अंकिता निंबाळकरांचा अश्रूंचा बांध फुटला! म्हणाल्या, गौतम काकडेला फाशी द्या!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • #bakasur #bakasurvsmathur #bakasursharyat #mathur #bailgada #bailgada_sharyat_official #nimbutfire #kakde #gautambhaiya #ranjitnimbalkarsir #bailgadasharyat #bailgadapremi #bailgadarace #bailgadaa5000 #maharashtra #pune #govtofmaharashtra #baramati #agriculture #ajitpawar #sharadpawar #supriyasulefc
    गुरुवारी मध्यरात्री 11:00 वाजल्यानंतर ते आज पहाटेपर्यंत बारामती तालुक्यात मोठी खळबळजनक घटना घडली. बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेले ट्रिपल महाराष्ट्र हिंदकेसरी गौतम काकडे यांच्या घरी बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार झाला, या गोळीबारात जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    काल रात्री अकराच्या सुमारास गौतम शहाजी काकडे यांच्या घरी निंबूत येथे बैलाच्या पैशाच्या व्यवहारावरून गौतम काकडे यांचा भाऊ गौरव याने फलटण येथील सुंदर बैलाचे मालक रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. गोळी डोक्यात गेल्याने निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला बारामती येथे व त्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
    या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर स्वामी विवेकानंद नगर फलटण यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे व तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता या घटनेतील जखमी निंबाळकरांचे निधन झाल्याने हा गुन्हा आता खुनाचा गुन्हा म्हणून रूपांतरीत होईल.
    याप्रकरणी रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबूत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजीत निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला.
    यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये 27 जून 2024 रोजी देऊन हा व्यवहार स्टॅम्पवर लिहून देण्याचे ठरले होते. व्यवहार करताना आपण समक्ष हजर होतो, असे रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबूतला नेला.
    27 जून 2024 रोजी सकाळी 11 म च्या सुमारास रणजीत निंबाळकर व संतोष तोडकर हे गौतम काकडे यांच्याकडे बैलाच्या व्यवहाराची चर्चा करण्यासाठी निंबूत येथे गेले होते. त्यांच्याशी चर्चा करून रणजीत निंबाळकर परत फलटण येथे दुपारी दोन वाजता पोहोचले, तेव्हा त्यांनी गौतम काकडे हे आपले बैलाचे राहिलेले पैसे न देता, तुम्ही स्टॅम्पवर सही करा असे म्हणत होते, मात्र मी पैसे दिल्याशिवाय सही करणार नाही असे म्हणून परत आलो आहे असे त्यांनी सांगितल्याचे अंकिता निंबाळकर यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे.
    दरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अंकिता निंबाळकर, रणजीत निंबाळकर, दहा महिन्यांची मुलगी अंकुरण, नातेवाईक वैभव भारत कदम आणि पिंटू प्रकाश जाधव हे चारचाकी गाडीतून निंबूत येथे निघाले होते. लोणंद येथे आल्यानंतर संतोष तोडकर हे थांबले होते. संतोष तोडकर हे रणजीत निंबाळकर यांना म्हणाले, सर, तुम्हाला या व्यवहाराचे पूर्ण पैसे दिले आहेत, तुम्ही सही का केली नाही? त्यावर रणजीत निंबाळकर यांनी आम्हाला फक्त पाच लाख रुपये मिळाले, बाकी पैसे अजून गौतम काकडे यांनी दिले नाहीत असे सांगितले.
    त्यावेळी संतोष तोडकर यांनी मला गौतम काकडे यांनी तुम्हाला पूर्ण व्यवहाराची रक्कम दिल्याचे व व्यवहार पूर्ण केल्याचे सांगितले आहे, असे म्हणून संतोष तोडकर त्यांच्या गावाकडे निघून गेले. त्यानंतर गौतम काकडे यांनी 32 लाख रुपये नेण्यासाठी बोलवल्याने त्यांच्या घरी निंबूत तेथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अंकिता निंबाळकर, रणजीत निंबाळकर व त्यांचे नातेवाईक वैभव कदम व पिंटू जाधव हे पोचले.
    त्यावेळी त्यांच्या घरी आल्यानंतर गौतम काकडे व हे सर्वजण घराजवळील अंगणात बाजेवर बसले होते, तेव्हा गौतम काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांना संतोष तोडकर यांना मी तुम्हाला पैसे दिले नाहीत, असे का सांगितले? तुम्ही असे बोलायला नको होते, मी तुम्हाला सकाळी पैसे देतो, तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे सांगितले.
    त्यावेळी रणजीत निंबाळकर यांनी माझे राहिलेले पैसे द्या, मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल, तर तुमचे पाच लाख रुपये मी तुम्हाला परत देतो, माझा बैल परत द्या असे सांगितले. त्यानंतर सगळे गाडीकडे निघाले, त्यावेळी गौतम काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांना, तू बैल कसा घेऊन जातो तेच मी बघतो, असे म्हणून त्यांनी फोन लावून पोरांनो तुम्ही वर या असे सांगितले.
    त्यानंतर त्यांनी गौरव यास देखील फोन करून बोलावून घेतले गौरव व अनोळखी तीन मुले तिथे आल्यावर गौतम काकडे हे आमच्याकडे परत आले व गौतम काकडे यांनी गौरव व त्या अनोळखी तीन मुलांना, या सराला मारा लय बोलतोय हा असे म्हणाले. त्यावेळी गौरव च्या हातात काठी होती. ती काठी गौतम काकडे यांनी घेऊन तो मारण्यासाठी रणजीत निंबाळकर यांच्या अंगावर धावून शिवीगाळ केली. त्यावेळी वैभव कदम हे गौतम काकडे यांना तुम्ही वाद घालू नका आपण उद्या व्यवहार चर्चा करू असे सांगत अडवत होते.
    अनोळखी तीन जण शिवीगाळ करत असताना गौरव याने तू बैल कसा नेतो तुला जिवंत ठेवतच नाही असे म्हणून त्याच्याकडे असणाऱ्या पिस्तूल मधून रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात एक गोळी झाडली. गोळी लागताच रणजीत निंबाळकर खाली पडले. त्यानंतर गाडीतून रणजीत निंबाळकर यांना वाघळवाडी व तिथून बारामतीतील भोईटे हॉस्पिटल येथे नेण्यात आले.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 195

