Carvaan Classic Radio Show | Jagdish Khebudkar Marathi Songs Special | महान गीतकार | मराठी गाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • ‪@saregamamarathi‬ पुन्हा एकदा महान गीतकार जगदीश खेबुडकर आणि त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवरील नवीन भाग घेऊन आले आहे.
    Click below to listen to your favorite song.
    0:01:35 Bai Bai Manmoracha
    0:04:54 Ek Lajara Na Sajara Mukhda
    0:10:21 Airaneechya Deva Tula [1965]
    0:13:52 Dhundi Kalyana
    0:17:35 Chandra Aahe Sakshiila
    0:22:33 Ashtavinayak Tuza Mahima Kasa
    0:41:35 Dehachi Tijori
    0:44:38 Vithoo Mauli Tu
    0:52:35 Tumhavar Keli Mee Marji Bahaal
    0:56:00 Aali Naar Thumkat Murdat
    1:00:36 Raja Lalkari Ashi De
    1:06:42 Ya Ravji Basa Bhavji
    1:14:20 Disla Ga Bai Disla (Mala Baghun Galat Haslaa)
    1:19:57 Mala Lagali Kunachi Uchaki
    1:24:45 Akashi Zep Ghe Re Pakhara
    Credits:
    TRACK TITLE: Bai Bai Manmoracha
    ALBUM/FILM TITLE: Mohityanchi Manjula
    ORIGINAL ARTIST: Lata Mangeshkar
    MUSIC DIRECTOR: Anandghan
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Ek Lajara Na Sajara Mukhda
    ALBUM/FILM TITLE: Chandnachi Choli Ang Ang Jaali
    ORIGINAL ARTIST: Usha Mangeshkar, Arun Sarnaik
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Airaneechya Deva Tula [1965]
    ALBUM/FILM TITLE: Sadhi Mansa
    ORIGINAL ARTIST: Lata Mangeshkar
    MUSIC DIRECTOR: Anandghan
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Dhundi Kalyana
    ALBUM/FILM TITLE: Dhakti Bahin
    ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke, Asha Bhosle
    MUSIC DIRECTOR: Sudhir Phadke
    LYRICIST: Jagdish Khebudkar
    TRACK TITLE: Chandra Aahe Sakshiila
    ALBUM/FILM TITLE: Chandra Hota Sakshila
    ORIGINAL ARTIST: Asha Bhosle, Sudhir Phadke
    MUSIC DIRECTOR: Sudhir Phadke
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Ashtavinayak Tuza Mahima Kasa
    ALBUM/FILM TITLE: Ashtavinayak
    ORIGINAL ARTIST: Anuradha, Jaywant Kulkarni, Chanda Shekhar Gadgil, Pt. Sharad Jambhekar, Chorus, Mallesh
    MUSIC DIRECTOR: Anil-Arun
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Dehachi Tijori
    ALBUM/FILM TITLE: Amhi Jato Amuchya Gava
    ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke
    MUSIC DIRECTOR: Sudhir Phadke
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Vithoo Mauli Tu
    ALBUM/FILM TITLE: Are Sansar Sansar
    ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke, Suresh Wadkar, Jaywant Kulkarni
    MUSIC DIRECTOR: Anil-Arun
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Tumhavar Keli Mee Marji Bahaal
    ALBUM/FILM TITLE: Pinjara
    ORIGINAL ARTIST: Usha Mangeshkar, Chorus
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Aali Naar Thumkat Murdat
    ALBUM/FILM TITLE: Pinjara
    ORIGINAL ARTIST: Wagya, Chorus
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar
    TRACK TITLE: Raja Lalkari Ashi De
    ALBUM/FILM TITLE: Are Sansar Sansar
    ORIGINAL ARTIST: Anuradha, Suresh Wadkar
    MUSIC DIRECTOR: Anil-Arun
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Ya Ravji Basa Bhavji
    ALBUM/FILM TITLE: Naav Motha Lakshan Khota
    ORIGINAL ARTIST: Asha Bhosle
    MUSIC DIRECTOR: Anil-Arun
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Disla Ga Bai Disla (Mala Baghun Galat Haslaa)
    ALBUM/FILM TITLE: Pinjara
    ORIGINAL ARTIST: Usha Mangeshkar
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Mala Lagali Kunachi Uchaki
    ALBUM/FILM TITLE: Pinjara
    ORIGINAL ARTIST: Usha Mangeshkar, Chorus
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Akashi Zep Ghe Re Pakhara
    ALBUM/FILM TITLE: Aram Haram Aahe
    ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke
    MUSIC DIRECTOR: Sudhir Phadke
    LYRICIST: Jagdish Khebudkar
    #saregamamarathi
    #jagdishkhebudkar
    #latamangeshkar
    #marathisongs
    #मराठीगाणी
    #carvaanclassicradioshow
    Follow RJ Sanika on:
    Instagram - / saregama_sanika
    Facebook - / rjsanika
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Facebook: / saregama
    Twitter: / saregamaglobal

