रंगपंढरी Face-to-Face: Mohit Takalkar - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • तालमीत 'मज्जा येणं' हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. नटांना त्रास झाला पाहिजे. त्यांना प्रश्न पडले पाहिजेत. ते जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत आपण खोलात जाऊन काही शोधतोय असं होऊ शकत नाही.'
    - मोहित टाकळकर
    मराठी रंगभूमीवर वर्षानुवर्षं रुळलेल्या संहितांचा परीघ रुंदावणारा, नाटकाच्या सादरीकरणाचे ठोकताळे बदलणारा आणि प्रेक्षकांवरील परिणामांच्या निरनिराळ्या शक्यता चोखाळणारा प्रतिभावान आणि प्रयोगशील दिग्दर्शक म्हणजे मोहित टाकळकर.
    परंपरेला सन्मानपूर्वक नाकारत, अत्यंत कष्टपूर्वक स्वतःची नवी, स्वतंत्र रंगभाषा निर्माण करण्याबाबत मोहित आग्रही आहे.
    'मात्र रात्र' मधल्या आंबट-गोड रात्री असोत, की 'तू' मधल्या रुमीच्या मखमली कविता; 'मै हूं युसूफ' मधले शापित विस्थापित असोत, वा 'गजब कहाणी' मधला शेकडो मैलांची पदयात्रा करणारा हत्ती; 'बंदिश' मध्ये स्टेजवर केले जाणारे ताजे डोसे असोत, की 'तिची सतरा प्रकरणे' मधली रेस कार, मोहितच्या प्रत्येक नाटकात प्रेक्षकांना एक रसरशीत, नवा रंगानुभव मिळतो. पूर्वी कधीही न जाणवलेले शरीरातले काही निद्रिस्त कण उजळतात. नाटकाचा नवा अर्थ मनात उमटतो.
    अशी ३५ हून अधिक वैविध्यपूर्ण नाटकं मोहित गेली २० वर्षं मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर सादर करत आलेला आहे.
    दिग्दर्शक असला तरी सर्व माहीत आहे असा गैरसमज न बाळगता सर्व नट आणि तंत्रज्ञांबरोबर संहितेतील आशयाचा आणि नाटकाच्या रुपाचा शोध घेत मोहित प्रयोग कसा साकार करतो हे ऐकूया आजच्या भागात.

ความคิดเห็น • 39

  • @ranjitlatasunil1917
    @ranjitlatasunil1917 2 ปีที่แล้ว

    स्वतःशी प्रचंड प्रामाणिक असणारा दिग्दर्शक👌👌👌👌👌

  • @anukatyare
    @anukatyare ปีที่แล้ว

    फारच वेगळी मुलाखत आणि माहिती!
    हे असे लोकं फक्त प्रायोगिक रंगभूमीसाठी काम करत असताना इतर काहीच काम करत नाहीत का? आर्थिक गणितं कशी जुळवून आणतात?

    • @marathiManus10
      @marathiManus10 ปีที่แล้ว +1

      Mohit runs his restaurant "Barometer" in Pune.

    • @marathiManus10
      @marathiManus10 ปีที่แล้ว +1

      "प्रायोगिक" हा शब्द खरंच खूप बोलका आहे. It's not at all a daily dinner dish.
      स्थूलमानाने - नाही शक्य होत ह्या पद्धतीची नाटकं करून "रोजमर्राकी जिंदगी" ढकलणं. ह्या नाटकांना frequent प्रेक्षक मिळणार नाही (बहुदा नाटककर्त्यांना ते अपेक्षितच नाही) कारण बहुतांशी ही नाटकं सखारामी विषय हाताळतात.
      या नाटकांमधले ९०% कलाकार स्वतःच लावलेल्या मास्क पायी उजळ माथ्याने "तद्दन" व्यायसायिक नाटक नाही करू शकत. अद्वैत दादरकर प्रभृती वेळेत झी मराठी = EMI हे समीकरण ओळखतात (शुद्ध हेतूने आणि अद्वैतदादा ह्या चॅनल वर आला होता म्हणून दिलेलं उदाहरण - no offence at all). काही जण webseries/TH-cam आदी माध्यमं करू पाहतात आणि तिथली धंद्याची गणितं गोष्टी "अजूनच थोड्या सोप्या करून" सांगायची असते ते मान्य करून मान तुकवतात.

    • @marathiManus10
      @marathiManus10 ปีที่แล้ว

      महविद्यालयीन रंगभूमीने दुर्दैवाने "प्रायोगिक" चा "वैचित्र्य" हा अर्थ लावलाय. प्रायोगिक करण्यासाठी आधी ढोबळ नाटक तरी आलं पाहिजे - direct सचिन तेंडुलकर नाही होता येणार हे सगळे विसरतात. कलोपासक, INT आदी संस्थांनी प्रायोगिकचं बक्षीस ठेवणं "बंद" केलं तर भविष्यात खूप चांगली प्रायोगिक नाटकं बघायला मिळतील😅.

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว +1

      Thanks for your elaborate, interesting and articulate feedback.

    • @marathiManus10
      @marathiManus10 ปีที่แล้ว

      @@RangPandhari Thanks, this is my favourite channel!
      Lots of love to Madhurani tai and team, please keep it up. Hopeful to see my list of people appearing sooner or later:
      * Sayaji Shinde
      * Nipun Dharmadhikari
      * Nandu Madhav
      * Suhaas Joshi (परत एकदा😊)
      * Pradeep Mulye
      * Prashant Damale
      * Dharmkeerti Sumant
      * Manaswini
      And so on.

  • @jyotisalbarde7520
    @jyotisalbarde7520 2 ปีที่แล้ว

    छान 👍

  • @yogeshwarbendre8348
    @yogeshwarbendre8348 2 ปีที่แล้ว

    This interview should be declared as a Heritage Interview.

  • @rajeevmadhavjoshi7750
    @rajeevmadhavjoshi7750 3 ปีที่แล้ว

    Director as a Facilitator...good

  • @vishalgaikwad07
    @vishalgaikwad07 3 ปีที่แล้ว +2

    This may be one of the best interviews I experienced ,he is really great to say something about him is .....only he is really great. ...the questions asked are really good .,... really thankful to you for this interview 🙏🙏🙏

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Thanks for your feedback and watching.

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 3 ปีที่แล้ว +5

    "Open असले की शक्यता वाढतात "
    बापरे!
    नाटक, नाटककार, दिग्दर्शन, अभिनय आणि प्रेक्षक सर्वांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे नाही पण एकमेकांकडे दुसर्‍या दृष्टिकोनातून बघण्याची शक्यता नक्की पडताळून बघता येईल.
    टाकळकर एका निराळ्या, निर्जन वाटेने प्रवास करत आहेत. भविष्यात त्याचा धोपटमार्ग होईलही. पण पल्ला फार मोठा आहे......... तरी या एकुलता एक योद्धयाला आपण सलाम नक्कीच ठोकू शकतो. शक्य झाल्यास 'हे ही' नाटक अनुभवून बघू. कदाचित् एखादा नवीन ठेवा मिळून जाईल. तडवळकरसाहेब आणि "रंगपंढरी" परिवार, तुम्ही तुमचा हातभार निश्चित लावला आहे.
    टाकळकर साहेब, तुम्ही जोपासत असलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष होवो, ही सदिच्छा 🙏

  • @cadiwan
    @cadiwan 3 ปีที่แล้ว +2

    मधुराणी आणि योगेश ज्या पध्दतीने तुम्ही प्रत्येक कलाकाराकडून बरोबर पाहिजे ती उत्तरे अलगद काढून घेता ते कमाल आहे !
    खरंच दस्तैवजीकरण हा हेतू प्रचंड यशस्वी होतोय👏

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 ปีที่แล้ว

    Really inspirational and thought provoking interview

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 3 ปีที่แล้ว +2

    Brainstorming interview.
    नाटक, संहिता, वाचन, तालीम, दिग्दर्शन या सगळ्या बाबत
    पारंपारिक धाटणी बाजूला ठेवून
    मोहितजी स्वतःचे वेगळे, हटके ,स्वतंत्र विचार घेऊन काम करत आहेत
    त्यांचे विचार संपूर्ण समजून घेणे आणि अमलात आणणे ही प्रोसेस अवघड आहे पण सुंदर असेल
    दुसऱ्या भागात मोहितजी जास्त मोकळेपणाने आणि स्पष्टीकरण देत बोलले त्यामुळे त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करता आला
    मुलाखत खूप छान झाली पुन्हा पुन्हा पहावी अशी
    सुंदर

