‘दादा माणूस’ Dada Manus - आंधळा मारतो डोळा कसा बनला ? चित्रपट बनताना कोणत्या समस्या आल्या एपिसोड 84

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • ‘दादा माणूस’ Dada Manus
    कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.
    संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये

ความคิดเห็น • 25

  • @parshantbhangepatil
    @parshantbhangepatil 6 หลายเดือนก่อน +11

    दादा पून्हा होणे नाही🙏🙏💐💐🙏🙏

  • @vilasnandi9982
    @vilasnandi9982 6 หลายเดือนก่อน +9

    मराठी चित्रपट सृष्टीत विशिष्ट समाज चे वर्चस्व होता आणि आहे, ते दादा कोंडके सारखे इतर समाज्याच्या लोकांना स्विकारत नाहीत, असे तुमच्या सर्व भाग पाहिल्यावर लक्षात येते, नाही तर दादा कोंडके ना महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला पाहिजे.....

  • @santoshchandavale2804
    @santoshchandavale2804 6 หลายเดือนก่อน +15

    लहानपणी गावच्या यात्रेत,तंबू मधे हा,चित्रपट पहिला होता.गाणीही,गावरान ढंगाची,भन्नाट,होती,खुप मजा आली

  • @pandharinathkale5533
    @pandharinathkale5533 3 หลายเดือนก่อน +5

    दादा कोंडके गिनीज बुक होल्डर आहेत, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.👍🚩❤️✅🇮🇳

  • @mp-vy2pz
    @mp-vy2pz 4 หลายเดือนก่อน +8

    खरे म्हणजे दादांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणी माहराष्ट भूषण पुरस्कार देयाला पाहिजे होते

  • @PrajktaShisode
    @PrajktaShisode 6 หลายเดือนก่อน +8

    Anita tai dadanchi mulakat asel tr ek episode banvana❤

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 6 หลายเดือนก่อน +5

    छान किस्सा सांगितला 😊 thanks 🙏

  • @gangadhargungewar8707
    @gangadhargungewar8707 3 หลายเดือนก่อน +3

    अनिता पाध्ये ताई स्वर्गीय दादा कोंडके यांच्या संबंधीचे आत्मचरित्रपर आपण लिहिलेले पुस्तक मी वाचले आहे वाचले आहे आपण जीवनातील अत्यंत सूक्ष्म बारकावे या पुस्तकात उल्लेख केला आहात दादांचे खाजगी आयुष्य किती खडतर गेले जवळच्या लोकांनी त्यांचा किती छळ केला हे वाचून अत्यंत वाईट वाटते त्या काळातील चित्रपट सृष्टीतील विरोधी फळी च्या लोकांनी त्यांना डॉमिनेट करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु दादा कोंडके हरहुन्नरी उत्कृष्ट कलाकार होते जनतेत नामांकित होते त्यामुळे त्यांनी कोणाला भीक घातली नाही घातली नाही आपण त्यांच्या आत्मचरित्रावर छान प्रकाश टाकला आहात आपले हार्दिक अभिनंदन

  • @MukundDeshmukh-m6h
    @MukundDeshmukh-m6h 6 หลายเดือนก่อน +7

    माझ्या आयुष्यातील मी पाहिलेला पहिला चित्रपट.

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 3 หลายเดือนก่อน +5

    दादा कोंडके बद्दल अतिशय आदर आहे इतके प्रभावी बोलायचे समोरच्या ची पंचाईत होत असे

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 2 หลายเดือนก่อน +3

    आंधळा मारतो डोळा ह्याचा (त्यावेळच्या ) कोहिनूर चित्रपटगृहावरील भव्य cutout अजून आठवतोय!
    दादाकोंडक्यांचा cutout आणि त्यांच्या एका डोळ्याच्या जागी ब्लिंक होणारा दिवा हे अत्यंत वेगळ्या पद्धतीचे असल्याने प्रमुख आकर्षण होते.

