Salam---Mangesh Padgaonkar--Marathi Kavita.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2013
  • ONE OF THE BEST POEM OF MANGESH PADGAONKAR.
  • เพลง

ความคิดเห็น • 157

  • @shreeram8985
    @shreeram8985 4 ปีที่แล้ว +39

    पाडगांवकरांच्या काव्य प्रतिभेला सलाम, त्यांच्या शुरतेला सलाम, कवितेतील व्यंगाला सलाम, त्यांची कविता समजुन घेणा-यांना सलाम, त्यांच्या कविता वाचन लहेजा ला सलाम

  • @vikramchavan672
    @vikramchavan672 2 หลายเดือนก่อน +3

    विडंबन काव्य काय असतं.. आतापर्यंत ची बेस्ट कविता..आजही .. तंतोतंत जुळते

  • @Nil_8
    @Nil_8 4 ปีที่แล้ว +18

    कविता न समजता भाष्य करणाऱ्या संकुचिततेला सलाम

  • @vijaymarathe8
    @vijaymarathe8 6 หลายเดือนก่อน +4

    सलाम ही कवीता अमर आहे... कधीही ऐकली तरी ती वास्तव परिस्थितीची जाणीव करून देते🙏

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 ปีที่แล้ว +9

    आजतागायत कित्येक वेळा ही कविता पाहिली,वाचली.परत परत बघतो.माननीय श्री मंगेश पाडगावकर यांना पुनश्च सलाम.

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 3 ปีที่แล้ว +12

    सामान्यांच जगणं मुश्किल करणा-यांना सलाम 😥🙏🙏🙏

  • @rahulnarkar8139
    @rahulnarkar8139 4 ปีที่แล้ว +8

    सलाम , मंगेश पाडगावकर यांना...
    वा म्हणायच धाडस होत नाही... कारण सरांच्या कविता
    या वा पलिकडील आहेत...

  • @stoned_ape
    @stoned_ape 2 ปีที่แล้ว +8

    Why this is getting more relatable day by day...

  • @nagappakullur3641
    @nagappakullur3641 3 ปีที่แล้ว +3

    चाचणि नव्हे कवीवरा ! ही आहे टोचणी पिचलेल्या हृदयाःचि ! सलाम करतो !
    निवडून येताच सर्वाना गुलाम करतो !
    अस्मिता ? ? ? ! ! !

  • @shivajichate1239
    @shivajichate1239 4 ปีที่แล้ว +5

    भारतातील सर्वात महान कवी मंगेश पाडगांवकर

  • @amrapalipanchal5679
    @amrapalipanchal5679 6 ปีที่แล้ว +20

    "SALAM" Sarkhi suryakirani satya kavita lihinarya Padgaonkara na "SALAM"💙🙏🙏🙏

  • @dude26841
    @dude26841 4 ปีที่แล้ว +10

    Immortal...We are very fortunate to have this heavenly creation..🙏

  • @Sharad-ez6gf
    @Sharad-ez6gf 4 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या प्रत्येक शब्दाला सलाम❤😊

  • @nidhi4486
    @nidhi4486 6 ปีที่แล้ว +13

    मंगेश पाडगावकरांच्या कवितेला मनापासून सलाम....

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 9 หลายเดือนก่อน +1

    निडर कवी समाजातील प्रत्येक विदारक वास्तव्य कवितेत मांडलेला आहे आपल्या निढरतेला सलाम

  • @bharatikapadia5827
    @bharatikapadia5827 8 ปีที่แล้ว +25

    the sheer power, of the words and of the performance, stills the breath and stuns me into silence!

  • @Uday2310
    @Uday2310 6 ปีที่แล้ว +56

    सलाम
    सबको सलाम
    ज्याच्या हातात दंडा
    त्याला सलाम,
    लाथेच्या भयाने
    डावा हात गांडीवर ठेवून
    उजव्या हाताने सलाम,
    बघणार्‍याला सलाम,
    न बघणार्‍याला सलाम,
    विकत घेणार्‍याला सलाम,
    विकत घेण्याचा इशारा करणार्‍याला सलाम,
    सलाम, भाई,
    सबको सलाम.
    वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
    शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
    लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
    देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
    देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
    रिकाम्या हातातून ऊद काढणार्‍या बडेबुवाला सलाम,
    शनीला सलाम,
    मंगळाला सलाम,
    भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
    आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
    बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
    साहेबाची टरकवणार्‍या
    त्याच्या साहेबाला सलाम,
    सलाम,प्यारे भाईयों और बेहेनों ,
    सबको सलाम.
    ज्याच्या हातात वृत्तपत्र
    त्याला सलाम,
    भाषणांचे, सभांचे
    फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
    वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
    त्यांची वेसण धरणार्‍या
    राज्यकर्त्यांना सलाम,
    ज्याच्या समोर माइक्रोफोन
    त्याला सलाम,
    त्यातून न थांबता बोलतो
    त्याला सलाम,
    लाखोंच्या गर्दीला सलाम,
    गर्दी झुलवणार्‍या
    जादुगारांना सलाम,
    भाईयों और बेहेनों , सबको सलाम.
    नाक्यावरच्या दादाला सलाम,
    हातभट्टीवाल्याला सलाम,
    स्मग्लरला सलाम,
    मटकेवाल्याला सलाम,
    त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
    लोकशाहीलाबी सलाम,
    ठोकशाहीलाबी सलाम,
    सत्तेचा ट्रक चालविणार्‍यांना सलाम,
    ट्रकखाली चिरडलेल्या,
    गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
    ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
    विमानातून बाँम्ब फेकणार्‍यांना सलाम,
    शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
    काळा बाजारवाल्यांना सलाम,
    त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
    गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
    तिरडीचे सामान विकणार्‍यांना सलाम,
    तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
    मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
    सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.
    बिळांना सलाम,
    बिळातल्या उंदरांना सलाम,
    घरातल्या झुरळांना सलाम,
    खाटेतल्या ढेकणांना सलाम,
    पिचलेल्या बायकोला सलाम,
    दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
    गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
    किडक्या धान्याला सलाम,
    भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम,
    धंद्याच्या मालकाला सलाम,
    युनियनच्या लीडरला सलाम,
    संपाला सलाम,
    उपासमारीला सलाम,
    सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
    चाळीचाळीतून तुंबलेल्या
    संडासातल्या लेंड्यांना सलाम,
    मानगूट पकडणार्‍या
    प्रत्येक हाताला सलाम,
    सलाम, भाइयों और बेहेनों , सबको सलाम.
    या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
    या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
    सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
    जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
    या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणार्‍यांना सलाम,
    उपनिषदे आणि वेदांना सलाम,
    साखर कारखान्यांच्या दादांना सलाम,
    त्यांच्या शेकडो लॉर्‍यांना सलाम,
    निवडणुकींना सलाम,
    निवडणूक फंडाला सलाम,
    अदृष्य बुक्क्यांना सलाम,
    मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
    ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
    त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
    दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
    या बातम्या वाचणार्‍या सर्व षंढांना सलाम,
    सलाम, भाइयों और बेहेनों , सबको सलाम.
    सत्ता, संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
    तर डोके फोडतील,
    हलकट लाचारांचा देश म्हटले
    तर रस्त्यावर झोडतील,
    खरीदले जाणार्‍यांचा देश म्हटले
    तर वाटा रोखतील,
    देवधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
    तर नाक्यावर गाठून ठोकतील,
    शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
    तर नोकरीवरुन काढतील,
    म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
    आणि त्यानंतर अर्थातच
    या माझ्या
    परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
    या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
    सलाम प्यारे भाइयों और बेहेनों, सबको सलाम,
    अनेक हात असते
    तर अनेक हातांनी केला असता सलाम,
    लेकिन माफ करना भाइयों,
    हात तर दोनच
    आणि त्यातला डावा
    लाथेच्या भयाने
    ठेवलेला गांडीवर
    म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम,
    सलाम, सबको सलाम,
    भाइयों और बेहेनों ,सबको सलाम.
    -- मंगेश पाडगांवकर

