Anger | Khuspus with Omkar| Emotions Crash course |Dr. Shirisha Sathe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 553

  • @amazing_amruta_singer
    @amazing_amruta_singer ปีที่แล้ว +12

    माझ्या भावनांचा रिमोट माझ्या हातात आहे. काय भन्नाट आहे हे.

  • @ashwinibhide5021
    @ashwinibhide5021 ปีที่แล้ว +14

    भावनांचा क्रॅश कोर्स series फारच सुंदर आहे. मोठ्यांना तर फायद्याचा आहेच पण त्यापुढे जाऊन मला वाटत हा school curriculum मध्ये ठेवायला हवा. ८-१० वी च्या मुलांना समजू शकेल आणि त्यांना फार गरज पण आहे. Nurture मधे आपोआप येईल.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 ปีที่แล้ว +78

    ओंकार तुझे आणि तुझ्या टीमचे पुन्हा पुन्हा खूप कौतुक, अभिनंदन आणि आभार - इतकी सुंदर सिरीज आमच्याकरिता आणली त्याबद्दल❤

  • @tradewithattitude
    @tradewithattitude หลายเดือนก่อน +2

    सर psychology वरची उत्तोमत्तम व सर्वसामान्य लोकांना समजतील अशी पुस्तके सुचवा ही विनंती 💐💐🙏🙏

  • @Fnetbroadband
    @Fnetbroadband 9 หลายเดือนก่อน +11

    राग हा जिथे सहन होतो तिथेच केला जातो.... जिथे राग खपवून घेतला जाणार नाही... तिथे माघार घेतली जाते....

    • @ManyIndividuals-xz3ty
      @ManyIndividuals-xz3ty 4 หลายเดือนก่อน +1

      More appropriate is anger is expressed where it is must to express whether fruitfulness is of minor to it's purpose. Sometimes anger is not expressed at the exact situation but always stored for better situation to vomit it aggressively. Or better expressed with passive aggressive way like as said gossip, tantrum, jokes. Withholding, shrinkage ,withdrawal etc.

  • @shubhadautgikar9624
    @shubhadautgikar9624 ปีที่แล้ว +5

    पायवाटा जाणीवपुर्वक निर्माण कराव्या लागतील हा विचार अतीशय आवडला.....ह्यातच सगळ्या प्रश्णानवरचे उत्तर सापडले आहे...फार सुंदर आणि ऊपयोगी मुलाखत झाली.मनापासुन धन्यवाद

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 11 หลายเดือนก่อน +7

    "गुस्सा कितना बड़ा अकलमंद होता है,
    हमेशा कमजोर के सामने ही आता है।"
    -नाव आठवत नाही

  • @gaurikv
    @gaurikv ปีที่แล้ว +7

    खूपच शास्त्रीय पद्धतीने हा विषय डिसकस केलेला आहे. अंतर्मुख करून विचार करायला लावेल असा.
    ह्यातला एक मुद्दा मला जास्त विचार करायला लावत आहे. कारण तो मला पुरेसा काळाला नाही.
    "मी दुसऱ्यांशी चांगली वागले आहे आणि म्हणून मी तसेच चांगले वागणे एक्सपेक्ट करते". हे मला कोणी लिहून दिले नसले तरी, दुसऱ्या बाजूने BELIEF सिस्टिम सांगते तुम्ही चांगले वागा म्हणजे तुमाला तशी वागणूक मिळेल. आता चांगले वागण्या पाठीचे मोटिवेशन काय असले पाहिजे?
    विचार करावा लागेल...
    खुसपूस टीम फारच छान विषय निवडलात तुमचे धन्यवाद.

    • @chitrabargaje3158
      @chitrabargaje3158 3 หลายเดือนก่อน

      माणूस म्हणून चांगलेच वागायला हवे. पण दुसरे तसेच वागतील अशी अपेक्षा नेहमीच पूर्ण होणार नाही. जे आपल्या control च्या बाहेर आहे ते कंट्रोल करायला न जाता आपण स्वतःचे वागणे control करण्याकडे effort घेतले पाहिजेत. Because as mam said reality is indifferent to your perception or expectation.

