निरोगी जीवनाचे 27 नियम || 27 Rules for Healthy Life (in Marathi)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • निरोगी जीवनाचे 27 नियम || 27 Rules for Healthy Life (in Marathi)
    निरोगी जीवनाचे 27 नियम
    1. पाणी नेहमी खाली बसून, घोट घोट पिणे.
    2. प्रवासात पाय जवळ घेऊनच पाणी पिणे.
    3. जेवण नेहमी मांडी घालूनच करा.
    4. उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे रोग उत्पन्न करते.
    5. सकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनीट वज्रासनात बसा.
    6. दुपारच्या जेवणानंतर 20 मिनीट वामकुशी घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
    7. सायंकाळचे जेवण पाच ते सात या वेळेस झाले पाहिजे. कारण सूर्यास्तानंतर जठराग्नी मंद होत जातो.
    8. संध्याकाळी जेवणानंतर 5 ते 10 मिनीट वज्रासनात बसावे व 20 मिनीट शतपाऊली करावी.
    9. सकाळी फळांचा रस घेणे उत्तम. दुपारी ताक किंवा लिंबू-पाणी आणि रात्री जेवणानंतर दुध चालते.
    10. शिंक, जांभई, आळस, झोप, लघवी, संडास, तहान, भूक हे वेग कधी आवरू नये.
    11. वेग आवरल्यामुळे सर्व रोग होतात.

    12. वेग कोणकोणते असतात? - शिंक, जांभई, आळस, झोप, लघवी, संडास, तहान, भूक, अपानवायू, उलटी, रडणे, शुक्रवेग हे सर्व वेग आहेत.
    13. झोपतांना ब्रम्हचारी मुले-मुली यांचे डोके पूर्वेकडे असावे, गृहस्थ स्त्री-पुरूषांचे डोके दक्षिणेकडे असावे.
    14. जेवतांना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे.
    15. घराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणे शुभ असते.
    16. अभ्यास करतांना तोंड उत्तरेकडे असावे.
    17. लघवी नेहमी खाली बसूनच करावी, व्यवस्था नसेल तर पुढे कमरेतून वाकून करावी.
    18. लघवीला जातांना पाणी पिवून जावे. आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये; तसेच जेवूही नये.
    19. शौचाला जातांना पाणी पिऊन जावे पण आल्यानंतर कमीत कमी 15 मिनीट पाणी पिऊ नये; तसेच जेवू नये.
    20. जेवतांना नाकपुडीचा उजवा स्वर चालू असावा.
    21. पाणी पितांना किंवा रस पितांना डावा स्वर चालू असावा.
    22. झोपेतून उठतांना डाव्या अंगाकडून उठावे.
    23. रात्री झोपतांना डाव्या कुशीवरच झोपावे.
    24. थकवा आल्यास शवासनात झोपावे.
    25. हाय बीपीवाल्यांनी उजव्या कुशीवर झोपावे.
    26. ज्या अन्नाला शिजवतांना सूर्यप्रकाश व हवा मिळत नाही ते अन्न म्हणजे अन्न नसून विष आहे.
    27. अन्न शिजविल्यानंतर ४८ मिनीटांत त्याचे सेवन केले पाहिजे.
    #rhinspired

ความคิดเห็น • 1