Konkani Malvani Bhajan || Kokanatil Ganapati Bappa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • भजन-
    देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर,तुकाराम,सोपान,निवृत्ती,एकनाथ, नामदेव, चोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत.
    स्वरूप-
    स्थानिक स्तरावर संवादिनी(हार्मोनियम),मृदंग, तबला, ढोलकी, टाळ, टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते. पूर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. वारकरी पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत.

ความคิดเห็น • 14