Anand Harpla | Dharmaveer | Prasad Oak | Saurabh Salunke | Chinar - Mahesh | Mangesh Kangane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.8K

  • @RoshanNarwade
    @RoshanNarwade 2 ปีที่แล้ว +48

    मी एकदा ठाण्याच्या एका हॉटेल मध्ये पप्पा सोबत जेवण पार्सल घ्यायला गेलेलो तेव्हा मला त्यांच्या देवघरात आनंद दिघे साहेब यांचा फोटो दिसला होता...तेव्हा मला कळलं आनंद दिघे साहेब हे किती मोठे व्यक्तिमत्व होते ! 🙏🏻💯

  • @Sankys187
    @Sankys187 2 ปีที่แล้ว +47

    दीनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग परतला.....
    Hats off to Writer and Singer....
    Stunning...

  • @cartoonshort3461
    @cartoonshort3461 2 ปีที่แล้ว +30

    कधी आनंद साहेबाना बघितलं नाही पण हे गाणं ऐकल्या वर डोळ्यात आस्रु येतात { जय आनंद साहेबाना }🙏🏻

  • @shreeinterior8976
    @shreeinterior8976 2 ปีที่แล้ว +16

    प्रसाद दादा मनापासून धन्यवाद तुझ्या रूपात का होईना फक्त ठाण्यालाच काय साहेबांच कार्य संपूर्ण जगाला समजले... एक तसबीर तयार झाली मनात साहेबांबद्दल सर्वांच्या मनात...

  • @noonesperfect
    @noonesperfect 2 ปีที่แล้ว +12

    काळजाला भिडणारी शब्द रचना आणि त्याचबरोबर गाण्याचे द्रावक संगीत मन हेलावून टाकते आणि श्री. आनंद दिघेंना कधीहि न पाहिलेल्याना त्यांची उणीव जाणवते हि खरंच मोठी हूर हूर आहे... अप्रतिम गाणे

  • @VoiceofpublicMH01234
    @VoiceofpublicMH01234 2 ปีที่แล้ว +15

    खरंच निःशब्द करणारी रचना आहे या.. गाण्याची... 💯🙏🥺 असं गाणं कधीचं कुणाला तयार करता नाही येणार..... अतिशय हृदय पिळवटून गायलं आहे...हे... गाणं.... खरंच.... सुंदर....गायकी ... सौरभ... 💯☺️✌️❤️

  • @rupeshbhuvad3683
    @rupeshbhuvad3683 2 ปีที่แล้ว +17

    गाणे खूप हृदयाला स्पर्श करून जाणारे आहे . आणि हे गाणे ऐकताच रडू येते आणि एक मनात वेगळीच उम्मिद जागी होते . आज साहेब हवे होते.ही कहाणी बघून प्रत्येकाच्या मनात काही सेकंदासाठी तरी माणूसपण जागे होईल .
    त्यांची ही कहाणी सर्व जगा समोर घेऊन आल्या बद्दल धन्यवाद.

  • @Saai07254
    @Saai07254 2 ปีที่แล้ว +20

    आजही महाराष्ट्रातील बऱ्याच भागात साहेबाबद्दल माहीती नव्हती...प्रवीण तरडे आणि मंगेश सर तुमचे मनापासून आभार...आज फक्त तुमच्यामुळे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले😥😥😥🙏🙏🙏👍👍👍👍

    • @manishagawande6563
      @manishagawande6563 2 ปีที่แล้ว

      Agdi barobar amha vidrbhatil lokanna tr Dighe saheb kon hote he ya purvi mahit nvht

  • @jayshivray5253
    @jayshivray5253 2 ปีที่แล้ว +21

    चित्रपट बघताना जेव्हा हे गाणं बघत होतो तेव्हा अक्षरशः डोळे भरून आले होते. अख्खं थिएटर सुन्न झालं होतं. सगळे जण एकटक लावून भान विसरून इमोशनल होऊन हा दुःखद क्षण बघत होते. एका नेत्यावर जनतेनं काय आणि किती जीव लावावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले दिघे साहेब... ❤️😢

  • @anujadongre633
    @anujadongre633 2 ปีที่แล้ว +36

    कोण आहे तो गाणं लिहणारा? प्रत्येक वेळी डोळ्यातून पाणी काढण्याची क्षमता आहे ह्या गाण्यात 😓 सलाम सगळ्यांना ज्यांनी रचना केली आणि गायलं त्या सगळ्यांना 🙌 माझा आनंद हरपला 😢

