तीळ लागवड तीळ लागवड कशी करावी तिळाची लागवड कधी करावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
  • तीळ लागवड थंडीच्या काळात आहारामध्ये तीळ असणे फार आवश्यक आहे. तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, तिळाचा हलवा हे पदार्थ संक्रांती सणामध्ये हमखास खाल्ले जातात. पुर्वीच्या काळी एक तीळ सात जणांनी खाल्ल्या अशी दंतकथा आहे. परंतु तिळाचे वजन ०.००१ किंवा २ मिलीग्रॅम असते. तथापि सर्व गोष्टी समप्रमाणात वाटून खाव्यात आणि त्याही कोणताही कलह न होता. असा संदेश मानाला संस्कृतीने देणे अभिप्रेत असावे, म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी 'तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणण्याची व मानण्याची प्रथा आजही बऱ्यापैकी टिकून आहे. पांढरी तीळ सरसकट खाल्ली जाते, तर काळ्या तिळास आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे.
    .*DOWNLOAD APP --- play.google.co...
    WHATSAPP wa.me/91917280...
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/91917280...
    आयुर्वेदिक महत्त्व : तिळाचे तेल प्यायल्याने अशक्त व्यक्तीचे वजन वाढते. भूक लागत नसल्यास दोन मुठीएवढे तीळ भाजून गुळाबरोबर सुपारीच्या आकराएवढे लाडू तयार करावेत व दिवसातून दोन लाडू सकाळ, संध्याकाळ असे तीन दिवस सलग खाल्लास भूक व्यवस्थित लागते किंवा तिळाच्या तेलाचा मसाज नियमित सर्वांगाला करावा.
    ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर पुरेसे दूध येत नाही त्यांनी दोन चमचे तिळाचे तेल रोज सकाळी प्यावे. स्त्रियांना अंगावर विटाळ कमी जात असेल त्यांनी तीळ नियमित खावे किंवा तीळ तेल प्यावे. ज्या स्त्रियांना अंगावर खूप जाते त्यांनी तीळ गाईच्या तुपाबरोबर सेवन केल्यास फाजील आर्तव कमी होते.
    रक्त मुळव्याध झाल्यास बरे होईपर्यंत एक चमचा तीळ जेवणानंतर दोनदा खावे.
    मुळा व तीळ एकत्र करून खाल्ल्याने त्वचेखाली साठलेले पाणी शोषले जाते आणि सूज ओसरू लागते.
    तिळाच्या तेलाचा मसाज केल्यास थकलेले स्नायू पूर्ववत काम देऊ लागतात. कोणतेच श्रम जाणवत नाहीत. मुळव्याधीवर सकाळ, संध्याकाळ बरे होईपर्यंत त्या जागेवर तिळाचे तेल लावल्यास मुळव्याध बरा होतो.
    टीप : उष्ण प्रकृती, डोळ्यांची आग होणाऱ्यांनी, ज्यांना लघवीला त्रास होत असेल व संडासवाटे रक्त पडत असेल तर तीळ खाऊ नयेत.
    लागवड : तिळाची पेरणी शेतामध्ये मुख्य पिकाच्या आडतासाला केली जाते, याचे कारण म्हणजे तिळाचा पाला ना शेळी - मेंढी, ना गाय, म्हैस, बैल खात, त्यामुळे मुख्य पिकाच्या संरक्षणाबरोबरच ह्या तिळापासूनही चांगले उत्पादन घेता येते. ५ - ६ वर्षापासून काही भागात सलग पिकही केले जाते, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. तिळासाठी जमीन नांगरलेली असावी. फुळवाची पाळी किंवा फणपाळी मारून जमीन तयार करवी. तिळाला पाणी कमी लागते. साधारणपणे जुनचा पाऊस पडला की, पेरणी केली जाते. मात्र नंतर जर पाऊस १ महिना पडला नाही तर पाण्याची पाळी द्वावी लागते. नंतर फुले लागतेवेळी पाण्याचा ताण बसू देऊ नये. कारण तिळाची फुले नाजूक, कोमल असल्याने लगेच गळून जातात.
    तिळाचे खोड हिरवट पोपटी असते. पाने जाड असतात. खोडाच्या बेचक्यातून तिळाची कुडी बाहेर येते. त्यामुळे तीळ चांगले टचटचीत भरण्यासाठी तिळाचे खोड सशक्त असणे गरजेचे असते. या कालावधीत झिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण असल्यास तिळाच्या खोडावर हिरवा व काळा मावा पडतो. त्याचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास खोड पोचट, कमकुवत होते, परिणामी तीळ पोसत नाही याकरिता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढे दिल्याप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.
    जाती :
    १) फुले तीळ नं. १:९० ते ९५ दिवसात तयार होणारी जात असून नगर, नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सरासरी एकरी उत्पादन २ ते २.५ क्विंटल मिळते.
    २) डी ७-११-१ : ९० ते ९५ दिवसात तयार होणारी जात जात असून खानदेशात उपयुक्त अशी आहे. सरासरी एकरी उत्पादन १.५ ते २ क्विंटल मिळते.
    ३) नं. ८ व १२८ : १२० ते १२५ दिवसात तयार होणाऱ्या 'गरव्या' प्रकारातील जाती असून विदर्भ, मराठवाड्यामध्ये उपयुक्त आहेत. या जातीचे सारासरी उत्पादन एकरी सव्वा ते १.५ क्विंटल मिळते.
    ४) जळगाव : खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेली सुधारित जात असून या जातीचे एकरी उत्पादन ६ ते ७ क्विंटल आल्याची नोंद आहे.
    बीजप्रक्रिया : एकरी २ ते ३ किलो बी पुरेसे होते. बियाण्यास जर्मिनेटची बीजप्रक्रिया करावी, म्हणजे बी ८ - १० दिवसात चांगले उगवून येते. जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये (२५ मिली जर्मिनेटर + १ लि. पाणी) १ ते २ तास बी भिजवून, सावलीत सुकवून लावल्यास बीजजन्य रोग होत नाही. आभाळ आल्यास उबळ होते तो होत नाही. शक्यतो बी वाळू मिसळून पेरावे. पेरताना बी नेहमी दाटच होते, कारण मुठीतून बी सटकते, बी पेरतान बोटावर तीळ येते. तेव्हा ६'' अंतरावर विरळणी करावी. बांधावर पेरल्यास विरळणी करण्याची गरज नाही. खुरपणी अवघड असते. कारण तिळाचे दांडे थोडे नाजूक असल्याने काळजीपुर्वक खुरपणी करावी. दोन तासातील अंतर १।। फूट ठेवावे. ९ ते १२'' अंतर झाल्यास खुरपणीस त्रास होतो. गवत काढताना बायांच्या हालचालीमुळे पिकाचे नुकसान होते, दांडे तुटतात. वितभर पीक झाल्यानंतर खुरपणी करावी.
    खते : खुरपणी झाल्यानंतर एकरी १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत टाकावे. ४० ते ४५ दिवसात बी फुलोऱ्यात येते. फुले जांभळ्या रंगाची असतात.
    कीड व रोग: तिळाचे बी सहसा कीड व रोगाला बळी पडत नाही. कीड व रोगाला बळी पडणाऱ्या पिकाऐवाजी उदा. भुईमुगासारख्या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे, परंतु अधिक उत्पादन देणाऱ्या जाती निर्माण होणे गरजेचे आहे. ज्यावेळेस कुड्यात तीळ भरले जाते (Dough Stage) (दुधाळ अवस्थेत) म्हणजे साधारणपणे ६० ते ७५ दिवसाचे पीक असताना पाऊस झाल्यास तीळ काळे पडते. असा तीळ बदला म्हणून विकले जाते. भाव कमी मिळतो. तीळ लागवड कशी करावी #ॲग्रोवन ,

ความคิดเห็น • 34

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 ปีที่แล้ว

    *DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
    😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247

    • @sandipgarje3500
      @sandipgarje3500 ปีที่แล้ว

      खूपच छान अप्रतिम माहिती देता तुम्ही

  • @pushprajsinghrajput9168
    @pushprajsinghrajput9168 3 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक पिकावर आपण video बनवला त्या साठी धन्यवाद ❤️👍

  • @kavikavya7425
    @kavikavya7425 3 ปีที่แล้ว +11

    विडीओ थोडे लहान लहान टाकत जावा..
    आणि माहीती देतांना शिल्लकच्या टवाळ्या कमी कराव्या.. आधुच शेतकरी कातावलेला असतो.. कामाच कमी अन बिनकामी जास्त होतय

    • @n.s.b5014
      @n.s.b5014 2 ปีที่แล้ว

      😂😂🤣

  • @atulfulwade5538
    @atulfulwade5538 4 ปีที่แล้ว +1

    Sundar mahiti dili saheb. Majha vichar ahe til lavayacha

  • @niteshahir2958
    @niteshahir2958 3 ปีที่แล้ว

    Utpadan kity milte akri

  • @SachinPatil07PikSalla
    @SachinPatil07PikSalla 4 ปีที่แล้ว +1

    तीळ पिकासाठी तणनाशक सांगा

  • @prakashkapure3221
    @prakashkapure3221 2 ปีที่แล้ว

    Saheb hatat tapkir cha daba kabr ahe

  • @rameshwarshewale1148
    @rameshwarshewale1148 5 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 4 ปีที่แล้ว +2

    ४०८ तीळ बियाणे कुठे मिळेल याचा उल्लेख करीत नाही, सागां न भाऊ!

  • @bandudeshpade6699
    @bandudeshpade6699 4 ปีที่แล้ว +1

    Tilach peek kiti divsach aahe

  • @rajeshyeshwantrao7068
    @rajeshyeshwantrao7068 5 ปีที่แล้ว +1

    Sir maza 1acer jamin aahe. Mala tila compound karaych aahe 4hi bajune tar total kiti squer feet hotil plz sanga

    • @rjm2416
      @rjm2416 3 ปีที่แล้ว

      1089*40 kara

    • @rajuwagh8401
      @rajuwagh8401 2 ปีที่แล้ว

      बडबड जरा जास्तच आहे

  • @pramodladke4159
    @pramodladke4159 5 ปีที่แล้ว +8

    माहिती कमी बळबळ जास्त

    • @kavikavya7425
      @kavikavya7425 3 ปีที่แล้ว +1

      भावा बरोबर आहे तुझं.. होबासक्या जास्त मारतोय राव हा मानूस..

  • @yashjaybhay6347
    @yashjaybhay6347 2 ปีที่แล้ว

    राजमा उनाळी लागवड कधी करावी

  • @vikasatpalwad8676
    @vikasatpalwad8676 4 ปีที่แล้ว

    सोयाबिन मधे आबक तीळ पेरल्यास फायदे आणी तोटे काय सांगावे

  • @ankushmangde5772
    @ankushmangde5772 3 ปีที่แล้ว

    तिळात तणनाशक आहे का

  • @akshaygarad8557
    @akshaygarad8557 4 ปีที่แล้ว

    तीळ उन्हाळ्यात जमेल का....?

  • @archanav.arekar6803
    @archanav.arekar6803 4 ปีที่แล้ว

    Mung pikachu mahiti saga

  • @vijaybabhulkar3593
    @vijaybabhulkar3593 4 ปีที่แล้ว +1

    हातात कायले डब्बा घेतला याचा अर्थ का तू खुप कस्त्क्सरे घुमाव्ते

  • @sohammahajan158
    @sohammahajan158 5 ปีที่แล้ว

    til cha bhav kay asto ..

  • @sunandabhagat3858
    @sunandabhagat3858 4 ปีที่แล้ว

    एक तिळाला किती वाळू मिक्स करायचे

    • @ravindrakarotkar9322
      @ravindrakarotkar9322 ปีที่แล้ว

      वाळू पेक्षा गांडूळ खत वापरा

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 5 ปีที่แล้ว

    Chhhan video

  • @tusharjadhav7639
    @tusharjadhav7639 3 ปีที่แล้ว

    विकायचा कूट

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 5 ปีที่แล้ว

    Verayty konti lavaci