  • @ShivajiJadhav-xq6oh
    @ShivajiJadhav-xq6oh 2 วันที่ผ่านมา +154

    माझ्या बहिणीला अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्यांनी न्याय दिला पाहिजे आणि त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे

    • @trekkingthrills94
      @trekkingthrills94 2 วันที่ผ่านมา +9

      बंदी कसली घालता दादा.. जन्मठेव नाही तर फाशी द्याला हवी... जीव घेणं.. खून करणे हे हे कोणते अमानवी कृत्य आहे

    • @Ppatil6137
      @Ppatil6137 2 วันที่ผ่านมา +5

      त्यांच्यावर फक्त बंदी न घालता त्यांच्या पुढील सात पिढ्यांवर बंदी घातली पाहिजे त्यांच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याची शिक्षा भोगू दे आणि गौतम काकडे आणि त्याच्या भावावर कठोर कारवाई झाली पाहिजे

  • @shivkumarmalgaveshivkumar1570
    @shivkumarmalgaveshivkumar1570 2 วันที่ผ่านมา +228

    अखिल भारतीय संघटनेने अंकिता वहिनीला सपोर्ट केला पाहिजे

    • @babankadam4771
      @babankadam4771 2 วันที่ผ่านมา +3

      काय पिस्तुल बाळगणारे संंघटनेला माहीत नाही काय

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 2 วันที่ผ่านมา +91

    त्यांच्या घरी जाऊन सुंदर सोडून आणावे हि संघटनेला विनंती आहे. अन्यथा संघटनेला कोनि विश्वास ठेवणार नाही.

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 วันที่ผ่านมา +152

    कठोर मधली कठोर शिक्षा व्हावी...फाशीची पण शिक्षा झाली असती पण सध्या भारतात फाशी देण्यावर बंदी आहे....जन्मठेप तरी झाली पाहिजे.....