    • @ruijadhav9335
      @ruijadhav9335 2 ปีที่แล้ว +1

      Mangesh kangne ahet tychi saarvch gaani mast astat

    • @aaravteach391
      @aaravteach391 2 ปีที่แล้ว +1

      केव्हाही ऐकले तरी,मन भरून येते असे वाटते की खूप रडावे.खरंच गाण.. 👏🥰🥰अनि शब्द

    • @singergaytrirajput2000
      @singergaytrirajput2000 2 ปีที่แล้ว

      खरचं निशब्द मी दिवसातच 10ते15 ऐकतोचं

  • @sunils.ghodsare4822
    @sunils.ghodsare4822 2 ปีที่แล้ว +18

    हे हृदयस्पर्शी गाणं आणि हा चित्रपट इतका सुंदर होता, असे वाटतं की बघतच रहावा.खूप EMOTIONAL SONG आहे. Heartbreaking💔

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 2 ปีที่แล้ว +23

    स्वर्गीय श्री आनंद दिघे अतिशय सालस व्यक्तिमत्व होतं. माझा अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधता आले. तेव्हा(१९८३) मी विद्युत मेटलिक्स पनामा ब्लेड कंपनीमध्ये अधिकारी म्हणून कामाला होतो. मला वैयक्तिक ओळखायचे. एक आठवण म्हणुन वागळे इस्टेट काही वर्षांपूर्वी मोठा पाऊस झाला होता लोक अक्षरशः उघड्यावर होती. तेव्हा मी स्वतः त्यांचं ते कार्य बघितला आणि थक्क झालो. एका दिवसामध्ये एवढी मदत गोळा करून गोरगरिबाला वाटली. तो प्रसंग आठवलं की थक्क व्हायला होतं.
    जय हिंद जय शिवराय.

  • @strangefollowers7883
    @strangefollowers7883 2 ปีที่แล้ว +18

    किती पण वेळा हे गाणे ऐकले तरी 'माझा आनंद आनंद आनंद हरपला', हे ऐकताना प्रत्येक वेळी अंगावर शहारे येतातच....अप्रतिम गाणे

  • @aayushsawant1836
    @aayushsawant1836 2 ปีที่แล้ว +20

    कीतीही ऐकल तरी मन भरून येतच आणी अंगावर शहारा येतोच गायकास खरच सलाम

  • @adityasadare5727
    @adityasadare5727 2 ปีที่แล้ว +13

    खरं तर साहेबांच‌ हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात.आज फक्त आणि फक्त धर्मवीर चित्रपटामुळे महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना दिघे साहेबांची जाणीव झाली आहे. खुप खुप धन्यवाद प्रवीण तरडे सर व संपूर्ण टीम व विशेष गायकाचेही अभार ...🙏🥺🙏

  • @vaibhav7721
    @vaibhav7721 2 ปีที่แล้ว +15

    कालच हा मूव्ही बघितला. खरच शिवसेना काय असते ते मला कळलं. आताची परिस्थिती मधे असा साधा सरळ निःस्वार्थी माणूस कधीच होणार नाही. आनंद दिघे साहेब अमर रहे अमर रहे 😭😭😭😭😭

  • @shrivansamsher1252
    @shrivansamsher1252 2 ปีที่แล้ว +10

    काय शब्द रचना अप्रतिम आहे...शब्द जणू काळजाला चिरून आत्म्याला जाऊन भिडतात..इतके भूरळ घाळून घायाळ करता... सौरभ साळुंकेनी आणि सर्व team ने जीव ओतला आहे...धर्मवीर आनंद दिघे चित्रपट घडविण्यासाठी... आम्हाला अप्रतिम अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद... सर्व टीम चे...धर्मवीर...👌👌👌👍👍

  • @s2aschanel327
    @s2aschanel327 2 ปีที่แล้ว +19

    आंनद दिघे साहेबांना कधी पाहिलं नाही पण आजच्या जगात असा देवमाणूस होऊन गेला हे महाराष्ट्राचे भाग्य

  • @hanumanttemghare2705
    @hanumanttemghare2705 2 ปีที่แล้ว +14

    दिघे साहेबांस पाहण्याचा योग नाही आला पण मी चित्रपट पाहिला. एका गुरुसाठी, संघटनेसाठीचं योगदान ह्यात दिसत. आनंद हरपला हे गाणं डोळ्यांत पाणी आणत, तुम्ही कोणत्या पक्षाचं अथवा संघटनेचे काम करता हे महत्त्वाचं नाही. तुम्ही जनतेसाठी काय व कसे आहेत हे महत्त्वाचे.🙏🚩

  • @vishalrajyedage1112
    @vishalrajyedage1112 2 ปีที่แล้ว +24

    अप्रतिम गान आई शप्पत मनाला भावूक झालं.. खरच खूप छान ....
    आनंद दिघे साहेब 🤗♥️

  • @amitpotkule7000
    @amitpotkule7000 2 ปีที่แล้ว +836

    या वर्षीचा मराठी चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रसाद ओक यांना जाहीर करण्यास हरकत नाही.असे माझे वैयक्तिक मत आहे

  • @vishalwaghamode5952
    @vishalwaghamode5952 2 ปีที่แล้ว +7

    खरच कौतुकासाठी शब्द अपूरे पडतील असा उत्कृष्ट चित्रपट...महाराष्ट्राला असा थोर महापुरुष समाजसेवक लाभला हे भाग्यच म्हणाव व आपन सर्वांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा..

