महिला दिनानिमित्त व्यंकटेश फाउंडेशन ने होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • ती आली, तिनं पाहिलं, ती खेळली, ती हसली आणि ती जिंकली....
    रोजचे काम, टेन्शन, स्वयंपाक, मुलं, सर्व जबाबदाऱ्या यांना जरा वेळ विसरून मनमुराद आनंद लुटण्यासाठी आज च्या व्यंकटेश फाउंडेशन आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमामधील स्पर्धेत डान्स, नाटक, रॅम्प वॉक मध्ये सर्व महिला वर्ग सहभागी झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा इतका होता की काहींच्या डोळ्यात आपोआप आनंद अश्रू आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन भारावून गेले. ती नेहमी लढते आणि जिंकते आज पण ती खेळली आणि जिंकली.
    आजच्या महिला दिनानिमित्त व्यंकटेश फाउंडेशन ने होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त महिलांनी उस्फुर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व माता भगिनींचे व्यंकटेशच्या वतीने मन:पूर्वक धन्यवाद..🙏

ความคิดเห็น •