    • @shaileshsorte
      @shaileshsorte 2 วันที่ผ่านมา +1

      Jan ke badle jan

  • @amaykarale8361
    @amaykarale8361 2 วันที่ผ่านมา +17

    गौतम काकडे हा बैलगाडा मालक नसून तो व्यापारी आहे, बैलगाडा शर्यती मधून माघार घेतली होती परत आला लायकी न्हवती तर सौदा कशाला करायचं.... भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭

  • @vijaynikam2290
    @vijaynikam2290 2 วันที่ผ่านมา +58

    शिक्षा झालीच पाहिजे गौतम काकडेला

  • @JAY_HIND301
    @JAY_HIND301 2 วันที่ผ่านมา +34

    चॅनल काढल्या पासून एवढं चालला नसेल तेवढं काल पासून चालतोय..
    सर miss you❤❤

  • @ankushpalve9404
    @ankushpalve9404 2 วันที่ผ่านมา +16

    अखिल भारतीय संघटनेने अंकिता ताईंना न्याय मिळवून देवे

  • @AtulJadhav-zl2pd
    @AtulJadhav-zl2pd 2 วันที่ผ่านมา +8

    जो पर्यंत रंजीत सराना न्याय मिळत नाय तो पर्यंत बैलगाडा शर्यत बंद च ठेवावी ही विनंती आहे संघटनेला 🙏

  • @user-xz6gp5rv6z
    @user-xz6gp5rv6z 2 วันที่ผ่านมา +30

    त्या च्या घरी जाऊन त्याची वाट लाववा 😡😡😡😡😡

  • @shreedhartavate9656
    @shreedhartavate9656 2 วันที่ผ่านมา +23

    त्या लेकराला न्याय द्या 😢

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 2 วันที่ผ่านมา +2

    सर तुमच्या मुलाखतीची आतुरतेने वाट पाहायची लोकं....... खरच miss करणार सगळे 😞😞

  • @Ppatil6137
    @Ppatil6137 2 วันที่ผ่านมา +10

    फक्त गौतम काकडे वर कारवाई न करता त्याच्या पुढील सात पिढ्यांवर कारवाई करा जेणेकरून त्याचे येणाऱ्या पिढीला सुद्धा कळू दे की त्याच्या पूर्वजांनी काय कुकर्म केले होते

  • @Mr.rahul.14
    @Mr.rahul.14 2 วันที่ผ่านมา +47

    आता कुठे गेले बैलगाडा संघटनावाले😡😡😡😡

    • @SagarDevkar-fh3wq
      @SagarDevkar-fh3wq 2 วันที่ผ่านมา

      संघटना तुमची वयक्तिक लफडी मिटवायला आहे का.??

    • @op4545op
      @op4545op 2 วันที่ผ่านมา

      ​@@SagarDevkar-fh3wqbarobar

    • @sagarhandgar9044
      @sagarhandgar9044 2 วันที่ผ่านมา +1

      हा खरेदी विक्री चा विषय आहे शर्यतीचा नाही

  • @prathamdhone279
    @prathamdhone279 2 วันที่ผ่านมา +69

    तुम्हाला न्याय राहुल पाटील देऊ शकतो तो शिंदे सरकारचा मोठा कार्यकर्ता आहे

    • @SantoshJadhav-mq5zu
      @SantoshJadhav-mq5zu 2 วันที่ผ่านมา +6

      Mitra gamavlay tyani tyachi shiksha gautam bhaiyala dilich pahije jar.
      #rahul bhai

    • @op4545op
      @op4545op 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@SantoshJadhav-mq5zu rahul patil kay karnar ahe to sota 2 mahine att madhe hota to nay nighu shkala ata kay madat karnar apli nyay vevastha ghan ahe paise dile ka zala jo khun karto to paise deto ani 4-5 varshya madhe bhayer yeto ani mg kes thambli

    • @roshanvare3391
      @roshanvare3391 2 วันที่ผ่านมา +1

      Gautam bhaiya Ajit Pawar cha manus ahe.tyacha jivavar. Hi karatan karto to

  • @omkarmatale1115
    @omkarmatale1115 2 วันที่ผ่านมา +6

    फाशी ची च शिक्षा झाली पाहिजे कारण समजल पाहिजे त्यांना घरातला जबाबदारी घेणार व्यक्ती गेला की कुथुंब कस हतबल होत समजेल गौतम काकडे ला

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 2 วันที่ผ่านมา +23

    गौतम ला उभा जाळला पाहिजे

  • @VikasJadhav-vs5nr
    @VikasJadhav-vs5nr 2 วันที่ผ่านมา +11

    राहुल भाई पाटील यांनी न्याय द्या त्या ताईला

  • @shamraobhagade7103
    @shamraobhagade7103 2 วันที่ผ่านมา +1

    बैलगाडा चालू करण्यासाठी न्यायाधिश यांनी निकाल दिला तो रद्द करण्यात यावा हि विनंती सरांना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 2 วันที่ผ่านมา +6

    सर्वसामान्य जनतेने आता तरी लक्षात घेतले पाहिजे आणि एकजुटीने पैसे वाल्यांचा माज उतरवला पाहिजे

  • @vishwakulkarni2375
    @vishwakulkarni2375 2 วันที่ผ่านมา +4

    गौत्या ला हणाला पाहिजे.. संघटना काय तर करा.. अंकिता ताई ला न्याय दया.. आपली लेक हय समजून पाठीशी रहा कळकळीची विनंती.. 🙏🏾

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 วันที่ผ่านมา +6

    सुंदर हा आम्ही आणणारच सरांची शेवटची इच्छा आहे आमच्या ती राहुल भाई आणी आम्ही पूर्ण करणारच

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 วันที่ผ่านมา +54

    कुठे गेली तुमची सघटना कुठे गेले युट्यूब वाले निगा बाहेर

    • @rahulsargar2440
      @rahulsargar2440 2 วันที่ผ่านมา +8

      te sagle siranchy body pashi ahet

    • @Akash_Kamthe
      @Akash_Kamthe 2 วันที่ผ่านมา

      @@rahulsargar2440kon ny itha

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 2 วันที่ผ่านมา +6

      👌👌... ते बॉडी जवळ असतील.. 🙏🙏

  • @user-xz6gp5rv6z
    @user-xz6gp5rv6z 2 วันที่ผ่านมา +3

    लव्ह यू सर

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 วันที่ผ่านมา +24

    सुकाचा संसार बिखरला बैलगाडा संघटना बंद करा

    • @MrYashYT9075
      @MrYashYT9075 2 วันที่ผ่านมา

      yee chup...😡😡😡 उगाच बैल गाडा का बंद करतोस 😡😡😡

  • @shyamtalekar9252
    @shyamtalekar9252 2 วันที่ผ่านมา +4

    शर्यती क्षेत्रात जर का माणसाने जीव गमवावा लागत असेल तर शर्यती बंद झालेल्या बऱ्या

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 2 วันที่ผ่านมา +2

    सरकार यांनी प्रकरण दाबू नये. दोषींना शिक्षा झाली पाहिजे

  • @AmolBhakare-sr3po
    @AmolBhakare-sr3po 2 วันที่ผ่านมา +16

    संघटनेने लवकर कारवाई करण्यात यावी नाहीतर संघटनेला काडीची किंमत राहणार नाही

    • @SantoshJadhav-mq5zu
      @SantoshJadhav-mq5zu 2 วันที่ผ่านมา +3

      Agadi barobar

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 2 วันที่ผ่านมา +2

      Nyay nahi milala tr nakki sharyt shetr band honar ...aslya Sanghatnecha kahi fayda nahi mg udya jahihi hou shakt

  • @nathaBendkoli-dh5uj
    @nathaBendkoli-dh5uj 2 วันที่ผ่านมา +9

    बैलगाडा बंद करावा संपूर्ण महाराष्ट्रत 🙏🙏खूप जणांचे जीव जात आहेत

  • @popathagare8528
    @popathagare8528 2 วันที่ผ่านมา +3

    आज काकडे व निंबाळकरदोन कुटुंबाची वाताहत झाली .
    नंदीचा तळतळाट लय वाईट असतो .
    हे ह्या काल घडलेल्या प्रसंगावरून समजतंय