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 2 ปีที่แล้ว +11

    निशब्द....😥😥😥
    देवमाणूस... 🙏🙏🙏🙏
    सिनेमा बघताना आपोआप डोळ्यातून पाणी येते.
    खरच देवमाणूस... खरे साहेब 🙏🙏🙏💐

  • @marathitopreels7675
    @marathitopreels7675 2 ปีที่แล้ว +19

    लपून ठेवलं दिघे साहेब कोन होते ते धन्यवाद तरडे साहेब 🙏🙏

  • @akshaysolanke2124
    @akshaysolanke2124 2 ปีที่แล้ว +34

    एकनाथ साहेबांचा काही स्वार्थ असता तर पक्ष पण सोडू शकले असते पण अजूनही ते म्हणतात मी शिवसेना सोडली नाही
    खरच शिवसेनेला वाचवलं एकनाथ साहेबांनी🙏💐💐🙏

  • @mayurkate2810
    @mayurkate2810 2 ปีที่แล้ว +17

    मला आंनद दिघे साहेब कोण होते ते माहीत नव्हतं पण हा सिनेमा बगितल्यानंतर समजले की ती व्यक्ती कोण होती . अशा या व्यक्तींचा सिनेमा बनवणार्या टीमला मनापासुन आभार.🙏♥️👍
    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🚩🙏✌

    • @anu54
      @anu54 2 ปีที่แล้ว +1

      Same here

  • @ishaandhawade8583
    @ishaandhawade8583 2 ปีที่แล้ว +11

    मी पुण्याचा आहे आणि मी धर्मवीर हा चित्रपट ठाण्याला जाऊन first day first show बघितला. ठाण्याच्या त्या गर्दीत त्यांच्या नायकाचा चित्रपट पाहताना जेव्हा हे गाणं शेवटी लागलं तेव्हा मी अक्षरशः भावूक झालो होतो... खरंच, खूप महान मनुष्य होते दिघे साहेब.

  • @arunkedare
    @arunkedare 2 ปีที่แล้ว +10

    हे गाणं जेव्हा-जेव्हा ऐकतो तेव्हा खरंच अश्रु अनावर झाल्याशिवाय राहत नाहीत😭💔 हृदयस्पर्शी गाणं😌💫 आनंद दिघे साहेब तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल 🧡🙏💐

  • @pritamchaudhari495
    @pritamchaudhari495 2 ปีที่แล้ว +14

    माझा आनंद हरपला या शब्दांनी अक्षरशः अंगावर सर्रकन काटा आला. खूप सुंदर 👍

  • @gauravkumar-yr8jg
    @gauravkumar-yr8jg 2 ปีที่แล้ว +28

    I m from Bihar... Just watched this movies... No Words... Numb... Tears In Eyes. 😭😭 Anand Dhighe Sahab 😭 Respect.... Jai Maharashtra 😭 Itni jldi ni jana tha apko sahab 😭😭😭🙏🙏🙏

  • @akshaysolanke2124
    @akshaysolanke2124 2 ปีที่แล้ว +25

    खरच एकनाथ साहेबांनी शिवसेनेला वाचवलं🙏🙏💐💐

  • @shashsankgupta5891
    @shashsankgupta5891 2 ปีที่แล้ว +22

    मैं उत्तर प्रदेश से हूं, परंतु जब भी शिवाजी और मराठी भाषा के बारे में सुनता हुं तो एक अलग सा रिश्ता लगता है इस से

    • @YouTuberr79
      @YouTuberr79 2 ปีที่แล้ว

      छत्रपती शिवाजी महाराज बोल भाई

    • @shashsankgupta5891
      @shashsankgupta5891 2 ปีที่แล้ว +2

      @@TH-camrr79 sorry dost, Raja shivchatrapati maharaj

    • @YouTuberr79
      @YouTuberr79 2 ปีที่แล้ว

      @@shashsankgupta5891 👍

  • @ganeshbhor7023
    @ganeshbhor7023 2 ปีที่แล้ว +22

    खूप लहान आसल्या पासून ऐकत होतो परंतु या फ्लिम मुळे कळाले की आसा देव माणूस होणे नाही
    पण आज जर साहेब आसते तर त्यांनी नक्की राज साहेबाना साथ दिली असती

  • @MrADLox
    @MrADLox 2 ปีที่แล้ว +17

    हा एकमेव चित्रपट असा आहे, ज्याची दोन्ही गाणी
    बघताना डोळ्यात अश्रू येतात 👍🖤

  • @rupeshgshirode2527
    @rupeshgshirode2527 2 ปีที่แล้ว +15

    थेटर मध्ये गाणं ऐकताना रडलो...... खुप खूप सुंदर कलाकृती आणि प्रेरणादायी जीवनकार्य 🚩
    दिघे साहेबांस पाहण्याचा योग नाही आला पण मी चित्रपट पाहिला. एका गुरुसाठी, संघटनेसाठीचं योगदान ह्यात दिसत. आनंद हरपला हे गाणं डोळ्यांत पाणी आणत, तुम्ही कोणत्या पक्षाचं अथवा संघटनेचे काम करता हे महत्त्वाचं नाही. तुम्ही जनतेसाठी काय व कसे आहेत हे महत्त्वाचे.🙏🚩

    • @RajPatil-pj7ib
      @RajPatil-pj7ib 2 ปีที่แล้ว

      महत्वाचं बोललास भाऊ

  • @Sabkamalik123
    @Sabkamalik123 2 ปีที่แล้ว +15

    असे चित्रपट फक्त फक्त आणि फक्त प्रवीण तरडे च लिहू आणि दिग्दर्शक म्हणून करू शकतात.
    धर्मवीर आनंद दिघे साहेबांना योग्य न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा प्रत्येक मराठी माणूस आपल्या लोकांच्या प्रगती साठी धडपड करेल.
    जय महाराष्ट्र!

  • @janardhanlakade2487
    @janardhanlakade2487 2 ปีที่แล้ว +16

    खरोखर हा चित्रपट बनविणारया डायरेक्टर ला माझा जय महाराष्ट्र.

  • @VoiceofpublicMH01234
    @VoiceofpublicMH01234 2 ปีที่แล้ว +9

    ह्रदयस्पर्शी शब्दरचना आणि भान हरपून टाकणारी गाण्याची चाल....खरंच.....खूप खूप छान झालं आहे हे गीत... ऐकतच राहावं अस हे गाणं आहे 💯☺️✌️💯🙏🏻☺️💯💫🎭🎵

  • @ashoktambe10
    @ashoktambe10 2 ปีที่แล้ว +18

    सिनेमा च्या आधी कोनाला ही माहित नव्हते दिघे साहेब ,,,,,, Jay Maharashtra 🚩🚩

  • @SD-pk6qg
    @SD-pk6qg 2 ปีที่แล้ว +31

    धर्मावीर आनंद दिघे साहेबाच्या आत्म्याला शांती लाभली ✌️🚩आज त्याचा शिष्य मुख्यमंत्री झाला.

  • @laxmangange3679
    @laxmangange3679 ปีที่แล้ว +15

    दिघे साहेब आज तुम्ही या जगात नसले तरीही तुम्ही या जगात नसले तरीही सर्वांच्या मनात जिवंत आहे

  • @narayanpatil6470
    @narayanpatil6470 2 ปีที่แล้ว +16

    माझा आनंद, आनंद...आनंद हरपला...😭😭😭
    खरंच साहेब आज हवे होते...

    • @saritaredekar9167
      @saritaredekar9167 2 ปีที่แล้ว +1

      अंगावर शहारे आणणार हृदयस्पर्शी गाणं 🙏👌👌👌👌💐

  • @chayaramdasgiri1962
    @chayaramdasgiri1962 ปีที่แล้ว +15

    झी चित्रमंदिर वर हा सिनेमा पाहिला खूपच चांगले कार्य आनंद धिगे साहेबांनी समाज सुधारणा केलीली पाहायला मिळाली

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 2 ปีที่แล้ว +10

    धर्मवीर आनंद दिघे खरच खुप महान व्यक्ती होते असा माणूस पुन्हा होणे नाही .......

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 ปีที่แล้ว +20

    काळजाला भिडणारा गीत आहे दादा✨🎤👌😓😓

  • @jayantrevdekar2310
    @jayantrevdekar2310 2 ปีที่แล้ว +16

    "आनंद हरपला" हे नुसतं गीत नसुन एका आभाळा एवढ्या व्यक्तीमत्वाचा जीवन प्रवास आहे. या गीताचे गीतकार मंगेश कांगणे यांना सलाम....
    माझा आनंद हरपला...
    मुखात सुखाची साखर ठेवून
    जोडली जन्माची नाती
    रामाच्या रुपात जपला माणूस
    मारुतीरायाची छाती
    वाघाची लीला नि कपाळी टिळा
    तू उजेड अंधारासाठी
    भनक भीतीची नव्हती भवती
    आभाळ रे माझ्या पाठी
    देऊन किनारा मनाच्या होडीचा
    सारंग हरवला..
    माझा आनंद हरपला...
    नाराज नशीब घेऊन एखादा
    जन्माला आलेला कुणी
    पडली नजर तुझी ज्याच्यावर
    अखंड राहिला ऋणी...
    विसर पडावा घडू नये कधी
    जिव्हारी जिवंत जाण
    दारात तुळस कौलारू कळस
    देव्हाऱ्यात तुझा मान...
    दिनांचा देव्हारा सोडून मोकळा
    श्रीरंग परतला..
    माझा आनंद हरपला... ||१||

    देऊन कान तू ऐकली गाऱ्हाणी
    सदैव देवाच्या आधी
    सवाल छळतो आता मी कुणाला
    दाखवू नवस यादी...
    वार सणवार रेखीव रांगोळी
    दारात सजेल जेव्हा
    वादळ होऊन तुझी आठवण
    दाटून येईल तेव्हा..
    घराघरातला उंच थरातला
    गोविंद हरवला..
    माझा आनंद हरपला... ||२||
    वाऱ्याला खुपली आनंद झुळूक
    विझला तेजाचा दिवा
    असाच उजेड देणारा दिवा
    तो आणील कुठून नवा
    येतील जातील देणारे हात
    तू तिथेही उजवा देवा
    गाय-गरीबाची बात नको
    तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा
    देऊन भरारी आभाळा पल्याड
    पतंग सरकला..
    माझा आनंद हरपला... ||३||
    मंगेश कांगणे

  • @kishor4603
    @kishor4603 2 ปีที่แล้ว +17

    खरंच ऐक ठाणेकरासाठी देवानेच जन्म घेतला होता मी ठाण्यातील नाही पन ऐका माणसात देघे साहेबाना चिञापटातुन पाहीले डोळ्यात पाणी आले ऐक देवच मी पन पाहीला आज मि
    आहे अहमदनगरकर हे देवा परत जन्म घे पन आमच्या अहमदनगर मध्ये जन्म घ्या दिघे साहेब तुम्हीची खरंच खूप गरज आहे

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 2 ปีที่แล้ว +10

    गान अगदीं काळीज पिळवटून टाकणारे आहे आनंद दिघे साहेब पुन्हा पुन्हा जन्माला यावे माझ्या घरी हीची परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramayanuniversaltruth8149
    @ramayanuniversaltruth8149 2 ปีที่แล้ว +8

    तुम धर्म की रक्षा करो, धर्म तुम्हारी रक्षा करेंगा🙏🏻🙌🏻🚩🚩🚩येतो धर्म स्ततो जया

  • @omsontakke2574
    @omsontakke2574 2 ปีที่แล้ว +13

    हा सिनेमा पाहिला आणि दिघे साहेब आम्हाला माहीत पडले. हे गाणं ऐकताच डोळे अश्रूंनी भरून आले.😭😭😭😭

  • @sumitkohapare973
    @sumitkohapare973 ปีที่แล้ว +16

    असे महान मानव आमच्या देशात रत्न मनून जन्माला आले अश्या महान मानवाला कोटी कोटी प्रणाम 👏

  • @allover5775
    @allover5775 2 ปีที่แล้ว +10

    दिघे साहेब आजही आपली कमी जाणवते ..!
    साहेबान सारखा लोकांना जपणारा लोकांच्या हिता साठी जगणारा आणि लोकांसाठी वाटेल ते करणारा माणूस पुन्हा होणे शक्यच नाई 🥺💐

  • @ankitnavale4302
    @ankitnavale4302 2 ปีที่แล้ว +20

    एकलव्याचा अंगठा शेवटी गुरुनेच कापला .
    #गुरुवर्य ♥️💯

  • @sachinadmane7963
    @sachinadmane7963 2 ปีที่แล้ว +6

    काय संगीत,काय स्वर,काय मुसिक!
    एकदम हृदयाला भिडलं ....
    पुन्हा पुन्हा एकल उपयोगिता संपतच नाही.

