संत नामदेव महाराजांचे मराठी अभंग | Sant Namdev Maharaj Abhang | संतांची अभंगवाणी | Raag Yaman |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • RAAG YAMAN
    ABHANG - JANMACHE KARAN
    VOCAL - VAIBHAV KADU , SHITAL PATIL , BIPIN MHATRE
    TABLA - DNYANDEEP BANDA
    PAKHAWAJ - KIRAN BHOIR
    TAAL - OM BHOIR
    COROSS - VAISHNAVI MHATRE ,MANGESH PATIL , VIJAY GAIKAR
    .....................................................................................................................
    हरिपाठाचे अभंग
    ३९. नामाचा महिमा कोण करी सीमा । जपा श्रीरामा एक्याभावें।
    न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे । वर्णिजे वक्त्रं श्रीरामनाम। धा
    अनंत पुण्यरासी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत। ३।
    नामा म्हणे राम हा जप परम । तो देह उत्तम मृत्युलोकी। ४।
    ४०. जन्माचे कारण रामनाम पाठे। जाईजें वैकुंठे एक हेळां ।।।
    रामनामा ऐसां जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल अपैसा इहलोकीं। २।
    दो अक्षरी राम हा जप परम। नलगे तुज नेम नाना पंथ। ३।
    नामा म्हणे पवित्र श्रीरामाचें चरित्र । उद्धरसि गोत्र पूर्वजेंसी। ४ ।
    ४१. विषयांचे कोड कां करिसी गोड। होईल तुज जोड इंद्रियबाधा।१।
    सर्व हे लटिके जाणुनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे। २।
    मायाजाळमोहो इंद्रियांचा रोहो। परि न धरिसी भावो भजनपंथे। ३ ।
    नामा म्हणे देवा करी तूं लवलाहो । मयूराचा टाहो घन गर्जे। ४ ।
    ४२. कांसवीचे दृष्टी जै होईजे भेटी । तै अमृताची वृष्टि घडे त्यासी। १।
    तैसें हे भजन श्रीरामाचे ध्यान । वाचे नारायण अमृतमय।२।
    धन्य त्याचे कुळ सदां पै सुफळ । दिननिशी फळ रामनाम । ३।
    नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम । वाचेसी सुगम रामनाम । ४ ।
    ४३. सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ । वंदि कळिकाळ शास्त्र सांगे। १।
    ब्रह्मांडनायक ऐंसे जें कवतुक । तेचि नाम एक श्रीकृष्ण ऐसें। २ ।
    आदी अंत पाहतां नाही पै सर्वथा। परिपूर्ण सरीता अमृताची। ३ ।
    नामा म्हणे अनंत कां करीसी संकेत। उद्धरिले पतीत युगायुगीं। ४ ।
    हरीपाठाचे प्रत्येक अभंगानंतर 'न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे। वणिज वक्त्र
    श्रीरामनाम' हे धृपद म्हणावे.
    गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । तो उद्धरे तात्काळ कलीमाजी। १ ।
    नारायण नारायण हेचि पारायण । उद्धरले जन इहलोकी । २।
    तटती यातना कर्माच्या भावना । जड जीव उद्धरणा नाम स्मरा । ३ ।
    नामा म्हणे राम हा जप परम । न लगती नेम नानाकोटी। ४ ।
    ६. तीर्थ तपरासी जप हृषीकेशी। नाम अहर्निशी रामराम । १ ।
    तीर्थांचे पै तीर्थ नाम हें समर्थ । होईल कृतार्थ रामनामें। २ ।
    साधेल साधन तुटेल बंधन । वाचे जनार्दन सुफळ सदा । ३ ।
    नामा म्हणे हरी उच्चार तूं करीं । उद्धरसी निर्धारी इहलोकी। ४ ।
    ४६. पाहता ये परिपाठी आणीक नाहीं सृष्टी । नामेविण दृष्टी न दिसे माझे। १ ।
    नामचि समर्थ नामचि मथीत । शंकरासी हेत रामनामी। २ ।
    पुरती सर्व काम वाचे रामनाम । न लगती ते नेम कर्मजाळ । ३ ।
    नामा म्हणे उच्चार न करी तूं विचार । तुटेल येरझार नाना योनी । ४ ।
