Swarali Joshi | Sur Nava Dhyas Nava| विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2023
  • सांवळें सुंदर रूप मनोहर
    राहो निरंतर हृदयीं माझे
    आणीक कांहीं इच्छा आम्हा नाहीं चाड
    तुझें नाम गोड
    तुझें नाम गोड पांडुरंगा
    विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
    भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
    आइका जी तुम्ही भक्त भागवत ।
    कराल तें हित सत्य करा ॥२॥
    कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ।
    वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥३॥
    तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
    सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥
    अर्थ
    हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करने ही अमंगल बाब आहे .हे भक्तजनहो, तुम्ही भगवंतचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधुन घ्या .आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ति आहे .तुकाराम महाराज म्हणतात, की शरीच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपुर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो इश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे .
    🙏🏻🙏🏻
  • เพลง

ความคิดเห็น • 2

  • @OmkarKortikar-zg9pf
    @OmkarKortikar-zg9pf 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम... 👏👏👏💐

  • @zakasmusic7566
    @zakasmusic7566 8 หลายเดือนก่อน

    ❤❤🎉🎉. Khup chan bala