  • @dnyanupatil.3
    @dnyanupatil.3 2 ปีที่แล้ว +17

    सर्वच नेते सारखे नसतात काही आनंद दिघे साहेब असतात 💐💐

  • @saurabhpanda7822
    @saurabhpanda7822 2 ปีที่แล้ว +14

    Coincidently I saw Dharmaveer movie today and today is the day when Eknath Shinde is taking oath of CM of Maharashtra. Teachings and inspiration make a good human being.
    I literally cried.
    Such great soul like Dighe Saheb karmas helps needy people after their death also live example Eknath Shambhaji Shinde.
    Just wanted to thanks hope you were there now. But u will always be in everyone's heart.

  • @dsdoundesachin5443
    @dsdoundesachin5443 2 ปีที่แล้ว +25

    सर्वच राजकारणी सारखे नसतात,काही आनंद दीघे साहेब असतात 🙏🙏

  • @rekhajagdale2796
    @rekhajagdale2796 2 ปีที่แล้ว +7

    Such divine voice. We can see Aanad saheb in front of us.... Thank you for your devine voice....

  • @omkarmali6954
    @omkarmali6954 2 ปีที่แล้ว +18

    मी कोल्हापूरचा आहे पण दिघे साहेब यांच्या बदल खूप काही समजल धर्मवीर या चित्रपटातून 🙏 असा धर्मवीर प्रतेक जिल्ह्यात असला पाहिजे 🙏🙇

    • @amsrules
      @amsrules 2 ปีที่แล้ว +1

      Shivaji janmala yava.. pan bajuchya gharat.. nehmi dusrya lokan madhe Shivaji Maharaj kiva Anand Dighe ka shodhato apan..

    • @rajeshkalesirsir412
      @rajeshkalesirsir412 2 ปีที่แล้ว +1

      दिघेसाहेब फक्त ठाण्यापुरते ते नसून संपूर्ण महाराष्ट्राचे होतेे

  • @vaibhavkhillari8913
    @vaibhavkhillari8913 2 ปีที่แล้ว +9

    मी या माणसाबद्दल पहिले ऐकले नाही पण जेव्हापासून यांच्या बद्दल ऐकलं तर मला धक्काच बसला असा देव माणूस भारतात काय राज्यात नाही पहिला मिस यु दिघे साहेब

  • @akshayshinde6460
    @akshayshinde6460 2 ปีที่แล้ว +14

    काय आवाज आणि गाण्याचे बोल😢♥️

  • @ph6263
    @ph6263 2 ปีที่แล้ว +41

    साहेबांची चिठ्ठी हे कोणाला विश्वास बसो वा नसो पण माझ्या पप्पांची नोकरी ह्या गोष्टीची साक्ष आहे.

    • @prashantgore03
      @prashantgore03 2 ปีที่แล้ว +2

      असा माणसातला देव पुन्हा होणे नाही…🥺😭

    • @ashoklad3772
      @ashoklad3772 2 ปีที่แล้ว +1

      New video of aanand dhighe saheb

    • @FakeSpiderMan3434
      @FakeSpiderMan3434 2 ปีที่แล้ว +2

      Jai Maharashtra bhau🙏
      Dighe saheb amar rahe💔🥺🙏😭😭

  • @babumarathe4104
    @babumarathe4104 2 ปีที่แล้ว +21

    खुप कौतुक करावस वाटत एकनाथ शिंदे साहेब तुमचे
    कारण तुम्हीं आनंद साहेबांच स्वप्न पुर्ण केले
    जय महाराष्ट्र साहेब

  • @sagarm.davari..lifeexperie5804
    @sagarm.davari..lifeexperie5804 2 ปีที่แล้ว +8

    काय बोलावं या गाण्याबद्दल... काळजाला भिडतय ❤️❤️

  • @ruijadhav9335
    @ruijadhav9335 2 ปีที่แล้ว +987

    ............ निशब्द करणार गाण आहे सिनेमागृहात बघितल्यावर रडूच येत होत

  • @TheHarsh11111111
    @TheHarsh11111111 2 ปีที่แล้ว +9

    Unfortunately I didn’t saw this movie in theatre . Viewed on Zee and realized I miss the milestone moments of my life. Hats off to lyricist singer of this song . Goosebumps no doubt

  • @shubhampatilofficial6158
    @shubhampatilofficial6158 2 ปีที่แล้ว +18

    आनंद दिघे साहेबांनी सर्वांना नेहमी आनंद दिला पण मरताना मात्र फार मोठे दुःख देऊन गेले😭

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 2 ปีที่แล้ว +13

    आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव नतमस्तक 🙏 अशा देवरूपातील माणसाचं स्मारक नाही मंदिर उभारले पाहिजे हीच कळकळीची विनंती प्रार्थना आहे 🙏🙏🙏🙏🙏 आणि खरोखरच प्रसाद ओक आणि प्रविण दरडेना पुरस्कार मिळाला पाहिजे दिघे साहेब यांना जीवंत केले मानाचा मुजरा तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayashinde1283
    @vijayashinde1283 2 ปีที่แล้ว +9

    खरच खूप निशब्द झाले मी. आणि प्रसाद ओक chi acting तर एकदम भारी. गुरुपौर्णिमेच्या shot la आम्ही एवढ रडलो ना. खरच खूपच छान movie

  • @changrygaming
    @changrygaming 2 ปีที่แล้ว +15

    आनंद दिघे साहेबानी जे समाजकार्य केल ते कोनीच करु शकत नाही आणि डबल कोणी आनंद दिघे होने नाही ❤️❤️ सलाम तुमच्या कार्यला आनंद दिघे साहेब अमर रहे अमर रहे आनंद दिघे साहेब अमर रहे 🙏🙏🙏

    • @ajitwalke5584
      @ajitwalke5584 2 ปีที่แล้ว

      खरेच आज दिघे साहेब पाहिजे होते

  • @dadapatil3366
    @dadapatil3366 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम गीत, उत्तम शब्दरचना, अप्रतिम संगीत, अन लाजवाब गायन,.. सगळा लाजवाब मिलाप 👌

  • @indianmercedes-benz1558
    @indianmercedes-benz1558 2 ปีที่แล้ว +8

    काय बोलायचं दिघे साहेबाबद्दल बोलायला शब्द नाहीये असा देव माणूस पुन्हा होणे नाही ... आजच्या परिस्थतीला तुम्ही हवंय साहेब तिकडे आमचे साहेब एकटे पडलेत 😭😭

  • @ravindrajadhav5178
    @ravindrajadhav5178 2 ปีที่แล้ว +9

    सौरभ साळुंखे वा..मस्त आवाज, बाळुमामांचे आशीर्वाद.....आणि दिघे साहेबांचे......जय महाराष्ट्र

  • @martinkurhade5907
    @martinkurhade5907 2 ปีที่แล้ว +4

    हे गाणं ऐकल की अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी 🥺 दिघे साहेब आज तुमची खरो खर खूप गरज आहे

  • @vishaldusane6618
    @vishaldusane6618 2 ปีที่แล้ว +68

    आज दिघे साहेबांचा शिष्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय!!🚩🚩

  • @amolgavali3655
    @amolgavali3655 2 ปีที่แล้ว +19

    ज्यांना फिल्म समजला... त्यांना दिघे साहेब समजले कट्टर हिंदूत्ववादी🚩🚩धर्मवीर

  • @samarthmobile8106
    @samarthmobile8106 ปีที่แล้ว +15

    एक महापुरुष... स्व. आनंद दिघे साहेब 🙏🙏🙏

  • @S_a_r_t_h_a_k-m2b
    @S_a_r_t_h_a_k-m2b 2 ปีที่แล้ว +20

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब तुम्ही अमर व्हा 😭😭😭😭

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 ปีที่แล้ว +15

    शिवसेना तेव्हाची आणि आताची, लाज वाटते आणि वाईट वाटतं.

  • @sanjalisankhe6800
    @sanjalisankhe6800 2 ปีที่แล้ว +10

    दिघे साहेब काय होते हे ह्या movie मुळे कळलं. सलाम साहेब..🙏

  • @rushikeshbhosale5572
    @rushikeshbhosale5572 2 ปีที่แล้ว +10

    आतिशय सुंदर गाणं मला पिक्चर आवडला आजुन सारख पहायला जावे वाटत

  • @अध्वर्युखोबरे
    @अध्वर्युखोबरे 2 ปีที่แล้ว +14

    दिघे साहेब ना आमच्या पिढीने पहिले देखील नाही तरीही हे गाणं ऐकल्यानंतर खूप अभिमान वाटतो त्यांच्या बद्दल लिहिणारा खूप जवळचा वाटतो गायन पण खूप मनापासून केलेले आहे

  • @sapnasatpute5800
    @sapnasatpute5800 2 ปีที่แล้ว +12

    दिघे साहेबां सारखे साहेब या जन्मात काय पुढे सात जन्मात सुद्धा कोणी होणार नाही. दिघे साहेबां सारखा या जगात कोणीच नाही

  • @aanand2017
    @aanand2017 2 ปีที่แล้ว +5

    मनाला भिडणारे, अप्रतिम शब्द, मनाला भिडणारी चाल आणि तितकाच सुंदर आवाज...👌👌💐💐

  • @AkshayBandagar
    @AkshayBandagar 2 ปีที่แล้ว +13

    आज २६ ऑगस्ट वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!💐🚩🙏🏼

  • @archanakadam1023
    @archanakadam1023 2 ปีที่แล้ว +7

    हे गाणं, हा सीन आणि हा आवाज 😭❤️अश्रू अनावर झाले 😭😭😭😭❤️❤️❤️❤️

  • @karanshinde8638
    @karanshinde8638 2 ปีที่แล้ว +12

    असा गुरु आमच्या कोल्हापूरला नाय मिळाला कधीच...... 🙏🏻🚩

    • @pradeeppatil5364
      @pradeeppatil5364 2 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर आहे भावा 💯