ความคิดเห็น • 386

  • @KhatuYogesh
    @KhatuYogesh ปีที่แล้ว +40

    आम्हाला Khebudkar Sir Private Highschool कोल्हापूर येथे मराठी विषय शिकवायला होते... 1985-1990 दरम्यान.. तेव्हा नेहमी आम्ही त्यांच्या संपर्कात असायचो..रोज बघायचो ..बोलायाचे... पण सर सिनेमा क्षेत्रात आहेत हे बिलकुल माहीत न्हवते.. त्यांनी पण कधी याची पुसटशीही कल्पना दिली नाही.. चालत घरी जायचे..हातात पिशवी घेवून कपिलतीर्थ मार्केट मध्ये भाजी घेताना दिसायचे...सायकल ने फिरायचे...सिने अभिनेते भालचंद्र कुलकर्णी इंग्लिश शिकवायचे..आम्ही त्यांना म्हणायचो सर तुम्हाला कुठेतरी बघितल्या सारखं वाटतय (पोस्टर वर)..ते पण फक्त स्मायल देवून विषय बदलायचे..😊

    • @chitramujumdar2008
      @chitramujumdar2008 11 หลายเดือนก่อน

      Samgra Jagdish Khebudkar ase sarve vachayla Aikanyasathi khuthe milel

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 5 หลายเดือนก่อน

      महान लोकं असेच असतात
      आपल्याला त्यांचे वास्तव्य मिळाले
      आपण भाग्यवान आहात

    • @venkatraoraghoji6494
      @venkatraoraghoji6494 หลายเดือนก่อน

      😅. σк

    • @SJKolase
      @SJKolase หลายเดือนก่อน

      किती साधेपणा

    • @sagarpatil5953
      @sagarpatil5953 18 วันที่ผ่านมา

      नांद्रे विद्यालय येथे शिकत असताना साहेबांचे भाषण ऐकले होते।।। ग्रेट मराठी माणूस

  • @sanjayjoshi7214
    @sanjayjoshi7214 ปีที่แล้ว +37

    जगदीश खेबुडकर सर 1975 साली मला मराठी विषयाला होते, जेवढी त्यांची गाणी अप्रतिम तेवढी त्यांची persanyality होती. त्यांचा ड्रेस कोडे white paint, white shirt, black belt व kolhapuri चप्पल.

    • @lokhadevijayb.3535
      @lokhadevijayb.3535 ปีที่แล้ว +4

      आपले भाग्य आहे अश्या थोर व्यक्तीच्या सानिध्यात आपण वावरलात 🙏🙏

  • @omkarbhat8605
    @omkarbhat8605 ปีที่แล้ว +49

    नमस्कार मी खेबवडे गावचा आहे आम्हाला खुप अभिमान आहे की असा गीतकार आमच्या गावात जन्माला येऊन त्यांनी आपले आडनाव खेबुडकर लावून प्रसिद्ध केल .. त्यांच्या साहित्याला तोडच नाही. महान अश्या वेक्तीला कोटी कोटी प्रणाम 🙏

    • @vishnukhule3596
      @vishnukhule3596 7 หลายเดือนก่อน

      😮

    • @raviwaghmare2581
      @raviwaghmare2581 5 หลายเดือนก่อน

      त्यांच खर आडनाव सांगाल का दादा

    • @umeshpatil9986
      @umeshpatil9986 5 หลายเดือนก่อน +1

      सर नमस्कार फ्रॉम खानापूर belgav

  • @rajaramarde6858
    @rajaramarde6858 ปีที่แล้ว +28

    1976 साली मी प्रायव्हेट हायस्कूलला ११ वी ल होतो , त्यावेळी खेबुडकर सर हे मराठी शिकवायला होते. सरांचं कोणतही गाणं ऐकलं कि ११ वीचे दिवस आठवतात. सरांची सर्वच गाणी ही वारंवार ऐकावीशी वाटतात.

    • @bhushangosavi2445
      @bhushangosavi2445 5 หลายเดือนก่อน

      You are lucky..Ki tumhi khebudkar yancha kadun marathi shikala

    • @NarayanKarande-yf8uo
      @NarayanKarande-yf8uo 4 หลายเดือนก่อน

      ​@@bhushangosavi2445❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 ปีที่แล้ว +14

    जगदीश खेबुडकर, अत्युच्च प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व, त्यांच्या सर्वच कविता तसेच सर्व अजरामर झाली आहेत, त्यांच्या काळात तेवढ्याच ताकदीचे संगीतकार गायक गायिका होत्या, म्हणून ही गाणी अविट गोडीची झाली आहेत, त्यांच्या प्रतिभेला साष्टांग दंडवत.

  • @SunilPatil-eh8on
    @SunilPatil-eh8on ปีที่แล้ว +19

    मी भुसावळला कॉलेज मध्ये असताना त्यांचा गावरान मेवा कार्यक्रम बघितला होता . खेबुडकरांना प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करतांना पाहणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग होता.

