ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कांदिवली वरुन शेतात आले भेटायला।काजुची भाजी।हलवा फ्राय।दुपारच जेवण❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 มี.ค. 2023
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 433

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 ปีที่แล้ว +49

    शेत तर सुपर से ऊपर आहे.सफेद कॅप घाल.अरे ब्लॅक कॅप घालू नको उन्हातून अजून त्रास होईल.श्वेता आणि आई दोघीही मुंबईच्या आहेत तरीही खूप आवडीने शेतात काम करतात

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 ปีที่แล้ว +17

    अनिकेत तुजे बाबा आणि मामा ग्रेट आहेत त्यांच्या मेहनतीला सलाम एवढा काम करतात तरी त्याच्या चेहरा हसरा असतो थकवा जानवत नाही

  • @vaishali4825
    @vaishali4825 ปีที่แล้ว +13

    भर उन्हात चालणे आणि त्यात सोबत कुणी नाही वरती उन आणि पाण्याची ओढ खरच खूप खूप मेहनत आहे

  • @vaishali4825
    @vaishali4825 ปีที่แล้ว +15

    तुझ्या व्हिडिओची वाटच बघत असते मी खूप छान असतात आणि श्वेता ,आई,आणि बाबा खूप मेहनती आहेत . त्यात तुला पाण्यासाठी ची धडपड बघून तर तुला नमस्कार स्वामी सदैव पाठीशी राहोत ,हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @yashvantparanjape6303
    @yashvantparanjape6303 10 หลายเดือนก่อน

    कोकणातील समृध्दता सौंदर्य आपुलकी सर्वांनसमोर दाखवता धन्यवाद

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว +2

    उन्हाळ्यात शेती करायची फारच दगदगीचे आहे..... पुढील वर्षी अभ्यास पुर्व शेती कर...एका ओळीत भुईमूग पेरणी केली तर भांगलणी कोळपणी करणे सोपे जाते... तुमच्या मेहनतीला भरभरुन यश मिळो ही सदिच्छा 👍👍👍

  • @snehasawant6123
    @snehasawant6123 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तू नंबर 1 टरकू आहेस ,माझे मणक्याचे ऑपरेशनमुळे पाय दुखतो आहे,आज हसून हसून खूपच मजा आली ,कालव्याच्या पायवाटेने जाताना जे काय बोलत होता ना तेंव्हा तूझ्या मागून येऊन भुओ( bhuo) करून तुझी मजा करावी असे वाटत होते, किती घाबरतो रे ,तरुण पिढीला तूझ्या कृतीतून खूप छान संदेश देत आहेस,हॅट्स ऑफ तुला आणी तूझ्या आई -बाबांना खूप खूप मोठा हो आणि आम्हा म्हाताऱ्याना हसवत राहा,👍👌🎂💐😊

  • @pranitlandge3117
    @pranitlandge3117 ปีที่แล้ว +2

    अनिकेत दादा मी नगर जिल्ह्यातला आहे आणि आमच्या शेतात सुध्दा नेहमी आम्ही भुईमूग घेतो..पण अशी भर आत्तापर्यंत कधीच घातली नाही..आणि त्याचा काही परिणाम ही होत नाही..आमचे जवळ जवळ ३-4 एकर भुईमुगाचे क्षेत्र असते त्यामुळे अशी भर घालणे परवडणार देखील नाही

  • @amard993
    @amard993 ปีที่แล้ว +5

    एकच सांगतो शेंगा लावल्या नंतर त्याला फक्त खुरपणी आणि खत लागत भर लागत नाही

  • @mahendravasudeomarde7661
    @mahendravasudeomarde7661 ปีที่แล้ว +3

    अनिकेत तूजी हिरविगार शेती बघुन खुप छान वाट्ते . कारन तू आई आणि बाबा नी शेती साटी केलेलि पहिल्या दिवसा पासुनची मेहनत मी बाघितली आहे.👍👏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम ब्लॉग, सुरुवाती चा shot जबरदस्त, आईने पण थोड थोड ब्लॉगींग सुरुवात केली पाहीजे, ती खुप छान बोलते, शेतीची कामे बऱ्यापैकी झाली आहेत, मामींच्या हातचे जेवण अप्रतिम, मामाच्या बनवलेल्या माशा ना तोड नाही, जबरदस्त👍👌

