Ashok Dhodi Case : दृश्यम स्टाईल गूढ पद्धतीने Eknath Shinde यांच्या पदाधिकाऱ्याला संपवल | काय घडलं ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025
- Ashok Dhodi Case : दृश्यम स्टाईल गूढ पद्धतीने Eknath Shinde यांच्या पदाधिकाऱ्याला संपवल | काय घडलं ?
मंडळी बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याकांड प्रकरणात अपहरण आणि निर्घृण हत्याकांड, असा थरकाप उडवणारा घटनाक्रम पाहून संपूर्ण राज्य हादरल असतानाच, आता पालघर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी, हे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अचानक गायब झाले होते, मुंबईला कामानिमित्त जातोय, असं सांगून ते 20 जानेवारीला घरातून निघाले होते. लवकरच घरी येतो, असं देखील त्यांनी घरातल्या मंडळींना सांगितले होते. मात्र, 12 दिवस झाले तरी अशोक धोडी घरी परतले नव्हते. या प्रकरणी पालघर पोलिसांच्या तब्बल आठ टीम्स गेली अनेक दिवस युद्धपातळीवर धोडी यांचा शोध घेत होत्या. दरम्यान इतके दिवस ते न सापडल्यामुळे कदाचित त्यांच्यासोबत काहीतरी बरेवाईट झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती आणि दुर्दैवाने हीच भीती अखेर खरी ठरली आहे. काल पालघर पोलिसांना गुजरातच्या भिलाड येथे बंद दगड खाणीत अशोक धोडी यांची कार सापडली. ती कार पोलिसांनी खाणीतून बाहेर काढली. खोल पाण्यात असलेली कार बाहेर काढण्यासाठी पोलिसांना जवळपास अडीच तास प्रयत्न करावे लागले. यानंतर कारची पाहणी केली असता, कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा दोरीने बांधून ठेवलेला मृतदेह सापडला, आणि सगळ्यांना धक्काच बसला. मंडळी तब्बल बारा दिवस धोडी हे गायब असणं, त्यानंतर गुजरातमध्ये एका दुर्गम दगड खाणीत अतिशय खोल पाण्यात त्यांची कार मिळण व कारच्या डिक्कीमध्ये त्यांचा मृतदेह असण, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर अतिशय प्लॅनिंग करून ही हत्या केल्याची दिसून येतय. दरम्यान या अपहरण व हत्येबदल पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, यातील मुख्य सूत्रधार हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे पण याबद्दल अजून तपास सुरू आहे. दरम्यान अविनाश धोडी याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असता, तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याच सांगण्यात येतय. मंडळी शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची एकदम दृश्यमस्टाईल पद्धतीने थरारक हत्या कोणी केली व मुख्य संशयित आरोपी धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश याचा यामध्ये काय सहभाग आहे, याबद्दल पोलिसांच्या हाती आतापर्यंत काय काय पुरावे सापडलेत त्याचा हा सविस्तर रिपोर्ट....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#ashokdhodi
#crimenews
#marathicrimestory
#ashokdhodinews
#vishaychbhari
#विषयचभारी
ashok dhodi,ashok dhodi case,ashok dhodi kidnapping,shivsena ashok dhodi,ashok dhodi murder case,ashok dhodi video,ashok dhodi bizza,ashok dhodi case news,ashok dhodi case today,ashok dhodi case update,ashok dhodi kidnap case,ashok dhodi murder news,shivsena ashok dhodi case,palghar ashok dhodi missing case,ashok dhodi news,ashok dhodi murder,ashok dhodi palghar,ashok dhodi kidnapping case,ashok dhodi updates,shiv sena ashok dhodi,ashok dhadi
सख्खा भाऊ पक्का वैरी 😢😢😢
आज काल पैशापुढे नाती परकी 😢
माझा हाच अनुभव, भावाकडे ट्रैक्टर आहे पण मला शेतात पाहिजे असेल तर देत नाही 🙏
गरीबी तून शिकलो मी आता 😢😢
Rivalry between both brothers was going on since the last 10 years
आज काल पैशापुढे नाती परकी 😢
माझा हाच अनुभव, भावाकडे ट्रैक्टर आहे पण मला शेतात पाहिजे असेल तर देत नाही 🙏
गरीबी तून शिकलो मी आता 😢😢
भाऊ भावाचा नाही राहीला 😢
अंधाराचा फायदा घेऊन नाही हजाराचा फायदा देऊन फरार😂😂😂