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 ปีที่แล้ว +12

    "राग" ह्या भावनेवर इतक्या वेळ बोलल्या तरी वाटलं आताच तर सुरू झाला एपिसोड.कठिण गोष्टी सोपी करून सांगणं,अप्रतिम. ऐकत रहावं

  • @jyotideshpande4770
    @jyotideshpande4770 ปีที่แล้ว +26

    खूपच सुंदर विषय ..एखाद्या व्यक्तिमुळे जर आपलं न भरून येणारं नुकसान झालं असेल तर नंतर कितीही काळ लोटला तरी त्या गोष्टी विसरता येत नाहीत..त्यातून बाहेर कसं पडावं या विषयावर एपिसोड करता येईल का..

    • @ManyIndividuals-xz3ty
      @ManyIndividuals-xz3ty 4 หลายเดือนก่อน

      Very true. Time factor is not important in any situations otherwise it may have solved problems itself. Change the surrounding and environment. Correct me if any.

  • @Udit077
    @Udit077 3 หลายเดือนก่อน +2

    In the era where creating a podcast on witchcraft, black magic, demon etc etc is trending...Making something like this which is necessary and important to talk about, will really make a difference..Keep up the great work you guys

  • @shwetambariangal6812
    @shwetambariangal6812 ปีที่แล้ว +6

    मी खूप नशीबवान आहे की पुण्यात असताना मला सुसंवाद मध्ये summer placement साठी गेले असताना ह्यांना भेटता आलं, जवळून ऐकता आलं, great mam. तूम्ही माझ्यासाठी आदर्श आणि inspiration आहात.

  • @sandhyadeshmukh1931
    @sandhyadeshmukh1931 ปีที่แล้ว +8

    आज सोनाराने कान टोचले 😊 काय धाराप्रवाह विश्लेषण!! आणि किती सुंदर आहेत मॅम 👌👌👌👌👌

  • @vishaly5132
    @vishaly5132 ปีที่แล้ว +16

    Anger becomes addictive… What a meaningful line👌

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 ปีที่แล้ว +7

    ओंकार अभिनंदन! आजचा तुझा होमवर्क मस्त होता. मॅडम ना सविस्तर मुद्दे मांडायला छान वेळ मिळाला. सर्वांना खूप शाबासकी. खूपसे मुद्दे कायम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • @zendanuja
    @zendanuja ปีที่แล้ว +13

    कमाल!! रागाला इतकं शांतपणे पहिल्यांदाच समजून घेतलं असेन! 💙 ही series खूप आवडली! Awaiting for the next one!

  • @AmberrCas
    @AmberrCas ปีที่แล้ว +10

    खूप मस्त चर्चा झाली.. पण मला अजून एका गोष्टीवर माहिती मिळाली असती तर आवडलं असतं.. काही वेळेस आपल्या राग व्यक्त करण्याच्या जागा / व्यक्ती वेगळ्या असतात.. म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी मला राग येणारी गोष्ट केलेली असते, पण आपल्या प्रतिक्रिया त्या दोन्ही व्यक्तींच्या समोर पूर्णपणे वेगळ्या असतात.. अगदी लहान उदाहरण द्यायचं तर , चहाचा कप आपल्या मुलाने फोडणे आणि पाहुण्यांच्या मुलाने फोडणे किंवा सहकाऱ्याने शिव्या देणे आणि बॉस ने शिव्या देणे ह्यांवरच्या माझ्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात.. ह्यात वर्चस्वाचा किंवा प्रेमळ नात्यांचा काही संबंध येतो का?