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +4

    अनिकेत श्वेता असेच😄😃😁 राहा ओल्या काजूची भाजी छानच आई बाबा कष्टाळू आहेत आनंदी आनंद आहे काजी बरेच धरले मस्तच धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว +5

    एकदम भारी येवढेच सांगेन सलाम माझ्या शेतकरी बांधवांना कारण खुप कष्ट करावे लागतात माझ्या शेतकर्याना छान व्हिडिओ दादा 👌❤️🙏

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc ปีที่แล้ว +3

    आई आणि बाबा ची खूप मेहनत आहे आणि दोन्ही जेवणाच म्हणशील तर काजूची भाजी खूप फेवरेट 😄😋

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 ปีที่แล้ว +1

    काजूची भाजी लय भारी हलवा कधीपण खावे शकतो काजु चीन भाजी वर्षातून एकदाच तु खाली चव माझ्या तोंडाला आली तु खरा श्रीमंत माणुस आहे

  • @sangrambhandirge746
    @sangrambhandirge746 ปีที่แล้ว +5

    आमच्या सातारा जिल्ह्यातील भागात शक्यतो पाऊसाळ्यात भोंईमूग करतात त्यामुळे भर घालावी लागत नाही पाणी वेळेवर मिळनार असेल तर भर घालू नको .जर पाणी भरपूर नसेल भर घाल,इकडची जमीन काळी आहे

  • @sudhirjadhav545
    @sudhirjadhav545 ปีที่แล้ว

    उत्तम , छान , मस्त , अप्रतिम अजून कोणती उपमा देऊ तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
    🥀🥀🌹🌹🙏🙏🙏

  • @mandarsawant7309
    @mandarsawant7309 ปีที่แล้ว

    भुईमूग लागवडीला मेहनत घेतली तुम्ही, भरपूर पिक येऊदे, आता हलवा की काजू तर माझ्या मते काजू कारण मला पण काजूची भाजी खूप आवडते, ओले काजू वर्षाने एकदाच मिळतात.

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 ปีที่แล้ว +1

    अनिकेत आई, आणि बाबा खरच खूप दमले आहेत आरामाची गरज आहे दोघांना मेहनतीला सलाम

  • @txxsandy5325
    @txxsandy5325 ปีที่แล้ว +6

    Dada kharach karaychi garaj nahiye rey♥️
    Asa normal aahe tasa thevla tari yetil bharpur shenga...
    Me also from solapur ♥️
    Love you dadu🫂

