ya zopadit mazya | kavita | या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .कविता आठवणीतल्या, ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.6K

  • @kavyagandh
    @kavyagandh  2 ปีที่แล้ว +419

    सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार🙏.
    आपण सर्वांनी ही कविता पाहून आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा मी आदर करतो.🙏
    संत तूकडोजी महाराजांच्या शब्दामधील सामर्थ्य अपार.🙏
    कविता ऐकून आपल्या बालपणातील शाळेच्या आठवणी जागृत झाल्या, उजळल्या.आणि आपण या कवितेस भरभरुन प्रतिसाद दिलात . मनाला भावलेल्या प्रतिक्रिया शब्दातून व्यक्त केल्या. आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार व खूप खुप धन्यवाद .🙏💐

    • @hanmantyadav5543
      @hanmantyadav5543 2 ปีที่แล้ว +12

      Oh

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว +7

      धन्यवाद 🙏🏻

    • @radhikakhetmalis1753
      @radhikakhetmalis1753 2 ปีที่แล้ว +6

      Khupch sundar shaleche aatvan zali 👌👌🙏🙏

    • @snehaljoshi6708
      @snehaljoshi6708 2 ปีที่แล้ว +12

      हो आम्हाला ही ही कविता होती. त्या वेळच्या कविता कीती सुंदर व भावूक करणार्या होत्या ना 🙏☺

    • @prashantkolkar8477
      @prashantkolkar8477 2 ปีที่แล้ว +7

      🙏

  • @hiralalapatil2671
    @hiralalapatil2671 3 หลายเดือนก่อน +14

    आज माझे वय 59 वर्षाचे आहे मला ही कविता शाळेत शिकत असताना लहानपणी होती आज मला पुन्हा ऐकायला मिळाली म्हणून मला फारच आनंद झाला

  • @SanjivaniVyavahare
    @SanjivaniVyavahare 6 หลายเดือนก่อน +3

    खूप मस्त पाठ आहे ही कविता धन्य वाद देवा खूप सुंदर बोध होतो

  • @bhaskarmore3010
    @bhaskarmore3010 หลายเดือนก่อน +4

    फारच सुंदर कविता आहे. सरळ आणि सोप्या भाषेत आहे त्यावेळेस आम्हाला चवथीला होती आमचे गुरुजी फार सुंदर तालात आवाजत म्हणत असे मुले वर्गाच्या बाहेर ही गात असत

  • @NitalPatil-zi3lj
    @NitalPatil-zi3lj 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर आणि मनाला भेदणारी अशी ही संत तुकडोजी महाराज यांची ही कविता खूपच छान आहे

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd 8 หลายเดือนก่อน +2

    कवितेची आठवण झाली.शाळेतले दिवस पुन्हा येणार नाहीत. उपक्रम अतिशय सुंदर आहे.पन्नस वर्ष नंतर ऐकायला मिळतात.. धन्यवाद..

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 2 ปีที่แล้ว +29

    मी शाळेत असताना ही कविता आम्हाला होती खरच चाळीस वर्षांपूर्वीची खूप आठवण ही कविता तुम्ही युट्यूब वर दाखवली खूप समाधान झाले श्री स्वामी समर्थ नमस्कार

    • @ashokpatil8773
      @ashokpatil8773 ปีที่แล้ว

      मी डीएड ला अस ताना वर्गावार हां पाठ शिक वला 1978 याची आठवान झाली अध्यापक विद्यालय जलगांव खूप छान कविता आहे
      धन्यवाद

  • @vidyamali8860
    @vidyamali8860 29 วันที่ผ่านมา +4

    मी 58 वर्षाची आहे मला ही कविता होती आज कविता वाचून मला खूप आनंद झाला

  • @GitaAtak
    @GitaAtak 2 หลายเดือนก่อน +3

    मी आज 54 वर्षाचा आहे.तो काळ आमच्या सारख्या भाग्यवान मुलांचा होता. म्हणून आम्हाला अशा महान कवींच्या अजरामर कवितांचा अभ्यास करायला मीळाल्या.