    • @avadhootghuge1390
      @avadhootghuge1390 2 ปีที่แล้ว +1

      असे नेते लाखांतून एक असतात. 🔥🔥🔥🔥

  • @devidasnawarkhele3764
    @devidasnawarkhele3764 2 ปีที่แล้ว +8

    आनंद साहेबाला मी पाहिलं नाही. पण यातून खूप प्रेरणा आणि आपुलकी जिव्हाळा समजतो...

  • @dnyaneshwarbagal5481
    @dnyaneshwarbagal5481 2 ปีที่แล้ว +47

    आज सुवर्णसोहळा बघायला दिघे साहेब तुम्ही पाहिजे होता😭 तुमच्या तालमीतला पैलवान आज मुख्यमंत्री होतोय🙏🏻🚩🌍🥺

  • @premjha1865
    @premjha1865 2 ปีที่แล้ว +7

    बहुत ही सुन्दर और मीठी आवाज है सौरभ भाई की और आनंद दिघे साहेब के बारे में जितना बोलो उतना कम है , आनंद साहेब जैसा इंसान अब धरती पर आना मुश्किल है

  • @prasadsahane7493
    @prasadsahane7493 2 ปีที่แล้ว +9

    एक एक शब्द मोत्या सारखा लिहला आहेस 👌👌🔥🔥

  • @akshaymane8428
    @akshaymane8428 2 ปีที่แล้ว +13

    हे गाणं ऐकताना माणूस अक्षरशः हरवून जातो यात, रडायला येतं हे गाणं ऐकताना...खरंच खूप मनाला भेदून जातं हे गाणं😢😢😢

  • @tartemahesh98
    @tartemahesh98 2 ปีที่แล้ว +13

    एकही क्षण असा वाटला नाही का हा प्रसाद ओक आहे , हुबेहूब दिघे साहेब डोळ्यासमोर दिसत होते पूर्ण movie संपे पर्यंत 🥺🥺🥺

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 2 ปีที่แล้ว +8

    अनेक येतील जातील पण परमेश्वर स्वतः आनंद दिघे साहेब यांच्या माणूस रुपात अवतरला हे भाग्य पुन्हा लाभेल का नतमस्तक दिघे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आणि माझा आनंद हरपला या गाण्याचे गायक आणि लेखक य़ांना माझा नतमस्तक साष्टांग दंडवत 🙏 काय लिहिले आहे गाने गायकाने तर अप्रतिम गायले शब्द सुचेना काय बोलावे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @newhindipartymix2552
    @newhindipartymix2552 2 ปีที่แล้ว +13

    Never ignore a person who loves you, cares for you, misses you. Because one day, you might wake up from your sleep and realize that you lost the moon while counting the stars💝💖💖

  • @abhikanthegishte51
    @abhikanthegishte51 2 ปีที่แล้ว +10

    किती hi साहेब झाले होतील.....मुंबई hi आमच्या बापाची म्हणणाऱ्यांना एकच नाव पुरेसे आहे........मुंबई तुमच्या बापाला मिळवून देणारा हा खरा मुंबईचा बाप होता जो रस्त्यावर राहून या मुंबईसाठी जगत होता........साहेब एकच......आपले दिघे साहेब..........

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 2 ปีที่แล้ว +17

    मी 26 ऑगस्टला जाणार आहे ठाण्याच्या टेम्भी नाक्यावर आनंद दिघे साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी

  • @Classic_Boss
    @Classic_Boss 2 ปีที่แล้ว +36

    साहेब तुमचा शिष्य आज मुख्यमंत्री झाला.. अपेक्षा करतो की तुमचे संस्कारांनी महाराष्ट्र उजळून निघल 🙏

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 2 ปีที่แล้ว +13

    श्री स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुजरा 🙏💐🏹🚩🐯

  • @Sayanisrangoli
    @Sayanisrangoli 2 ปีที่แล้ว +13

    साहेब आज तुम्ही हवे होता
    आजच्या समाजाला तुमच्यासारख्या माणसांची खूप गरज आहे 💐💐💐
    प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये गोरगरिबांच्या सेवेसाठी खारीचा जरी वाटा उचलला तरी कोणताही गरीब उपाशी मरणार नाही