मिशन जरेवाडी ता. पाटोदा मार्गदर्शन (भाग२) करताना डायट प्राचार्य डॉक्टर दयानंद जटनुरे साहेब

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • मिशन जरेवाडी ता. पाटोदा मार्गदर्शन (भाग१) करताना डायट प्राचार्य डॉक्टर दयानंद जटनुरे साहेब #जरेवाडी #बोधकथा #ksagar #school #bodhkatha #ranpakhara #इयत्ता #रानपाखरा #education #manat #moral
    #जरेवाडी​ #बोधकथा​ #ksagar​ #जरेवाडी​ #school​ #ranpakhara​ #bodhkatha​ #रानपाखरा​ #इयत्ता​ #education​ #manat​ मिशन जरेवाडी ता. पाटोदा मार्गदर्शन (भाग१) करताना डायट प्राचार्य डॉक्टर दयानंद जटनुरे साहेब #जरेवाडी​
    बीड जिल्हा परिषदेचा 'मिशन जरेवाडी' हा गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम.... त्यासाठी माननीय आमदार सुरेश धस साहेब यांनी पुढाकार घेतलेला…17 जानेवारी रोजी “मिशन जरेवाडी” प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी धाराशिव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य माननीय दयानंद जटनुरे साहेब यांनी मार्गदर्शन केले...
    माननीय आमदार सुरेश धस साहेब ही एकाग्रचित्ताने माननीय प्राचार्यांचे विचार ऐकत होते......
    बीड जिल्हा परिषदेतील सीईओ,, सर्व विस्तार अधिकारी ,,केंद्रप्रमुख तसेच तीन तालुक्यातील शिक्षक व पालक उपस्थित होते.. सर्वांनी दिलखुलासपणे टाळ्या वाजवून प्राचार्यांच्या विचारांना दाद दिली... माननीय प्राचार्य बोलत होते... आणि माननीय आमदार सुरेश धस साहेब ही मन लावून ऐकत होते आणि आणखी बोलत रहा अशा प्रकारे दादही देत होते... अखेरच्या टप्प्यात संयोजकाकडून एक चिठ्ठी प्राचार्यांकडे जात होती... तेव्हा माननीय आमदार सुरेश धस साहेबांनी हाताने इशारा करून मागेच थांबवून बोलू द्या ...बोलत राहू द्या ...असे संयोजकांना सांगितले....
    कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हा परिषद बीड मधील अधिकारी माननीय प्राचार्य साहेबांचा फोन नंबर घेत होते.. काही शिक्षकांनी ''शैक्षणिक वारीच्या पंढरीचे दर्शन झाले'' अशा शब्दात प्राचार्यांच्या विचारांना दाद दिली...
    कार्यक्रम संपल्यानंतर आमदार माननीय सुरेश धस साहेबांनी प्राचार्यांना स्वतःच्या जवळ बसवून जेवण केले....
    त्याचे व्हिडिओ चित्रीकरण एकूण तीन भागात आहे...हे शैक्षणिक विचार आपण जरूर ऐकावेत ही विनंती
    भाग 01
    • मिशन जरेवाडी ता. पाटोद... ​
    भाग ०२
    • मिशन जरेवाडी ता. पाटोद... ​
    भाग ०३
    • मिशन जरेवाडी ता. पाटोद... ​
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड.... अतिशय दुर्गम भागात डोंगराच्या पायथ्याशी वसलेले तीनशे लोकसंख्या असलेले गाव.. परंतु शाळेची पटसंख्या 800 पेक्षा जास्त.. जवळपासच्या 38 गावांमधून शाळेमध्ये विद्यार्थी येतात... शाळेला मैदान अतिशय कमी.. परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीतूनही आपला विकास करता येतो हे या शाळेचे उत्तम उदाहरण..... शाळेच्या प्रवेशद्वारातच जुन्या दोन वर्ग खोल्या . त्याच्या पाठीमागील बाजूस किचनसेड .किचन शेड मधील सर्व साहित्य व्यवस्थित लावलेले ..किचन शेडमध्ये भाजीपाला ठेवण्यासाठी फ्रिजची सोय .. किचनसेड च्या समोर गांडूळ खत प्रकल्प ...शाळेचा पट वाढत जाईल.. विकास होत जाईल त्याप्रमाणे वर्ग खोल्याचे बांधकाम वर डोंगर पोखरून वाढवत नेलेले... एक ते आठवीपर्यंत वर्ग असणारी प्रत्येक वर्गाच्या दोन तुकडे असणारी 16 शिक्षक असणारी ही शाळा ... शाळेमध्ये असावेत अशा सर्व गोष्टी या शाळेमध्ये आहेत, परसबाग,, रोबोटिक क्लब,, विज्ञान प्रयोगशाळा, अवकाशातील वस्तू 200 पट दाखवणारी दुर्बीण.. विद्यार्थ्यांची गुणवत्ता अतिशय चांगली,सुंदर हस्ताक्षर प्रकल्प,, कला क्रीडा, स्पर्धा परीक्षा अशा सर्व बाबतीत शाळेमध्ये केलेले नियोजन आणि काम अचंबित करणारे ....
    शाळेचा व्हीडीओ
    • प्रा. शाळा जरेवाडी ता.... ​
    श्री क्षीरसागर आर. एम.
    प्रा. शाळा काटगाव ता. तुळजापूर
    मो. 9767560434

ความคิดเห็น •