  • @PanditPatil-oo2rm
    @PanditPatil-oo2rm 5 หลายเดือนก่อน +5

    1977-78साली मी सहावीत असताना ही कविता आम्हाला होती आज सुद्धा ती आठवण येते आणि मन उदास होते. कुठे गेले ते दिवस,....

  • @ShaileshNarvekar-pr3qs
    @ShaileshNarvekar-pr3qs หลายเดือนก่อน +3

    42 वर्षानी सदर कविता एकली खुप समाधान वाटला ती माझी ही कविता तोंडपाठ होती

  • @shailakathawate3984
    @shailakathawate3984 2 ปีที่แล้ว +5

    फारच सुंदर कविता फारच दिवसांनी ऐकायला मिळाली

  • @traveller_annu
    @traveller_annu 2 ปีที่แล้ว +8

    शाळेचे दिवस आठवले..! पण खरचं या कवितेचा अर्थ अगदी मनाला पटणारा आहे, माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा तो किती समाधानी आहे हे महत्वाचे..! खूप छान वाटलं ही कविता ऐकून..!❤️✨

    • @snehatipnis3370
      @snehatipnis3370 ปีที่แล้ว

      अगदी बरोब्बर 👍

  • @rohinejadhav5666
    @rohinejadhav5666 ปีที่แล้ว +4

    वा खुप छान, लहान पनाची आठवण झाली, इयत्ता सहावीला कवीता होती,संत तुकडो महाराज जे थोर,राष्ट्र संत होऊन गेले, पळत्याच्या पाठी लागनया पेक्षा, आहे त्या परिस्थितीत समाधानी कस रहाव, हे या कवितेतून संत तुकडोजी महाराज जगाला सांगतात, अशा या थोर संताना शत शत नमन

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @vijaynarode7413
    @vijaynarode7413 6 หลายเดือนก่อน +3

    खरेच zopdimdhe जे सुख आहे ते राजमहलत नहीं

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 ปีที่แล้ว +5

    तुमच्या या उपक्रमामुळे आमच्या लहानपणीच्या सगळ्या कविता आता चाली सुद्धा लक्षात येत आहेत.

    • @gajananchhabile2878
      @gajananchhabile2878 ปีที่แล้ว

      मनाला एका क्षणात बालपणात घेवुन जाणारी कविता आम्ही आमच्या भजनात गात असतो

  • @shivajibhandarkarbhandarka5359
    @shivajibhandarkarbhandarka5359 ปีที่แล้ว +9

    40 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले व ते गोड क्षण आठवून डोळ्यांना पाणी आले

  • @vasantraosutar7417
    @vasantraosutar7417 หลายเดือนก่อน +4

    वास्तवातील कविता आहे.खूप छान.

    • @kavyagandh
      @kavyagandh  หลายเดือนก่อน

      Thanks 🙏💐

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 9 หลายเดือนก่อน +3

    शाळेतील ते दिवस किती छान होते मजा केली आपण सर्वांनी बालपणी

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 หลายเดือนก่อน +3

    ही कविता आम्हाला मराठी शाळेत तिसरीला की चौथीला होती.
    आता माझे वय 63 वर्षाचे आहे. कविता ऐकून खूप छान वाटले.
    धन्यवाद व आम्ही आपले आभारी आहेत.

    • @kavyagandh
      @kavyagandh  หลายเดือนก่อน

      Thanks.

  • @sayadrasul8420
    @sayadrasul8420 ปีที่แล้ว +1

    🌴🌹🙏शालेय जिवनातिल त्रीकालाबाधित वास्तव, विचार आज पर्यंत सदाबहार आहेत.
    🙏 फक्त माणुसकी हाच खरा संत होय तुकडोजी,व गाडगे महाराज की जय.🌴🌹🙏

  • @suvarnak848
    @suvarnak848 2 ปีที่แล้ว +6

    कविता ऐकुन फार बरं वाटलं सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला माझं बालपण मैत्रीणि शाळा आमच्या बाई ते वेगळे दिवस शाळेतील अभ्यास गेले ते दिवस राहिल्या आठवणी खूप आभार

  • @bharatrokade1074
    @bharatrokade1074 2 ปีที่แล้ว +4

    बऱ्याच म्हणजे जवळ जवळ ५० वर्षा पूर्वी ही कविता होती आणि आज मला u tube वर ही कविता ऐकायला मिळाली धन्य झालो.

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 2 ปีที่แล้ว +4

    सहाव्या वर्गात होती.....
    लय भारी..
    दूर मागे गेलो कविता ऐकून.🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏💐💐💐💐🇮🇳👏

  • @shalinim9294
    @shalinim9294 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान.शाळा व बालपण आठवले . खूप आनंद झाला.धन्यवाद 🙏

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 6 หลายเดือนก่อน +2

    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला वर्गातील मुलांना विचारलं प्रश्र विचारले कुठे कुठे झोपडी दिसते याची आठवण झाली खूपच सुंदर कविता बोधप्रद संदेश दिला आहे

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 5 หลายเดือนก่อน +5

    मी आज 62 वर्षांचा आहे मला आठवतंय माझी आई या कविता आम्हा भावंडांकडून म्हणउन घ्यायची,तिचा आवाजही छान होता,चाल ही छान लावायची. आपल्यामुळे त्या सर्व आठवणींना आज उजाळा मिळाला 🙏

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 8 หลายเดือนก่อน +4

    गतकाळ हा गतवैभव सुखाचा नी दुःखाचा संगमेश्र्वर आहे

  • @rukhminitak4757
    @rukhminitak4757 2 ปีที่แล้ว +7

    पुन्हा बालपण व शालेय जीवनात नेऊन सोडल्या बद्ल खुप खुप धन्यवाद!👌👌🙏🙂

  • @manishasuryawanshi-we4os
    @manishasuryawanshi-we4os 10 หลายเดือนก่อน +3

    खरंच खूप छान आहे कविता, माझी आवडती कविता आहे

  • @namdevhambir1101
    @namdevhambir1101 10 หลายเดือนก่อน +2

    खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या, अतिसुंदर

  • @mangalaburade2948
    @mangalaburade2948 2 ปีที่แล้ว +324

    👌४८वर्षा पूर्वीचा काळ आठवला आम्हाला ही कविता इयत्ता ६ वी ला होती शाळेचे दिवस आठवले . आम्ही त्या वेळी बाई म्हणत होतो. बाई ताल सुरात कविता शिकवीत असे खूप छान वाटले आता ही जशाचा तसा दिवस आठवला . 👌 जणू काही वर्गातच बसलो आहोत . जुन्या मैत्रिणी आठवल्या. 👌

    • @ulkapatil182
      @ulkapatil182 2 ปีที่แล้ว +13

      खूप दिवसांनी ही कविता वाचली,खूप छान वाटले 👍

    • @arjunsalunkhe5514
      @arjunsalunkhe5514 2 ปีที่แล้ว +5

      Lai bhari

    • @kavyagandh
      @kavyagandh  2 ปีที่แล้ว +7

      मन:पूर्वक धन्यवाद . ...🙏💐

    • @kavyagandh
      @kavyagandh  2 ปีที่แล้ว +4

      Thank U so much.🙏💐

    • @kavyagandh
      @kavyagandh  2 ปีที่แล้ว +5

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद . ...🙏💐👍

  • @kishoretribhuwan9777
    @kishoretribhuwan9777 ปีที่แล้ว +5

    ही कविता माझ्या बालपणीची.अगदी मुखोद्गत होती मला.अशाच कवितांची आज अभ्सक्रमात समाविष्ट करण्याची गरज आहे.बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.की ज्यामुळे मुले शाळेला हासत खेळत येऊ शकतील.

