America-America,chapter 11 “Lageenghaie”
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025
- ११ ) लगीनघाई
११ ) लग्न ठरवून अमित,म्हणजे आपला बॉबी,बाब्या हो ! अमेरिकेत परत आला. वर्षाने लग्न होणार होतं. पण आत्तापासूनच तयारी करायला नको का ? लग्न म्हणजे काही “हे “ नाहीय !!! शिवाय डॉक्टर बायकोला MS करायचे आहे ! त्याची चौकशी करायला हवी ! बघा अमितची काय काय तयारी सुरु झाली ते
जड मनाने सगळ्यांचा निरोप घेतला
आणि अमित परतला अमेरिकेला
मित्रांना साखरपुड्याचा वृत्तांत कळवला
लगेच MS च्या चौकशीचा श्रीगणेशा केला
इंजिनिअरिंगच्या TOEFL GRE ठाऊक होत्या
पण डॉक्टर लोकांच्या परीक्षा माहित नव्हत्या
अमृताला जर MS करायचेच आहे
तर घोडे दामटायलाच हवे चौकशीचे !
डॉक्टरांचं MS म्हणे सोपं नसतं काही !
द्याव्या लागतात परीक्षा USMLE
अजून पण असतात परीक्षा काहीबाही
त्याशिवाय तर अर्जच करता येत नाही
लेखी झाल्यावर मग, तोंडी परीक्षा असते
त्यानंतरच म्हणे अर्ज करायची स्टेप असते
मगच मार्ग मोकळा होतो admission चा
पुढे अडथळा आहेच ! H1 visa चा
कुठे मिळेल admission नेम नाही
मिळेल तिथे, जायची तयारी हवी
खर्चाची काय बरे तरतूद करावी ?
विचार करून थकली अमितची स्वारी
मित्रमंडळींचा घेतला मग विचार
लांब असले तरी जिवलग होते फार
बॉबी तू उगीचंच घाबरतोस फार !!
आगे बढो ! आम्ही लावू ना हातभार !
आश्वासनाने अमित एकदम भारावला
आत्ता कुठे त्याने मोकळा श्वास घेतला
भारतात,घरी आणि अमृताला, फोन केला
लग्नाच्या तयारीला लागा म्हणाला
अरे !! त्याला आहे ना वर्षाचा कालावधी ?
इतकी कसली आलीय लगीनघाई !
हो ! पण लागतील USMLE ला दोन वर्षे तरी !
लग्नानंतर सगळं कसं कायदेशीर होईल
आणि अमृताला MS करता इकडे येता येईल
आता ? एकदमच उडाली गडबड
माय-बापाला कुठलंच काम सुचेना धड
दोघांची आपापसात सुरु झाली कडकड
आजी-आजोबांची नुसतीच आपली बडबड
लगीनघाईला सुरुवात झाली दणकून
सगळे कामाला लागले कंबर कसून
पत्रिका झाल्या एकदाच्या छापून
त्या वाटण्याचे काम घेतले मग विभागून
परगावच्या पत्रिका टाकल्या courier करून
हॉल काय, catering काय, सगळे आले जुळून
मोजक्याच लोकांना आमंत्रण होते
त्यामुळे सगळेच enjoy करीत होते
लग्न जरी सहा महिने अलीकडे आले होते
तरीसुद्धा कुठेच काही कमी पडले नव्हते
लग्न लागले,सूप वाजले
पाहुणे सगळे जिकडचे तिकडे गेले
सर्व कसे दृष्ट लागण्यासारखे झाले
आणि अमित-अमृता अमेरिकेला गेले
लग्न करून अमित-अमृता अमेरिकेला गेले
अमित-अमृता अमेरिकेला गेले