  • @nirmalabawaskar2011
    @nirmalabawaskar2011 7 หลายเดือนก่อน

    पू लं यांना ऐकल्यावर जर कोणाच्या विचारांमध्ये रस येतो तर तो फक्तं आणि फक्तं पाडगावकरांच्या शब्दात ❤️❤️❤️

  • @rdnyansagar
    @rdnyansagar 8 ปีที่แล้ว +15

    Marathi sahityane ek anmol heera gamavla aaj..

  • @madhu338
    @madhu338 8 ปีที่แล้ว +20

    मंगेश पाडगांवकर को सादर नमन.... समसामयिक रचनाएं और आई कॉन्‍टेक्‍ट...ज़बर्दस्‍त......

    • @ajit1202
      @ajit1202 5 ปีที่แล้ว

      Thank you !:

  • @aydivg
    @aydivg 3 หลายเดือนก่อน

    अक्षर कविता, भावना, विचार, विद्रोह. सलाम, पाडगावकरांच्या माणुसकीला!

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 11 วันที่ผ่านมา

    Sir mangesh padgavkarana naza salam he. Aze aavdate kavi yanchya kavita mala far aavdtat sir tumhala salan

  • @umeshgawas
    @umeshgawas 6 ปีที่แล้ว +8

    Legend. I literally cried watching this.

  • @rahulhoteekar2882
    @rahulhoteekar2882 4 ปีที่แล้ว +93

    आणि हया कवितेवर dislikes करणार्यांनाही सलाम...🙇

    • @Krishna-ss2nk
      @Krishna-ss2nk 3 ปีที่แล้ว +6

      Dislike करणाऱ्या लोकांच्या भीतीला सलाम .... पाडगावकर यांनी सत्यावर बोट ठेवलंय म्हणून dislike केलेलं दिसतंय

    • @rahulkarjatkatkar2999
      @rahulkarjatkatkar2999 3 ปีที่แล้ว +5

      Tumchya ya comment la salaam

    • @KD-wt1bh
      @KD-wt1bh 3 ปีที่แล้ว +2

      😉

    • @integrity2679
      @integrity2679 ปีที่แล้ว

      Tumchya comment vr like karnaryala salam

    • @prakashkhatavkar4200
      @prakashkhatavkar4200 ปีที่แล้ว

      ​@@integrity2679मला तर कुणी डिसलाईक केलेले दिसत नाहीत मग कशावरून ओळखले की कुणी डिसलाईक केलेले आहे

  • @pratik9882
    @pratik9882 3 ปีที่แล้ว +3

    काल आज आणि उद्या ही सत्य असणारी काव्य.

  • @Cmahale
    @Cmahale 8 ปีที่แล้ว +5

    An Acerbic critique of hypocrisy and social system in India! Don't understand how audience can clap instead Mangeshjee would appreciate introspection

  • @Krishna-ss2nk
    @Krishna-ss2nk 3 ปีที่แล้ว +2

    Dislike करणाऱ्या लोकांच्या भीतीला सलाम .... पाडगावकर यांनी सत्यावर बोट ठेवलंय म्हणून dislike केलेलं दिसतंय

  • @user-zd5ty7fv4e
    @user-zd5ty7fv4e 2 วันที่ผ่านมา

    विसाव्या शतकातील महान कवी

  • @sp6245
    @sp6245 3 ปีที่แล้ว +3

    Great Mangesh Padgonkar ..........

  • @maltiv7426
    @maltiv7426 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सांगितलेल्या सत्याला सलाम

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 ปีที่แล้ว

    मराठीतील अप्रतिम अशी गाणी लि हिनारे मंगेश जिना सलाम

  • @pradeepjaptap419
    @pradeepjaptap419 8 ปีที่แล้ว +4

    Its incredible India, and in that we have lost a one, a special one, who had a total faith in us and by his writings tried to increase and explore it. aaj aamhi tumhala salam karto........ amhi manjhe jyana tumcha khup abhiman vato....

  • @chandrashil6882
    @chandrashil6882 ปีที่แล้ว

    आज सुध्दा तितकाच प्रासंगिक आहे सलाम

  • @shreeram8985
    @shreeram8985 3 ปีที่แล้ว

    पाडगांवकरांच्या कविता सादरीकरणाला सलाम, सलाम भाई सलाम पाडगांवकरांच्या कवितेला सलाम

  • @dhruvpatil6670
    @dhruvpatil6670 ปีที่แล้ว +1

    ह्या कविता लिहिल्या ला सलाम

  • @samirgandhigreenergysolar8085
    @samirgandhigreenergysolar8085 ปีที่แล้ว

    अगतिकतेचा स्पष्ट उद्गार.
    आपल गाण आपल्याल पटल पाहिजे,
    गाण्यावर प्रेम करत म्हटल पाहिजे.

  • @dattatreyajoshi5106
    @dattatreyajoshi5106 9 หลายเดือนก่อน

    वो भी क्या दिन थे !!इधर शाम उधर हाथ मे जाम !! ( कवितांचा ,विंदा ,कुसुमाग्रज मंगेशजी वसंत बापट जी ) अब तो रस्ते भी न याद हैं मयखानोंके !!

  • @sachinparkhe4173
    @sachinparkhe4173 หลายเดือนก่อน

    These were the days where all were accepting this satire by all including politicians and all members of society... They respected this criticism

  • @vijayalondhe8426
    @vijayalondhe8426 6 หลายเดือนก่อน

    सलाम फक्त आपल्या स्वतःच्या अंतर आत्म्याला सलाम.

  • @durgeshkale8832
    @durgeshkale8832 3 ปีที่แล้ว

    सलाम आजही किती लागू पडते. सुंदर 👌

  • @yogeshchavan2503
    @yogeshchavan2503 5 ปีที่แล้ว +3

    This poet is ... fascinating

  • @krishna7240
    @krishna7240 3 ปีที่แล้ว +1

    समोर बसलेल्या नेत्यांना काय करावे सुचत नाहीये..... कशाला आलो मी इथे अस वाटत असणार त्यांना.....
    जाऊद्या त्यांना पण सलाम 😁 असो

  • @ajitpavgi4587
    @ajitpavgi4587 3 ปีที่แล้ว

    अगदी असच नाही पण ह्यांचप्रकारे देवादीदेव महादेवाच्या रुद्र ह्या प्रार्थनेमधेही नमक ह्या भागामधे असाच सर्व गोष्टींना नमः असे संबोधले आहे. बर्याच चांगल्या व त्रासदायक कल्पनांना नमः असे म्हणले आहे.

  • @amoldatir8152
    @amoldatir8152 ปีที่แล้ว

    Bhitichya pratyek thekedarala salaam.....epic line..

  • @Rohit_c11
    @Rohit_c11 8 ปีที่แล้ว +2

    khup chhan...aaplya deshatla sattya agdi sahaj mandlat yatun..

  • @Sarvajit369
    @Sarvajit369 8 ปีที่แล้ว +1

    maharashtrane aaj chirtarun kavi gamavala,sahitya kshetratil surya harapala,aaj kavita thambali karan aaj kavitevar jiv ovalun taknara khara kalavant sampurn sahitya vishvane gamavala aani aaj prem kavitanche shabd porke jahale,mandesh padgaonkarna bhavpurn shraddhanjali

  • @vinodraghavanuk
    @vinodraghavanuk ปีที่แล้ว

    Beauty of those days were different shades of ideologies and political affiliations are in the audience. Vilasrao Deshmukh (Congress) with wife, Sena leaders Manohar Joshi and Chagan Bhujbal sitting next to Vilasrao. Back row Bal Thackeray's son Uddhav and his wife Rashmi humbly sitting in the back row. That's the beauty and power of Knowledge ❤

  • @user-bx1ob7xk8l
    @user-bx1ob7xk8l 5 หลายเดือนก่อน

    Best.Marathi.Kvita.Exlance

  • @antimshivgan5000
    @antimshivgan5000 5 ปีที่แล้ว +1

    कवीता पण छान आणि सादरीकरण हि छान I Miss you sir

  • @user-vo6hj1kj1s
    @user-vo6hj1kj1s 4 ปีที่แล้ว +12

    हा विडिओ dislike करून tiktok ला like करणाऱ्याला सलाम...

  • @raviponkshe3149
    @raviponkshe3149 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम लिहिले आहे सादरीकरण सुंदरच आहे
    राजवट बदलली तरी वास्तव तेच आहे जे लिहिले आहे

  • @Nilesh828
    @Nilesh828 ปีที่แล้ว

    तुमच्या अप्रतिम प्रतिभेला सलाम...

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 3 ปีที่แล้ว +1

    Salaam mangesh padgaonkar great

  • @omkarshinde2465
    @omkarshinde2465 6 ปีที่แล้ว +2

    salaam Mangesh padgavkar sahebanaa

  • @manmohanroge
    @manmohanroge 3 ปีที่แล้ว

    कविता आणि सादरीकरण सारेच अप्रतिम.🙏

  • @archanabhalchandra3462
    @archanabhalchandra3462 8 ปีที่แล้ว +1

    kahi dShk juni aani ajun kahi shTkache aayush aSleli aPrteem kavita.. Padgaobkar saheb.. Salam.:-)
    ~ Arun.

  • @217akashmaske2
    @217akashmaske2 6 ปีที่แล้ว +4

    wow!amazing poem.

  • @sandeepdokhe3767
    @sandeepdokhe3767 6 ปีที่แล้ว +1

    Salaam salaam salaam mangesh sahebana salaam

  • @vikaskawade7646
    @vikaskawade7646 2 ปีที่แล้ว +1

    सलाम,सलाम

  • @vijaykumarthorat4450
    @vijaykumarthorat4450 9 ปีที่แล้ว +3

    Saheb, mi pan ek Garibada . Tumchya kavitela ani tumhala Hazarda karto Salam!Salam!!Salam!!!

  • @kailashdhule
    @kailashdhule 8 ปีที่แล้ว +1

    salaam....... kharach.... tumachya.... vyaktimatwala......ani....... vicharanna......salaam

  • @dattapanchal648
    @dattapanchal648 4 หลายเดือนก่อน

    Padgakarala Salam

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 ปีที่แล้ว

    माझ्या आवडत्या कवींना सलाम

  • @avisonawane8228
    @avisonawane8228 6 ปีที่แล้ว +2

    Heart touching poet...

  • @undeadredemption_
    @undeadredemption_ 3 ปีที่แล้ว +2

    Marathi socialist poets were so damn good back then

  • @sushmaankush1798
    @sushmaankush1798 2 ปีที่แล้ว

    पाडगावकरांना त्रिवार सलाम ,,,,,

  • @govindpatil7314
    @govindpatil7314 3 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👌 I salute the poem

  • @prakashpradhan7351
    @prakashpradhan7351 6 ปีที่แล้ว +1

    Padgaokar aaplya kavitela SALAM

  • @sayaligite2955
    @sayaligite2955 5 ปีที่แล้ว +1

    salam tumchya kavitela ani salam tumchya Kavi manala

  • @JoshiSubodh
    @JoshiSubodh 8 ปีที่แล้ว

    Apratim kavita. Very powerful.

  • @zerx_mc
    @zerx_mc 4 ปีที่แล้ว +1

    bhedak ani vastavvadi ani prastapitacha burkha fadnari kavita.

  • @rohinishrimant8869
    @rohinishrimant8869 6 ปีที่แล้ว +1

    Salam triwar Salam to my dearest poet MANGESH PADGOAKAR

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 3 ปีที่แล้ว +1

    No ek

  • @mr.banduwawale7844
    @mr.banduwawale7844 2 ปีที่แล้ว +1

    Heart touching poet 👌👌

  • @girishpatil7930
    @girishpatil7930 3 ปีที่แล้ว

    Salaam to you mr mangesh for the realist

  • @reshmashendkar5519
    @reshmashendkar5519 5 ปีที่แล้ว +2

    सत्य परिस्थिती .. 😐

  • @Veganesh
    @Veganesh 2 ปีที่แล้ว +1

    Amazing.. 🌷🌹

  • @silaskshetre
    @silaskshetre 3 ปีที่แล้ว +1

    Heart touching ❤️

  • @rameshmohite2311
    @rameshmohite2311 6 ปีที่แล้ว +1

    खूपच मार्मिक कविता

  • @shukladhansultane3677
    @shukladhansultane3677 6 ปีที่แล้ว +1

    kharokar salam 👍👈

  • @laxmangaikwad3474
    @laxmangaikwad3474 4 ปีที่แล้ว +1

    Hands up sir

  • @somnathdhumal4462
    @somnathdhumal4462 7 ปีที่แล้ว +2

    very very good nice .....I like

  • @swapnilkhaparkar8556
    @swapnilkhaparkar8556 5 ปีที่แล้ว +1

    सलाम साहेब

  • @bhushanvidalkar8130
    @bhushanvidalkar8130 2 ปีที่แล้ว

    5.20 is best in all time

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 2 ปีที่แล้ว

    कविता वाचन म्हणजे मंगेश पाडगावकर ,अफलातून उर्जा असायची. तुम्हाला सलाम नाही प्रणाम.

  • @savitatibrewala4227
    @savitatibrewala4227 2 ปีที่แล้ว

    Wah 🙏🏽❤️

  • @djvijaypatil7480
    @djvijaypatil7480 8 ปีที่แล้ว +2

    Salam...

  • @shubhamranaware9203
    @shubhamranaware9203 3 ปีที่แล้ว

    Shendur lavalelya dagadala salam, 👍👍

  • @priyankavast2052
    @priyankavast2052 7 ปีที่แล้ว

    khupch inspiring poem

  • @vishalgtejale
    @vishalgtejale 8 ปีที่แล้ว +1

    Bhavpurna natmastak Salam Salam Salam Salam

  • @kishorpatil2011
    @kishorpatil2011 2 ปีที่แล้ว

    Samor diggaj nete baslele astana ashi kavita mhanayachi himmat phakt adhiche kavi karu shakat hote. Aajkal chya kavini ani patrakaar ni swatala vikun takle ahe sattepudhe

  • @shrutijagtap3944
    @shrutijagtap3944 2 ปีที่แล้ว

    🙏🙏wow the truth of the world

  • @hemant862
    @hemant862 ปีที่แล้ว

    Zakkas

  • @mihirjadhav8197
    @mihirjadhav8197 6 ปีที่แล้ว +1

    Awesome

  • @onkarkulkarni1425
    @onkarkulkarni1425 3 ปีที่แล้ว

    Salaam...

  • @sanapsandip9852
    @sanapsandip9852 7 ปีที่แล้ว +1

    salam...

  • @ajaytoony
    @ajaytoony 8 ปีที่แล้ว

    salam sir, tumhala salam

  • @abhijeet7putesatpute243
    @abhijeet7putesatpute243 8 ปีที่แล้ว

    Salam Salam....Salam...aani phakat ....Salam.....

  • @karanmore7832
    @karanmore7832 5 ปีที่แล้ว +1

    salaam

  • @hsk1977
    @hsk1977 3 ปีที่แล้ว

    Samanya mansachya jivanchi short story.