    • @byJaswandi
      @byJaswandi 9 หลายเดือนก่อน

      Yes even I would like to know

  • @SanketAK1
    @SanketAK1 ปีที่แล้ว +15

    फारच अप्रतिम सिरीज आणि खूप खूप प्रेम, असेच विषय पुढे आणत राहा ❤ फक्त एकच विनंती एपिसोड्स मध्ये कमीत कमी इंग्लिश चा वापर करावा.
    Jargons इंग्लिश मध्ये असू शकतात त्याला हरकत नाही परंतु समजावताना मराठीत ऐकायला आवडतील 🙏🏼 सहमत असाल तर लाईक करा

  • @vidyutshetty2372
    @vidyutshetty2372 3 หลายเดือนก่อน +1

    You can't get a batter faculty for this subject than this one....

  • @madhaviathavale9219
    @madhaviathavale9219 ปีที่แล้ว +3

    प्रेम आणि अटॅचमेंट यात नेहमीच लोक गल्लत करतात ....यावर पूर्ण एक पॉडकास्ट मध्ये बोललं जावं....

  • @anaghabhide9649
    @anaghabhide9649 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आणि शास्त्रीय कारणं, उदाहरणं देऊन केलेलं विश्लेषण 👌🏻👌🏻
    शिरीषा मॅडम जबरदस्त बोलतात, एकदम to the point 👌🏻👍🏻 एकदम engaging झालीये ही सिरीज 👌🏻👌🏻

  • @gotchaa100
    @gotchaa100 ปีที่แล้ว +21

    Greetings from San Francisco!! Omg you guys are doing an exceptional job of discussing these topics! There is therapy available easily here but listening to this in mother tongue strikes a special chord!! Shirisha is outstanding! Please keep such good content coming!!!

  • @manishanaik5626
    @manishanaik5626 ปีที่แล้ว +107

    शिरिषा मॅमचं नाव बघून...... विडियो पहाण्या आधीच 👍 करून टाकलं......it has to be good.....no doubt about it ....😊

    • @VR-ql8pd
      @VR-ql8pd ปีที่แล้ว +5

      True she is awesome 👌

    • @swaradanargolkar9884
      @swaradanargolkar9884 ปีที่แล้ว +1

      मी पण आधी like केलं मग व्हिडीओ बघतेय

    • @varshapatil3786
      @varshapatil3786 ปีที่แล้ว +1

      Mipn same

    • @amrutah2897
      @amrutah2897 ปีที่แล้ว

      Mi pan

    • @Manumaoo918
      @Manumaoo918 ปีที่แล้ว +1

      Agree

  • @sujataghangurde1836
    @sujataghangurde1836 ปีที่แล้ว +13

    फार सुंदर एपिसोड..! अतिशय मार्गदर्शक आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी अशी पूर्ण सिरीजच खूप आवडली, सगळेच एक्स्पर्टस् खूप छान बोलले.
    मनापासून धन्यवाद..! 💕

  • @ashwini1005
    @ashwini1005 ปีที่แล้ว +3

    या series मधले सगळेच भाग उत्तम आहेत. डॉ. शिरीषा यांचे विचार फारच logical आहेत. तुमच्या team चे हार्दिक अभिनंदन!!🎉🎉

  • @dr.latashep5811
    @dr.latashep5811 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम विश्लेषण,
    आत्मपरीक्षण साठी अतिशय महत्वाचे टूल्स समजले.
    अनेक मुद्दे स्वतः शी relate होत होते.
    Thanks Dr Shirisha mam
    And अमुक तमुक team

  • @RushiiCreativeMantra
    @RushiiCreativeMantra 10 หลายเดือนก่อน +1

    Khhhpch Sundar

  • @diptikelkar4953
    @diptikelkar4953 ปีที่แล้ว +1

    शिरीषा मॅडम सोबत तुम्ही चांगला आणि वाईट माणूस की स्वभाव या विषयावर podcast करू शकाल का? त्या खूप छान समजावून सांगतात...आणि तुम्ही प्रश्न पण खूप मस्त विचारता...