  • @saurabhkadam5207
    @saurabhkadam5207 2 วันที่ผ่านมา +5

    बैलगाडी मालक जागे होयला हाव उद्या तुमचिवर्व ही वेळ येईल ह्या माणसाला शिक्षा देईला आपण एक होऊन मागे उभ राहूयात

  • @rajendrashinde3354
    @rajendrashinde3354 2 วันที่ผ่านมา +2

    बैलगाडा शर्यत चालू करणार्यांना हत्तीच्या पायाखाली द्यायला पाहीजे.

  • @sharadsonwane202
    @sharadsonwane202 2 วันที่ผ่านมา +1

    वाईट झालं कोणी असा विचार केला नव्हता

  • @maheshjadhav8733
    @maheshjadhav8733 2 วันที่ผ่านมา +20

    विचार करा बैलगाड्या क्षेत्रातील माणसं जर चालत्या बोलत्या माणसाला, त्याच्या बायको मुली समोर निर्घृणपणे मारत असतील, तर त्या मुक्या जनावरांचे काय हाल करीत असतील... बैलगाडा शर्यत बंद झालीच पाहिजे.

    • @trekkingthrills94
      @trekkingthrills94 2 วันที่ผ่านมา +8

      1 व्यक्ती च्या चुकी मुळे सगळ्या क्षेत्राला नाव ठेवू नका दादा.. किती तरिं गाडा मालक पोटच्या पोराला प्रमाणे जीव लावतात नंदी वर

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 2 วันที่ผ่านมา +1

    गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे निंबाळकर सरांना मनोभावे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nareshprabalkar
    @nareshprabalkar 2 วันที่ผ่านมา +3

    सुंदर आणि सर्जा ताईंनी राहुल दादा ला द्यायला पाहिजे

  • @bantipawaskar3599
    @bantipawaskar3599 2 วันที่ผ่านมา +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @sandeshkumbhar3739
    @sandeshkumbhar3739 2 วันที่ผ่านมา +3

    आगे बढो हम आपके साथ he 🙏

  • @varesarkar7775
    @varesarkar7775 2 วันที่ผ่านมา +9

    आर गृहमंत्री कूठय

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रामध्ये कायदा जिवंत आहे निंबाळकर सरांना न्याय देऊन सिद्ध होईल आपल्या भाषेमध्ये तो व्यवहार अपूर्ण आहे डायरेक्ट जाऊन बैल सोडून आणायचा

  • @rupalimane6547
    @rupalimane6547 2 วันที่ผ่านมา +4

    सुटी नाहि गोतम काकडे कुठ पन गाव

  • @rutikdate4531
    @rutikdate4531 2 วันที่ผ่านมา +1

    Adi sunder tabyat ghya

  • @shyamtalekar9252
    @shyamtalekar9252 2 วันที่ผ่านมา +3

    बैलगाडा शर्यत लवकर बंद करा

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 วันที่ผ่านมา +2

    Bhavpurna shraddhanjali nimbalkar sir

  • @shivajikathavle2214
    @shivajikathavle2214 2 วันที่ผ่านมา +3

    सर याना परत सर्जा वाट पाहत आहे 😭😭😭

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 2 วันที่ผ่านมา +1

    Sunder rahul bhai patil dya tai❤

  • @user-wb3sz9hy7t
    @user-wb3sz9hy7t 2 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @gokulkuklare4154
    @gokulkuklare4154 2 วันที่ผ่านมา +5

    सुदर माघे घय

  • @user-xz6gp5rv6z
    @user-xz6gp5rv6z 2 วันที่ผ่านมา +1

    शांत बसूच नका

  • @SandipBarve-d1s
    @SandipBarve-d1s 2 วันที่ผ่านมา +1

    Miss you sir❤❤

  • @krushnatpatil7232
    @krushnatpatil7232 2 วันที่ผ่านมา +4

    गौतम काकडे कसाब

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 2 วันที่ผ่านมา +6

    अखिर भारतीय संघटणा झोपलीया का आता

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 2 วันที่ผ่านมา +18

    आमच्या बहिणीला न्याय द्या

  • @maheshpatil3100
    @maheshpatil3100 2 วันที่ผ่านมา +2

    न्याय मिळाला पाहिजे ताई ला

  • @nileshkamble3131
    @nileshkamble3131 2 วันที่ผ่านมา +4

    बैलगाडा संघटना कुठे गेली??

