील जायला परवानगी घेऊन जावे लागते. माफ करा कदाचित माझे चुकीचे निघो!

    • @pallavitiwari7231
      @pallavitiwari7231 8 หลายเดือนก่อน

      ताई तुमचे म्हणणे अगदी खरे आहे.सत्य परिस्तिथी आहे,असा अनुभव देखील आहे. नमस्कार.

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 8 หลายเดือนก่อน +1

    Khupach mast subject Gharoghari matichy chuli chyan samajavun sangitla aahe

  • @nilambarishinde7283
    @nilambarishinde7283 8 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर माहिती.मॅडम