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 6 หลายเดือนก่อน +5

    Dada is great personality & great actor, thanks for Anita Tai this information.

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 6 หลายเดือนก่อน +4

    Dear Annita Padhye, you narrate the episode very well. I love it and try and see. Dada Kondke was a gifted artist. His talent was extraordinary! I was brought up in Nasrapur Bhor Taluka. I love Marathi actors. Once I was going by ST from Pune to Kolhpur. At one stop we all got down and as soos as Vasant Shinde started talking I noticed him due to missing tooth. Nobody had noticed him. He was going to Kolhapur for shooting. In Prabhat Theatre Pune. I found Suryakant and Ganpat Patil sitting behind me in balkany. I offered them tea but they said it's ok. Then film team came from Mumbai to Adelaide. I was called by SAFC for dinner with them. Actor Amrapurkar was there. I took them for a dinner. Last, I met Ramesh Deo at His residence overlooking the sea. We sat in his terrace garden and chatted like old friends. He gave me his biography, 'Ya Sukhano ya!' He showed me collection of guns by rolling the wall of his room! Everyone has curiosity for movies, actors, or how movies are made. I became a member of Writer Centre in Adelade, wrote Script Hollywood style, got involved with South Australian Film Commision. Made a Short Film which was screened here. Became member of Australian Directors Guild and got invited to Oscar like event in Sydney. First Maharashtrian to do so. I wrote, directed and financed the film, shot in different location in Adeliade. The title was 'Voices'. Got students studying film from Flinders Uni to work for free. I auditioned them and had bought expensive camera to shoot auditions I did give all unit a wrap up party! Had good cinematographer. Film stock was expensive. My film was critically reviewed in film magazine' So I know all parts of film making and enjoy your talks on Dada. I wish I knew him. I would have brought him here in Adelaide and showed him SAFC and top Australian films. You are doing well and I enjoy it tremendously. There is one Padhye whom I knew. He was editior of Sakal news paper and his daughter lives here. So I used to meet him in Marathi Mandal. Now I don't attend. Anyway, it is nice to listen to your 'Kisse'.👏 You can do 'One Woman Show' just by narrating Dada's life from the beginning to end. It will be interesting. 'Dada Kondke Alive'! 😀

    • @meeramohite8808
      @meeramohite8808 6 หลายเดือนก่อน

      मराठीत प्रतिक्रिया दया काही कळल नाही

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  6 หลายเดือนก่อน

      Thank you. lets subscribe my channel ,like it and share it. very soon going to start new series on Film Celebs , especially Hindi , and some marathi too. so keep watching .

    • @sandipkoli2018
      @sandipkoli2018 4 หลายเดือนก่อน

      किती सालची गोष्ट आहे

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 6 หลายเดือนก่อน +5

    😊 Namaskar madam 😊

  • @shrinathbharate6231
    @shrinathbharate6231 6 หลายเดือนก่อน +21

    दादा कोंडके कदाचित प्रस्थापित जातीचे नाहीत म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला नसावा तेलुगु तमिळ क्षेत्रामध्ये एक से बढकर बॅनर आणि कलावंत आहेत पण दादांचा रेकॉर्ड कुणालाही मोडता आला नाही

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan 6 หลายเดือนก่อน +2

      बरोबर... अशोक सराफ यांचे काय योगदान आहे ?

  • @rohidasbhagat2972
    @rohidasbhagat2972 6 หลายเดือนก่อน +3

    दादा कोंडके 👌🏻👍

  • @subhashkelkar1475
    @subhashkelkar1475 6 หลายเดือนก่อน +3

    Thanks!

  • @AnilKhankal
    @AnilKhankal หลายเดือนก่อน

    Sharad talwalkar nahi jaishankar danave

  • @suhaskul1
    @suhaskul1 27 วันที่ผ่านมา

    Who is the actress played Dada's sisters role

  • @BhushanMusicPlatform8482
    @BhushanMusicPlatform8482 6 หลายเดือนก่อน +2

    गंमत आहे