  • @shwetaayare6124
    @shwetaayare6124 ปีที่แล้ว +3

    कळतेय पण वळत नाही.... कारण आपण ते घोटवत नाही आहे..... खुप छान.... हे session परत परत ऐकत राहव... as revision.... खूप खूप धन्यवाद अमुक तमुक टीम आणि Dr. Sathe madam तुमचं.... love u madam....❤

  • @ulhasdesai7763
    @ulhasdesai7763 ปีที่แล้ว +15

    Keep episodes on mental health , mental balance as comparing 4Q . ( Adverse Quotient , Intelligent Quotient , Emotional Quotient, Social Quotient. )

  • @sgupte3291
    @sgupte3291 18 วันที่ผ่านมา

    Dr. Sathe, you are amazing. Omkar’s, thank you for inviting her!!

  • @maiskitchen9584
    @maiskitchen9584 ปีที่แล้ว +1

    खूप च माहिती पूर्ण कार्यक्रम होता पहिल्यांदा मला वाटत ही चर्चा माझ्या साठी होती. नवरात्री मध्ये देवी ने माझ्यावर मॅडम च्या रूपात दान दिल खूप खूप खूप आभारी आहे धन्यवाद.

  • @vilashoke5217
    @vilashoke5217 2 หลายเดือนก่อน

    👌🙏 कुठलाही निर्णय घेत असताना दुविधा अवस्था होणे यावर एक 🙏🙏🙏

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 ปีที่แล้ว +1

    आणि भारतीय मानस शास्त्र म्हणजे पातंजल योग दर्शन आहेच

    • @madhavileparle
      @madhavileparle หลายเดือนก่อน

      त्यावरही कोणी तज्ज्ञांकडून माहिती मिळाल्यास उत्तम!

  • @AparnaSuhas
    @AparnaSuhas ปีที่แล้ว +7

    I love listening to Shirisha Ma'am. She speaks so convincingly. I learnt a lot from her previous videos too. Thank you Omkar 🙏🏻

    • @sapu501
      @sapu501 ปีที่แล้ว

      That's the point. She speaks convincingly... But what she speaks is not much impressive

  • @neetajoshi8362
    @neetajoshi8362 7 หลายเดือนก่อน +1

    Shirisha madam i have no words to express gratitude fpr this episode and your knowledge sharing. This is phenomenal. . @omkar can we please also have one session on insecurity and dealing with insecurities in relationships

  • @MILINb3E
    @MILINb3E 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान असतात विषय आणि तज्ज्ञांची मते. Lot of take away. मॅडमच्या वाक्यांचा शेवट अस्पष्ट होत जातो. ते ऐकण्यासाठी speaker ला कान लावावा लागतो. 😊

  • @ArunGKTechPune
    @ArunGKTechPune 7 หลายเดือนก่อน +1

    Extraordinary.... मानसशास्त्राचे अतिशय सुंदर वर्णन...

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 ปีที่แล้ว +1

    अत्यंत उत्तम स्पष्टीकरण ... In appropriate words ... प्रत्येकानी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे ... कारण Anger is a common problem everywhere... People have the attitude of Attack is the best defence, hya background var इतके scientific उद्बोधन ऐकून खूप छान वाटले ... प्रश्न ही छान विचारले आणि Dr नी दिलेली उत्तरे तर ... अप्रतिम दर्जाची होती ... Full of knowledge n wisdom ❤ Liked this podcast episode thoroughly!! Khoop dhanyawad!!

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 8 หลายเดือนก่อน +1

    She is so good👍

  • @ratnamalalonkar8194
    @ratnamalalonkar8194 9 หลายเดือนก่อน

    अमुक तमुक टीम सद्यस्थितीला सामाजिक बदल घडविण्यासाठी, परिवर्तन घडवून आणण्यासाठी अत्यावश्यक असे विषय हाताळत आहात. आजचा राग विषयावरची खुसपूस सुद्धा खूप मानसिक बळ देऊन विचार प्रवृत्त करून बदलास सामोरे जाण्याचे धाडस निर्माण करू शकता असे वाटते. बदलत्या परिस्थितीत आपण स्वत:त बदल करण्याची ताकद , प्रेरणा अमुक तमुकच्या प्रत्येक विषयामध्ये आहे. आपल्या टीमचे व श्रिशा मॅडमचे अभिनंदन 💐💐👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
    पुढील काळात नवीन नवीन विषय ऐकायला, प्रेरणा घ्यायला निश्चितच आवडतील.

