नावडती भाजी आता होणार आवडती ❤️ | तोंडली काचऱ्या | तोंडली भाजी | Tondali Kacharya | Bhaji Recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2023
  • नावडती भाजी आता होणार आवडती ❤️ | तोंडली काचऱ्या | तोंडली भाजी | Tondali Kacharya | Bhaji Recipe |
    #vaishalideshpande #marathirecipe #food #भाजी #bhajirecipe #tondalichibhaji #vaishalideshpanderecipes #recipevideo #recipe #quickrecipe #kitchenhacks #bhaji #thali #tondalibhajirecipe #तोंडलीचीभाजी
    तोंडली भाजी साहित्य आणि प्रमाण :
    २५० ग्रॅम तोंडली
    ५ टेबलस्पून तेल
    १ टीस्पून मोहरी
    १/४ टीस्पून हिंग
    १ टेबलस्पून लाल तिखट
    १/२ टीस्पून हळद
    १/२ टीस्पून आमचूर पावडर
    चवीनुसार मीठ
    ओले खोबरे सजावटीसाठी
    बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 30

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 ปีที่แล้ว +2

    आणि एखादा व्हिडिओ खूप आवडला तर मनापासून शुभेच्छाही देते.50 वर्ष स्वैपाक केला असला तरी आपल्यापेक्षा लहानांचे अनुभव आणि टिप्स अनुकरणीय असतात.लहानांकडूनही खूप शिकायला मिळतं.😊

  • @komalrecipes2663
    @komalrecipes2663 ปีที่แล้ว

    छान recipe

  • @kavitakhedkar4353
    @kavitakhedkar4353 ปีที่แล้ว

    अशा पद्धतीने नक्की करून बघेन

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 หลายเดือนก่อน

    Tasty❤❤❤

  • @bhartimali7929
    @bhartimali7929 ปีที่แล้ว

    Chan

  • @aatulkavalanekar
    @aatulkavalanekar ปีที่แล้ว

    Mast

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 ปีที่แล้ว

    माझी कमेंट खिलाडूपणे घेतली ह्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद. मी मोजक्याच जणांच्या रेसिपीज् बघते.त्यात एखादी खटकणारी बाब कमेंट करून कळवते.त्यात टीकेचा हेतू नसतो.उलट व्हिडिओ आणखी छान होण्यासाठीचा प्रयत्न असतो.
    नव्याने शिकणाऱ्यांसाठी सविस्तर सांगता हेही पटलेच.
    तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ज् साठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशिर्वाद. मी तुम्हाला आशिर्वाद देण्याइतकी नक्कीच मोठी असेन 😊🤝

  • @anupamadeshmukh3731
    @anupamadeshmukh3731 หลายเดือนก่อน

    जीवनसत्वे पाण्यात फुकट जाणार नाहीत का?

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 ปีที่แล้ว +2

    😀किती छान योगायोग! सध्या आमच्याकडे तोंडलीला खूप बहर आहे एक दिवस‌आड मिळतात.माझ्या मुलीला आवडतात काचऱ्या.
    मी करते नेहमी अगदी अशाच.👍🙏👌👌

    • @shubhanginerlekar9971
      @shubhanginerlekar9971 ปีที่แล้ว

      आम्ही अशीच करतो फक्त लाल मिरची न वापरता हिरवी मिरची फोडणीत घालतो.बाकी सगळी पद्धत अगदी same.तशी भाजी सुद्धा खूप छान लागते.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      घराच्या अंगणात झालेली तोंडली. त्याची चव अजून छान लागत असेल.

    • @janhaviborwankar453
      @janhaviborwankar453 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande हो ना आणि ती सुद्धा organic.

  • @user-gc9tf9kn1d
    @user-gc9tf9kn1d ปีที่แล้ว

    माझ्या सासूबाईंच्या हातची ही भाजी म्हणजे केवळ अहाहा.... सगळ्या चवी अशा एकाच भाजीत त्या कशा आणतात कोण जाणे, आंबट-तिखट-गोड-कडवट. मी तश्शीच करते तरी चवीत दुय्यमच ठरते 😊

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว +1

      मला वाटतं आपली आई, आजी, सासूबाई यांच्या हातची चव वेगळेच असते.

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 ปีที่แล้ว +1

    छान रेसीपी 👌👌🙏चुकून तेल जास्त झाले तरी पीठ पेरून भाजी छान लागते.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      हो. अगदी करू शकतो.

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 ปีที่แล้ว

      ​@@VaishaliDeshpande खुप छान

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 ปีที่แล้ว

    मी अगदी अशीच भाजी करते.माझा अडीच वर्षांचा नातू ही भाजी नुसती घेऊन खातो

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 ปีที่แล้ว

    koknatli kandyachi jhanjhanit amti veg veg lya padhatine kartat - ti dakhva na ekda !

  • @neelamkanhere8735
    @neelamkanhere8735 ปีที่แล้ว +4

    सगळ्याच रोजच्या भाज्या दाखवाल का,?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      हो. नक्की करूयात. आपल्या चॅनलवर रोजच्या जेवणात होणाऱ्या काही भाज्या दाखवल्या आहेत. भरली वांगी, कोबी, फ्लॉवर, बटाटा, सिमला मिरची, मेथी मटर मलई यासारख्या अजूनही काही भाज्या दाखवल्या आहेत.

    • @neelamkanhere8735
      @neelamkanhere8735 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande पालेभाज्या, गोळा भाजी, पातळ भाजी अशा दाखवा plz

    • @nehadeshmukh2469
      @nehadeshmukh2469 ปีที่แล้ว

      पालकांची पळीवाढी भाजी दाखवा

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 ปีที่แล้ว

    तोंडली चीरली की हाताची बोटे आकासल्यासारखी अशी काहीतरी होतात, त्यामुळे आधी हाताला जरा तेल लावून घ्यावे.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว +2

      हो नक्कीच लावू शकतो. पण मला.वाटते की बोटांना तेल लावले तर तोंडली सुरीने चिरताना तोंडली हातातून पटकन सरकून कधीतरी बोटाला सुरी लागू शकते. तोंडली चिरली की हाताला मीठ चोळले तरी हात स्वच्छ होतात.

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 ปีที่แล้ว +1

    रेसिपी ज् छान असतात.पण निवेदन गरजेपेक्षा जास्त सविस्तर आणि काहीसं कृत्रिम वाटतं.मत मनमोकळेपणाने मांडलं
    .कृपया गैरसमज नसावा.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      सुनिता ताई,
      आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा नव्याने स्वयंपाक शिकत असतात त्यांना काही गोष्टी सांगण्यासाठी व्हिडिओ सविस्तर करावा लागतो. त्या छोट्या छोट्या टिप्स मधून पदार्थ करताना ते न चुकता करू शकतात. पण तुमची सूचना मी नक्की लक्षात ठेवते.

    • @snehalbhave3290
      @snehalbhave3290 5 หลายเดือนก่อน

      नाही नाही, निवेदन अगदी छान असते, गरजेपेक्षा मुळीच जास्त नसते, एखाद्या गोष्टीमागील करणे सांगताना, आवश्यक टिप्स सांगताना निवेदन सविस्तर होणारच. निवेदन कृत्रिम नक्कीच नाही, उलट आपलीच ताई/आई/ मावशी सांगत आहे असे वाटते. मला वैशाली ताईच्या रेसिपीज खूपच आवडतात.