    ४७. तपांचे पै तप राम हे अमुप। करी कां रे जप रामनामी। १ ।
    रामकृष्ण म्हणे वाचे नारायण। तुटेल बंधन यमपाश। २ ।
    साधेल साधन होती कोटी यज्ञ । नाम जनार्दन जप करी। ३ ।
    नामा म्हणे जिव्हे नाम स्मरण करी । म्हणे नरहरी एक भावें । ४ ।
    ४८. हाचि नेम सारी साधेल तो हरी । नाम हे मुरारी अच्युताचें। १।
    गोविंद हरे गोविंद हरे । यादव मुरारे रामनाम । २।
    न लगती कथा नाना विकलता। राघवाचे स्मरतां नाम वाचे । ३ ।
    नामा म्हणे राम आम्हा हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां। ४ ।
    ४९. करूं हे कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें। १।
    जगाचा जनक रामकृष्ण एक। न करितां अविवेक स्मरे राम। २।
    तुटेल भवजाळ कां करिसी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रिय बाधा। ३।
    नामा म्हणे गोविंद स्मरे तूं सावध। नव्हे तुज बाध नानाविघ्नें। ४ ।
    ५०. मायेचे भूचर रज तम सात्विक। रामनाम एक सोडवणे।।
    राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । नामें घडे यज्ञ कोटी देखा । २॥
    न लगती साधन नाना मंत्र विवेक । रामनामीं मुख रंगी कां रे।३।
    नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां । नित्य ते पौर्णिमा सोळा कळी। ४।
    ५१. माझें मी करिता गेले हे दिवस। न धरीच विश्वास रामनामी।।
    अंती तुज उद्धरती रामकृष्ण हरी। राम पंचाक्षरी मंत्रसार। २ ।
    कां करशील सांठा प्रपंच विस्तार । न तुटे येरझार नामेंविण। ३।
    नामा म्हणे कैंसे रामनामी पिसें। तो उद्धरेल अपैसे इहलोकी। ४ ।
    ५२. नको नको माया सांडी लवलाह्या । पुढील उपाया झोंबें कां रें।१।
    रामनाम म्हणे तुटेल बंधन। भवबंध मोचन एकानामें। २।
    स्मरतां पतीत उद्धरले यथार्थ। नाम हाचि स्वार्थ तया झाला । ३ ।
    नामा म्हणे हा जप करी तूं अमूप। नामें चुकली खेप इये जनीं। ४ ।
    ५३. स्मरण करितां रामनाम ध्वनी। ऐकतांची कर्णी पळती यम । १।
    ऐसें पाठ करी रामकृष्ण हरी । होतील कामारी रिद्धीसिद्धी। २।
    साध्य तोचि साधी न करी उपाधि । जन्मांतरीच्या व्याधि हरती नामें। ३ ।
    नामा म्हणे सर्व राम हाचि भाव । नाही आणिक देव रामेंविण। ४ ।
    ५४. रामकृष्ण माळ घाली कां अढळ । तुटेल भवजाळ मायामोह। १ ।
    होशील तूं साधु न पवसी बाध । पूर्ण ब्रह्मानंद पावेल तुज । २ ।
    जपतां रामनाम पुरती सर्व काम। आदि अंती नेम साधेल तुज । ३ ।
    नामा म्हणे कृतार्थ पूर्ण मनोरथ। न लगती ते अर्थ माया फासें। ४ ।
    ५५. शरीर संपत्ती मायेचे टवाळ । वायांची पाल्हाळ मिरवितोसी। १।
    नाम हेचि तारी विठ्ठल निर्धारी । म्हणे हरी हरी एकी हेळा । २ ।
    स्मरतां गोपाळनाम वंदील काळयम । न लगती नेम मंत्रबाधा। ३ ।
    नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम । राम हेंचि नाम स्मरें कां रे । ४।
    १६. भवाब्धि तारण रामकृष्ण नांव। रोहिणीची माव सकळ दिसे।१।
    चि थोर नाम हेंचि थोर । वैकुंठी बिढार रामनामें । २ ।
    महे निशाणी जपताची अढळ । वैकुंठ तत्काळ तया जीवा। ३ ।
    नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल। अंती तुज पावेल नाम एक । ४ ।
    ‌‌‌‌‌‌‌‌ हरीपाठ अभंग समाप्त.
    श्री संत नामदेव महाराजांचे टॉप १० गाजलेली अभंग
    Non - Stop Marathi Abhang
    #abhang
    #मराठीगाणी
    #Saregamamarathi
    #MarathiSong
    #Oldmarathisong
    #Marathigani

ความคิดเห็น • 2