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान अमुक तमुक व सर्वांसाठी प्रार्थना हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ही प्रार्थना सतत म्हटल्यामुळे राग कमी होते आणि मन समाधान होते सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @bhagyashreewalvekar3671
    @bhagyashreewalvekar3671 ปีที่แล้ว +5

    खूपच छान ❤ ma'am किती सुंदर प्रकारे सांगतात! आणि ओंकार hats Off to you and your team... You make it so interesting to listen to these episodes! Well done! ❤❤❤❤

  • @chitsvp
    @chitsvp ปีที่แล้ว +4

    So much relatable, the best part is , she is not only explaining it logically but also giving handy tools to overcome the problem .

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 3 หลายเดือนก่อน

    ओंकार तुझे खूप खूप कौतुक अभिनंदन तू वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन आमच्या सारख्या जेष्ठाःसाठी खूप छान आहे .

  • @sviews01
    @sviews01 ปีที่แล้ว +1

    अतिशय चांगला उपक्रम राबवत आहात तुम्ही.. आज समाजाला अशा प्रकारच्या राग, भीती,negatively याबद्दल जगरुकता आणत आहात.. धन्यवाद

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर , मुद्देसूद आणि भावपूर्ण मांडणी होती डॉ. शिरिषा मॅडम यांची , अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @RitaG-q7z
    @RitaG-q7z 9 หลายเดือนก่อน

    Amuk Tamuk series all episodes ...Amazing...Superb!! The creative head Shardul for taking exceptional , sensitive topics for discussion and Omkar's hosting is Fantastic!!!

  • @harshalimurudkar8361
    @harshalimurudkar8361 หลายเดือนก่อน

    Omkar thanks for the idea of addressing these issues in the society.

  • @vilesh8543
    @vilesh8543 5 หลายเดือนก่อน

    My internal peace is most important. माझी आत्मशांति खूप महत्वाची आहे. गुरुमंत्र. 😇

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 ปีที่แล้ว +1

    राग याबद्दलचा हा episode पण अतिशय चांगला.अनेक टिप्स मिळाल्या. डॉ शिरिशा साठे यांना या भावनेबद्दल बोलायला सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद.🙏

  • @ManovedhPallaviPatankar
    @ManovedhPallaviPatankar 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विश्लेषण उत्तम उदाहरणासह, शिरीषा Ma'am 20 वर्षांपूर्वी च्या आमच्या Clinical Psychology च्या गुरू 🙏

  • @prasadkakade6313
    @prasadkakade6313 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान
    राग यांच्याकडे त्रयस्थपणे कसं पाहायचं हे आज शिकायला मिळालं
    मानसशास्त्र या विषयावर अजून खूप काही ऐकायला आवडेल
    योग्य आणि मानसशास्त्र यावरही काही करता आलं तर खूपच छान होईल
    खूप शुभेच्छा!!!💐💐💐

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 11 หลายเดือนก่อน

    वेगवेगळ्या विषयांना उत्तमरितीने हाताळता त्याबद्दल टिमचे ,वक्त्यांचे आभार

  • @leopold17780
    @leopold17780 4 หลายเดือนก่อน

    If I allowed to watch only one video on TH-cam I will watch this video again and again. सगळे emotions जर शिरिशा मॅडमनी स्मजवले असते, तर बरे झाले असते! Thanks अमूक तमूक टीम for making this series and thanks Dr Shirisha sathe for explaining the subject very well ❤

  • @shraddha_more
    @shraddha_more ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर सिरीज आहे. अनेक धन्यवाद अमुक तमुक टीम आणि प्रत्येक भावनेसाठी आलेल्या डॉक्टर्सनाही. अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

  • @prachikale8332
    @prachikale8332 8 หลายเดือนก่อน +1

    Attyanta sundar episode. Thank you 🙏

  • @apurvajoshi6560
    @apurvajoshi6560 10 หลายเดือนก่อน

    किती व्यवस्थित आणि सामान्य माणसाला समजेल असं विश्लेषण आहे❤ खूप काही शिकायला मिळालं.

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 9 หลายเดือนก่อน

    खूप व्यवस्थित मांडणी, Shirisha साठे मॅडम अगदी उत्तम प्रकारे विषय समजावून सांगतात.
    पुन्हा विनंती की सर्वसामान्य viewers यांना समजण्यासाठी इंग्रजी शब्दांच्या ठिकाणी मराठी sub titles देता आले तर उत्तम.

  • @manojjadhavjalkot4476
    @manojjadhavjalkot4476 ปีที่แล้ว

    ओमकार दादा व मॅडम तुम्ही खूपच सर्वांच्या मनातील प्रश्ने शोधून त्यांची उत्तरे दिलात अस वाटल.

  • @anands9131
    @anands9131 ปีที่แล้ว +2

    Pls do a session with Dr Shirisha mam on anxiety and depression.

  • @Niab9
    @Niab9 ปีที่แล้ว +6

    I am really thankful to you Amuk Tamuk. As mental health practitioner are often avoided by people for taking any theory or councelling but if one understands they really interprets our issues or emotions which we aren't aware and free us from that. They are heroes definitely we change our attitude towards life. Mam, has really interpreted nicely.

  • @varshapendse371
    @varshapendse371 3 หลายเดือนก่อน

    Excellent! excellent!!!
    1.04.42...पासून पुढे तर यथार्थ..दोन वाहनांनी ठोकले तर लागलं का तुम्हाला..❤❤व्वा! इतिहासातील सुंदर,मानवतावादी गोष्टींचा ..pathway तयार करणे ,ही काळाची गरज आहे..पसायदान आठवले🙏🙏

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 ปีที่แล้ว +5

    Insightful...with actual...realistic takeaways❤ Dr. Sathe..... presence actually gives a homely vibes. As if i am discussing my concerns with an elderly family member. Omkar..... हे एव्हड्यावर थांबवू नका....❤ Bring on more and more intense emotions ! People confuse and mixup so many emotions.....

  • @shubhangijoshi6987
    @shubhangijoshi6987 3 หลายเดือนก่อน

    Sathe madam ...You explained it very well...... Amazing session.......Very helpful....😊

  • @sumitagaikwad39
    @sumitagaikwad39 ปีที่แล้ว +2

    Very few people like Mam, can put complex emotions in simple words.

  • @ashwamedhpatole
    @ashwamedhpatole ปีที่แล้ว

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अमुक तमुकच्या टीमचे प्रश्न योग्य असतात. आणि डॉ. शिरिषा नहमीच थेट मुद्देसूद समजवतात.
    डॉ भूषण आणि डॉ. साठ्येंची एकत्र बैठकसुद्धा आवडेलच.

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 ปีที่แล้ว

    अमुक तमुक टीम चे विशेष कौतुक करते... असे महत्त्वाचे विषय हाताळण्याबद्दल !!🙏🎉👌💐 🎉

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त आहे यार हे सगळं माझ्या साठीच आहे अस वाटतय धन्यवाद आभार अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद

  • @priyankamore1975
    @priyankamore1975 ปีที่แล้ว

    शिरीषा मॅडम तुम्ही फारच छान पणे गोष्टी समजून सांगता❤

  • @smitapatil1172
    @smitapatil1172 ปีที่แล้ว

    मी फॅन झाले आहे मॅम ची... किती सहजतेने सोप्या शब्दात समजावून सांगतात

  • @vidyadongre2020
    @vidyadongre2020 ปีที่แล้ว

    खूप सूक्ष्म पातळी वर निरीक्षण करायला लावणारे व्याख्यान..

