श्री सिताराम महाराज खर्डी येथील देवस्थान मंदिर परिसरात नारळ हार विक्रेत्यांचा विळखा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • खर्डी येथील देवस्थान श्री सिताराम महाराज मंदिर परिसरात नारळ हार विक्रेत्यांचा विळखा
    खर्डी प्रतिनिधी:- संतोष कांबळे
    पंढरपूर तालुक्यातील जागृत देवस्थान असणारे खर्डी येथील श्री सद्गुरू सिताराम महाराज मंदिरात गुरुवार व आमोशेला हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात या भाविकांना नारळ, हार, पेढा विक्रेत्यांकडून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नारळ विक्रेत्यांकडून मोठमोठ्या छत्र्या उभ्या केल्या असल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यास अडचण निर्माण झाली आहे. पंढरपूर-सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर खर्डी हे गाव असून या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते मंदिरासमोर रोडवर बसलेल्या नारळ विक्रेत्यामुळे वाहनांच्या एक किलोमीटर पेक्षा जास्त रांगा लागल्याचे दिसत आहे रोडवर होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांचा बळी जाण्याची दाट शक्यता असल्याने मंदिर समिती व ग्रामपंचायत ग्रामसेवक कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    कारवाईचे पत्र मिळताच पोलीस ॲक्शन मूड वर आले परंतु नारळ विक्रेत्यांकडून पोलिसांना अरेरावीची भाषा सुरु असून याकडे पोलीस निरीक्षकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे व यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी असे भाविकांमधून बोलले जात आहे.
    #ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
    Website- pprnews.in/
    Facebook Page: / ppr-news-104094362133

ความคิดเห็น •