आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून सेंद्रिय गूळ उत्पादन, अनिकेत ऍग्रोटेक, बारुळ, नांदेड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2023
  • भारतीय जेवण हे सध्या जगभरात कौतुकाचा विषय आहे. भारतीय जेवणातील घटक आरोग्यासाठी पूर्णपणे पोषक असतात. पारंपारिक भारतीय जेवणात नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीपाल्यासाहित आंबट गोड तिखट कडू सपक अश्या सगळ्या चवींनी युक्त असलेले घटक असतात. सध्या होत असलेल्या आधुनिकीकरणासोबत लोकांच्या जीवनशैलीतही अनेक बदल झाले असून गोड पदार्थांचे सेवन हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक सणासुदीला गोडाचे जेवण असेल तर सणाचा आनंद द्विगुणीत होतो. आपल्या भारतीय संकृती मध्ये पारंपारिक गोडाचे पदार्थ बनवताना वापरण्यात येणारा नैसर्गिक रित्या तयार केल्या जाणारा घटक म्हणजे गुळ आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात गोडाचे पदार्थ बनवायचे असतील तर आपल्याला साखर सहज उपलब्ध असते. तरीपण सध्या प्रत्येक भारतीय आरोग्याविषयी खूप जागरूक झालेला आहे आणि पारंपारिक भारतीय पाकशास्त्राकडे सगळ्यांचा कल वाढलेला आहे.
    सेंद्रिय गुळ तयार करण्याची पारंपारिक पद्धत आहे. त्या पद्धतीची सांगड आधुनिक तंत्रज्ञानाशी घालून अनिकेत अग्रोटेक बारूळ येथे आधुनिक पद्धतीने पारंपारिक गुळ बनवला जातो. क्रशर मधून ऊस क्रश करून त्याचा रस स्टेनलेस स्टील च्या टाकी मध्ये एकत्रित केला जातो. तिथून तो मोटार पंप च्या सहाय्याने कढई मध्ये पोचवला जातो. स्टेनलेस स्टील च्या कढई मध्ये रस पोचल्या नंतर कढई खाली भट्टी मध्ये जाळ पेटवला जातो. तो जाळ पेटवण्यासाठी कमीत कमी प्रदूषण निर्माण करणारे जैविक इंधन जे कि रस काढल्यानंतर उरलेला उसाचा चोथा असतो; त्याचा वापर इंधन म्हणून केल्या जातो. रसाचे शुद्धीकरण करण्यासाठी रसातील मळी काढून टाकणे आवश्यक असते. मळी काढून टाकण्याचे काम भेंडी पावडर वापरून केल्या जाते. गुळामध्ये कॅल्शियम चे प्रमाण खाण्याचा चुना टाकून वाढवले जाते. खाण्याच्या चुन्यामुळे रसाला मजबुती येते. शेवटी पातळ रसाचे घट्ट सार बनवण्यासाठी एरंडा पावडर चा वापर केला जातो. भेंडी पावडर, खाण्याचा चुना, आणि एरंडा पावडर हे असे नैसर्गिक रित्या लागणारे घटक वापरून सेंद्रिय गुळ तयार केला जातो. भट्टी पेटल्यानंतर सुमारे १ ते १.३० तासात त्या रसाचे गुळामध्ये रुपांतर होते. उत्तम प्रतीचा सेंद्रिय गुळ तयार करण्यासाठी रसाला योग्य प्रमाणात गरम करून योग्य वेळी योग्य ते आवश्यक घटक टाकणे खूप आवश्यक असते. अनिकेत अग्रोटेक बारूळ येथे स्टेनलेस स्टील च्या कढई मध्ये गुळ बनत असल्यामुळे तो गुळ एकदम उत्तम दर्जाचा बनतो.
    अनिकेत अग्रोटेक बारूळ येथे स्वच्छतेला अतिशय गंभीररित्या महत्व दिले गेले आहे. कामगारांचा कमीत कमी संबंध गुळ बनवण्याच्या प्रक्रियेशी यावा म्हणून ती प्रक्रिया जवळपास ८०% स्वयंचलित केलेली आहे. आरोग्याचा स्वच्छतेशी खूप जवळचा संबंध असल्या कारणाने सेंद्रिय गुळ बनवताना स्वच्छतेला अग्रक्रमाने प्राधान्य दिलेले आहे. कोरोनाच्या महामारी नंतर प्रत्येक भारतीय आरोग्यासंबंधी खूप जागरूक झालेला आहे. एक जिम्मेदार भारतीय म्हणून आमच्या अनिकेत अग्रोटेक येथे उत्तम प्रतीचा सेंद्रिय गुळ बनवण्यासाठी आम्ही प्रतीज्ञाबद्ध आहोत. सेंद्रिय गुळ : आरोग्याची गरज झालेली आहे.
    For more details : 9421759142
    Gajanan Galshetwar,
    Village - Barul,
    Talika - Kandhar
    Dist. - Nanded.

ความคิดเห็น • 1

  • @bhagwannaik7876
    @bhagwannaik7876 7 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र जेवण पद्धतीत गूळ सध्या हद्दपार झाला आहे, अनिकेत ऍग्रोटेक च्या सेंद्रिय गूळ उत्पादनामुळे आहारात साखरे ऐवजी सेंद्रिय गुळाचे प्रमाण नक्कीच वाढेल, तुमच्या कार्याला शुभेच्छा💐💐