  • @manalimurkar5737
    @manalimurkar5737 ปีที่แล้ว +3

    Emotions crash course... अतिशय स्तुत्य उपक्रम 👌👌... दिलसे thank u❤.... 'Gaslight'.. ह्या topic वर चर्चा होऊ शकते का ओमकार?..pls try for it🙏

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 ปีที่แล้ว

    मॅडम खूप छान विश्लेषण करून सांगितले तुम्ही,रागावर थोडा ताबा माणसाने ठेवला तर खरचं त्याला शांती लाभते

  • @manishacharankar2891
    @manishacharankar2891 11 หลายเดือนก่อน

    ओमकार तू आणि तुझी टीम खूप छान काम करीत आहात .खूप चांगले विषय तुम्ही मांडतात,आणि त्यावर चर्चा घडून आंताय त्या बदल मनापासून धन्यवाद .

  • @manasion7660
    @manasion7660 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम पद्धतीने सांगितले.या पद्धतीने स्वतः वर काम करणे सहज शक्य वाटू लागले आहे.खरंच हे सेशन परत परत ऐकावं लागेल,म्हणजे कळेल आणि वळायसाठी काम करता येईल.

  • @suparnashal
    @suparnashal 9 หลายเดือนก่อน

    Dr shirisha Sathe is awesome .. please hv her again on show

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey ปีที่แล้ว +1

    अमुक तमुक
    प्रत्येक भाग सतत ऐकावा वाटतो🎉❤

  • @Shalaka_Gadre
    @Shalaka_Gadre ปีที่แล้ว +1

    She is so intelligent and intellectual ❤

  • @ushachaudhari217
    @ushachaudhari217 3 หลายเดือนก่อน

    खुप छान मॅडमना खुप वर्षांनी व्हिडिओ च्या माध्यमातून बघते

  • @warana369
    @warana369 ปีที่แล้ว

    👌अत्यंत उत्कृष्ठ मुलाखत...👌👏👍❤❤❤💐🙏
    उत्तम प्रश्न आणि अत्यंत परिणामकारक, नेमकी उत्तरे...👍
    दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
    संपूर्ण 'अमुक तमुक' चमू चे मनापासून अभिनंदन 💐💐💐

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम संवाद सुसंवादाची महती शास्त्रीय पद्धतीने ऐकायला मिळाला. धन्यवाद🎉

  • @vrundabhalghare6923
    @vrundabhalghare6923 ปีที่แล้ว

    Wow ! Great ! Mala Saglyat jast tumchya hya guest Saglyat jast awadtat . Kay sundar boltat khup sundar bhag zala . Great knowledge sundar samjavun sangital . Jadhav tumhi pan great aahat . Solid bhag ❤❤ Mam na sanga tya great aahet .

  • @smitapatil1687
    @smitapatil1687 ปีที่แล้ว +1

    अगदी महत्वाचा विषय... सुरेख स्पष्टीकरण आणि उदाहरणं 👌👌

  • @shailuofyash
    @shailuofyash ปีที่แล้ว

    फार गरजेचे आहे हे जाणून घेणं,फारच महत्वपूर्ण व्हिडिओ❤

  • @kirtiaphale1481
    @kirtiaphale1481 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, अप्रतिम very intelligent,very good guidance. मुद्देसूद संभाषण.❤

  • @monicadeodhar
    @monicadeodhar ปีที่แล้ว

    अमुक-तमुक चे सगळे videos खूप भारी असतात👌👌 शिरीषाजी यांची तर मी फॅन आहे❤. त्यांचे बोलणे, विचार तार्किक पणे मांडणे, भाषा सगळंच खूप खूप आवडतं. ओंकार तुम्ही पण छान anchoring करता, तुमचे प्रश्न पण एकदम योग्य असतात 💯. Positivity आणि Negativity वर एक एपिसोड शिरीषा mam बरोबर घ्यावे ही विनंती👍🙏

  • @rupalisaraf8759
    @rupalisaraf8759 10 หลายเดือนก่อน

    Actually shirisha mam la kadhi ekayla milate yach wat ch baghat aste ...khup chan vishleshan rag...rag ha changla pan aau shakato wah...the space between stimulus and responce...hatts off Dr shirisha and amuk tamuk team....we r weting for next series

  • @anjalirege1839
    @anjalirege1839 ปีที่แล้ว +1

    Nature, nurtur and neighbourhood is a perfect combination which gives birth to extreme anger. Excellent episode for the people who are angry by default and for the people who are at receiving end. One sentence that cought my attention all my life is when you are angry you loose more than your temper.

  • @chetanchopade5416
    @chetanchopade5416 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर, सोपे, सुटसुटीत, मनापासून, हसत खेळत..... शब्द कमी पडतायेत....

  • @RadhaMapari-l3y
    @RadhaMapari-l3y 6 หลายเดือนก่อน

    Omkar dada tumcha program khup chhan ahe.. Khup detail charcha krta tumhi tumchya karykrat.. Anek important vishay tumhi mandta.. Well done for your efforts.. Mla fkt ekch gosht awdt nhi ti mhanje tumchi bsnyachi paddt.. Ti bdlali tr khip chaan hoil ad mla vatt..

  • @jayashreepandit7102
    @jayashreepandit7102 ปีที่แล้ว

    उत्तम।पाची भावनांचे खूप छान विश्लेषण ।या नंतर जमल्यास पूर्वाग्रह, मत्सर, असुरक्षितता, धार्मिकता, कंडिशनिंग या विषयांवर पण कार्यक्रम करावा।

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 ปีที่แล้ว

    शिरीषाताई तुमच्या बोलण्यातून तुमचं ज्ञान, तुमचा अनुभव जाणवतो. संवादातून अतिशय सुंदर आणि सहज पद्धतीने तुम्ही विषय मांडता त्यामुळे विषय समजतो. तो समजून घेण्याची उत्कंठा निर्माण होते आणि ऐकल्यानंतर त्यावर विचार,चिंतन आणि मनन करण्यासाठी उद्युक्त व्हायला होतं.
    तुमचे खूप खूप आभार

  • @meghakharkar7739
    @meghakharkar7739 ปีที่แล้ว

    सारखं सारखं ऐकायला हवे.खुप सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगितले आहे.

  • @manasivaishampayan4301
    @manasivaishampayan4301 11 หลายเดือนก่อน

    ओंकार खूपच छान आहे ही संवाद मालिका.

  • @jyotsnadeodhar1707
    @jyotsnadeodhar1707 2 หลายเดือนก่อน

    sarva episod khup Chan. purna episod eka jagi basun ekale jawe asel Zale ahet khup Chan ane tumchya khup koutuk.. as navin det raha. tya tya kshetratalya tadnyana bolawlya mule mudesud charcha ekanyacha Anand milato. good.

  • @vishakhagindya
    @vishakhagindya 11 หลายเดือนก่อน +1

    All episodes are really very good from this series..
    If possible please include depression as well in this emotion series

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 ปีที่แล้ว

    खूप छान as usual. Shirisha mam तुम्ही लवकर सापडायला हव्या होतात मला.

  • @rushikeshdeshpande661
    @rushikeshdeshpande661 ปีที่แล้ว

    खूपच छान खूप insighte मिळतात मला संशय ह्या विषयावर संवाद ऐकायला आवडेल

  • @rohinigharde8161
    @rohinigharde8161 ปีที่แล้ว

    Shirisha Mam tooo good...U are the Gem..... Fabulous Talk. Ani Omkar tu agadi achuk prashn hertos...too good 👍