श्री गोंदवलेकर महाराज प्रवचने, ३० मार्च |Gondavalekar Maharaj Prawachan - 30 March

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • ३० मार्च : ज्या घरात शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥
    गृहस्थाश्रमासारखा आश्रम । दुसरा नाही खास ॥
    नीतिधर्माचे रक्षण । यासाठीच विवाहाचे कारण ॥
    ज्या घरात राहते शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥
    कृतीवर मनुष्याची परीक्षा । जैसी वासावर पदार्थाची परीक्षा ॥ कोणाचा न करावा घात । ऐसे वागावे जगात । आपले आपण करून घ्यावे हित । त्यालाच म्हणतात संभावित ॥
    न कधी व्हावे आपण निराश । व्यवहार हात देईल खास ॥ व्यवहारातील करावा प्रयत्न । प्रपंचात न पडू द्यावे न्यून । रोगाची भीति । न ठेवावी चित्ती ॥ रोगाला उपचार करावे जरी बहुत । तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त ॥
    आप्त इष्ट सखे सज्जन । यांचे राखावे समाधान । परि न व्हावे त्यांचे अधीन ॥
    सर्वांशी राहावे प्रेमाने । चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने ॥
    आपलेपणा ठेवला जेथे । प्रेम लागत असे तेथे॥
    ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले । तेथे समाधानाचे मान कमी झाले ॥
    मन राखता आले । तरच प्रत्येकाला सुख लागले ॥
    सुखाने नांदावे नवरा-बायकोंनी । राम आणावा ध्यानी ॥
    दोघांनी रहावे प्रेमाने । सदा वागावे आनंदाने ॥
    एकमेकांनी दुसऱ्यास दु:ख होईल असे न करावे ।
    काळजी वाटेल असे न वागावे ॥
    घरातील माणूस मार्गाने चुकले । त्यास प्रायश्चित्त हवे खरे ।
    पण ते नसावे जन्माचे । तेवढ्यापुरते असावे साचे ॥
    एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले ।
    तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे ॥
    आचरण शुद्ध असावे । एकपत्नीव्रत सांभाळावे । प्राण गेला तरी परद्वार करू नये ॥
    कोणतेही व्यसन करू नये । नीच संगत धरू नये ॥
    भलते काम करू नये ॥
    गृहछिद्र कोणा सांगू नये । आपला बोज आपण घालवू नये । विश्वासघात कोणाचा करू नये ॥
    परदु:खे हसू नये । देहदु:खे त्रासू नये । केला उपकार बोलूं नये ॥ मुलाबाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात कधी उदास न व्हावे । प्रेमाने वागावे सर्वांशी । सुख राहे नि:स्वार्थापाशी ॥
    आईवडिलांची आज्ञा पाळावी । चांगल्याची संगत धरावी । अभ्यासांत लक्ष ठेवून राहावे । भगवंताचे नामस्मरण करावे ॥ नामापरते न माना दुजे साधन । जैसे पतिव्रतेस पति प्रमाण ॥ नामापरते न मानावे सत्य । ज्याने राम होईल अंकित ॥ हेच साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल॥
    ९०. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांति ॥

ความคิดเห็น •