दुर्गशिलेदार भुदरगड बद्दल विद्यमान आमदार व मान्यवरांच्या प्रतिक्रिया !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • दि ६ जून २०२४ रोजी भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे दुर्गशिलेदार भुदरगड तर्फे शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला.
    किल्ले रांगणा येथे दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता.यावेळी रांगणाईदेवी मंदिर,महादेव मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदीर व राजवाडा परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली.
    पहाटे 5 वाजता महादरवाज्याचे पूजनाने सोहळ्यास सुरुवात झाली.भागातील पाच नदीच्या पाण्याने भरलेल्या कलशांचे यावेळी पूजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता रांगणाईदेवी मंदिरात आरती करणेत आली.त्यानंतर रांगणाईदेवी ते राजवाडा अशी शिवछत्रपतींच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढणेत आली.ह्या वर्षीचा शिवराज्याभिषेक माननिय आमदार श्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करणेत आला. त्याचबरोबर दुर्ग शिलेदार भुदरगड, वर्ल्ड फॉर नेचर, सारथी व जवाहर हायस्कूल निळपण यांच्यावतीने 5350 इतके सीड बॉल तयार करण्यात आले होते या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व दुर्गप्रेमींच्या कडून रांगणा परिसरात सीड बॉल रोपण करण्यात आले आजच्या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा संस्कृती लेझीम पथक दारवडच्या चिमुकल्यानी वाढवली.
    यावेळी तालुक्याचे आमदार श्री प्रकाश आबिटकर, श्री बाबा नांदेकर, गारगोटीचे सरपंच श्री प्रकाश वास्कर,श्री सम्राट मोरे,श्री मच्छीन्द्र मुगडे,दुर्गशिलेदारचे श्री आनंद देसाई, साताप्पा गुरव,श्री दत्तात्रय गवसे,संग्राम देसाई,अनिल देसाई, शरद देसाई, वीरेंद्र देसाई,मनोज देसाई,रणजित देसाई तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शिवभक्त हजर होते.या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
    -साताप्पा गुरव

ความคิดเห็น • 1