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 5 วันที่ผ่านมา

      Khebdukar जगदीश 😢माझा दाँत पंक्ति असीच खेबड़ा झाला मी काय केली सागड़े दाँत तुड़वाइली आणि शीघ्र बूढी झाली मस्त गाँधी आहे दुनिया भली आप भले सागड़े भले माझा अर्थ सागड़े खूप छान गीत.

  • @ajitm7
    @ajitm7 ปีที่แล้ว +6

    जगदीश खेबुडकर, काय बोलू यांच्या कवितेला व काव्य रचनेला,आज यांचा या मराठी पिढीला कोणताही अभिमान नाही याची खंत वाटते. कोल्हापूर ने अनेक महान कलावंत दिले आज त्या जिल्ह्यातील लोकांनी यांची नावे सांगावीत.

  • @gautamthakare6614
    @gautamthakare6614 ปีที่แล้ว +24

    विठू माऊली तू माऊली जगाची या गीताने तर अवघा भारतवर्ष भक्तिमय झाला

  • @vikramkadam8689
    @vikramkadam8689 ปีที่แล้ว +12

    अगदी बालपणापासूनच खेबूडकर सरांची गाणी ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो..नांदेडचे तत्कालीन आमदार हेमंत पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जगदीश खेबूडकर सरांची प्रत्यक्ष भेट झाली होती..माझ्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण..असा गीतकार पुन्हा होणे नाही...

  • @rajanjadhav3258
    @rajanjadhav3258 ปีที่แล้ว +37

    विशेष बाबा म्हणजे सरांनी लिहलेली २५०० गीत आणि ३५०० कविता , ह्या सर्वच्या सर्व अप्रतिम आणि तेवढ्याच लोकप्रिय ठरल्या.. मानाचा मुजरा..

  • @ramjiawatade841
    @ramjiawatade841 ปีที่แล้ว +12

    कॉलेज मध्ये असताना १९९५ साली आमच्या स्नेहसंमेलनात चिफ गेस्ट म्हणून आले होते तेव्हापासून मी त्यांचा फॅन आहे

  • @vajeer-lh9et
    @vajeer-lh9et ปีที่แล้ว +10

    जगदीश सर मी आणि माझा मित्र ऐकत्र आमच्या कोल्हापुर मधील मंगळवार पेठेत डिनर केल होत . आम्ही आमच भागय समजतो .

  • @vikramkhilari5959
    @vikramkhilari5959 3 หลายเดือนก่อน +4

    अशा व्यक्तीला खरं तर भारतरत्न पुरस्कार भेटायला हवा.
    मराठी राजकारणी लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असे रत्न राज्यात जन्मले , संपलं इथंच.
    पण तुम्ही राजकारणात इतकं दंग झाले की, तुम्हाला अशी लोक संपलेली पण कळलं नाही.
    तुम्हाला उरावर घ्यायला बॉलिवूड लागतं.😢😢😢😢😢

  • @sunildemllo39
    @sunildemllo39 ปีที่แล้ว +27

    सानिका तूझ्या गोड सुरेल आवाजातले माहितीपूर्ण निवेदनच इतकं छान असतें 👌🏻👌🏻 मी आणि माझी पत्नी तूझ्या आवाजचे "फॅन " आहोत. खेबूडकरासारख्या दिग्गज कविबद्दल काय बोलावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Yogiji73
    @Yogiji73 2 ปีที่แล้ว +28

    बापरे काय ही माणसं. किती मोठी माणसं.

  • @dattatraykodle5943
    @dattatraykodle5943 2 ปีที่แล้ว +13

    जगदिश खेबुडकर म्हणजे साक्षात कोल्हापूरकर लोकांचा अभिमान, शान,

  • @raginisalampure5574
    @raginisalampure5574 ปีที่แล้ว +9

    सरांना मनापासून वंदन अगदी साध्या भाषेत लिहिलेली गाणी अविस्मरणीय आहे

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 ปีที่แล้ว +26

    खुपच अजरामर गाणी लिहिली आहेत स्व. जगदीश खेबुडकर साहेब यांनी. आम्ही आपणास वंदन करतो. स्वर्गातील देव देवता हि आपल्या गीतात न्हाऊन जातील.

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 ปีที่แล้ว +18

    जगदीश खेबुडकर जी म्हणजे अप्रतिम बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत उदाहरण ! इतक्या उच्च कोटीची मधुर गाणी सामान्य बुद्धिमत्तेच्या कवीला स्फुरणे शक्य नाही ! त्यांचे प्रत्येक गाणे ऐकताना नवीन वाटते ! त्रिवार मुजरा या असामान्य बुद्धीच्या कवीला !

  • @sanjayanandraomandharepune5230
    @sanjayanandraomandharepune5230 ปีที่แล้ว +5

    कोल्हापुर ला आमच्या शालेत यायचे खेबुडकर सर

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 11 หลายเดือนก่อน +4

    हर हुंनर व प्रतिभासपन्न कवी, गीतकार भाषा पंडित या वा आशा अनेक उपाधी नी समृद्ध ते होते.

  • @nileshjoshi2468
    @nileshjoshi2468 ปีที่แล้ว +22

    सर्वच गाणी ऐकून मन अतिशय प्रसन्न झाले जगदीश खेबुडकर यांना शतशः नमन.सर्वच संगीतकार आणि निर्माते यांना पण वंदन.

  • @dattashinde5613
    @dattashinde5613 ปีที่แล้ว +5

    असा सरस्वतीचा वरदहस्त आणि असामान्य प्रतिभाशक्ती असणारा रचनाकार आता शतकात तरी होणे अशक्यच !

  • @vijayrane8141
    @vijayrane8141 ปีที่แล้ว +8

    असे गीतकार या जमान्यात बघायला मिळाले असते बर झाले असते. असे सुंदर गीतकार आपल्याला लाभले हेच आम्हचे भाग्य आहे.

  • @mohankamate6668
    @mohankamate6668 2 ปีที่แล้ว +14

    जगदिश खेबूडकरांबद्दल माझ्यासारख्या कोल्हापूरकराने लिहिणे म्हणजे सुर्याबद्दल लिहीणे.कवी म्हणून ग.दि.माडगुळकरांचे शिषत्व पत्करलेले महान गीतकार.प्रत्येक गीतात जीवनाचे तत्व मांडणारा अद्वितीय कवी.मला त्याचा विशेष अभिमान आहे.त्रिवार मानाचा मुजरा.

  • @chandrakantughade319
    @chandrakantughade319 ปีที่แล้ว +2

    खरेच अशी मानस परत होणे नाही विश्वास बसत नाही खरेच आम्ही नशीबवान आहोत हे ऐकायला आम्हाला मिळालाय ही मानस देवांनी पाठवली होती

  • @subhashborchate29
    @subhashborchate29 ปีที่แล้ว +13

    निसर्गदत्त देणगी लाभलेला प्रतिभावंत कलाकार. खरतर आपण नशिबवान आहोत यांच्या तृप्त करणाऱ्या गाण्यांबरोबर आयुष्य आनंदात जगतोय. 👏👏

  • @deepakbhosale8309
    @deepakbhosale8309 2 ปีที่แล้ว +26

    किती किती सुंदर ही गाणी. नाहीतर आजची गाणी ताल नाही सूर नाही. अप्रतिम. किती सुंदर भावार्थ या गाण्यांना.

  • @swapnarane8050
    @swapnarane8050 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम👌 जगदीश खेबुडकर सर आमच्या कॉलेजमध्ये आलेले. त्यांना प्रत्यक्ष ऐकण हे आमच अहोभाग्य🙏

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 2 ปีที่แล้ว +8

    माझ्या बालपणात रेडिओ वर ऐकलेली गाणी आणि शनिवारी डीडी वन वर पाहिलेला सिनेमा ❤खुपच सुदंर आठवण❤ 🙏

  • @vishhal3992
    @vishhal3992 ปีที่แล้ว +36

    अष्टविनायक हे गाणं एका रात्रीत लिहिणे म्हणजे खरंच श्री गणेशाचा आशीर्वाद... खूप खूप धन्यवाद सानिका, गाण्या पाठची गोष्ट ही सांगितल्या बद्दल....

    • @pallavishirke4261
      @pallavishirke4261 ปีที่แล้ว +1

      गट।।।। ॰।।।
      ।।।।।

      ।।।
      ।।।।

      ।।।
      ।।
      ।।।।
      ।।।
      ।।।।।

    • @anilshambharkar5541
      @anilshambharkar5541 ปีที่แล้ว

      @@pallavishirke4261 qq1ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp

    • @anilshambharkar5541
      @anilshambharkar5541 ปีที่แล้ว

      @@pallavishirke4261 //////////////////////////l//@

    • @mahadevchougulechanduricha6834
      @mahadevchougulechanduricha6834 11 หลายเดือนก่อน

      आपण मराठी गाण्यांचा खजीना या चॅनल वरून लोकांना खुला ठेऊन आजही मराठीच वैभवशाली इतिहास नवीन पिढीला दिला त्याबद्दल मी ऋणी आहे 🚩 जय जगदंब 🙏🚩🙏💐

  • @sharadpatil.2960
    @sharadpatil.2960 2 ปีที่แล้ว +30

    जगदीश खेबुडकर हे मराठी चित्रपटातील प्रतिभावंत गीतकार होते .त्यांचे कोणतेही गीत असो मनाला चटका लाऊन जाते .असा गीतकार पुन्हा होणे नाही .आणि अशी गाणीसुध्दा पुन्हा होणार नाही .

  • @narahrigodse5195
    @narahrigodse5195 6 หลายเดือนก่อน +1

    यांच्या ७५ वर्षाला त्यांनी सादर केलेला गावरान मेवा चा जगदीश खेबूडकर नाबाद ७५ कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात पाहिला. अप्रतिम.
    30:00

  • @abhijeetborse
    @abhijeetborse ปีที่แล้ว +8

    महान माणसे महाराष्ट्राला परिचित असले पाहिजे अशी लोककलेचा येणाऱ्या पिढीला ओळख करून द्यायची कारेक्रम राबवा सरकारने🙏

  • @mohanshrikhande403
    @mohanshrikhande403 2 ปีที่แล้ว +7

    कै. जगदीश खेबुडकर म्हणजे मराठी गीतांचा आत्माच. 🌹🙏🏻 त्यानी " पिंजरा " चित्रपटासाठी लिहीलेली सर्वच गाणी अर्थपूर्ण, सहजसुलभ होती. त्यांच्यासारखा मराठी गीतकार भविष्यात होणे नाही. त्याना नम्र अभिवादन 🌹🙏🏻
    २०.०७.२०२२.

  • @santoshjagtap6593
    @santoshjagtap6593 ปีที่แล้ว +4

    ह्या गाण्यांचे रसाळ,माहितीपूर्ण विवेचन ज्यांनी केले आहे,त्या सानिका मुतालिक या निवेदिकाताईंचा आवाज खूप छान आहे.त्यांचा आवाज सह्याद्री वाहिनीवर पूर्वी असणाऱ्या वृत्तनिवेदिका समीरा गुजर यांच्या आवाजाशी अगदी साधर्म्य दाखविणारा व मिळताजुळता आहे.

  • @anaghajoshi3083
    @anaghajoshi3083 2 ปีที่แล้ว +190

    जगदीश खेबुडकर सर आम्हाला कोल्हापूरला मराठी विषय शिकवायला होते. पण त्यावेळी त्यांचे मोठेपण माहित नव्हते, धुंदी कळ्यांना पासून ते लावणी पर्यंत त्यांच्या गाण्यांमध्ये मध्ये खूपच विविधता आहे .खरंच खूप महान व्यक्तिमत्व, त्यांच्याविषयी खूपच अभिमान व आदर आहे

    • @affanshaikh1238
      @affanshaikh1238 ปีที่แล้ว +2

      Salute

    • @anuradhalohogaonkar3893
      @anuradhalohogaonkar3893 ปีที่แล้ว +6

      खेबुडकर यांची गाणी म्हणजे चाल व अर्थपूर्ण संगम

    • @ranjitkuwar5215
      @ranjitkuwar5215 ปีที่แล้ว +2

      Super singer 👏👏👏🎉🎉

    • @pratibhabadgujar2094
      @pratibhabadgujar2094 ปีที่แล้ว +3

      तुम्ही खूपच भाग्यवान आहात. ☺️👍🏻🙏🏻

    • @balajiekbote7442
      @balajiekbote7442 ปีที่แล้ว +4

      ताई आपण खुपच भाग्यवान आहात,
      तो साल कोणता होता

  • @ranjitraskar9592
    @ranjitraskar9592 ปีที่แล้ว +5

    गाणी ऐकताना पुन्हा त्या जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं.....

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 2 ปีที่แล้ว +11

    मन मोहरून टाकणारी अवीट गाणी ऐक त रहावे वाटते सर त्री वार अभिवादन. 👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 หลายเดือนก่อน +2

    ❤️🙏❤️आज पौर्णिमा,अमावस्या यांचे अनोखे मीलन!! वा!वा! कम्माल मशाल,जीवलग❤⭐️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏

  • @jagdishpatil1398
    @jagdishpatil1398 11 หลายเดือนก่อน +2

    महान गीतकार आणि कवी पण हवी तशी प्रसिध्दी ह्या व्यक्ती ला लाभली नाही . अलोकिक अशी प्रतिभा जगदीश खेबुडकर यांच्या कडे होती ,त्यांची गाणी ऐकताना लक्षात येते की ते किती महान होते त्यांना मानाचा मुजरा.

  • @marutihake4569
    @marutihake4569 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मराठी भाषेचा शब्दात किती किमया आहे हे दाखवून देणारे महान लेखक.कवी खेबुडकर सर

  • @nalishabankar5288
    @nalishabankar5288 2 ปีที่แล้ว +18

    अप्रतिम गाणी !!अवीट गोडीची ,अगदी एकापेक्षा एक. आणि सानिका तुझं निवेदन तर खूपच छान, लाघवी आणि मधाळ आहे. खूप खूप धन्यवाद!!

    • @adhikraojadhav4877
      @adhikraojadhav4877 2 ปีที่แล้ว

      आठवण आली एकदा यशवंत
      हायस्कूल इस्लामपूर ला खेबुडकर आले होते एकदा त्यांनी एक गाणं म्हटलं हितं नको तिथ जावो आडोशाला उभा राहू एवढेच ते म्हणाल्याने गप्प बसले आणि एक मुलगी म्हणाली का बघतात आणि सगळं हास्य तयार झालाही माझी जुनी आठवण

    • @gangadharumarye8207
      @gangadharumarye8207 2 ปีที่แล้ว

      676

  • @anandpatil3354
    @anandpatil3354 2 ปีที่แล้ว +2

    गावरान मेवा कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांची आणि माझी भेट झाली. मी सरांना भेटायला गेलो आणि त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला अक्षरशा त्यानंतर मी 25 एक कविता लिहिल्या असा परिस्पर्श मला सरांच्या निमित्ताने लाभला वंदन माझ्या गुरुवर्य ना

  • @jayshreekhude3324
    @jayshreekhude3324 2 ปีที่แล้ว +14

    महाराष्ट्रातील अनमोल रत्न नाना

  • @businesbook
    @businesbook ปีที่แล้ว +5

    किती सुदंर आणि मनमोहक गाणी ,कितीही टेन्शन असुद्या मनाला हलके करणारे
    आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हि तुमची ,आमची कथा ,व्यता मांडतात ,

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 หลายเดือนก่อน +3

    🌹👌🌹🙏इतका मुक्त “पिंजरा”परत होणे नाही👌❤️⭐️👌❤️⭐️🙏⭐️❤️⭐️❤️⭐️⭐️❤️🙏👌❤️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏

  • @santoshkadam2697
    @santoshkadam2697 ปีที่แล้ว +2

    अशी माणसं पुन्हा होणे नाही थँक्स सानिका

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹🕉️अष्टविनायक नमो नमः🌹🙏🌹❤👌❤👌❤👌❤🙏❤👌❤👌❤👌❤🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💫💜💫💜💫💜💫💜💚💜💫🌸🧡🌸🧡🌸🌸🧡🌸🧡🌸🧡🌸🧡🌸

  • @vitthalmahalle988
    @vitthalmahalle988 2 ปีที่แล้ว +4

    अशी गाणी , असा गीतकार पुन्हा होणे नाही .

  • @tanajighumare929
    @tanajighumare929 ปีที่แล้ว +3

    वर्ष आठवत नाही पण गावरान मेवा हा ऑर्केस्ट्रा घेऊन दारफळ तालुका माढा येथे
    येथे आले होते.

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 2 ปีที่แล้ว +19

    महान कवी, गीतकार, आदरणीय जगदीश खेबूडकर... यांना विनम्र अभिवादन.. त्यांच्या गीतांना, कवितांना, लावणींना सलाम, सानिका अप्रतिम प्रस्तुती साठी तुला मनस्वी धन्यवाद 👍🌹🙏

    • @kartrshing466
      @kartrshing466 2 ปีที่แล้ว

      Marathitle jnu shailendra na bhooto na bhavishyari swa. Mhan geetkarala samuche 100 baar vandan

  • @rajeshambardekar4847
    @rajeshambardekar4847 2 ปีที่แล้ว +30

    एकापेक्षा एक अवीट गोड गाणी , मराठी व्याकरणातील प्रत्येक गोष्टीला सरांनी स्पर्श केला , त्यांच्या गीतातून तो दिसून येतो , सर तुम्हाला तुमच्या चरणांवर माझा सदैव साष्टांग नमस्कार आणि आदरांजली

  • @manoharkulkarni1690
    @manoharkulkarni1690 ปีที่แล้ว +3

    जगदीश खेबुडकर हे विविध प्रकारच्या गीतांनी बहरलेला गीतव्रुक्ष.

  • @Aalad0049
    @Aalad0049 3 หลายเดือนก่อน +1

    जगदीश खेबुडकर कविता गाणी लावणी रचनाकार त्याचीऺ जुनी गाणी आजही ऐकू ऐकूशी वाटतात ते एक मराठी साहित्य सिनेमा चित्रपट सृष्टीतील एक संतच याना माझा साष्टांग नमस्कार 🙏🍄

  • @anitashinde924
    @anitashinde924 ปีที่แล้ว +2

    खुप छान
    मला मराठी जुनी गाणी प्रचंड आवडतात

  • @chandrakanterankardhayripu9417
    @chandrakanterankardhayripu9417 10 หลายเดือนก่อน +1

    दैवी देणगी लाभलेला एक प्रतिभावंत व्यक्ति

  • @sunilgharkar534
    @sunilgharkar534 ปีที่แล้ว +6

    सदा अजरामर गाणी, आवाज सर्वच .या महान कलाकारा बद्दल मी काय बोलणार.फक्त यांना एकायला मिळते हेच आमचे नशीब

  • @artistr.b.yadavyadav3144
    @artistr.b.yadavyadav3144 ปีที่แล้ว +2

    मराठीत गाणी खूप छान लिहिले आहेत

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम! लाजवाब!गीतकार, संगीतकार, अणि दिग्दर्शक यांच्या प्रतिभेचा संगम आता पुन्हा कधीही अनुभवण्यास मिळणार नाही,

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 หลายเดือนก่อน +1

    ❤🙏❤गं गणपतये नमो नमः🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼⭐️🌼❤️👌❤️🙏❤️

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 วันที่ผ่านมา

    🌹🙏🌹👌🕉️गं गणपतये नमो नमः❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🕉️❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +3

    🌹🙏🌹”पिंजर्यानेच आकाशी झेप घेतली,अजराअमर झाला❤🌺❤💫❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺😇🌺🌿🌺👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏🌹🌹🌹🙏🙏🌹🌈🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @dilipsapkal1256
    @dilipsapkal1256 2 ปีที่แล้ว +9

    सर मराठी वाङमय प्रांतातील एक अत्युच्च प्रतिभा . आपल्या प्रतिभेपुढे शिष माझे झुकती .

