Day - 16 - Average weight 610 Grams |Poultry Farm | Night Shoot

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • जैव सुरक्षा कार्यक्रम
    फार्मरने दुसऱ्या कोणत्याही शेडला भेट देऊ नयेअगर इतर कोणाचीही भांडी , उपकरणे आपले शेडवरआणू नयेत.
    1)शेडचे प्रत्येक दरवाजाबाहेर फूटबाथ बांधावा.त्यामध्ये 1 लि.पाण्यास 50 मिली.फॉर्मुलीन किंवा चुनापावडर व ब्लिचींगपावडर मिसळून टाकावी.
    2)मेलेले पक्षी शेडमध्ये पोत्यावर किंवा खांद्याच्या भांडयामध्ये ठेऊ नये.बादली किंवा पाटीमध्ये थोडी तूस टाकूनत्यावर ठेवणे.नंतर खोल खड्डा काढून त्यामध्ये पुरणे.किंवा मरतूक खड्डयामध्ये टाकणे.किंवा जाळून टाकणे.
    3)देशी कोंबडया शेडच्या आसपास पाळू नयेत.
    4)शेड मधील कामगारानी वेगळया चप्पल वापराव्यात व त्या पुन्हा बाहेर वापरू नयेत.
    शेड निर्जुंतुकीकरण करणे
    पक्षी गेल्यावर लगेच शेडमधील सर्व खाद्याची व पाण्याची भांडी बाहेर काढावीत.
    उवा , लिका व माशा इ.साठी न्युऑन 2 मिली प्रति लिटर पाण्यातून खत , जाळी पत्रा व पडदे यांवर फवारणे .15 लि.पं१पासाठी 30 एम.एल. न्युऑन वापरणे.
    शेडमधील सर्व खत काढुन घ्यावे.खत विकले नसेल तर शेडपासून 1 कि.मी.अंतरावर वाऱ्याच्या विरूदध बाजुस टाकणे.खत शेडच्या जवळ टाकल्यास पक्षांना रोगाचा व माशांचा त्रास उदभवतो.
    शेडमधील कोबा किंवा भांडयाखाली चिकटलेले खत खुरप्याने खरडून काढणे व शेड पुर्ण झाडून घेणे.
    शेडच्या आसपास 20 फूट जागा स्वच्छ करावी.आसपासचे गवत काढून टाकावे व जाळीच्या बाजुची झाडे सवळून घ्यावीत. शेडच्या दरवाजासमोरचे व आसपास पसरलेले खत आणि पिसे गोळा करून जाळुन टाकावीत.
    शेडमधील पिसे व असलेले जंतू , शेड ( जमीन व भिंती ) बर्नरने जाळुन घ्यावे.
    एक हजार लिटर टाकीत 100 लिटर पाणी 10 लि.एच.2 ओ 2 टाकुन ते पाणी रात्रभर पार्इपलार्इन मध्ये भरून ठेवावे वदुसऱ्या दिवशी पार्इप लार्इन फ्लाशिंग करून घ्यावी. किंवा1/2 इंची पार्इप लार्इनसाठी ¹ 10 फूटामध्ये 1 लिटर पाणी बसते. 3/4 इंची पार्इप लार्इनसाठी ¹ 10 फूटामध्ये 1.5 लिटर पाणी बसते.
    संपुर्ण शेड आतून वर पासून खालीपर्यंत स्वच्छ करावे.जाळी जळमट धुळ झाडून घ्यावी.बाजुच्या भिंती स्वच्छ कराव्यात.
    शेडच्या बाजुच्या भिंती पडदे व जमीन स्वच्छ पाण्याच्या प्रेशरने धुऊन घ्याव्यात.शेड पुन्हा एकदा साबणाच्या पाण्याने धुऊन घ्यावे.प्रति 1000 स्क्वे.फुटसाठी 2 किलो निरमा पावडर वापरणे.
    शेडमधील खड्डे सिमेंटने बुजविणे त्यामुळे उंदराचा प्रादुर्भाव कमी होतो.
    सर्वप्रथम शेडमधील कोबा / जमीन पाण्याने ओली करून घेणे.
    ¹ त्यानंतर हातामध्ये हँडग्लोज व पायामध्ये गमबुट घालुन 1000 स्क्वे.फुट जागेसाठी 2 किलो कॉस्टीक सोडा या प्रमाणे कॉस्टीक सोडयाचे खडे जमीनीवर पसरावेत व त्यावर पुन्हा एकदा पाण्याचा फवारा मारावा. दुसऱ्यादिवशी ( 12 ते 24 तासानंतर ) कोबा स्चच्घ पाण्याने धुऊन घ्यावा. पाण्याच्या भांडयावरील क्षार अॅसिडने धुऊन काढावेत त्यासाठी हायड्रोक्लोरीक अॅसिडचा (एच.सी.एल. ) वापर करावा.एच.सी.एल. वापरताना हँडग्लोजचा वापर करावा.अॅसिड भांडयाला लावण्यासाठी ब्रशचा वापर करावा सर्व भांडी धुऊन जंतूनाशक द्रावणात ( बी 904 7 मीली/लिटर पाणी)2 ते 3 मिनीटे बुडवुन घ्यावीत.
    सर्व खाद्याची व पाण्याची भांडी स्वच्छ धुऊन वाळवुन शेडमध्ये ठेवावीत.उन्हाळ्यामध्ये ठेवल्याने प्लॅस्टीकची भांडी खराब होतात. शेडचे निर्जतुकीकरण करण्यापुर्वी सर्व शेडची किरकोळ दुरूस्ती करून घ्यावी.
    डियोक्लीन पावडरचा वापर
    शेड निर्जतुकीकरणासाठी डियोक्लीन पावडरचा वापर करावा.1.5 किलो डियोक्लीन पावडर 70 लिटर पाण्यामध्ये घेऊन ते 1000
    स्क्वे.फुटसाठीवापरावे.डियोक्लीनची फवारणी शेड बंद करून पिस्टनच्या पंपाने सर्व भिंती कोबा , पडदा , जाळी व भांडी इत्यादी वर करावी पाठीवरील पंपाने डियोक्लीन फवारू नये कारण पाठीला इजा होऊ शकते.
    डियोक्लीनची फवारणी झाल्यानंतर 2 दिवसानंतर चुना मारावा.
    पक्षी येण्या अगोदर शेडमध्ये फॉर्मुलीनची फवारणी करावी ( 1000 स्क्वे.फुटसाठी 15 लि.पाण्यामध्ये 500 म्लिी फॉर्मुलीन टाकणे किंवा पॉटेशियम परमॅग्नेट व फॉर्मुलीन एकत्र घेऊन धुरी करावी. 1000 स्क्वे.फुटसाठी 500 ग्रॅम पॉटेशियम परमॅग्नेट व 1 लि. फॉर्मुलीन वापरणे व त्यानंतर शेड 24 तास बंद ठेवणे.

ความคิดเห็น • 1

  • @grootman6728
    @grootman6728 2 ปีที่แล้ว +1

    Supereme Pan feeders ...is good sir .