म्हसवड : प्रेमसंबंधातून तृतीयपंथीयाचा खून, गळा आवळून कंबरेला दगड बांधून टाकलं विहीरीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • "तृतीयपंथीच्या खुनाचा छडा म्हसवड पोलीसांनी अवघ्या ६ तासात लावला"
    आधी प्रेम झालं, नंतर लग्न करण्यासाठी सतत मागे लागणार्या राशी उर्फ राहूल घुटूकडे हिची तीचा प्रियकर समाधानने गळा दाबून खून केला नंतर कंबरेला दगड बांधून विहीरीत टाकलं.
    पाहुयात सविस्तर बातमी...
    म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मसाईवाडी ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत नागोबा मंदीर ते पानवण जाणारे कच्चा रस्त्याच्या लगत असलेल्या विजय सिन्हा यांचे विहीरीत एक अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचे माहीती डायल ११२ वर फोनकरुन कळवली. सदर माहीतीचे आधारे प्रेताबाबत खात्री करण्यासाठी पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत विहीरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसुन आले. सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्याची व त्याच्या नातेवाईकांची ओळख पटविणे आहवानात्मक होते. सदरचे प्रेत पोलीसांनी विहीरीतून बाहेर काढले व त्यांचा पंचनामा करतेवेळी मिळालेल्या माहीतीवरुन सदरच्या मृत व्यक्तीचा गळा आवळून खुन करुन, खुन केल्याचा पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेताचे कमरेस लाईटच्या केबलने सुमारे ३० ते ३५ किलो वजनाचा दगड बांधुन विहीरीत टाकल्याचे दिसत होते. यावरुन पोलीसांना प्रेताची, प्रेताचे नातेवाईक व आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघड करण्याचे तिन्ही आव्हानाला सामोरे जावे लागत होते. सदर मयताचे हातावर गोंदलेले दिसत असल्याचे दिसत असल्याने, पोलीसांनी सदर गोंदलेल्याच्या आधारे मयताचे नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरवात केली. सदरची माहीती इन्स्टाग्राम, व्हाटसअप, या सोशल मिडीयावर प्रसारीत केली. त्यावेळी मयताचे नातेवाईक यांचा संपर्क झाला. त्यावेळी सदरचा मयत हा मोटेवाडी ता. माण जि. सातारा येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटूकडे, वय २५ वर्षे, हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर सदरचा मयत याचा कोणीतरी खुन केला असल्याचा संशय असल्याने पोलीसांनी गोपनिय बातमीदार व तांत्रिक माहीतीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. व आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध सुरू असताना मयत तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे, वय २५ वर्षे, रा. मोटेवाडी ता. माण जि. सातारा यांचे व संशयीत आरोपी समाधान विलास चव्हाण, रा. दिवड ता. माण जि. सातारा यांचे सोबत प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरुन आरोपी समाधान विलास चव्हाण, रा. दिवड ता. माण जि. सातारा हा आपले शेतात काम करत असताना पोलीसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीसांनी त्यास विश्वासात घेवून तपास केला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यावेळी पोलीसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपी याने आपले व राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे यांचे प्रेम संबंध होते व तो आपणांस लग्न कर व मला घरी घेवून चल, असा तगादा लावला होता. म्हणून मी त्याचा कायमचा काटा काढायाचे ठरवून राशी उर्फ राहुल घुटुकडे यांस मसाईवाडी ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत नागोबा मंदीर ते पानवण जाणारे कच्चा रस्त्याचे लगत असलेल्या विजय सिन्हा यांचे विहीरीजवळ घेवून जावून त्यांचे अंगावरील साडीने त्याचा गळा आवळून ठार मारुन त्याचे प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याकरीता त्याचे प्रेतास लाईटचे केबलने कमरेस दगडबांधुन विहीरीत टाकून मोटारसायकलने घरी निघुन आल्याचे कबुली दिली. त्यावेळी त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेण्यासाठी
    मा. पोलीस अधीक्षक सो. सातारा समीर शेख,
    मा. अपर पोलीस अधीक्षक सो. सातारा, श्रीमती वैशाली कडुकर,
    मा. उपविभागीय पोलीस अधीकारी सो, दहिवडी उप विभाग,श्रीमती अश्विनी शेंडगे
    यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्ह्यांचे तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक,
    पोलीस उपनिरीक्षक, श्री. अनिल वाघमोडे व अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्ह्यांबाबत गोपनिय
    खबऱ्यामार्फत व तांत्रिक माहीतीचे आधारे आरोपी निष्पन्न केला.
    सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा, श्रीमती. वैशाली कडुकर, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, दहिवडी विभाग, दहिवडी श्रीमती अश्विनी शेंडगे, यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक, अनिल वाघमोडे, व अमंलदार शशिकांत खाडे, अमर नारनवर, पोपट चव्हाण, रुपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धिरज कवडे, वसिम मुलाणी, श्रीकांत सुद्रीक यांनी केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.

ความคิดเห็น • 1