Pandit Raja Kale - Santvani Concert Abhang Varsha 14th July 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • "अभंगवर्षा" एक चिरंतन स्वरयात्रा, जीवनातील चिरंतन मूल्य चिरंतन रागदारीच्या माध्यमातून साकार करण्याची स्वरयात्रा. फकीरी मे अमीरी का एहसास देने वाली जीवन को व्यापक बनाने वाली स्वरयात्रा.
    गुरुवर्य अभिषेकी बुवा सांगायचे की
    सूर्य फिरे अदरी बदरी,
    चंद्र फिरे अमावस आये,
    सौ घुंघट की ओट करे,
    चंचल नैन छिपे न छिपाए
    जसे चंचल नेत्रांची भाषा लपत नाही तसेच वागण्या बोलण्यातला व गाण्यातला मनोभाव ही लपत नाही. अर्थात तो किती प्रामाणिक आहे हे जाणकारांना लगेच समजते.
    गाणे तुम्हाला काय समजले, काव्याचा तसेच सुरावटीचा भावार्थ तुम्ही कसा काढला, त्यातील गुंजाइश विस्तार करण्याच्या शक्यता तुम्ही कशा समजून घेतल्या व त्या रियाजाने कशा आपल्या केल्या तसेच आपल्या व्यक्तिगत आवडी निवडी या सर्व गोष्टींवर गाण्याचा असर अवलंबून आहे.
    गुरुवर्य अभिषेकी बुवांच्या अमीट संगीत रचना ह्या परंपरेच्या व्यासंगातून, ध्यास व तंद्रीतून निर्माण झालेल्या आहेत. ते नेहमी सांगायचे की संगीतात नवीन चांगले काही सृजन करायचे असेल तर परंपरेचा अभ्यास व्यासंग असणे आवश्यक आहे. नाहीतर त्या सृजनास दर्जा रहात नाही.
    आजच्या प्रचार प्रसार माध्यमांच्या द्वारे
    अतिहुशारीने स्वतःला प्रगट करण्याची व पैसा कमविण्याची घाई झालेल्या गायकांना गुरू शिष्य परंपरेचे महत्त्व राहिलेले नाही. बुजुर्ग कलाकारांचा धाक राहिला नाही. सकाळ पासून सोशलमीडिया वर लाईक्स वाढविण्याची साधना करायची, स्वर साधना जमेल तेवढी करायची किंवा नाही केली तरी चालते . त्यामुळे आजकालच्या मैफिली ह्या जाहिरातबाजी मध्येच गाजतात. दोन तंबोऱ्यात भाव सौंदर्यवादी गायकीने मैफिल जमवणे हे दुर्मिळ झाले आहे.
    स्वराभिषेक प्रतिष्ठान आयोजित "अभंगवर्षा" सारख्या विशेष कार्यक्रमाद्वारे तसेच स्वराभिषेक गुरूकुलाच्या माध्यमातून चतुरस्र गायकीचे मर्म सांगणाऱ्या उत्तम विद्यादाना द्वारे संगीतात नव चैतन्य निर्माण करण्याचा, भाव सौंदर्याची मैफल परत जमविण्याचा, संगीताचे सुवर्ण युगाची परंपरा जपण्याचा आणि ती नविन पिढीत परावर्तित करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
    स्वराभिषेक गुरुकुल हे कोणत्याही सांगीतिक प्रकारचे "गाण्याचे गाणेपण" जपण्यासाठी व सांगीतिक परंपरेचे जतन संवर्धन करण्यासाठी पूर्णतः समर्पित आहे.तरी नवीन पिढीच्या संगीत साधकांनी गुरुकुलाच्या ह्या गौरवशाली परंपरेशी आपले सांगीतिक बंध निर्माण करून आपले संगीत समृध्द करावे यातच गुरुकुलाच्या कार्याचे सार्थक आहे.
    हृदयसपर्शी संगीताचे जतन संवर्धन व अभिजात भारतीय संगीत परंपरा जपणाऱ्या या "स्वराभिषेकी स्वरयात्रेस" जनता जनार्दन तसेच Corporate sector चे आशीर्वाद व सहकार्य सदैव लाभावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
    Dr.Raja Kale
    Vocalist - Hindusthani Classical & Semi-Classical Musical Forms.
    Founder/Director : Swarabhishek Pratishthan/Gurukul
    Contact: Call/Whatsapp :`
    9324602263 / 9619634969 / 9967933550

ความคิดเห็น • 16

  • @manishambhore8589
    @manishambhore8589 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम! वाह जय श्री राम!

  • @MandarNagwekar
    @MandarNagwekar 2 หลายเดือนก่อน

    ❤खुप छान, सुंदर गायन राजाभाऊंच🙏

  • @vijayjog2637
    @vijayjog2637 2 หลายเดือนก่อน +1

    Congratulations sir shubhechha sir for future lifestyle God always great sir

  • @rameshbhabal1086
    @rameshbhabal1086 2 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय अभिषेकी सरांचा वारसा पुढे चालवताय मनःपूर्वक मानवंदना सर

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कार्यक्रम झाला , ओम् साईराम, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. शुक्ल गुरुजी..

  • @pralhadbadwe3356
    @pralhadbadwe3356 2 หลายเดือนก่อน

    Dr. Pt. Rajaji Kale, Great!Shivaji Chopde our school mate has fwd the clip. No words to express joy, God bless you all!👌🙏

  • @gsat_sub
    @gsat_sub 2 หลายเดือนก่อน

    Guruji, Pranam. wonderful programme. It was nice to see Rigved as well.

  • @SYBERIAN_EDITZ
    @SYBERIAN_EDITZ 2 หลายเดือนก่อน

    Namaskar sir 🙏🙏Beautiful program 🙏🙏👌👌

  • @drbharativikasamte4948
    @drbharativikasamte4948 2 หลายเดือนก่อน +1

    Muze abhiman hai Pt. 😅Raja Kaleji hamare Sambhajinagarke Putra hai.Dr.Bharati Amte.

  • @ghanshyamnagose4755
    @ghanshyamnagose4755 2 หลายเดือนก่อน

    अतिशय अप्रतिम सुंदर प्रस्तुती मन प्रसन्न झालं हार्मोनियम आवाज कमी होतं तबलावादक अतिशय अप्रतिम आपल्या सर्वाचेच मनापासून अभिनंदन व नमस्कार

  • @dilipmestry7926
    @dilipmestry7926 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @drbharativikasamte4948
    @drbharativikasamte4948 2 หลายเดือนก่อน +3

    Dr. Pandit Rajajis father Late Prabhakarji Kale was a violinist and friend of my father late Bhausaheb Vaishampayan. Rajaji is our Gurubandhu too.18.7.2024 .

  • @ishaandessai9059
    @ishaandessai9059 2 หลายเดือนก่อน

    सुंदर कार्यक्रम

  • @SudarshanRao-j8c
    @SudarshanRao-j8c 2 หลายเดือนก่อน

    4:57

  • @MurlidharMadave
    @MurlidharMadave 2 หลายเดือนก่อน

    Pt abhisekhicha gayan aathavte

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye4971 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार