✅Sunday Special Panipuri रगडा,गोड पाणी, तिखट पाणी रेसिपी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
  • रगडा - यासाठी आपण घेतले आहे १/२ वाटण तो रात्री भिजत घालून सकाळी कुकर मध्ये वाटाणा आणि बटाटा शिजवून घ्या. कढईमध्ये तेल घालून जिरीची फोडणी करा त्यावरती एक छोटा कांदा आणि एक छोटा टोमॅटो कापून परतून घ्या व वरून हे शिजलेलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ओतून घ्या त्यावर एक चमचा हळद एक चमचा धनापूर एक चमचा जिरेपूड चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट असं सर्व मसाले घाला व वरून कोथिंबीर घालून छान उकळी येऊ द्या आपला रगडा तयार आहे.
    गोड पाणी - गोड पाण्यासाठी आपण घेतली आहे पाव किलो खजूर पाव किलो चिंच दीड पाव गूळ १०० ग्रॅम मनुके
    चिंच खजूर आणि गुळ हे एक शिट्टी देऊन शिजवून घ्या त्यानंतर खजूर वेगळे करून त्याचे बी काढून खजूर आणि मनुक्याचे वाटण करा व चिंच आणि गुळ व्यवस्थित गाळणीने गाळून घ्या त्यानंतर हे दोन्ही मिश्रण गाळून एकत्र करून घ्या व त्यामध्ये एक चमचा बडीसोप अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा मीठ हे सर्व घालून हलवून घ्या आपली गोड पाणीपुरी तयार आहे.
    तिखट पाणी - तीख ट पाण्यासाठी आपण घेतला आहे एक जुडी कोथिंमबीर अर्धी जुडी पुदिना नऊ दहा हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा एक लिंबू पुदिना आणि कोथिंमबीर धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये हिरवी मिरची आल्याचा तुकडा आणि लिंबाचा रस घाला एक चमचा काळे मीठ घाला जिरं धना पावडर घालून चांगले बारीक करून गाळणीने गाळून घ्या व रेडिमेड पाणीपुरी मसाला घाला किंवा तो नसेल तर जिरा पावडर आणि काळे मीठ थोडसं काळीमिरी पावडर हे सर्व घालून छान मिक्स करून घ्या आपले तिखट पाणी तयार आहे.
    शेव, दही, पुरी, बुंदी हे सगळे घेऊन या आणि एन्जॉय करा शेवपुरी ,दहीपुरी, पाणीपुरी.♥️
    व्हिडिओ आवडल्यास करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद!
    Manisha Recipes Annpurna 🙏🏻

ความคิดเห็น • 2