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 3 ปีที่แล้ว +2

    ग्रेस ची कविता जशी पटकन् समजत नाही पण हे काही तरी वेगळं, खूप छान आहे असं वाटतं, तसं मोहित ची मुलाखत, त्याचा विचार, त्यानं काही तरी स्वतः ची वाट निवडली आहे, आणि त्यात पॅशन दिसते. मला खूप काही समजलं नाही पण ते वेगळं आहे असं जाणवलं.. मधुरा तुम्ही छान घेता मुलाखत,

  • @bansidharhadkar6883
    @bansidharhadkar6883 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @ashokambavade8331
    @ashokambavade8331 3 ปีที่แล้ว +1

    Can anyone tell me about "Chaheta" I want to see .

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Chaheta isn't available digitally yet. But you can watch many other आसक्त plays on their TH-cam channel:
      th-cam.com/users/AasaktaKalamanch

  • @komaljoshi5619
    @komaljoshi5619 3 ปีที่แล้ว

    Interesting and informative..

  • @shubhamkatewad
    @shubhamkatewad 3 ปีที่แล้ว

    Ek no🙏👍

  • @tejabandal3880
    @tejabandal3880 3 ปีที่แล้ว

    Sunnnndar vichar ....

  • @kvisualtree
    @kvisualtree 3 ปีที่แล้ว

    Fantastic !

  • @beenadhakras1989
    @beenadhakras1989 3 ปีที่แล้ว

    Excellent interview! Hats off for thinking out of the box!👍

  • @bharatikarandikar8028
    @bharatikarandikar8028 3 ปีที่แล้ว

    Great work

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 3 ปีที่แล้ว

    छान

  • @ruchamg
    @ruchamg 3 ปีที่แล้ว +4

    मधुराणीचा नक्कीच कस लागला बोलतं करताना आणि, त्यातल्या त्यात लोकांना कळेल् अशा भाषेत काढून घेताना..प्रश्न आवडले
    पण उत्तरं फारशी पटली नाहीत
    सामान्य तालीम अशी असते असं म्हणताना आपण किती वेगळे आहोत हे अधोरेखित करायचं होतं असं वाटलं

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว +1

      Thanks for your honest feedback.

  • @MCC2023
    @MCC2023 3 ปีที่แล้ว

    Experimental man ❣️🙌🎭

  • @cadiwan
    @cadiwan 3 ปีที่แล้ว

    सुंदर उत्तरे !

  • @vasuraj
    @vasuraj 3 ปีที่แล้ว +2

    सगळे प्रयत्न करुनही नटाला नाही जमत.. असं समजल्यावर काय करता...? हे विचारून घ्याल का?

  • @radhikajoshi684
    @radhikajoshi684 3 ปีที่แล้ว

    Vegale pragat ani navin vichar.

  • @nitaukidwe6090
    @nitaukidwe6090 3 ปีที่แล้ว

    👏👏👏👏👏

  • @shriharikilledar3548
    @shriharikilledar3548 3 ปีที่แล้ว

    आज मधुराणी mam खुप विचारकरुन प्रश्न विचारत होत्या बहुदा ..अस मला वाटले...may be i am wrong, but the choice of question are very good ...all questions are some how same which we know by all these episodes but this time she asked in a twested yet easy to understand way...and हा खुपच प्रगल्भ,खुप विचार करणारा,काहीतरी वेगळे करु बघणारा दिग्दर्शक वाटला....his Honesty towards his art is comandeble, it will take time to understand thse people....God bless him and whole Rang Pandhri Team...
    One request: please try to bring Nana Patekar Sir ....would love to hear him ..I know it's a impossible task but atlest TRY🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatikarandikar8028
    @bharatikarandikar8028 3 ปีที่แล้ว

    It would be my dream to work with Mohit

  • @DrSachinNandedkar
    @DrSachinNandedkar 3 ปีที่แล้ว +1

    Formless..

  • @bansidharhadkar6883
    @bansidharhadkar6883 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम