ips वैष्णवी मिसाळ ह्यांची सरकार ला जाग करणारी कविता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • नमस्कार
    माझा कवितेचे नावं आहे
    सरकार
    सरकार लक्ष द्या तुम्ही
    दप्तराच ओझं सहन होत नाय
    शाळा आहे मैलावर
    जाऊसतोवार पाठ दुखते हाय
    सरकार तुमचं आमच्यावर लक्ष नाय
    मराठी इंग्रजी गणित बालभारती
    पुस्तकांची दप्तरंत गर्दीच गर्दी
    गृहपाठ वर्गपाठ,
    अभ्यास hi भरमसाठ,
    काय बोलू, अन काय काय
    सरकार तुमचं आमच्यावर लक्ष नाय
    खेळ नाही, वेळ नाही,
    बेरीज, वजाबाकी सोडत नाही,
    हे लिहलं कि ते राही
    अभ्यासाचं दिवस रात्र स्वप्नात येई
    आम्ही लहान आहोत कि नाय
    सरकार तुमचं आमच्यावर लक्ष नाय
    रोजच आमचं शेड्युल्ड असत बिझी
    तुम्हाला वाटत आमचं आयुष्य इझी
    सकाळी 8 पासून संध्याकाळी 8 पर्यंत
    असतो आम्ही आतल्या आत झुरत
    बोलावं कुणाला, अन काय काय
    सरकार तुमचं आमच्यावर लक्ष नाय
    करा फक्त एवढंच,
    दप्तर राहूद्या वर्गातच,
    मोकळ्या हाताने शाळेत जाऊद्या
    भरपूर सार ज्ञान मस्तकात येउद्यात
    शिक्षण आमचं हसत खेळत जाय
    सरकार एवढं म्हणणं पूर करायचं हाय
    कवी वैष्णवी महाबली मिसाळ

ความคิดเห็น • 2