MOTHYABA I Dr Krishna Bhawari I मोठ्याबा I डॉ कृष्णा भवारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • मोठ्याबा
    डॉ. कृष्णा भवारी
    आदिवासींच्या जीवन- जाणिवा या मुळातच एका विशिष्ट कथा सूत्राने गुंफलेल्या आहेत. नागर संस्कृतीपासून कोसो दूर असलेला हा समाज नेहमीच वर्तमानात जगत असतो. 'आजचा दिवस माझा' ही भावना त्याच्या मनात कायम असते. निसर्गाला सोबत घेऊन तो नेहमीच स्वच्छंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. निसर्गात जन्मलो, निसर्गाच्या कुशीत वाढलो आणि अखेरचा श्वासही निसर्गातच घेणार असा त्याचा दृढ विश्वास आहे. जंगलातील कंदमुळं, रानभाज्या, मांस, मासे शोधण्यातच त्याची उभी हयात जाते. पोटाची आग शमविण्यासाठी आपल्या आयुष्याचं मातेरं कधी झालं, हे त्याला कळतही नसतं. तरीही निसर्गाची साथ तो कधीच सोडत नाही. तो अनंत दिवास्वप्न पाहतो आणि आपल्या सहस्त्र बाहुंनी निसर्गाला कवेत घेऊन सृष्टीतील चराचराला ठणकावून सांगतो की, " उद्याचा दिवसही माझाच असेल ! "
    #chetakbooks
    #मराठी
    #marathistory
    #marathikatha
    #aadiwasi
    #aadiwasi

ความคิดเห็น • 1

  • @aradhyayeul.9041
    @aradhyayeul.9041 9 หลายเดือนก่อน

    कृष्णा भवारी सरांचा फोन नंबर हवा आहे.