गोव्यातील पाणीटंचाईवर काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- "राज्य आणीबाणी" घोषित करत तातडीने कारवाईची मागणी; दीर्घकालीन उपाययोजनांवर भर
गोव्यातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईवर काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून, या परिस्थितीला "राज्य आणीबाणी" म्हणत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय भिके यांनी सरकारच्या "अपुऱ्या प्रतिसादावर" नाराजी व्यक्त करत म्हटले की, लाखो नागरिकांना सुरक्षित पिण्यासाठी पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. काँग्रेसने जलसंधारण प्रकल्पांसाठी अधिक निधी, पाणी साठवणुकीला प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या सुधारण्यसाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. - บันเทิง