*भुतांची जत्रा* - आगडगाव, काळ भैरवनाथ मंदिर - Must visit place near PUNE & Nagar | स्वादिष्ट प्रसाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 เม.ย. 2023
  • Hello Everyone,
    This video is different from my previous videos. We visited this simple but yet divine Temple in Ahmednagar district.
    नगरपासून वीस किलोमीटरवर असलेले आगडगाव. माणसांची जत्रा संपली की, दुसऱ्या दिवशी तेथे भुताची जत्रा भरते, असे मानतात. अंधश्रद्धेचे स्तोम न माजविता गावकरीही यामागील कार्यकारणभाव शोधत आहेत. दर रविवारी तेथे मिळणारा आमटी भाकरीचा महाप्रसादही प्रसिद्ध आहे. भैरवनाथाची यात्रा संपली की, सायंकाळी सर्वांना तातडीने घरी परतायचे वेध लागतात. बाहेरहून आलेली मंडळी आपापल्या गावी निघून जातात. गावातील मंडळीही मंदिर परिसर सोडून गावात जातात. दुसऱ्या दिवशी कोणीही मंदिराकडे फिरकत नाही, कारण त्या दिवशी रात्री तेथे भुतांची जत्रा भरते, असे मानले जाते. अंधश्रद्धा म्हणून याचे स्तोम माजविण्यात आलेले नाही, मात्र गावातील लोक यावर प्रथा म्हणून विश्वास ठेवतात. मुख्य म्हणजे असे का मानले जाऊ लागले, याचा शोध घेण्याचाही गावकरी प्रयत्न करीत आहेत.
    नगर जिल्ह्यातील आगडगाव येथील हे वैशिष्टय. नगरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे काळ भैरवनाथाचे पुरातन देवस्थान. छोटेच, पण टुमदार मंदिर तेथे आहे. त्यावर शिलालेख नाही. मात्र, मोठमोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे, असा अंदाज बांधला जातो. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. त्यांच्या नावांवरून याला दुजोरा मिळतो. आणखी एक दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. मंदिराच्या शेजारी एक जुना कडुनिंब आहे. त्याची पाने मात्र गोड लागतात. त्याला बहर येतो, पण लिंबोळ्या लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांत त्याचे एकही दुसरी रोपटे तयार झालेले नाही. असे हे अजब ठिकाण. या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नाही. देवस्थानजवळ निस्पृह बाबांची गादी आहे. बाबांचे निधन झाल्यानंतर त्याच परिसरात त्यांची समाधी बांधली जाते. अशा २४ समाधी तेथे आहेत. यावरून २४ पिढ्यांपेक्षा जुना इतिहास याला असल्याचे मानले जाते.
    Source : maharashtratimes.com/editoria...
    #agadgaon #bhutanchijatra #ahmednagar
    Instagram handle - apurva.patil18
    I hope you enjoyed this video and if you did then you know the drill - SUBSCRIBE, LIKE and SHARE.
    Thank you!

ความคิดเห็น • 2