  • @anirudhatandale6121
    @anirudhatandale6121 2 วันที่ผ่านมา

    खरे खरं निंबाळकर सर हा चांगला माणूस होता राव 😭

  • @supriyaa0001
    @supriyaa0001 วันที่ผ่านมา +1

    फसवाफसवी करणारे काकडे सगळे

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 วันที่ผ่านมา +2

    #rahul bhai mitrala nyay milaun dyav

  • @sachinmore1176
    @sachinmore1176 2 วันที่ผ่านมา +15

    Gautam kakade la fashi zali pahije
    Rip Ranjit sir

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 2 วันที่ผ่านมา +5

    पैशाच्या जोरावर आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर आज ना उद्या काकडे सही सलामत बाहेर येणार..... आपल्या देशात गरिबाला काडीची किंमत नाही

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 2 วันที่ผ่านมา +2

    ताईला न्याय भेटू द्या मिस यु सर

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 2 วันที่ผ่านมา +2

    Rahul bhai yat pudhakar gheun 😢 nyay dya tyana

  • @AnsarahmadAhmad-uf5ug
    @AnsarahmadAhmad-uf5ug 2 วันที่ผ่านมา

    Sagar bahu wayerman ani soma darwar khub sapot karat aahe sir cha family la salam tumala

  • @Ba-Ba-191
    @Ba-Ba-191 2 วันที่ผ่านมา

    बैल त्यांच्या ताब्यात ठेवला आणि कमी जास्त केल बैला सोबत तर 😢 शासन जबाबदार रहिल 😢 कारण जो माणूस माणसावर हल्ला करू शकतो तर प्राणी बैलावर नाही का 😢 सुंदर ला काही झाले तर मग सांगु

  • @kakabandal492
    @kakabandal492 2 วันที่ผ่านมา +2

    खरं म्हणजे सरकारने व न्यालयाने बैल गाडा शर्यतीवर बंदी आणली पाहिजेत 😡😡😡

  • @pravinkokare119
    @pravinkokare119 2 วันที่ผ่านมา

    Sunder vachva tya rakshsa pasun...rip sir

  • @RaviHola
    @RaviHola 2 วันที่ผ่านมา +1

    आमचा वाघ गेला😢😢😢😢😢

  • @user-xz6gp5rv6z
    @user-xz6gp5rv6z 2 วันที่ผ่านมา

    मिस यू सर 😭😭😭😭😭😭

  • @vaibhavpatil687
    @vaibhavpatil687 2 วันที่ผ่านมา +1

    न्या... मिळाला.. पाहिजे...

  • @rajendrainjekar1906
    @rajendrainjekar1906 2 วันที่ผ่านมา

    संघटना गौतम पाठीशी आहे

  • @user-xl6vk1kw4m
    @user-xl6vk1kw4m 2 วันที่ผ่านมา

    एवढं सगळं होऊन देखील ती दादाच म्हणतआहे

  • @maheshkambli5344
    @maheshkambli5344 2 วันที่ผ่านมา +2

    Fashi Chi shiksha zalich pahije

  • @MahavirKare
    @MahavirKare 2 วันที่ผ่านมา

    Miss you sir 🥹🥹

  • @user-tm2nf5xl7u
    @user-tm2nf5xl7u 2 วันที่ผ่านมา

    Rahul patil dada cha number ahe ka

  • @papputodkarfitnessfriends1591
    @papputodkarfitnessfriends1591 2 วันที่ผ่านมา

    Bailgada association kuthe aahe

  • @dhirajmhatre2829
    @dhirajmhatre2829 2 วันที่ผ่านมา

    Sirana nayay milallach pahije. Jevdhe loka tithe hote sarvan vr gunhe dakhal kara

  • @rajaramjadhav896
    @rajaramjadhav896 2 วันที่ผ่านมา

    शर्यतला काकडे यांनी कांलबा पासला

  • @PravinShirtode-cz6vl
    @PravinShirtode-cz6vl 2 วันที่ผ่านมา

    न्याय मिळवून देवावा

  • @aniltamboli-dv6ic
    @aniltamboli-dv6ic 2 วันที่ผ่านมา +3

    फारच वाईट घटना घडली ही. व्यवसाय व्यवहार काहीही असो पण असा अमानुष पणा करणे फारच गैर आहे.