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 ปีที่แล้ว +1

    सुरूवात खूप छान व सुंदर केली पत्याभाई तुमचे दर्शन दिले आनंद झाला आज सुट्टी आहे का आमच्यासाठी वेळ काढून व्हिडिओ मध्ये आला असो पण खूप दिवसांनी अनिकेत बरोबर आला जुने दिवस आठवले खरच आई पप्पांच्या मेहनतीला मानाचा मुजरा 🙏🙏🙏आई तुम्हाला संधीवाताचा ञास आहे काळजी घ्या शेती करणे गरजेचे आहे पण त्याच बरोबर तुमची तब्येतीची काळजी घ्या तुम्ही चांगल्या तर अजून खूप खूप छान व सुंदर शेती होणारच रागवू नका चुकीचे असेल तर माफ करा स्वॉरी 🙏🙏🙏पण तुमच्या अंगात अजिबात रक्त नाही तुम्हाला खरच खुप दम लागतो व तब्येत नुसती जाड झाल्यासारखे वाटत आहे हे चांगले नाही शरीराकडे लक्ष द्या अंगाला सूज आहे त्यामुळे शरीर खूप दुखते तरीही आनंदाने शेतात काम करता व आज खरच व्हिडिओ मी अनिकेत रासम जसे बोलतो तसे छान बोलल्या व आसामच्या महिला जश्या चहाच्या मळ्यात काम करताना दिसतात तश्याच दिसत होत्या चेहर्‍यावर आनंद ही तसाच आज मामा मामींनी खरच छान व सुंदर जेवन केले हे प्रेम आपलेपणा शहरात पहायला मिळणार नाही शहरात पाणीसुद्धा मिळणार नाही जेवन तर विसरूनच जा पाहुणे किती प्रेमाने भेटायला आले व त्यांचा छोटा मुलगा जेंव्हा शेतात फिरायला जात होता तेंव्हा खरच अगदी मनापासून सांगते खोटे बोलत नाही मला वाटले तुझा मुलगाच असा बालगोपाळ फिरतआहे व हे नक्कीच आम्ही पाहणारच खूप खूप आनंद झाला मनातून कारण तुझी जोडीदार ही सुद्धा शेताला गावाला महत्त्व देते मग त्यांचा बालगोपाळ सुद्धा असाच शेतात धुडूधुडू धावणार हे लिहीतानाही मन आनंदाने भरून आले डोळे पाणावले कारण जो शेतासाठी इतके कष्ट करतो शेतालाच आपले सर्वस्व मानतो शेतातुन मोती करतो त्याचा मुलगाही असाच गोड क्युट बाळकृष्ण मातीत खेळूनच मोठा होणार व त्यात पप्पांनी त्याला कडेवरही किती प्रेमाने घेतले अरे हे आजोंबाचे प्रेम नातवांना नाही मिळत कारण आजी आजोबा हे काय हेच नातवंडांना माहीत नसते पण पप्पांच्या कडेवर हा आनंद त्या चिमुकल्याने घेतला व पुढे तुझा मुलगा हक्काने हे स्वर्गीय सुख घेणारच खरच तुझ्याकडे मनाची श्रीमंती खूप आहे व देवाहूनही सर्वश्रेष्ठ असे आई वडील यांचा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर रहाणारच आहे व शिदोरी लाख कोटींची आहे मामा तुमची रेसिपी अप्रतिम असणारच पण रागवू नका श्वेता खात नसताना अनिकेत साठी नॉनवेज बनवते प्रयत्न मन लावून करते त्यामुळे माझ्या मते तिची रेसिपी मस्तच आहे व तुम्ही सुद्धा हेच बोलणार काजूची भाजी मस्त का नॉनवेज तर आम्ही काजूच्या भाजीला जास्त नंबर देणार व आम्हाला काजू पहायलाही मिळत नाही व तुमच्याकडे काजूचा सडा पडलेला असतो म्हणजे कोकणी माणूस मनाने श्रींमत तर आहेच पण त्याबरोबरच ऩशीबानेही सुखी व आनंदी आहे व खाणेही शहरात पैसा देवूनही मिळणार नाही अशी सुंदर व आरोग्यासाठी उत्तम पौस्टीक आहार करतो तसेच आमच्या कडे शेंगाना भर घालत नाही पण काही ठिकाणी घालावी लागते आई बरोबर बोलली जशी जमीन तसे उपाय करावे लागतात पण पिशव्या बांधत नाही प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहे आमच्या कडे शेंगाचे पीक छान मस्तच होते पण कष्ट खूप करावे लागतात व सगळ्यात महत्त्वाचं खर्च खूप येतो शेती करणे इतके सोपे नाही पैसा अगोदर गुंतवणूक करून मग आपल्याला त्याचे फळ मिळते पण तु कधीही खर्चाचा विषय करत नाही हा तुझ्या मनाचा मोठेपणा 🙏🙏🙏व पुरण पोळी आई छान करणार की श्वेता तर आई आता अनिकेतचे लाड करुच नका तुमचीच पुरणपोळी सुंदरच होणार पण अनिकेत खोटेच पण प्रेमाने जरा श्वेतानेही छान केली असे बोलणार हे दोघांचे प्रेम तुम्हाला सुद्धा आवडेल हे नक्कीच पण त्याला पुऱणपोळी खूप खूप आवडते हे आम्हाला माहित आहे तुम्ही आराम करा व श्वेता तुच अनिकेतला शिकव व दोघे मिळून आईलाच खाऊ घाला व हे अनिकेत आनंदाने करेल कारण कुठल्याच गोष्टीला तो नाही बोलणार नाही काम असेल तर तो आनंदाने करतो म्हणून तर तिथे लक्ष्मीचा सदैव वास आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Thank u tau❤️

    • @anitatilaye2485
      @anitatilaye2485 ปีที่แล้ว

      तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम 🙏

  • @satishnalavade3684
    @satishnalavade3684 ปีที่แล้ว +1

    कोल्हापुरात भुईमूगा ची शेती जास्त प्रमाणात करतात
    पण भर घालत नाही, विडिओ सुंदर आहेत.

  • @vijayshreemore8819
    @vijayshreemore8819 ปีที่แล้ว +3

    Your mother is so sweet 💞 we love and respect to your parents 💟

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 ปีที่แล้ว +1

    तुझ्या मेहनतीला सलाम....काजूची भाजी खूप छान....😍अप्रतिम ब्लॉग....❤️

  • @youtubeshort.....2641
    @youtubeshort.....2641 ปีที่แล้ว

    Radhangari madhe lahan lahan Sari karun te lavtat kiva line aakhun te lavtat Pan ikde bhar nhi lavat, ran yeu naye mhnanun tumhi mati lavat asal, ran kadhnysathi chot attachebale awjar milat bajaramdhe tumhi tyacha use karun, tras kami hoil ,kalji ghya ❤❤❤

  • @balajimarepalle8132
    @balajimarepalle8132 ปีที่แล้ว

    खुप छान विडीओ असतात दादा तुझे , तुझे प्रत्येक विडिओ मी आवर्जून पाहतो खुप छान वाटतात तुझे विडिओ 🙏

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 ปีที่แล้ว

    Khup sunder video Bappa bless you 😍 kaki kaka 😍😍 Halwa Lay bhari 😍 khup mehant ahe bhava आई पावणादेवी चा आशिर्वाद सदैव राहू दे 🙏

  • @mangeshbane4690
    @mangeshbane4690 ปีที่แล้ว

    मी कमेंट केली असती पण शेतीविषयी माझच ज्ञान कमी आहे. तु कर म्हणजे मलापण समजेल
    मी हलवा कॅटेग्रीतला आहे. तुझ्या मेहनतीसाठी फुल मार्क 👌👍👏

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 ปีที่แล้ว +5

    एकटं जाऊ नको बरोबर कुणीतरी पाहिजे. चवळी मूग छान झाले आहेत 👌🏻👍🏻

  • @soniamalgoankar930
    @soniamalgoankar930 ปีที่แล้ว +2

    Salute to your aai and papa 🙏 you are doing great job

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 ปีที่แล้ว +1

    आई बघ, हॆ उडव.. ते उडव.. 😂😂 भारी एकदम.. तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम. 👍🏻👍🏻

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 ปีที่แล้ว +1

    खूप भारी दिसते आहे शेती, आखीर मेहनत रंग लाई 🌿🌱चवळी, मूग शेंगा छानच आल्यात आणि कोवळे कच्चे मूग चवीला मस्त लागतात 👌
    मी पोरबंदर, गुजरात चे एक u tube चॅनेल पहाते, त्यांचे मूळ पिक भुईमूग, कैक एकर भुईमूग करतात, पण कधी त्यांनी अशी भर घातल्याचे पाहिले नाही.
    मुक्काम पोस्ट कोकण चॅनेल चा शशांक ठाकूर तुझा मित्र ना, मग तो तर दर वर्षी भुईमूग करतो. तू त्याला का विचारत नाहीस ? मी मागे पण तूला तसे सुचवले होते. असो, तुम्ही सर्व खूप मेहनत घेत आहात , यश नक्की मिळणार 👍

  • @rohitpatil6825
    @rohitpatil6825 ปีที่แล้ว

    @Aniket Bhau - Just ek thought dokyat ala - if possible Drone sobat asel tar kalvyacha pani baghnyasathi swataha jaychi garaj nai 😅
    Drone uudvaycha n pani ahe ki nai shetatunch baghaycha ( within flying range)

  • @spnikam5307
    @spnikam5307 ปีที่แล้ว +2

    It's called mulching. Using plastic thin paper helps to keep moisture and keep crop clean,. and to reduce cost of production.

  • @aartisawant8145
    @aartisawant8145 ปีที่แล้ว

    खुप मेहनती आहेस, तू आई बाबा खुप छान वाटले, पाहून, हे पाहून गावची आठवण येते,

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 ปีที่แล้ว

    Halvyatle aani mi roj video baghte aani tya agodar like karte

  • @bapupatil981
    @bapupatil981 ปีที่แล้ว

    आमच्या खानदेशात पण अशी भर वगैरे नाही करत मी पहील्यांदाच बघतो हे अस ईकडे तर खूप प्रमाणात भुईमूग करतात

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Apratim Mug Shenga
    Mast Food
    Bhari Blog
    👌👌👌👌👌👌👌

  • @ParvezKhan-vl3jb
    @ParvezKhan-vl3jb ปีที่แล้ว +1

    काजू आणि हलवा दोनू पन मस्त एक नम्बर

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 ปีที่แล้ว +2

    दादा गाडी घेऊन जायाच पानी बघायला आमच्याकडे चींच वडाचझाड पान्याच्या ठीकानी रात्री वबारावाजता जात नाहीत हे आबां झाडाच पही ले वेळ ऐईकल

  • @geetabhutal6593
    @geetabhutal6593 ปีที่แล้ว +2

    सर्वच एका पेक्षा एक कलाकार आहे खुप छान

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 ปีที่แล้ว

    Ek number Aniket aaaicha try super hota god bless aaaaiii

  • @mahadevcharatkar5223
    @mahadevcharatkar5223 ปีที่แล้ว

    अनिकेत आजचा ब्लॉक खूपच छान होता
    तुझा मेहनतीला सलाम

  • @shrutighadigaonkar5558
    @shrutighadigaonkar5558 ปีที่แล้ว +4

    दादा तुझ्या सर्व व्हिडीओ खूप छान असतात...आम्ही तुझ्या सर्व व्हिडीओ बघतो...👌👌

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 ปีที่แล้ว

      खुप मेहनत करता तुम्ही.छान शेती.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 ปีที่แล้ว

      काजुची भाजी आणि हलवा.दोन्ही आवडीचे.छान रेसिपी.

    • @chandrakantsawant8970
      @chandrakantsawant8970 ปีที่แล้ว

      Halva.fish

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 ปีที่แล้ว +1

    Aniket tu aani tuzi family kiti kam kartat tari hi nehami hasat asta great work,take care all the best, nice video

  • @rutikkamble7458
    @rutikkamble7458 ปีที่แล้ว +1

    Chup chhan aniket ✨🥰 aai khup chhan bolya 🥰

  • @swaroopshinde7453
    @swaroopshinde7453 ปีที่แล้ว

    भुईमुगाला भर घातली नाही तरी चालतीया पण भुईमुगाला आरा फुटल्या की पाणी लांबवाय लागतंय म्हणजे आरा खोल जमिनीत जाऊन शेंगा चांगल्या भरत्यात. सारखं पाणी दिलं की आरा वरच्या वर राहून गाजरा सारख्या शेंगा हुत्यात.

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 ปีที่แล้ว +1

    Kaju chi Bhaji, please all you take care wear hat and carry water bottle while walk away for search for water

  • @nileshpujare6243
    @nileshpujare6243 ปีที่แล้ว +2

    तुला आणि आई बाबांना आशीर्वाद

  • @kajalchavanvideolog8890
    @kajalchavanvideolog8890 ปีที่แล้ว +1

    Nex taim tumhala nakki gaid karen dada pahila pryatna pn khup Chan aahe tumcha ... Chan aahe bhuimug

  • @shilpadesai9655
    @shilpadesai9655 ปีที่แล้ว

    किती मेहनत करता तुम्ही सर्व जण तुमचा मेहनतीक भरपूर यश मिळू दे

  • @kashinathsukkate5449
    @kashinathsukkate5449 ปีที่แล้ว +1

    Aamchya kade Bhar ghalt nay ahmednagar

  • @rajashreesuryavanshi3906
    @rajashreesuryavanshi3906 ปีที่แล้ว +1

    छान पोटभर जेवण झाले असे म्हटल्यास आमच्याच पोट भरल्यासारखं वाटते 😊

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 ปีที่แล้ว

    Ye dosti hum nahi todenge

  • @imranhasangadkari9692
    @imranhasangadkari9692 ปีที่แล้ว +1

    Namaskar dada.