  • @jayavaze988
    @jayavaze988 2 ปีที่แล้ว +5

    अर्थपूर्ण कविता शालेय जीवनाची आठवण जागी झाली. अविस्मरणीय

  • @balasahebpawar1418
    @balasahebpawar1418 8 หลายเดือนก่อน +2

    खुप आवडते मला ‌ही कविता, खुप आवडीने गायचे‌ मराठीच्या ‌तासाला, आठवणी ने‌ आजही डोळे भरून आले

  • @medhakhatavkar
    @medhakhatavkar 2 หลายเดือนก่อน +3

    Khup chan barech divsani Kavita aikli mast watle

    • @kavyagandh
      @kavyagandh  หลายเดือนก่อน

      Thanks 🙏💐

  • @minakshijade5429
    @minakshijade5429 2 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर कविता ऐका वर्षांपूर्वीची खूप खूप छान वाटले अक्षय जुन्या काळात गेलो असं वाटले शाळेचे दिवस आठवले खूपच छान जशीच्या तशी कविता ऐकायला मिळाली कविता ऐकणाऱ्यांची धन्यवाद

  • @kiranjangam2590
    @kiranjangam2590 2 ปีที่แล้ว +5

    लहान पण आठवले
    मस्त खुप छान सुंदर गायन

  • @chandrakantgiri9604
    @chandrakantgiri9604 2 ปีที่แล้ว +4

    शालेय जीवनातील आठवण जागी झाली.खुप आनंद झाला.

  • @JanardanPanmand
    @JanardanPanmand 7 หลายเดือนก่อน +3

    हि कविता जगण्याला अर्थ देते .आम्हाला इयत्ता सहावीला कविता होती.खुपच सुंदर काम करत जा मार्ग सापडतो हर हाल में खुशी जय शिवराय .

  • @RamGulumkar-hi5iy
    @RamGulumkar-hi5iy 7 วันที่ผ่านมา +2

    खूप खूप छान कविता खूप खूप सुंदर आहे ❤

    • @kavyagandh
      @kavyagandh  4 วันที่ผ่านมา

      Thanks .🙏💐

  • @sunandajadhav7219
    @sunandajadhav7219 2 ปีที่แล้ว +4

    मी स्वतः चाल लावत असे प्रत्येक कवीतेला. या कवीतेला चाल लावून सलग तीन वर्षे "काव्यगायन" स्पर्धेत पहिला नं. मिळवला होता. खुप खुप छान वाटले.

  • @varshanaik5200
    @varshanaik5200 ปีที่แล้ว +5

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्या वर्गात सर्व मैत्रीणीं सोबत तालासुरात कविता म्हणणं. खरच खूप सुंदर आठवण आहे. ही. तसेच सहावी / सातवीला कविता होती. " सृष्टी तुला पाहूनी धन्य माते..... " आमच्या शाळेत रोज प्रार्थना म्हणून म्हटली जाणारी. ही कविता जर आपल्या कडून ऐकायला मिळाली तर खूपच छान होईल.

    • @jayshreejadhav1493
      @jayshreejadhav1493 ปีที่แล้ว +1

      कविता ऐकून खुप बरे त्या शाळेचे दिवस आठवले ऐकतच राहावी कविता असे वाटू लागले त्यातील कवितेतील शब्द नी शब्द मनाला भावात होता खुप

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 करतो प्रयत्न .

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      Thanks. 👍💐

  • @rohinidoke241
    @rohinidoke241 ปีที่แล้ว +5

    Mala Mazi aai म्हणून दाखवत असे मलाही खूप आवडते ही कविता आईला जाऊन 5 year झाले पण आज ही कविता ऐकून आई ज्या तालासुरात म्हणायची ते स्वर पुन्हा ऐकू आले thanks

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @ashokjadhao931
    @ashokjadhao931 11 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला या झोपडीत खूप खूप प्रेम मिळालेला आहे आम्ही ही झोपडी कधीच विसरू शकत नाही

  • @sanketashinde2206
    @sanketashinde2206 10 หลายเดือนก่อน +2

    माझी शाळेत असल्यापासूनची सर्वांत आवडती कविता. खूप वेळा हिच कविता मी म्हणायचे. खूप छान वाटले ऐकून.

    • @kavyagandh
      @kavyagandh  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻

  • @लक्ष्मीपळशीकर
    @लक्ष्मीपळशीकर 2 ปีที่แล้ว +7

    मी कन्या शाळा मालाडला होते ही कविता ६ वी ला होती मन मुग्ध झाले मनाला खूप खूप समाधान वाटले त्या वेळेची आठवण झाली त्या वेळची बाई मुले आई बाबा आमचे घर रस्ता सर्व सर्व आठवत होते कविता अजून पाठ आहे तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏👌👍

  • @sunandabhilpawar5431
    @sunandabhilpawar5431 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर जुन्या आठवणीला उजाळा मिळाला शाळेतील सर्व मैत्रिणी शाळेतील सर्व परिसर 👌👍

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻

  • @premadeokar5599
    @premadeokar5599 2 ปีที่แล้ว +4

    कविता ऐकून खूप समाधान मिळाले,मनःशांती मिळाली,खूप खूप धन्यवाद 🙏

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर, जुन्या काळात गेली। मोझरी समोर अाली। खंजिरी वादक म्हणून प्रसिद्धी होते संत तुकडोजी महाराज। अाम्हाला अगदीच अाहे 🌹🙏

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      संत तुकडोजी महाराज.🙏🌹💐

  • @sumatishinde4974
    @sumatishinde4974 6 หลายเดือนก่อน +3

    ही कविता आम्हाला सहावीला होती खूप छान वाटलं ऐकून शाळेतल्या आठवणी झाल्या घाल घाल पिंगा वाऱ्या ही पण कविता खूप सुंदर आहे

  • @reshmachavan2934
    @reshmachavan2934 ปีที่แล้ว +3

    खरच जुने दिवस आठवले ही कविता आयकुन
    🙏👌👌👌💐

  • @nihargamer4109
    @nihargamer4109 2 ปีที่แล้ว +5

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नमन 👃👃

    • @kavyagandh
      @kavyagandh  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद . ...🙏💐👍

  • @shreyasbhosale699
    @shreyasbhosale699 ปีที่แล้ว +34

    माझी लहानपणीची आवडती कविता. माझ्या बाबां ना पण आवडायची ते मला गाऊन दाखवायचे. ते 3 वर्षां पुर्वी गेले.त्यांची आठवण आली आणी डोळ्यातून अश्रू आले.

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

    • @gajananmalave7539
      @gajananmalave7539 ปีที่แล้ว +2

      खरंच माझे बाबा सुद्धा ही कविता अगदी टाळत म्हूनायचे आज तेही नाही माझे सोबत पण तुकडोजी बाबांची कविता ही बाबांची आठवण करून देते आणि डोळ्यात अलगत पाणी येत... 😢 आणि सर आपले पण खरंच आभार

  • @raghunathnimbale7004
    @raghunathnimbale7004 4 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर कविता. आम्हाला मराठी शाळेत होती. जुन्या कविता फारच सुंदर होत्या.अजुनही एक कविता नववीत होती."आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे,स्वयंवर झाले सीतेचे"पुन्हा ही कविता कोणी याच माध्यमातून पाठवेल तर फारच छान होईल. ही कविता सरांनी सर्व विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतली होती.

