शाळा व्यवस्थापन समिती # सुचना # ऑगस्ट महिन्यातीविषयाचा समावेश # अहवाल लेखन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • शाळा व्यवस्थापन समिती # सुचना # ऑगस्ट महिन्यातीविषयाचा समावेश # अहवाल लेखन #SmC #संपूर्ण माहिती#लेखन
    विषय क्र:- 3 परिसर भेट नियोजन करणे
    ठराव क्र :-3
    -----वार दि / 08/2024 रोजी शाळा व्यवस्थापन समिती ची सभा आयोजित करण्यात आली.या सभेमध्ये शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी श्रावण महिन्यात १ दिवसाची परिसर भेट आयोजित करण्यात यावी यामुळे क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
    क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते .या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
    ठराव सर्वानुमते मंजूर
    सूचक - ------------
    अनुमोदक ----------------------
    विषय क्र:- 4 तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्या बाबत
    ठराव क्र :-4
    ---वार दिनांक /०८/२०२४ रोजी शाळा व्यवस्थापन समिती ची सभा आयोजित करण्यात आली.या सभेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या खो खो, कबड्डी,वुशू बुद्धिबळ मैदानी स्पर्धा क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदविणे व स्पर्धेत उज्वल यश मिळविण्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन करावे सराव घेण्यात यावा यासाठी क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करावे. शाळेची नोंदणी करणे खेळाडूची निवड करणे ओळख पत्र बनविणे स्पर्धेच्या ठिकाणी जाणे या विषयी चर्चा करण्यात आली.
    चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
    ठराव सर्वानुमते मंजूर
    सूचक - ------------
    अनुमोदक ----------------------
    विषय क्र:-5 सातत्य पुर्ण सर्वांकष मूल्यमापन आढावा
    ठराव क्र :-5
    -------वार दिनांक /०८/२०२४
    रोजी शाळा व्यवस्थापन समिती ची सभा आयोजित करण्यात आली.शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रिया ही अध्ययन-अध्यापन, शिक्षणप्रक्रियेचा दर्जा आणि परिणामी एकंदर शैक्षणिक व्यवस्था यांवर परिणाम करते. शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक हे मूल्यमापनपद्धतीबाबत अत्यंत संवेदनशील असतात. शैक्षणिक मूल्यमापनपद्धती नजरेसमोर ठेवून सर्व शैक्षणिक प्रक्रियेचे नियोजन व कार्यवाही होते. शैक्षणिक मूल्यमापनप्रक्रियेत उणिवा, त्रुटी राहिल्यास शैक्षणिक गुणवत्ताविकासात अडथळे निर्माण होतात. मूल्यमापन हा अध्ययन-अध्यापनपद्धतीचा एक भाग असून अध्ययनाच्या विविध टप्प्यांवर मूल्यमापन व्हावे आणि अध्यापकांद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती पडताळावी. यात विद्यार्थी हा शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. हे लक्षात घेऊन अध्ययनात आढळलेल्या त्रुटींवर निदानात्मक उपाय करावेत. अभिरुची व कला यांचेही मूल्यमापन करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासाच्या सर्व पैलूंकडे विद्यार्थ्यांच्या व्यापक अध्ययनप्रक्रियेकडे तसेच त्यांच्या वर्तनातील दृश्य बदलांकडे सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे साध्य होण्यासाठी विविध साधनतंत्रांच्या मदतीने अध्ययन-अध्यापन होणे गरजेचे आहे.या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
    ठराव सर्वानुमते मंजूर
    सूचक - ------------
    अनुमोदक ----------------------
    विषय क्र:-5 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
    ठराव क्र :-5
    ------वार दि. /०८/२०२४ रोजी शाळा व्यवस्थापन समिती ची सभा आयोजित करण्यात आली या सभेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभाग नोंदवावा . तसेच विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू आहे.तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता यावा तसेच शाळेचे मूल्यांकन करताना खालील बाबीचा विचार अ) पायाभूत सुविधा ३३ गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण
    क) शैक्षणिक संपादणूक - ४३ गुण
    परोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियानात सहभागी होणे.
    या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
    ठराव सर्वानुमते मंजूर
    सूचक - ------------
    अनुमोदक -------------------
    ठराव क्र :-७
    विषय क्र :-ऐन वेळी येणारे विषय
    ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. व श्री -------------- यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली.
    सचिव
    शाळा व्यवस्थापन समिती

ความคิดเห็น • 10

  • @mmkurane9457
    @mmkurane9457 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सप्टेंबर चे विषय व्हिडीओ टाका

  • @madhukargaikwad4373
    @madhukargaikwad4373 27 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 27 วันที่ผ่านมา

    खूप छान सर 👏🏼👏🏼

  • @vibhawaripadale7447
    @vibhawaripadale7447 20 วันที่ผ่านมา

    दर् महिन्यात सभा घ्यावे लागले ka

  • @durgazade2404
    @durgazade2404 27 วันที่ผ่านมา

    सर सखी सावित्री समिती अहवाल लेखनाचा व्हिडिओ दाखवा

  • @surekhapatil8409
    @surekhapatil8409 21 วันที่ผ่านมา

    सर्व विषय क्रमांक एक आणि विषय क्रमांक दोन यामध्ये काय फरक आहे? आम्ही तर तो एकच विषय घेतो

    • @GanitGuruDHANAJI
      @GanitGuruDHANAJI  21 วันที่ผ่านมา

      एका विषय वाचन आहे
      दुसऱ्या विषयात मंजुरी देणे

  • @sktscreations3578
    @sktscreations3578 19 วันที่ผ่านมา

    प्रत्येक ठरावात दिनांक लिहणे, रजिस्टर मध्ये वरती एकदा लिहिले तरी चालेल ना?

    • @GanitGuruDHANAJI
      @GanitGuruDHANAJI  19 วันที่ผ่านมา

      प्रत्येक ठराव हा वेगळा असतो म्हणून तारीख लिहिणे चांगले एकच दिवशी असणारे ठराव एकाच दिनांक चालेल