माझा विठ्ठल माझी वारी : वारीत विविध पालख्यांना विशेष महत्त्व, डॉक्टरांची वारीत मोफत रुग्णसेवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • विठू नामाचा जयघोष करत वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने आता वेगाने चालली आहेत. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची वेगवेगळी रुपं या वारीमध्ये पाहायला मिळतायत....
    आम्हाला या आनंदवारीमध्ये रेडेश्वर महाराज आणि संत निळोबा यांच्या पालखीचं दर्शन झालं.
    तर वारकऱ्यांच्या मदतीसाठी वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी खास डॉक्टरही सहभागी झाले होते.
    शेकडो कोस चालत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणं हे व्रत घेऊन इथले डॉक्टर्स काम करतायत.
    तर दुसरीकडे विठ्ठल नामाचा जप करत वारकरी अभंग आणि किर्तनात दंग झाले आहेत.
    कधी एकदा विठुरायाच्या त्या प्रसन्न मूर्तीचं दर्शन आपल्याला होईल याकडेच वारकऱ्यांचे डोळे लागलेत...
    सदा माझे डोळा ज़डो तुझी मूर्ती या अभंगाचा जप करत वारकरी मार्गस्थ होतायत...
    या साऱ्या सोहळ्याचा आढावा घेतलाय अभिनेता संदिप पाठकनं...
    पाहुयात माझा विठ्ठल माझी वारी...

ความคิดเห็น • 7