दिनदयाळ अंत्‍योदय योजना राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियान नगर परिषद पुर्णा अंतर्गत पीएम स्‍वनिधी तसेच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • दिनदयाळ अंत्‍योदय योजना -राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियान नगर परिषद पुर्णा अंतर्गत पीएम स्‍वनिधी तसेच स्‍वनिधी से समुध्‍दी योजने अंतर्गत नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी मा.श्री.युवराज पौळ यांच्‍या मार्गदर्शनानुसार सोमवार,दि.२४ जून २०२४ ते शुक्रवार, दि.२८ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० ते ०५.०० या कालावधीत कॅम्‍पचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍वनिधी से समुध्दिी या योजने अंतर्गत ज्‍या लाभार्थ्‍यांना १००००/-रु.२००००/-रु. तसेच ५००००/-रु.चा लाभ मिळाला अशा लाभार्थ्‍यांना १.प्रधानमंत्री जीवनज्‍योती योजना, २.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ३.प्रधानमंत्री जनधन योजना व रुपे कार्ड, ४.इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणी, ५.प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, ६.एक राष्‍ट्र एक राशनकार्ड योजना, ७.जननी सुरक्षा योजना, ८.प्रधानमंत्री मातवंदना योजना या ८ योजनेचा लाभ शिबिरामध्‍ये मिळणार आहे. त्‍यासाठी योजनेशी संबंधीत बॅंक अधिकारी तसेच योजनेशी संबंधीत सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत होते.
    कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष म्‍हणुन नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी श्री.मुकुंद मस्‍के तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन भारतीय स्‍टेट बॅंकेचे शाखा अधिकारी श्री.अमितकुमार जोंधळे, बॅंक ऑफ महाराष्‍ट्र चे शाखा अधिकारी श्री.चंद्रकांत कच्‍ध्‍वे, महाराष्‍ट्र ग्रामीण बॅंकेच्‍या श्रीमती नुपुर दत्‍ता नगर पालिका अधिकारी/कर्मचारी श्री.दिनेश मुळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून प्रमुख पाहुणे यांना स्वागतपर पुष्पगुच्छ न देता बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले लोणच्याचे पाकीट देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी श्री.महेश मोरे यांनी केले. प्रास्‍ताविकात कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली, बॅंक ऑफ महाराष्‍ट्राचे शाखाधिकारी श्री.चंद्रकांत कच्‍ध्‍वे यांनी मार्गदर्शनात लाभार्थ्‍यांना स्‍वनिधी योजने अंतर्गत कर्जाचे हप्‍ते वेळेवर भरल्‍यास आपण २०००० रु.तसेच ५०००० रु. घेण्‍यास पात्र होणार आहेत. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक लाभार्थ्‍यांना कर्ज वाटप करण्‍यात आले. स्किम लिंकेजसाठी सर्व लाभार्थ्‍यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्‍यात आले.
    तसेच भारतीत स्‍टेट बॅंकेचे शाखा अधिकारी श्री.अमितकुमार जोंधळे यांनी एनयुएलएम अंतर्गत जे बचत गट स्‍थापन आहेत त्‍यांनी पहिला हप्‍ता १लाख ५० हजार व दुसरा हप्‍ता ३ लाख कर्ज मिळते ते व्‍यवसाय उभा करण्‍यासाठी वापर करावा. मिळालेल्‍या पैशातुन मशिनरी खरेदी करुन विविध प्रशिक्षण घेवुन व्‍यवसाय करावा. व सर्वानी आपले स्‍वतःचे विमा काढुन घ्‍यावा असे मार्गदर्शनपर सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्‍यक्ष श्री.मुकुंद मस्‍के यांनी अनु्भवातुन एक उदारण लाभार्थ्‍यांना सांगितले. बॅंकेत आपले पत निर्माण करावयची असेल तर बॅंक खात्‍यात पैसे आपले सिव्‍हील कसे तयार झाले पाहिजे असे सांगितले. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा व त्‍याचा परतावा दिलेल्‍या मुदतीत भरावा. असे सांगितले. शिबिरा अंतर्गत बॅंकेतील कर्मचारी श्री.फेरोज पठाण व श्री.श्री.ठाकुर यांनी स्‍वनिधी से समुध्‍दी योजने अंतर्गत स्किम लिंकेजसाठी उपस्थितीत राहुन लाभार्थ्‍यांचे स्किम लिंकेज केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समुदाय संघटक श्रीमती पुष्‍पा बनसोडे तर आभार प्रदर्शन श्री.राहुल जोंधळे यांनी केले. स्‍वनिधी से समुध्‍दी योजनेचे प्रोफालिंगसाठी स्‍वाभिमान शहरस्‍तर संघाचे लेखापाल श्री.राजु आहिरे व्‍यवस्‍थापक श्री.राहुल जोधळे तसेच (CRP) वैशाली एंगडे, आश्विनी बागल, मधुमाला राऊत, आम्रपाली रणवीर, पुष्‍पा चुनोडे, गंगासागर वाहुळे यांनी कार्यक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी परिश्रम घेतले.
    #नगरपरिषद #पूर्णा #news #pradeep_nannaware #social_work #marathi

ความคิดเห็น •