बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा | बीड जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ส.ค. 2023
  • बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा बीड जिल्हायातील प्रत्येक शाळेत दर सोमवारी घेतली जाते.
    बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा
    आम्ही बीडकर अशी प्रतिज्ञा करतो की,
    मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत व मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत
    आम्ही बाल विवाह करणार नाही
    बाल विवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही,
    तसेच बाल विवाहास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणार नाही.
    बाल विवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, व शारिरीक आयुष्यावर दुष्परिणाम
    होतात याची आम्हाला जाणीव आहे.
    बाल विवाह हा कायदेशीर गुन्हा असुन त्यासाठी
    तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतुद आहे.
    बाल विवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ [1098]
    या क्रमांकावर संपर्क साधु.
    या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नांव व पत्याची आवश्यकता नसुन
    माहीती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची मला माहीती आहे. व या सामाजिक
    कामासाठी प्रशासनास संपुर्ण सहकार्य करु
    आम्ही आमच्या गावात,आजुबाजुला, शहरात बाल विवाह होणार नाही याची याची
    दक्षता घेऊ.
    सर्वांचा एकच नारा, बाल विवाह मुक्त करु बीड जिल्हयास
    जय हिंद जय महाराष्ट्र

ความคิดเห็น •