Dum Aloo | दम आलू
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- @Jyoti_kitchen88
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.
आज दम आलू ची रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य =
छोटे छोटे आलू - ७७५ ग्राम
कांदा -४
टमाटा -१
सुकं खोबरं - १ कप
तिळ - १/२ कप
लाल मिरची पावडर -३ चमचा
हळद -१ चमचा
तंदुरी मसाला -२ चमचा
धणे पावडर - १ चमचा
मीठ -१ चमचा
अद्रक लसूण पेस्ट -१/२ चमचा
कसुरी मेथी -२ चमचा
तमालपत्र -२ इ.
विधी =
बटाट्याची सालं काढून टाकावे व नंतर फोकच्या साह्याने छिद्रे पाडून घेतले.कांदा, टमाटा पेस्ट करून घेणे नंतर खोबरे,तिळ पेस्ट करून घेणे.कढईत ५ पळी तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात बटाटे लाल होईपर्यंत तळून घ्या.तेलात तमालपत्र व कसुरी मेथी घालून परतावे.कांदा, टमाटा पेस्ट घालून ५ मी.ते पगळे पर्यंत बारीक गॅसवर ठेवून परतावे.लाल मिरची पावडर, हळद, मीठ चवीनुसार, तंदुरी मसाला, धणे पावडर, अद्रक लसूण पेस्ट घालून ते १मी.परतल्यावर त्यात बटाटे व त्यात खोबरे,तिळाची पेस्ट घालून परतावे.कोथिंबर घालून ते परत परतावे. १ग्लास गरम पाणी घालून ते कुकरमध्ये ३शिट्टी घेवून शिजवावे.आपली दम आलू ची भाजी तयार झाली आहे ती सर्व्ह करावे.
धन्यवाद 🙏🙏