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 ปีที่แล้ว

    Khup chan.aai pappa tu sagale mehanati ahat.Shweta mumbaichi asun richie pan saath ahe tumhala.mama mami tumachi sagali family khup chan ahe.❤

  • @vivekgolar-fr9yv
    @vivekgolar-fr9yv ปีที่แล้ว +1

    Bhuimuga chya fulavar mati takaychi garj nahi pan roptyachya budashi bhar ghalavi lagte....pudha chya velela bhuimug saral eka ranget, don olimadhe 2 kiva 2.25 foot antar theun chhota tractor kiva bail jodine pershil... Jenekarun tula bhar ghaltana davarni karta yeil... Davarni hi bailanchya madtine kiva chhotya chya madtine karta yete... Yamule bhar ghalni ek divasat ani ek manus karu shakti... Pikala ase pani (patpani) dilyane panya cha andaj yet nahi. Tyamule pik yellow hou shakte... Bhar ghalat paryant kami pani dyave... Tya nanter kitihi dil tari chalel... Spinkler ne pani dil tar jast effective hoil... Pan thibak nako... Vedio chhan astata

  • @poojashinde4198
    @poojashinde4198 ปีที่แล้ว +2

    Kaku khup mst ahet

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 ปีที่แล้ว

    तुम्ही सर्व खूप मेहनत करताय👌काजुची भाजी,😇

  • @spnikam5307
    @spnikam5307 ปีที่แล้ว +3

    Excellent vlog. Labour problem in farming is very actue and headache to farmers.

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 ปีที่แล้ว

    Nice volg tumhi saglecha khup mehati ahat me halwa catagarytali

  • @kavitatemkar2727
    @kavitatemkar2727 ปีที่แล้ว

    Nehami pramanech video sunder zalay. Sagale eaktra pangat karun jevayla basta khup chhan. Hasmukh ahet saglech.

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 ปีที่แล้ว

    हलवा

  • @s.p.5115
    @s.p.5115 ปีที่แล้ว

    Are tumachuakade shingoba dongaravar javun night camping ka karat nahit tumhi yevadi sundar jaga aahe yar ...

  • @jyotipanchal4204
    @jyotipanchal4204 ปีที่แล้ว +3

    हसरी आजीला दाखव

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 ปีที่แล้ว +1

    अनिकेत बाळा तुला सलाम

  • @Motivationquotescafe
    @Motivationquotescafe ปีที่แล้ว

    Mala vatate ghar cha aju baju la tu pan ase sagle bhaji lav tomato mirchi ani je jamel te

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 ปีที่แล้ว

    खूप मेहनत करता तुम्ही. शेती छान झाली आहे. 👌👌

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +1

    Salute your pappa & mummy . They are doing hard work in farm with under sun shine.

  • @ajinathsanap2039
    @ajinathsanap2039 ปีที่แล้ว +1

    Dada bhar nako ghalu me maghcha varshi 12 kilo perla hota 10 gonya nighalya mala sengachya me ahmednagarcha ahe

  • @kajalchavanvideolog8890
    @kajalchavanvideolog8890 ปีที่แล้ว +1

    Aniket dada pn kharach bhar nahi ghalat sory pn tumhi extra mehanat kartay jyachi aajibat garaj nahi 🙏 ha aamcha buashet bolaycha zala te khurapni karne aawashak aahe aani tumcha bhashet bolaycha tr je ran majla aasel te kadne garjeche aasta 🙏

  • @kedarsontakke6942
    @kedarsontakke6942 ปีที่แล้ว

    सलाम आहे तुमच्या मेहनतीला 🙌

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 ปีที่แล้ว

    Hoy Dada Aplyakkade bhar ghalavi lagte. Karan aplyakadchi mati kadak aahe. Aani Ghat mathyavarti mati khup mau aaste. Aani tikde tractor ne nagarni kartat to ek plus point aahe. Aamcha mitrani ghatli aahe bharni. 🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Thank u

    • @Kolhapuri_Vikas
      @Kolhapuri_Vikas ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आमच्या कोल्हापूर भागात ट्रॅक्टर नांगरणी करताना मोठा फाळ लावतात त्यामुळे जमीन जास्त खोदली जाते त्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि शेंगा जास्त उतरतात.

  • @abhijeetpatil4195
    @abhijeetpatil4195 ปีที่แล้ว +1

    Tumcha tighanchi shetat ji tumhi mehnat keli ahe tyach fal disun yet ahet

  • @scorecard1007
    @scorecard1007 ปีที่แล้ว

    Best vlogger 👍

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan❤

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 ปีที่แล้ว

    Khupch khupch khupch 💐💐🙏🙏

  • @pramodnipanikar1947
    @pramodnipanikar1947 ปีที่แล้ว

    Aniket Aai barobar bolatat bhar ghalavi lagal ya jaminit karan Solapur chi jamin kali kasadar bhusbhushin asate mhanun fakta bhuemug perun zala ki chalatay.

  • @abcdabcd6006
    @abcdabcd6006 ปีที่แล้ว +3

    Kajubhaji recipe dakhaw .

  • @roshanibhoir8087
    @roshanibhoir8087 ปีที่แล้ว

    Dada aai sangtil tech aaik aaich yogy sangel

  • @dayananddhalvalkar3399
    @dayananddhalvalkar3399 ปีที่แล้ว

    Mast videos bhava

  • @manoj2404
    @manoj2404 ปีที่แล้ว +2

    Use your drone to check the water status rather than walking so much

  • @varshakadam812
    @varshakadam812 ปีที่แล้ว

    खूप कष्ट करता रे बाबानू

  • @deepakrahate4123
    @deepakrahate4123 ปีที่แล้ว

    Chan video aniket bhuibugachi sheti barobar thodi kalingad karayla pahije hoto garmi chalu hote ahe atta best of luck aniket and family 👍👍👍

  • @shaileshsawant9563
    @shaileshsawant9563 ปีที่แล้ว

    Pratyek thikanchi mati vegvegli aste solapur aani kokanatil matimadhye farak aahe tuzi aai mhante Tashi Shenga righayala mati bhus bhushit asne jaruri aahe

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 ปีที่แล้ว

    वारूळ मुंग्यांचं असतं त्यात साप आयता येऊन रहातो म्हणून म्हण आहे ना आयत्या बिळात नागोबा

  • @manojgawadevlogs7213
    @manojgawadevlogs7213 ปีที่แล้ว +2

    Namaskar 🙏

  • @shaileshsawant9563
    @shaileshsawant9563 ปีที่แล้ว +2

    Baki tuzi family great aahe

  • @prashantyele1891
    @prashantyele1891 ปีที่แล้ว

    भर आम्ही पण नाही गालत सातारा

  • @NamrataNK
    @NamrataNK ปีที่แล้ว

    Kajuchi bhaji ani aaenchi smile

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 ปีที่แล้ว

    काजु आणि हलवा दोन्ही किमती वस्तु आहेत मात्र दोंघाचे सात्विक आणि तामसी हे गुण बरच काही घडवु शकतात, त्यामुळे मांसाहार खाताना किमान संकष्टी एकादशी सारख्या तिथी, वार पाळता आल्या तर उत्तमच. पाळायलाच हवे असा दंडक नाही.
    🙏

  • @ninadmhatre-ye2pe
    @ninadmhatre-ye2pe ปีที่แล้ว +1

    First comment mi keli kay Andya dada Aniket dadus Maka kay ta sangh

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 ปีที่แล้ว +1

    एवढया लांब कालव्या पर्यंत जायला सायकल नाही का ठेवता येणार ,किती लांब जावे लागते, बाकी शेती एक नंबर

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว

    Aniket aamhi hi bhuimugachi sheti keliy pan maati lavne ha prakar aamcya bhagat naahi hot.
    Aamhi bhuimug khurapato tyamule kay hote ki vadhalele gavt kadhale jate aani bhuimugala mulana aarya laglelya astat mhanjech shengach astat tya tyanche khuraplyane jamin bhusbhushit mokali houn poshan changlech hote.
    Aso pratek gavakadchi paddhat vegli aste.
    Aamcya kade 8, 9,akar bhuimug kelela aahe. tumhi pan khup mehanat ghetayt.
    Aai baba hi khup mehanat ghet aahet tu pan ghetos. Aani mehanatiche phalahi chhan milanar.

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 ปีที่แล้ว

    Ek number

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 ปีที่แล้ว

    आमच्याकडे नाही अशी भर घालत , शेंगा पण भरपूर येतात,मातीची भर घालन compalsary नाही

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 ปีที่แล้ว

    छान शेत हिरवेगार आहे.

  • @pramodiniraundal3042
    @pramodiniraundal3042 ปีที่แล้ว +1

    Dada aamhi nashik ce aahot .aamcya kde pn nahi bhar ghalat kdhic.

  • @sindhudurgbattery237
    @sindhudurgbattery237 ปีที่แล้ว

    Mast

  • @sudhirdongare920
    @sudhirdongare920 ปีที่แล้ว +1

    Missing my Achirne