हसनभाई शेख राज्य सांस्कृतिक पुरस्कार सोहळा बतवानी चे सादरीकर करताना वसंतराव चव्हाण आणि रेखा चव्हाण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • एका प्रामाणिक आणि सच्च्या कलावंताचा गौरव..
    कोणत्याही माणसाच्या आयुष्यात तो जन्माला येऊन काय करून जातो हे महत्त्वाचे असते. जन्माला येणं आणि निघून जाणं हे आपल्या हातात नसले तरी त्याच्यामधील जगणं आपल्या हातात हातात असतं. मग हे करताना जिद्द, चिकाटी,ध्यास या जोरावर माणूस आपल्या स्वतःच्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थानावर जाऊ शकतो.
    महाराष्ट्र निर्मितीच्या साठ वर्षाच्या काळात ज्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची सुरुवात वेगळ्या दिशेने करून उच्च स्थान गाठले अशा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तीसंपन्न अशा व्यक्तींचा गौरव महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षात महाराष्ट्राची गिरीशिखरे म्हणून शासनाच्या वतीने जो गौरव केला जात आहे त्यामध्ये एका कष्टाळू, तमाशा कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या हसनभाई पाटेवाडीकर यांचा गौरव होणं ही त्यांच्या आणि आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट ठरली आहे.
    हसनभाई पाटेवाडीकर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक तमाशा कलावंत. तमाशा कलेत सातत्य ठेवून सतत काहीतरी करण्याची धडपड. प्रामाणिकता,विनयशीलता, दुसऱ्याविषयी तोंड भरून बोलण्याची त्यांची सवय त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळवून देणारी ठरली आहे. त्यांनी अनेक मोठ्या तमाशा फडात कलावंत म्हणून काम केले. काही दिवस स्वतःचा तमाशा फड चालविला. आपली स्वतःची ऑडिओ कॅसेट काढून लोकांच्यापर्यंत पोहोचवली. हे त्यांचे काम विचारात घेण्यासारखे आहे.
    हसनभाईंच्या जीवन प्रवासात दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी मुरलीधर शिंदे यांना बरोबर घेऊन काही वर्षांपूर्वी पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान स्थापन केले होते. तमाशा कलेतील सर्व तमाशा कलावंत आणि फडमालक एकत्रित यावेत यासाठी त्यांचा छोटासा प्रयत्न होता. त्यांच्या एका कार्यक्रमाला जाण्याचे भाग्य मला लाभले होते. विशेष म्हणजे या प्रतिष्ठानमार्फत दोन ज्येष्ठ तमाशा कलावंतांना पुरस्कार दिले जायचे आणि त्यासाठी आदरणीय रघुवीर खेडकर भाऊ हे स्वतः या पुरस्काराची रक्कम देत होते. त्यातील एक पुरस्कार कै.तुकाराम खेडकर यांच्या नावे होता. खूप चांगले कार्यक्रम या प्रतिष्ठानमार्फत नारायणगावला राहुटीच्या ठिकाणी होत होते. पण पुढे या प्रतिष्ठानचे काम का थांबले हे माहित नाही.
    दुसरे असे की मधल्या कोरोनाच्या काळात हसनभाईनी उदरनिर्वाह करताना आपल्या मोपेड वरून कोरोना विषयीची जनजागृती केली. कलावंत हिंमतवान असला पाहिजे, व्यसनापासून दूर असला पाहिजे, इतर काही गैर त्याने करू नये, इतरांच्यासाठी, समाजासाठी त्याने काही करावे ही अपेक्षा या तमाशा कलावंताने पूर्ण केली आहे. म्हणून हसनभाईंच्या कार्याला सलाम आहे. त्यांचा होत असलेला हा गौरव म्हणजे तमाशा क्षेत्राची उंची वाढविणारा आहे.
    हसनभाई तुमच्या कार्याला, धडपडीला सलाम.
    Instagram link:- / mr_ashfaq_025

ความคิดเห็น • 45

  • @rajeshsalunke9813
    @rajeshsalunke9813 4 หลายเดือนก่อน +6

    वसंतराव चव्हाण खूप छान आहे 🙏🙏

  • @harishtarateofficial8052
    @harishtarateofficial8052 ปีที่แล้ว +5

    विनोद चा बादक्षा वंसत चव्हाण दाजी खतरनाक

  • @pawarasantosh9011
    @pawarasantosh9011 2 ปีที่แล้ว +6

    खरा महाराष्टचा मुस्लीम माणुस महाराष्टची लोककला जोपासतोय धन्यवाद त्या माता पितांना ज्यांनी तुम्हास महाराष्टात जन्म दिला. मी एक कलावंत आदीवासी सांस्कृतीक कला मंडळ न्यु बोराडीकर ता.शिरपूर जि.धुळे जय (महाराष्ट करा कष्ट)

  • @kavishabdaswaramangrulkar5055
    @kavishabdaswaramangrulkar5055 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ,जुने तमाशा वैभवाचे दिवस आठवले

  • @bkanna4122
    @bkanna4122 2 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर सादरीकरण 👌👌👌
    परत तमाशाला चांगले दिवस येवोत हीच अपेक्षा ..💐💐💐

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतीम सादरीकरण बाईंच काम सुद्धा खुप छान बोलण्याच टुनींग सुद्धा खुप सुंदर

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG ปีที่แล้ว +2

    खुपच भारी विनोदी बतावणी

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 2 ปีที่แล้ว +1

    ऊत्कृष्ट. विनोदातून समाज प्रबोधन

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 ปีที่แล้ว +7

    सादरीकरण एकदम ऊत्तम आहे.

  • @tejraosapkal7799
    @tejraosapkal7799 ปีที่แล้ว +1

    हसन शेख भाई तुम्हाला जोड नाही मि मास्टर सपकाळ १ च नबरं भाई

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 2 ปีที่แล้ว +6

    सादरीकरण करण्यात आले आहे ते आवडले

  • @shant6009
    @shant6009 2 ปีที่แล้ว +4

    किर्तन=नर्तकी 👏👏👌👌

  • @SukhdevKhandekar
    @SukhdevKhandekar 5 หลายเดือนก่อน +1

    Lay.bhri

  • @dadasahebkolhe9282
    @dadasahebkolhe9282 2 ปีที่แล้ว +3

    लय भारी👍👍👍👍👍

  • @suryakantthakar4755
    @suryakantthakar4755 2 ปีที่แล้ว +1

    वसंत चव्हाण खास कार्यक्रम

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 2 ปีที่แล้ว +5

    वसंत रेखा तुमचे करावे तेवढे कैतूक कमीच आहे

  • @rampandhare9709
    @rampandhare9709 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @maulikute9201
    @maulikute9201 2 ปีที่แล้ว +3

    कडक पाखरू

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 2 ปีที่แล้ว

    Sadrikaran khup chhan

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 ปีที่แล้ว +8

    वसंतराव व रेखा ताई हि एकदा आलेले आहेत दोघेही फार हुशार कलावंत आहेत

  • @rajarametame5712
    @rajarametame5712 2 ปีที่แล้ว

    बतावणी सुन्दर आहे

  • @sultanshaikh2934
    @sultanshaikh2934 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @dattatrayharishchandre326
    @dattatrayharishchandre326 3 ปีที่แล้ว +4

    खुप सुदंर वसंतदादा व रेखाताई

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 2 ปีที่แล้ว

    Lai bhari

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर आहेत 2 कलाकार छान

  • @dattaraonirwal668
    @dattaraonirwal668 2 ปีที่แล้ว

    Very nice,

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 2 ปีที่แล้ว

    Super

  • @dineshbabar318
    @dineshbabar318 3 ปีที่แล้ว +6

    Nice comedy & perfectly timing

  • @fepalesuresh6793
    @fepalesuresh6793 8 หลายเดือนก่อน

    Suresh. Fepale

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 ปีที่แล้ว

    ✌️✌️✌️

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 3 ปีที่แล้ว +5

    नमस्कार आपण श्रीगोंदा या ठिकाणी शाहिर नाना साळुंके यांच्या कार्यक्रमात आलो होतो का, खुप छान

    • @user-nw6hw9jx7y
      @user-nw6hw9jx7y 2 ปีที่แล้ว

      Cl h. I'm TV GB EC TV TV TV GB GB EC GB

    • @vasantchavan5497
      @vasantchavan5497 2 ปีที่แล้ว

      हो आलो होतो सर

  • @vilasatakofficial1449
    @vilasatakofficial1449 2 ปีที่แล้ว +3

    तोड नाही जोडीला

  • @avinashchavan8617
    @avinashchavan8617 2 ปีที่แล้ว +2

    नंबर मिळेल का?..

  • @abuuazaminamdar6754
    @abuuazaminamdar6754 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @pankajsutar807
    @pankajsutar807 2 ปีที่แล้ว

  • @salmanpathantiktok7902
    @salmanpathantiktok7902 2 ปีที่แล้ว

    Bhay apka nambar

  • @jakeerkarnekar4028
    @jakeerkarnekar4028 8 หลายเดือนก่อน

    आसा कलाकार होणे नाही

  • @bharathdarkunde6217
    @bharathdarkunde6217 ปีที่แล้ว

    Wrgy5