कडव्या वालाची सुकी भाजी 😍 | पऱ्यावर गेलो कपडे धुवायला - Ambavali, Mandangad (Konkan)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- कडव्या वालाची सुकी भाजी 😍 | पऱ्यावर गेलो कपडे धुवायला - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही आज घरी कडव्या वालाची भाजी बनवली होती. कडवे वाल पाण्यात भिजत घालून त्याची साल काढली जाते. वालाचे बिरडे म्हणून ही भाजी लोकप्रिय आहे. या व्हिडीओमध्ये आम्ही आज दिवसभरात जे जे काही घडलं ते दाखवले आहे. वर्षाने सकाळी जेवण बनवले त्याच्यात वालाची भाजी होती. साधं जिरे आणि लसणाच्या फोडणीचे वरण होते. पापड, लोणचं आणि भात असे पदार्थ दुपारच्या जेवणात होते. आम्ही दुपारी जेवण करून कपडे धुवायला आमच्या घराच्या मागे असणाऱ्या पऱ्यावर गेलो. आमच्या गावी वागळ्याची धोंड आहे जिथे आम्ही कपडे धुवायला जातो. कपडे धुवायला गेलो तेव्हा पाऊस जोरात आला. आमच्यासोबत प्रांजु सुद्धा आली होती. प्रदनु सध्या गावी खूप धमाल करतो. पावसात भिजायला प्रदनुला खूप आवडते. पऱ्यावर कपडे धुवायला गेलो तेव्हा रानात खूप मजा आली. गावाकडचे रम्य वातावरण प्रसन्न करून टाकणारे असते. गावचा आमचा दिवस कसा असतो ते दाखवले आहे. कोकणातील गावी पावसाळ्यात वातावरण कसं असतं ते बघायला मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही कडव्या वालाची भाजी, वालाचे बिरडे बनवून दाखवले आहे. आम्ही कपडे धुवायला रानात गेलो ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KadavyaValachiBhaji #ValachiBhaji #ParyavarGeloKapadeDhuvayala #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar