Balasaheb Patil vs Manoj Ghorpade कोण होईल Karad Uttar Vidhansabha चा पुढील आमदार ?| Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Balasaheb Patil vs Manoj Ghorpade कोण होईल Karad Uttar Vidhansabha चा पुढील आमदार ?| Vishaych Bhari
    तारीख होती ०२ जुलै 2023! रविवारचा दिवस होता. सुट्टी असल्याने माणसं न्याहारी उरकून दुपारच्या वेळी डुलक्या घेत होती. तेवढ्यात सबंध महाराष्ट्रात एकच हूल उठली.... पवारांची राष्ट्रवादी फुटली. लोकांनी पटपट टीव्ही लावले, मोबाईल पाहिले तर एव्हाना तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन, सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला होता. अजित पवार यांनी राजभवनात पक्षातील इतर ८ ज्येष्ठ आमदारांसह मंत्री पदाची शपथ घेतली असल्याची ब्रेकिंग न्यूज आता झळकायला लागली होती. अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे जवळपास ४० आमदार फुटले अशा पद्धतीच्या बातम्या येऊ लागल्या. 2019 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा गंडलेला डाव यावेळी मात्र परफेक्ट बसला. अजित पवार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. वर्षभरापूर्वी शिवसेना फुटली होती. आता अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवार यांनी २४ वर्षांपूर्वी स्थापन केलेली राष्ट्रवादीही फुटली होती. यामुळे आता शरद पवार काय करणार? शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे पुढे काय होणार? अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित व्हायला लागले होते. मात्र अशा प्रश्नांनी खचतील ते पवार कसले?
    कट टू तारीख 3 जुलै 2023 म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतरची दुसऱ्याच दिवशीची सकाळ! सोमवारचा दिवस. माणसं अंथरुणातून उठत नाहीत तोपर्यंतच शरद पवार कराडकडे रवाना म्हणून बातम्या यायला लागल्या. या माणसाचा काल पक्ष फुटलाय. एखादा माणूस धक्क्याने अंथरुण धरुन पडला असता. मात्र अशा कठीण काळात, वयाच्या ८२ व्या वर्षीही अजिबात नाउमेद न होता, शरद पवार हा माणूस चक्क दौऱ्यावर निघतो याचे लोकांना आश्चर्य वाटले. गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शरद पवार हे आपले गुरु, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगम येथील स्मारकाला भेट देण्यासाठी पुण्याहून कराडला रवाना झाले होते. ज्या पुतण्याला बोट धरून राजकारणात आणले, त्या पुतण्यानेच राजकारणाच्या डावामध्ये काकाला धोबीपछाड दिला होता. 82 वर्षाच्या या नेत्याला हा धक्का सहन होणार नाही. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या पाठीशी कार्यकर्ते तरी उभा राहणार का ? जनतेचे समर्थन पवारांना मिळणार का? असे सवाल सुद्धा उपस्थित होऊ लागले. मात्र शरद पवार पुण्याहून कराड कडे रवाना झाले आणि पवारांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा समर्थकांची अक्षरशः झुंबड उडाली. यशवंत विचारांच्या कराडमध्ये तर हजारो समर्थकांनी शरद पवारांचे स्वागत केले‌. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मात्र याप्रसंगी शरद पवारांच्या सातारा जिल्ह्यातील एका अत्यंत निष्ठावंत शिलेदाराची चर्चा झाली, जे अशा परिक्षेच्या प्रसंगी स्वतः शरद पवारांच्या स्वागताला उपस्थित होते. ते म्हणजे राष्ट्रवादीचे स्थानिक कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील. एका बाजूला मंत्रिपदासाठी, विविध चौकशी यंत्रणांच्या कारवायांपासून वाचण्यासाठी शरद पवारांनी घडविलेले, वेळोवेळी बळ दिलेले, त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी, कुटूंबीय त्यांना सोडून जात असताना; अशा वादळातही पवारांच्या सोबत ठाम राहिलेले कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निष्ठेचं कौतुक झालं. मंडळी आज आपण याच बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघाचा अधिक खोलात जाऊन आढावा घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #balasahebpatil
    #manojghorpade
    #vidhansabhaelection2024
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    balasaheb patil,
    manoj ghorpade,
    karad uttar vidhan sabha,
    karad uttar vidhansabha,
    lagavbatti karad vidhansabha video,
    karad mla balasaheb patil,
    karad vidhan sabha matdar sangh,
    vidhan sabha election,
    karad north vidhan sabha,
    balasaheb patil satara,
    karad uttar madhe kon,
    karad uttar matdar sangh,
    mla balasaheb patil,
    balasaheb patil news,
    vidhansabha nivadnuk,
    karad,
    vidhansabha,
    vidhan sabha election 2024

ความคิดเห็น • 457