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹गणपताी,गणपती या द्विरोक्तीने मजा आली❤❤❤❤❤💫❤❤❤❤💫🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌸🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌈🌿🌈🌿🌈🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨👌⚡️⚡️⚡️⚡️💫✨💫✨💫✨💫⚡️✨💫✨💫

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle8832 2 ปีที่แล้ว +3

    खेबुडकर यांना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏🌹शब्दातच चित्र दृष्टी समोर आणणारी शब्द प्रगलभता❤ 👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️🙏

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 ปีที่แล้ว +3

    हम भारतीय है।भारत हमारा महान। 🌺🌺

  • @udayahire5500
    @udayahire5500 2 ปีที่แล้ว +3

    सन 1977-78ला एका ऑर्केस्ट्रा बरोबर खेबुडकर साहेब अशोकनगर येथे आले होते, संचालक मंडळाने मध्येच मागणी केली की आमच्या कारखाण्यासाठी एक गीत लिहा, लगेच साहेबांनी गीत लिहून गाणे सादर पण झाले, पुढे किती तरी वर्ष सकाळी कामगार कामावर जायच्या वेळी गीत वाजवले जात होते.

    • @ravikantbhujade6705
      @ravikantbhujade6705 2 ปีที่แล้ว

      👌👌🙏

    • @abhijeetborse
      @abhijeetborse ปีที่แล้ว

      कोणते गीत तेतर सांगितलं नाही

  • @nirajbahekar
    @nirajbahekar ปีที่แล้ว +1

    अप्रतिम हा गावरान मेवा लालित्यपूर्ण रसग्रहण सानिका.नानच्या गीतात शब्द सौंदर्य, चित्रपटाला प्रसंगानुसार घटनेतील गाण्यात
    भावव्यक्त करायला परकायाप्रवेश करणे सुलभ नसते. ती‌ भावस्थिती अनुभवून गीताला सरस्वतीचे अधिष्ठान प्राप्त होते अशा ह्या व्यक्ती आहेत.

  • @arunshinde9009
    @arunshinde9009 ปีที่แล้ว +2

    जगदीश खेबुडकर अत्यंत प्रतिभावंत गीतकार परंतु सध्या असे प्रतिभावंत कवी गीतकार हल्ली दुर्मिळ होत चालले आहेत.

    • @vaishalidesai-tm5pd
      @vaishalidesai-tm5pd ปีที่แล้ว +1

      मी फक्त नावालाच प्रतिभा, पण लकी कारण जगदीश kheboodkar सर म्हणून आम्हाला लाभले त्याच्याकडून मराठी शिकणे म्हणजे केवळ अप्रतिम त्याच्याकडून आणखी एक खूप सुंदर संस्कार आम्ही शिकलो तो म्हणजे वर्गात आल्याबरोबर ते सर्व मुलीच्या कपाळावर कुंकू व हातात बांगड्या आहेत का नाही ते पाहत कुंकू नसेल तर शेजारच्या मुलीला लाल refeelne मोठा tila तीच्या कपाळावर काढायला सांगत आणि बांगड्या नसतील तर आहेच रिकाम्या हातावर पट्टी पण याच संस्कार a मुळे आजही आमचे कपाळ व हात कधी रिकामे रहात नाहीत अशा परंपरा केवळ गीतात न mandata आचरणात आणणाऱ्या या थोर गुरूला माझे अनंत प्रणाम

  • @satishgaikwad4538
    @satishgaikwad4538 2 ปีที่แล้ว +3

    खरोखर लहान पणाची आठवण झाली

  • @swardhara25
    @swardhara25 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम यना तोडच नाही ऐकत असताना मन अभिमानाने भरून येते👌👌🙏🙏🙏🌹🌹

  • @vishnupatil3649
    @vishnupatil3649 ปีที่แล้ว +1

    असा गीतकार व त्यांची गाणी ऐकने भाग्यच म्हणाच अजरामर गीतकार

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 2 ปีที่แล้ว +10

    खेबुडकर सरांचा गावरान मेवा कार्यक्रम मी पाहिलाय ,त्यांचं वक्तव्य ही ऐकलंय

  • @hhhtfsv2589
    @hhhtfsv2589 ปีที่แล้ว +3

    मराठी भाषा आणि मराठी साहित्य मराठी कविता मराठी चारोळ्या मराठीतल कुठलही साहित्य असो याला जोडच नाही अप्रतीम सर !

  • @avanibamne7293
    @avanibamne7293 4 หลายเดือนก่อน +1

    छान गाणी अप्रतिम

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏🌹👌लोकसंगीतात शब्दगुंफण⭐️👌अहा!अहा!!❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏⭐️🌸🌺🌼🌸🌺🌼🌸🌺🌼🙏

  • @ashokchabukswar886
    @ashokchabukswar886 5 หลายเดือนก่อน +1

    ज्याच्या त्याच्या कर्म गीत प्रेमाच प्रतिकच असत!

