शांतादुर्गा षोडशोपचार पूजा / Shantadurga Pooja Vidhi Marathi with English subtitles.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • श्रीशांतादुर्गा देवीच्या भक्तांना मार्गदर्शक अशी शास्त्रशुद्ध पौराणोक्त पूजा इंटरनेटद्वारे सहर्ष प्रकाशित करीत आहे.
    पूजेत १६ उपचार असतात. पहिला उपचार आवाहन असून, शेवटचा उपचार मंत्रपुष्प आहे.
    परंतु त्या खेरीज अगोदर काही विधि आहेत आणि मंत्रपुष्पानंतर प्रार्थना इत्यादी आहेत.
    या मंत्रांनी दररोज देवीसह घरच्या इतर देवांचीसुद्धा पूजा करता येईल. किंवा #नवरात्र , #पंचमी #माघउत्सव इत्यादी पर्वणीच्या दिवशी शांतादुर्गेची विशेष पूजा अश्या प्रकारे करता येईल.
    पादुका कश्यासाठी ?
    परंपरेनुसार कवळ्याच्या शांतादुर्गेची मूर्ती अभिषेक इत्यादीद्वारे पुजत नाहीत. त्याऐवजी पादुका, सुपारी, श्रीयंत्र अशी देवीची प्रतीके उपयोगात आणतात.
    I am glad to present the Shodasha-upachara-pooja of Shree Shantadurga through You Tube.
    There are 16 upacharas (procedures) for offering a Pooja to a deity. The first upachara starts with Avahana and the last upachara is mantrapushpa .
    But there are some procedures which have to be followed before avahana and some like Prarthana ( prayer) after Mantrapushpa.
    This Pooja is a standard routine prescribed in Puranas, followed for all deities . Some people offer this worship daily, while some offer it during special days.
    The procedure showed here is useful for conducting Devi Pooja during Navaratri and also for regular worship of the deities in your home shrine.
    आल्बम : श्रीशांतादुर्गा उपासना प्रदीप (२००८)
    पूजा विधान : पारंपारिक शास्त्रानुसार
    स्वर : श्री. रवि ताम्बे गुरुजी (ठाणे)
    चंद्रशेखर खांडाळेकर
    अर्चक सहभाग (पुरोहित. श्रीशांतादुर्गा देवस्थान, कवळे, फोंडा, गोवा) :
    श्री. श्रीकुमार सरज्योतिषि
    श्री. विनायक पेंडसे
    चित्रिकरण स्थळ : श्रीशांतादुर्गा देवस्थानातील लक्ष्मी नारायण मंदिर, कवळे, फोंडा, गोवा
    ध्वनिमुद्रण : V.L.Digital studio Andheri East
    Album : Shree Shantadurga Upasana Pradeep (2008)
    Mantras : Traditional
    Chanting : Shri. Ravi Tambe (Thana)
    Chandrashekhar Khandalekar
    Archakas ( priests of Shantadurga Devasthan, Kavale, Ponda, Goa):
    Shri. Shrikumar Sarjyotishi
    Shri. Vinayak Pendse
    Video shot at : Laxminarayan temple within Shantadurga Devasthan complex. Kavale, Goa
    Audio Recording : V.L. Digital Studio Andheri East.

ความคิดเห็น • 33

  • @jyotikulkarni5867
    @jyotikulkarni5867 4 หลายเดือนก่อน +1

    Guruji खूपच उत्तम पूजा sangitli

  • @jyotikulkarni5867
    @jyotikulkarni5867 4 หลายเดือนก่อน

    🙏👣

  • @rekhasakhardande2627
    @rekhasakhardande2627 2 ปีที่แล้ว +2

    अतीशय सुंदर पुजा सांगितली आहे. पूजेच्या साहित्य जमावण्या पासून शेवट पर्यंत सांगितलेली पुजा खूपच छान सांगितली, छान सादर केली, छान vdo शूटिंग झाले आहे. अतिशय सुंदर समाधान वाटले. विनू आणि कुमारचे मना पासून कौतुक वाटले.

  • @radhakekre4569
    @radhakekre4569 ปีที่แล้ว +1

    Thanx for this type of vidieo for those persons spl our community youngsters don't know anything about our kuldevatas puja .n kulachar......Is therevidieo for Mangesh maharudra n some knowledge about mangeshi kulachar also.. plz share.....thanx....again.

    • @saubhaagyashekhara3279
      @saubhaagyashekhara3279  ปีที่แล้ว

      Thank you for your compliments. I am sorry that I do not have any information about Mangeshi Kulachars. God willing we shall come up with a video like this.

  • @vksomji
    @vksomji 2 ปีที่แล้ว +3

    Thankyou Haan !! for Sharing this Auspicious Pujan of Devi Shantadurga.
    Non Brahmin Spinster Woman Devotee's of Devi Shantadurga & Lord Mangeshi like Me are very very thankful to this Channel.
    May Devi Shantadurga & Lord Mangeshi, Bestow All the Worshipers With Good Blessings and Let the Blessings of Devi Shantadurga & Lord Mangeshi be with Everyone..
    I am in Need of the Blessings of Devi Shantadurga & Lord Mangeshi a Lot Since I am an Orphan 😞😌
    Om Namah Shivay.
    Om Shri Shantadurga Vijayte.
    Please Pardon Me for Commenting in English.✍️

    • @aaarti05
      @aaarti05 2 ปีที่แล้ว

      Sharade pahimam Shankara rakshamam. 🙏☂️🏡

  • @anilsukhatankar6402
    @anilsukhatankar6402 2 ปีที่แล้ว

    कुमार गुरुजी अतिशय सुंदर पुजा सांगितली फार छान

  • @prithvirajdeshmukh5774
    @prithvirajdeshmukh5774 2 ปีที่แล้ว +1

    देवा ! देवी अभिषेक पुजा याची देहा याची डोळा ऐकावयास व पहावयास मिळाली त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन !
    ll ॐ श्री शांतादुर्गा देव्यै नमः ll
    ----- पृथ्वीराज पत्की - देशमुख , गोळेश्वर रोड, कार्वे नाका , कराड , जि. - सातारा .

  • @rajeshmantrisuccessunlimit6707
    @rajeshmantrisuccessunlimit6707 2 ปีที่แล้ว

    श्री शांतादुर्गा देव्ये नमः

  • @RSVPRis
    @RSVPRis ปีที่แล้ว

    खूपच छान.

  • @rekhasakhardande2627
    @rekhasakhardande2627 2 ปีที่แล้ว +1

    अजून एक विनंति आहे. अशीच श्री गणरायाची पुजा सांगता येईल का. म्हणजे दर संकष्टीला आम्हाला त्याचे उत्तम मार्गदर्शन होईल.

  • @ajinkyarajasgaonkar3692
    @ajinkyarajasgaonkar3692 9 หลายเดือนก่อน

    Namaskar,
    Paduka naslyas, apan Kay karaych?

    • @saubhaagyashekhara3279
      @saubhaagyashekhara3279  9 หลายเดือนก่อน

      अन्नपूर्णा, दुर्गा इत्यादी मूर्तींवर शांतादुर्गेचे आवाहन करावे. त्या मूर्तीही नसतील तर सुपारीवर आवाहन करून षोडशोपचार पूजा करता येईल. ती सुपारी कायम एका वाटीत ठेऊन देवीच्या मूर्तीप्रमाणे तिची पूजा करावी.
      परंतु ती सुपारी खराब झाली अथवा कायम ठेवण्यात अडचण असेल तर खालील मंत्राने देवीचे उद्वासन करून सुपारी वाहत्या पाण्यात वा जलाशयात विसर्जित करावी.
      मंत्र
      यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम्।
      इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥
      श्रीशांतादुर्गापरमेश्वर्यै नमः:।
      यथास्थानं प्रतिष्ठापयामि।
      असे म्हणून अक्षता वहाव्या. नंतर पाण्यात विसर्जन

    • @ajinkyarajasgaonkar3692
      @ajinkyarajasgaonkar3692 9 หลายเดือนก่อน

      @@saubhaagyashekhara3279 Dhanyawad! Shodashopchar nantar Uttar puja chi garaz ahe ki Puja zalya nantar parat devi chi murti Devgharat thevave?

    • @saubhaagyashekhara3279
      @saubhaagyashekhara3279  9 หลายเดือนก่อน

      @@ajinkyarajasgaonkar3692 उत्तरपूजेची गरज नाही. खरंतर व्हिडिओमध्ये केवळ पादुका दाखवल्या आहेत, परंतु जर देवी तुमची कुलदेवता असेल तर घरातल्या सगळ्या देवांची पूजा देवीसोबत एकाच वेळी व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे करता येईल.
      उत्तर पूजेची गरज नाही. स्नान घातले की सगळे देव जागच्या जागी ठेवून पूजा करावी.
      जरी काही विशेष प्रसंगी देवीची वेगळी पूजा केली तरी उत्तरपूजा करू नये. पूजा झाल्यावर देव्हाऱ्यात ठेवावी.
      सुपारीवर पूजा केली आणि ती विसर्जित करायची असेल तरीही तुम्हाला जो आधी मंत्र दिला त्यानुसार पूजनाच्या नंतर उद्वासन करावे आणि विसर्जन करावे. उत्तर पूजा करू नये.

    • @ajinkyarajasgaonkar3692
      @ajinkyarajasgaonkar3692 9 หลายเดือนก่อน +1

      Dhanyawad! Manpurvak aabhar 🙏🏻

  • @esha0512
    @esha0512 2 ปีที่แล้ว

    धन्य

  • @rajeshmantrisuccessunlimit6707
    @rajeshmantrisuccessunlimit6707 2 ปีที่แล้ว

    कृपया धन्यवाद आपला भ्रमणध्वनीक्रमांक दया

  • @niharraut6841
    @niharraut6841 2 ปีที่แล้ว

    माहिती म्हणून सांगतो- आपल्या धर्मशास्त्रात आदिशक्तीच्या उपासनेत कधीही तुळशीपत्र वापरू नये. देवीला तुळस वर्ज आहे. आणि भगवती दुर्गेचा अभिषेक हा नेहमी देवी अथर्वशीर्ष किंवा देवी सुक्तने करावा. श्रीसूक्त केवळ मात्र लक्ष्मी करिता प्रशस्त आहे.

    • @saubhaagyashekhara3279
      @saubhaagyashekhara3279  2 ปีที่แล้ว +1

      आपण लक्षपूर्वक पूजा पाहिलीत याबद्दल धन्यवाद.
      तुळशीच्या प्रयोगावर वेगळवेगळ्या ग्रंथात मतांतरे आहेत. आमच्या देवळात देवी आणि शिवपूजेतही तुळस वाहण्याची प्रथा आहे. त्याला शास्त्राधारसुद्धा आहे.
      तसेच श्री ही देवता व्यापक आहे. पौराणिक लक्ष्मी आणि वैदिक श्री यात साम्य असते तरीही त्या भिन्न देवता आहेत. त्यामुळे श्रीसूकत हे कोणत्याही मातृदेवतेच्या अभिषेकासाठी निश्चित ग्राह्य ठरते.
      अर्थात ज्यांना देवी क्त इत्यादींचा प्रयोग करायचा असेल त्यांनी अवश्य करावा.

    • @niharraut6841
      @niharraut6841 2 ปีที่แล้ว

      @@saubhaagyashekhara3279 आपल्या धर्मशास्त्रात विशेषता शक्ती उपासने बाबत उल्लेखात -तुलसीघ्राणमात्रेण क्रुद्धा भवति चण्डिका ॥ (अर्थात तुळशी देवीला निवेदन केल्यास भगवती चंडिकेला क्रोध निर्माण होतो.)
      सोबतच दुसर्‍या उल्लेखात
      "तुलस्या गन्धमाघ्राय क्रुद्धा भवति सुन्दरी" ॥अर्थात तुळशीच्या गंधाने भगवती क्रोधीत होते.
      आणि जो तुम्ही जो उल्लेख केला की वेदातील श्री ही देवता व पुराणातील लक्ष्मी या भिन्न आहेत तर असे जर असते तर श्री सूक्तात श्री चे वर्णन - विष्णूपत्नी क्षमाशीले माधवी माधवप्रिया असे आहे. व सोबतच पद्मलये पद्महस्ता व धन- धान्य प्रदयीनी (असे केले नसते).
      बाकी तुमची इच्छा 🙏

    • @saubhaagyashekhara3279
      @saubhaagyashekhara3279  2 ปีที่แล้ว

      @@niharraut6841
      श्रीसूक्त श्री या देवतेचे आहे. श्रीर्देवता असा उल्लेख आहे. लक्ष्मीर्देवता नव्हे. हे सूक्त मूलतः पंधरा मंत्रांचे असून यात तिचा विष्णुपत्नी असा उल्लेख नाही. श्रीसूक्तानंतर जे मंत्र म्हटले जातात त्यात हा विष्णुपत्नी असा उल्लेख आहे.
      पद्मस्थिता किंवा धनदात्री म्हणून वैदिक श्री ही विष्णुपत्नी लक्ष्मी ठरत नाही.
      श्रीयंत्राला लक्ष्मीयंत्र म्हणतात परंतु तिथे श्री म्हणजे त्रिपुरसुंदरी. विष्णुपत्नी नव्हे. तसेच श्रीविद्या ही देखील त्या त्रिपुरसुंदरीची विद्या अर्थात मंत्र आहे.
      लक्ष्मी म्हणजे केवळ विष्णुपत्नी नव्हे. सप्तशतीत दोन महालक्ष्मी आहेत. एक आदिकारण असलेली महालक्ष्मी जिच्यातून विष्णुपत्नी निर्माण झाली. दुसरी महिषमर्दिनी . दोघींचाही महालक्ष्मी असाच उल्लेख आहे.
      तसेच महागणपतीच्या अंकावरही एक लक्ष्मी आहे.
      तेव्हा लक्ष्मी, श्री, महालक्ष्मी हे संबंध अत्यंत गुंतागुंतीचे आहेत.

