वसईच्या किल्ल्यामधला दीपोत्सव / Deepostav 2021 at Vasai Fort by Aamchi Vasai / MarathiTravelVLog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024
- #VasaiFort #DiwaliCelebration #Deepostav #AamchiVasai #UnnayanTours / MarathiTravelVLog
मुंबई अगदी शेजारीच असलेला वसईचा किल्ला आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे. किल्ल्यात आतपर्यंत रस्ता जात असल्यामुळे अगदी सहजपणे या किल्ल्यात जाता येतं.चालुक्य, शिलाहार आणि यादव राजांच्या ताब्यातली वसई पुढे सुमारे दोनशे वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होती.
धर्मांध पोर्तुगीजांनी इथल्या जनतेवर भयंकर अत्याचार केले. अखेरीस 1739 मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने हा किल्ला जिंकून घेतला. सुमारे 21000 मराठी सैनिक ह्या लढाईमध्ये शहीद झाले.
घरोघरी दिवाळी साजरी होत असताना वसई चा हा किल्ला मात्र अंधारातच असायचा. सगळीकडे कंदील, पणत्या तोरणांचा झगमगाट असताना मराठी सैनिकांच्या रक्ताने पावन झालेली ही पुण्यभूमी मात्र काळोखातच असायची. मराठी सैन्याच्या पराक्रमाचा आणि बलिदानाचा मूक साक्षीदार असलेल्या वसईच्या किल्ल्याची ही अवस्था बदलली आमची वसई ह्या सामाजिक संस्थेने.
संध्याकाळच्या सुमारास किल्ल्यामधल्या पुरातन नागेश्वर महादेवाच्या देवळापासून ह्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतातआणि मग वसई किल्ल्याचा सारा परिसर पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि चिमाजी अप्पांच्या वेशभूषेमुळे दीपोत्सवाला एक आगळाच रंग प्राप्त होतो, दीपोत्सवाला ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रदान करतो.
देव, देश आणि धर्मासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृती ह्या दीपोत्सवाच्या निमित्ताने जागवल्या जातात. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या इथल्या वास्तू, कंदील आणि रांगोळ्यांनी सजतात, पणत्यांच्या मंद प्रकाशात तेजोमय होतात.
'किमान एक तरी दिवा लावू वीरांच्या स्मरणार्थ' हा संदेश जनमानसात पसरवत जातात.
Video by Unnayan Tours
Website: www.unnayan.net
Contact or WhatsApp: 09967534396 / 09773510513
TH-cam : / unnayantours
Facebook Page: / unnayantours