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 ปีที่แล้ว +2

    मला ही कविता खूपच आवडायची .या कवितेत किती सुंदर आर्थ भरलेला आहे. येता तरी सुखे या जाता तरी सूखे जा कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या. 👌👌👌👌👏👏👏👏💐💐🙏🏿🙏🏿🌹

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻,

  • @pratapsonawane8976
    @pratapsonawane8976 2 ปีที่แล้ว +4

    बऱ्याच वर्षापासून बालपणीच्या या कवितेचा शोध घेत होतो. खूप आनंद झाला. धन्यवाद

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान गायला सर चाळीस वर्षाचा काळ आठवला आणि पुन्हा एकदा लहान झाल्यासारखा वाटला

  • @kantabatwal1059
    @kantabatwal1059 ปีที่แล้ว +3

    खुप छान कविता. माझी आवडती.शाळेमधील दिवस आठवले.

  • @ashokkaranje2221
    @ashokkaranje2221 ปีที่แล้ว +2

    माझ्या बालपणीतील कविता, मनाला भावणारी. आता पण तेवढीच 👌👌❤

  • @pramodjahagirdar-wj7ug
    @pramodjahagirdar-wj7ug ปีที่แล้ว

    आम्हाला लहानपणी ही कविता होती, आम्हाला फार आवडतं होती, आताही अर्धवट पाठ आहे . अतिशय सत्यपरीस्थीवर आधारीत आहे.श्रीमान लेखकांचे अनंत ऋणी आहोत. मना: पासुन अभिनंदन.,,

  • @dayanandshirke3545
    @dayanandshirke3545 2 ปีที่แล้ว +4

    मीं चौथी ला असताना ही कविता बालभारती या पुस्तकात होती. आज तेव्हाचे दिवस आठवले 👌👌👌👌👌

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 2 ปีที่แล้ว +4

    1967 ya varshi aamhala hi kavita Balbharti ya pathyapustakat 6 vi la asatana pathantarasathi hoti, Saglyana aavadanari hi kavita hoti. Sant Tukdoji Maharaj yani rachana keleli sumadhur kavita🙏🌹🙏🌹👍🌹👍🌹👍

  • @hemantbagul
    @hemantbagul ปีที่แล้ว +4

    काळजाच्या कोंदणात तुडुंब आठवणींना उजाळा मिळाला, फार भरून आले...
    धन्यवाद..!

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 ปีที่แล้ว +2

    ही कविता मला वर्ग 9 वीत होती . आज सर्वच राजकारण्यांनी ही कविता प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे . तरच हा भारत देश खऱ्या अर्थाने " सुजलाम सुफलाम , सश्य शामलाम " होईल अनथा कधीच नाही . वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ( माणिक मंजुळाबाई ठोसर ) यांना माझा विनम्र ❤❤❤❤❤ प्रमाण !!!!!

  • @NagoraoSonkusare
    @NagoraoSonkusare 9 หลายเดือนก่อน +1

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रथम प्रणाम. आमच्या वेळेला ही व्यवस्था नव्हती. आता "या झोपडीत माझ्या" ही कविता ऐकून मन कसे आनंदीत उल्हासित होते आणि नजरेसमोर येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खंजिरी भजन. मी प्रत्यक्ष कापसे चौक गरोबा मैदान नागपूर येथे पाहिले आहे. महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आंम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. कवी नागोराव सोनकुसरे, नवीन नंदनवन नागपुर

  • @narhariudgirkar9515
    @narhariudgirkar9515 ปีที่แล้ว +4

    आदरणीय यांना सादर दंडवत 👏👋🌹🌹 ही कविता ऐकून मला ४९ वर्षे झाली माझे मन हे गहिवरून आले आहे धन्यवाद आपले मनःपूर्वक आपणास शुभेच्छा

    • @VijayMatte-bv1ow
      @VijayMatte-bv1ow ปีที่แล้ว

      वा छान कविता मानवतेचे महान पुजारी यांनी दुनियेला उपदेश केला

    • @ChhayaShinde-mg6hb
      @ChhayaShinde-mg6hb ปีที่แล้ว

      मलापनहोती कवीता

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 ปีที่แล้ว +4

    खूप छान माउली धन्यवाद राम कृष्ण हरी

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 💐राम कृष्ण हरी.

  • @PanditPatil-oo2rm
    @PanditPatil-oo2rm 5 หลายเดือนก่อน +4

    1977-78 मी सहावीला होतो त्या वेळी ही कविता खूप आवडत होती. आजही ती आठवण आहे

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura ปีที่แล้ว +2

    सन 1973 साली मी इयत्ता तिसरी मध्ये होतो तेव्हा ही कविता आम्हाला होती श्री तुकडोजी महाराज यांची ह्रदयस्पर्शी कविता आजही आम्हाला जीवनातील वास्तवतेचे दर्शन घडवून जीवन जगण्याचे अमूल्य मार्गदर्शन करते कोटी कोटी प्रणाम 🙏😊👍

    • @sulbhayelukar6274
      @sulbhayelukar6274 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम संगीत, अप्रतिम चाल, भारावुन टाकनारे शब्द.. मन प्रसन्न झाले 😊

  • @govindrasal2576
    @govindrasal2576 หลายเดือนก่อน +4

    आपण आम्हास बालपणात नेले,छान वाटले

  • @dattatraypanchal8438
    @dattatraypanchal8438 ปีที่แล้ว +3

    Far juni Aathwan zali Shaletil
    Very nice Kavita
    Thanks 👍

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.

  • @gitanjalibheke142
    @gitanjalibheke142 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान आहे कविता

  • @SujataJangam-u5u
    @SujataJangam-u5u หลายเดือนก่อน +3

    खूप छान कविता आहे काका

  • @officialsavitahande879
    @officialsavitahande879 ปีที่แล้ว +2

    Wawa hi kavita amahala pan hoti kiti sunder shabad ani balapani cha kal sukhacha

  • @vikaschavan7417
    @vikaschavan7417 6 หลายเดือนก่อน

    खूप मनाला समाधान देणारी कविता आहे संत तुकडोजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏼

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 หลายเดือนก่อน +4

    १९६४ - १९६५ साली आम्हाला ही कविता चवथीला होती . कवितेच्या पृष्ठावरील चित्रही सुरेख होते कवितेला साजेसे होते .

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 2 ปีที่แล้ว +4

    आयुष्याभर सोबत करतात,या कविता... 👌👌👌🙏🙏🙏👆

  • @jayashrisatam581
    @jayashrisatam581 2 ปีที่แล้ว +4

    कवितेतील बैलगाडी अंगण सूर्य बघून मन तृप्त झाले बालपण आठवलं

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 ปีที่แล้ว +2

    मस्तच.लहानपण जागे झाले.धन्य त्या शिकवणा-या माझ्या बाई

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      रमणीय बालपण 👍

  • @ShrddhaDeshpande
    @ShrddhaDeshpande 8 หลายเดือนก่อน +2

    ही कविता मला शाळेत नव्वीत असताना होती .
    खूप जुनी आठवण जागी झाली.मस्त

  • @mrunalikulkarni1043
    @mrunalikulkarni1043 ปีที่แล้ว +4

    माझी व माझ्या वडिलांची ही खूप आवडत ti कविता. धन्यवाद

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान वाटलं शाळेची आठवण झाली खरंच सुखी होतो आपण श्रीमंत ही होतो

    • @prabhakarjoshi8378
      @prabhakarjoshi8378 2 ปีที่แล้ว

      Bhishma pratidnya hi waman panditanchi kavita milate ka.

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 2 ปีที่แล้ว +4

    लहानपणी ची कविता आठवली आणि शाळेचे दिवस सुद्धा. खुपच तालासुरात बाईंनी शिकवलेली ही कविता.

  • @rajupathare4102
    @rajupathare4102 ปีที่แล้ว +1

    मला ही कविता खूप खूप आवडायची।शाळेतील दिवस पुन्हा आठवतात छान मस्त

  • @namaratashinde4015
    @namaratashinde4015 7 หลายเดือนก่อน +2

    माझी आवडती कविता आहे ही अगदी तोंड पाठ, खरच,40वर्ष पूर्वी सुंदर छान दिवस शाळेटले आठवले , आता विसर पडत आला तरीही केव्हा, केव्हा गुण, गुणत गाते मी.❤👌👍🌹🌹✍️

  • @manishazende4417
    @manishazende4417 2 ปีที่แล้ว +4

    ,.,अप्रतिम. साधारण चाळीस वर्षांपूर्वीचे बालपण आठवले. ही कविता माझा भाऊ जो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. तो शाळेतून आला कि मोठ्या आवाजात म्हणायचा. तेव्हा मला ऐकायला खूपच आवडायचे. मीही त्या च्या बरोबर म्हणायचे. विशेषत.:' जाता तरी सुखे जा. येता तरी सुखे या ' या ओळी अजूनही मनात घर करून आहेत.

  • @arjunjawalekar9573
    @arjunjawalekar9573 2 ปีที่แล้ว +5

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या.खूप छान वाटले धन्यवाद.

  • @mayuripatankat5872
    @mayuripatankat5872 6 หลายเดือนก่อน +3

    माझे बाबा हे गाणे नेहमी म्हनयचे खूप छान आहे

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 ปีที่แล้ว +2

    हि कविता मला शालेय जीवनात होती,
    फारच छान कल्पना या कवितेत वर्णन केले आहे,
    संत तुकडोजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम,
    धन्यवाद, राम राम,

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 जय राम जी की .

  • @dattapanchal4541
    @dattapanchal4541 8 หลายเดือนก่อน +2

    खुप छान गायले आहे संत तुकडोजी महाराज

  • @sumatishinde4974
    @sumatishinde4974 6 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला ही कवीता सहावीला होती खुप वर्ष झाली ऐकली नव्हती धन्यवाद

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 ปีที่แล้ว +3

    अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी कविता आम्ही 1980 पूर्वी शाळेच्या प्रांगणात आयोजित पर्थना वेळी सर्व विद्यार्थी बोलत होते त्या पैकी मीही ही कविता आदून मधून बोलत असतो फार सुंदर❤

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @surendrabelurkar1894
    @surendrabelurkar1894 2 หลายเดือนก่อน +4

    मानवतेचे महान पुजारी वं.राष्टूसंत श्री तुकडोजी महाराज याचे भजन कविते च्या माध्यमातून सुंदर गायन व विवेचन यु ट्युब चॅनल चे खुप खुप स्वागत,,,,,,

    • @kavyagandh
      @kavyagandh  หลายเดือนก่อน

      Thanks 🙏💐

  • @jahidaminne6265
    @jahidaminne6265 25 วันที่ผ่านมา +1

    Junya kavita kharach mast,Very Nice

  • @ashokchorghe5032
    @ashokchorghe5032 4 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान ही कविता आम्हाला इयत्ता सहावीला होती .कवीवर्य आपण आम्हास बालपणात नेऊन ठेवलात

  • @baliramyadav9334
    @baliramyadav9334 ปีที่แล้ว +3

    👌👌ही सेवा अखंडित राहावी ही नम्र विनंती.🙏🙏

    • @kavyagandh
      @kavyagandh  ปีที่แล้ว +1

      We appreciate your support🙏💐

  • @anitasawant7481
    @anitasawant7481 2 ปีที่แล้ว +4

    Shalet le divas athavale
    Khup chan🙏👌👌👌👌

  • @ratnamalapatil2339
    @ratnamalapatil2339 2 ปีที่แล้ว +4

    माझी आवडती सुंदर कविता आम्हाला होती

  • @kiranjadhav567
    @kiranjadhav567 6 หลายเดือนก่อน +1

    माझी खूप आवडती कविता आहे . खूप छान वाटले कविता ऐकून.👌👌