    • @saubhaagyashekhara3279
      @saubhaagyashekhara3279  2 ปีที่แล้ว

      @@niharraut6841
      त्रिपुरापूजने वर्ज्या तुलसी सर्वदा बुधैः।
      तुलसीघ्राणमात्रेण क्रुद्धा भवति सुंदरी ।।
      यातील केवळ दुसरा चरण आपण उद्धृत करून देवीसाठी तुळस अग्राह्य ठरवलीत. परंतु हा श्लोक त्रिपुरसुंदरीसाठी वाराहतंत्रात दिला आहे. सर्व मातृदेवतांसाठी नाही.
      मत्स्यसूक्तात याची अधिक माहिती आहे ती अशी
      सुंदरी भैरवी काली ब्रह्मविघ्नविवस्वताम्।
      तुलसीवर्जिता पूजा सा पूजाsविफला भवेत् ।।
      अर्थात त्रिपुरसुंदरी, भैरवी, काली, ब्रम्हदेव, गणपती आणि सूर्य यांची पूजा तुळशीवाचूनच सफळ होते. म्हणजे या देवतांना तुळस वाहू नये. यात दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती किंवा अन्य मातृदेवतांचा उल्लेख नाही.
      आपण जो दुसरा श्लोकार्ध दिलात त्यात चंडिका हा शब्द कालिकेसाठी आहे दुर्गेसाठी नाही हे मी दिलेल्या श्लोकावरून ताडता येईल.
      किंबहुना परंपरा आणि गुरू जी पद्धत निश्चित करतात ती आपण चोखाळावी. आमची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असली तरी ती शास्त्रसंमत असल्याने निश्चितच आक्षेपार्ह नाही. 👃

    • @niharraut6841
      @niharraut6841 2 ปีที่แล้ว

      @@saubhaagyashekhara3279 दुर्गा आणि चण्डिके मध्ये जर तुम्ही भेद करत असाल तर यावर बोलणं चुकीचं व निरर्थक आहे!
      मग तर तुमच्या मते चंडी पाठ आणि दुर्गा सप्तशती हे ग्रंथदेखील दोन्ही वेगवेगळे असतील?
      देवी पुराण व कालिका पुराणातील दुर्गा उपासनापद्धती अवलोकन करा- त्यात भगवतीला बिल्वपत्र हे प्रधान असून तुळशी पूर्णतः वर्ज्य आहे. दुर्गा रुपी पार्वती मातेने सदाशिवाला पती रूपात प्राप्त करायला बिल्व पत्राचे कितीतरी वर्ष भक्षण केले, जी स्वता: बिल्ववृक्ष वासिनी आहे, तंत्रात उल्लेखाप्रमाणे बेलाचे तीन पान(अनुक्रमे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती स्वरूप आहे). आणि लक्ष्मीचं म्हणाल तर वैदिक, पौराणिक संदर्भ अनुसार बेलाचे फळ तर प्रत्यक्ष लक्ष्मीचे वक्ष स्वरूप सांगितले आहे.
      तुळशीचे वर्जं असल्याचे नियम श्री कूळ व काळी कुळ सर्व शाक्त संप्रदायात कटाक्षाने पाळायाचे सांगितले आहे, मग त्या जगनमातेचे कुठलेही मातृ स्वरूप असो हा नियम सर्व शक्ती देवतेला लागू होतो.
      (मला अजून यात लीहात बसून वाद घालण्याची इच्छा नाही, खर-खोटं करायचं असल्यास संपर्क करू शकता-८४१२८२०६८२)
      श्री शांतादुर्गा विजयते.. 🙏

  • @nayanajambotkar8775
    @nayanajambotkar8775 ปีที่แล้ว

    😊😊😊😊😊😊😊a¹
    ❤❤¹

  • @aradhana2871
    @aradhana2871 ปีที่แล้ว

    Udbatti wapru naye dhoop batti wapra.