  • @vishwaspatil8665
    @vishwaspatil8665 3 หลายเดือนก่อน +1

    Thanks for sharing 🎉❤

  • @9833483110
    @9833483110 ปีที่แล้ว +5

    प्रतिभावंत, प्रतिभावान, प्रत्यक्ष प्रतिभा या सगळ्या उपमा ज्यांच्यासाठीच आहेत असे कवी गीतकार यांना मानाचा मुजरा........🙏

  • @mahadeolinge7787
    @mahadeolinge7787 2 ปีที่แล้ว +4

    खरंच सानिका तुला तोडणे एवढं सगळं सुचत तरी कसं. तुझा थोडासा बोबडा आवाज मनाला भावून जातो
    . आणि खेडकर साहेब त्यांना तर गीतकार मध्ये तोडच नाही त्यांनी सहजर बोललं तर कविता होऊन जाते..

  • @babubhujbal6369
    @babubhujbal6369 ปีที่แล้ว +2

    Bhujbal B.M
    Super song Sir,
    Thanks

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +1

    अजरामर गाणी धन्यवाद.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 หลายเดือนก่อน +1

    🌹👌🌹🙏जगदिशा कम्माल!!🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️⭐️❤️⭐️🌺👌

  • @gadrepushkaraj
    @gadrepushkaraj 3 หลายเดือนก่อน +4

    खेबुडकर म्हणजे कुठल्या एका गावाचा नाही तर महाराष्ट्राचा अभिमान

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर निवेदन गान बनवताना लीहीतानाची मेहनत मिळाली दरमीळ महायती दीलेबद्दल
    खुपखुप धन्यवाद. 🙏🙏

  • @trymbakgosavi7669
    @trymbakgosavi7669 2 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर आहे. मराठीतील ध्रुव आहेत याचा आपणाला अभिमान वाटतो.

  • @drbhghatge
    @drbhghatge 6 หลายเดือนก่อน +1

    1959 late khebudkar guruji was primary school teacher at my Village Minche nesr peth Vadgaon district Kolhapur 416109. i was his student 5th to 7th class. (1959-1962) At that time he used to write songs in Marathi from Lavani to bhajan . simple living high thinking was his Moto..he was celebrating 15 August & 26 January with variety entertainment program at school.i was one of the participants of the program. during the period he use to sing his songs on akashwani ( AIR) Gaonran meva & other programs Like Marathi pic Devghar . songs from Pijra & other Marathi pic are liked by people.

  • @sharadkhebade988
    @sharadkhebade988 9 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर कार्यक्रम सदर केलात धन्यवाद

  • @sadashivsutar9562
    @sadashivsutar9562 ปีที่แล้ว +2

    अफाट प्रगल्भ शक्ती थोर गीतकार जगदीश खेबुडकर

  • @RavindraGholap-e5m
    @RavindraGholap-e5m 2 หลายเดือนก่อน

    लहानपणी रेडिओवर गायक, संगीतकार, गीतकार यापैकी सगळ्यात जास्त ऐकलेलं नाव म्हणजे जगदीश खेबुडकर... हिंदी मध्ये आनंद बक्षी आणि मराठी मध्ये जगदीश खेबुडकर सहज साधी सोपी शब्दरचना ऐकताक्षणी ओठावर बोलणारी मधाळ गाणी.... मराठी संगीत रसिकांसाठी गाण्यांची अलीबाबाची गुहाच सोडून गेलेत

  • @latabaishankhapal872
    @latabaishankhapal872 11 หลายเดือนก่อน +1

    🎉 मि कलिदासला गवरानमेवा pahila आहे

  • @sushils.p..6575
    @sushils.p..6575 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान गाणे ..आहेत..माणूस अगदी रमून जाते....

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹मनाच्या गाभार्यातील आत्मज्योत-शब्द”❤👌💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫🙏🙏🌿🌿🌿❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌿🌹🌹🌹🌹🌿🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌸🌈🌸🌺⚡️🌺⚡️🌺🌺🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺

  • @sidduholal748
    @sidduholal748 2 ปีที่แล้ว +4

    my language kannada...marati my fevirete song laavani thamaasha abhang..natygeet....love you marathi....jai shivaji

  • @dilipkhude9911
    @dilipkhude9911 ปีที่แล้ว +2

    नत मस्तक .❤

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹पिंजरा”ह्या गाण्यात दिसला❤👌❤❤❤👌❤❤👌❤👌❤👌❤❤❤❤✨💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫✨✨✨✨✨🌸✨✨🌸✨🌸✨🌸🌿🌿⚡️🌺🌿⚡️🌿⚡️🌺🌿⚡️🌿⚡️🌺🌈

  • @keshrajbhojne4930
    @keshrajbhojne4930 2 ปีที่แล้ว +4

    मराठी साहित्यातील एक नामवंत कवि .👌

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹पिसार्यातील एकेक पीस शब्दभाव फुलवतो👌👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⚡️❤🌿🌈🌿🌈✨🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈✨🌈🌺💫💫💫🌺💫🌺💫🌺💫🌺🌺💫✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