  • @BaluKolekar-rs7lq
    @BaluKolekar-rs7lq 2 วันที่ผ่านมา

    पैशा साठी सरांचा जिव गेतला

  • @SurajDongare-e4t
    @SurajDongare-e4t วันที่ผ่านมา

    काही शिक्स्या नाही होत पैसे घेऊन जामिनवर सुटेल बगा

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 วันที่ผ่านมา +1

    Janmathepechi shiksha jhalich pahije 💯 ani tepan vina parrol.

  • @user-oh2vc5vd2u
    @user-oh2vc5vd2u 2 วันที่ผ่านมา

    लय हात ऊचलतो गरीबावर फेड आता करमाची फळ

  • @RaviHola
    @RaviHola 2 วันที่ผ่านมา

    मिस यु रणवीर निंबाळकर दादा 😔🥺☹️😞🙏

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 วันที่ผ่านมา

    नीच काकडे ला शर्यती मध्ये येऊ देऊ नका

  • @yashbitale3635
    @yashbitale3635 2 วันที่ผ่านมา

    बैलगाडी शेत्रात त्याला उभा करू नका आता

  • @krishnajadhav2779
    @krishnajadhav2779 2 วันที่ผ่านมา

    Bail Gadi sangtana malida gyang Aahe ki kay ek bhainila nay mileun dhya

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 2 วันที่ผ่านมา

    टरबूज कुठं आहे???त्याची वाचा कधी उघडणार आहे??

  • @sandeepshelke5629
    @sandeepshelke5629 2 วันที่ผ่านมา

    Yachya faqt Rahul bhai ch pay chalu shakto

  • @kailassonavle9897
    @kailassonavle9897 2 วันที่ผ่านมา +1

    आमच्या बहिणीला ण्ययद्या

  • @user-oy8df5up5x
    @user-oy8df5up5x 2 วันที่ผ่านมา

    Tya hadhgala fashi dya

  • @swaranjalimule8705
    @swaranjalimule8705 2 วันที่ผ่านมา

    Gunhegarala fasich zali pahije

  • @ruturajmadane9896
    @ruturajmadane9896 2 วันที่ผ่านมา

    🥹

  • @SmilingGermanShepherd-xg4zv
    @SmilingGermanShepherd-xg4zv 2 วันที่ผ่านมา

    Tyacha bail punha maidanat nkoy

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 วันที่ผ่านมา

    Bailgada kshetratla ekmev hasara vyaktimatva rokhthok bolnare amche sir aaj aplyatun nighun gele ha murder ahe
    miss you sir
    Bhavpurna shraddhanjali nimbalkar sir

  • @parmeshwarwinchurkar2384
    @parmeshwarwinchurkar2384 2 วันที่ผ่านมา

    अरे आता कोणांच् खर् मानव हा एक बोलतो दुसरे काही बोलते

  • @ganeshtasu386
    @ganeshtasu386 2 วันที่ผ่านมา

    Gautam kakde Sharad Pawar saheb yancha khas chela kuth gele saheb

  • @purankumarsarve6654
    @purankumarsarve6654 2 วันที่ผ่านมา

    Avdha motha don banla Kay to tyacha ghari jaun atak Kara avdhe pan bhavana ,

  • @MahavirKare
    @MahavirKare 2 วันที่ผ่านมา

    Gautam kakde la janm thep zalich pahije 😢😢😢

  • @swatighude7186
    @swatighude7186 2 วันที่ผ่านมา

    Shiksha nay zali t rahul patil nkki thoknar tyana