#Sanskritik

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • ❤❤ श्री देव भैरी कोटेश्वरी श्री मानाई झोलाई चाबोलो❤❤
    निसर्गरम्य ठिकाण💕 चारी बाजूने निसर्गाने वेढलेला आहे, आणि मध्यभागी गाव आहे ,हे गाव जिल्हा रत्नागिरी, तालुका खेड मध्ये येतंय. या गावांमध्ये श्रीदेव भैरी कोटेश्वरी ,मानाई झोलाई, देवस्थानाची जत्रा तीन वर्षाने होते. या जत्रेच्या परंपरेला साडेतीनशे ते चारशे वर्षे पूर्ण झाले. या जत्रेची शोभा वाढवण्यासाठी आजूबाजूच्या गावातील पालख्या वाजत गाजत देवाला भेट देण्यासाठी येतात .उदाहरणार्थ :-मुरडे, पिसे ,चाकाळे दिवाण खवटी, चीचघर या गावातून प्रत्येकाचे देव पालखीतून देवाला भेट देण्यासाठी येतात .तसेच पंचक्रोशीतील जेवढे पण गाव येतात. त्या गावातील लोक उपस्थितीत राहतात तसंच अखंड महाराष्ट्रातील भाविक दर्शनाला या जत्रेला पोहोचतात🤎
    जत्रा ही पूर्ण तीन दिवसाची होते💕
    ❣ जत्रेचा पहिला दिवस❣
    जत्रेच्या पहिल्या दिवशी जे गाव लाट देणार आहे, त्या गावात लाट तयार करण्यात येते ,तिथे लाटेची पूजा करण्यात येते, लाटेचे पूर्ण काम करण्यासाठी आंबेया गावातील सुतार, समाजातील आमची भावकी तिथे जाऊन लाटेची सगळी तयारी करून देते. लाट आणण्यासाठी आमच्या गावातील लोक गेलेली असतात, त्यांच्यासाठी जे गाव लाट देणार आहे ते त्यांच्या जेवणाची ,खाण्याची ,राहण्याची सोय करते .लाट आणण्यासाठी गेलेल्या सर्व लोकांचे जंगी स्वागत केले जाते .दोन्ही गावातील ढोल, ताशे वाजवत ती लाट आमच्या गावाच्या दिशेने चालत आणली जाते .जेव्हा लाट गावाच्या दिशेने येते गावाची सीमा पार होते तेव्हा, तिथे बाजूला लागणारी सगळी घरं लाटेची पूजा करतात. लाट हळूहळू वरच्या वाडीतील दत्तगुरु मंदिरात आणली जाते व त्या रात्री लाट दत्तगुरु मंदिरातच ठेवली जाते🤎
    ❣ लाटेचा दुसरा दिवस❣
    जत्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरात रुपी लावणे .व दुपारी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने दत्त मंदिरातून लाट वरच्या वाडी पासून ,सुतारवाडी, खालच्या वाडीकडे ,आणली जाते. लाट आणताना प्रत्येक जण तर आपल्या अंगणात उभे राहून लाटेची पूजा करतात. तसेच लाट आणणाऱ्या गावकऱ्यांच्या अंगावरती पाण्याचा वर्षाव केला जातो .लाटेच्या दोन्ही बाजूने समतोल दबाव देऊन लाट खेळवली जाते .असं करत करत गावातील प्रत्येक वाडीतून लाट फिरते. देवाच्या नावाचा मोठ्या प्रमाणात गजर केला जातो. जेव्हा लाट सकपाळ वाडीकडे येते तेव्हा, जे लाटेचे चौथे मानकरी आहेत 💕श्री राजाराम शंखपाळ💕 यांच्या अंगणामध्ये लाट उतरवली जाते. अंगणामध्ये लाटेची पूजा केली जाते. व त्याच्यानंतर तसंच लाट खेळवत खाली घेऊन खालच्या वाडीत घेऊन जातात .💕 पुढे ती लाट बारदाना वरती उतरवली जाते💕 खालच्या वाडीमध्ये ते लाटेचे पहिले मानकरी आहेत💕 पुढे ती लाट मंदिराच्या मैदानामध्ये नेली जाते ,लाट घेऊन जाईपर्यंत जवळपास रात्र होते. पुढे सर्व गावकरी प्रामुख्याने आमची जी भावकी आहे सुतारवाडी ,रात्री ला सारा वर चढवतात .अशाप्रकारे दुसऱ्या दिवसाच्या जत्रेचा समाप्ती होते🤎
    ❣ जत्रेचा तिसरा दिवस❣
    लाटेचा दुसरा दिवस संपता सकाळी चार वाजेपर्यंत आजूबाजूच्या सगळ्या गावच्या पालख्या आमच्या मंदिरात पोचतात. जत्रेचा तिसरा दिवस असतो त्यादिवशी जामगा ची जत्रेला मानाई आणि झोलाई देवीची पालखी हजर झाल्यानंतरच दुसऱ्या दिवसाचा जत्रेचा कार्यक्रम चालू होतो मानाई आणि झोलाई या दोन्ही देवी आमच्या देवाच्या बहिणी आहेत. त्यामुळे त्यांची मुख्य तो प्रमुख हजेरी लागते त्यानंतरच सगळं कार्यक्रम सुरुवात होतो. तिसऱ्या दिवशी 3:35 ला लाटेच्या पूजेसाठी लाटेचे मानकरी लाटेवर चढतात. जेव्हा लाटेचे मानकरी लाटेवर चढतात तेव्हा भावकी, गावकी ही सारावर चढते .लाटेची पूजा संपन्न झाली म्हणजे तिसरा दिवसाचा जत्रेचा कार्यक्रम समाप्त होतो🤎
    या जत्रेत मध्ये मनोरंजनासाठी वेगवेगळे खाण्याचे स्टॉल लागलेले असतात. तसंच तुम्ही ज्वेलरी खरेदी करू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या कानातले कपडे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या जत्रेमध्ये लागतात तीन दिवसासाठी गावातील वेगवेगळे मंडळ आहेत ते प्रत्येक मंडळ जत्रेचा खर्च उचलतात. खूप शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होतो. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तणूक या कार्यक्रमात होत नाही. हजारो लाखो लोक या जत्रेला येतात. परंतु या जत्रेला पोलीस प्रोटेक्शन ची गरज लागत नाही . एवढ्या व्यवस्थितरित्या गावकरी लोकं ही जत्रा शांततेत पार पाडतात .संध्याकाळी लाटेचं सगळं कार्यक्रम संपल्यानंतर साराच्या बाजूच्या दोन्ही रस्सा पकडून वेगवेगळे खेळ खेळले जातात. प्रत्येक पुरुष आपली ताकद तिथे दाखवतो. तसंच त्यानंतर संध्याकाळी पाच ते सहा वाजता पूर्ण गाव गावातील सकाळची मुलं-मुली जावई नातवंड सोयरे संबंध जेवढे पण आहेत ते जत्रेला हजर असतात. ते सगळे सुंदर डीजे लावला जातो आणि पूर्ण गाव आमचं एकत्र नाचतो आनंद साजरा करतो का तर जत्रा शांततेत आणि छान साजरी झालेली असते आमच्या देवाची सगळी कार्यक्रमात चांगली झालेली असतात म्हणून आनंदात सगळ्या मुली सगळ्या सुना एकत्र नाचतात. ❣एक आनंदाची लहर झालेली असते त्यावेळेस असं वाटतं काही इंद्रदेव वरून फुलांचा वर्षाव करत आहे❣ त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी जातात व संध्याकाळी पुन्हा सगळेजण येतात .गावाने सुंदर असं कार्यक्रम ठेवलेला असतो. ज्याच्या मध्ये भरपूर असे मराठी कलाकार, हिंदी कलाकार येतात. त्यांच्या डान्स दाखवतात ,त्यांचे नाटक दाखवतात हे सगळे कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही मैदानावर ती रात्री आठ नंतर पोहोचतो, जो तो आपली जागा पकडण्यासाठी घोंगड्या चटया टाकतो ,आणि मग त्याच्यावर बसून किंवा झोपून आरामात आम्ही कार्यक्रम रात्री दोन वाजेपर्यंत पाहतो .या जत्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील सगळी गावं एकत्र जोडली जातात. तसेच या जत्रेच्या निमित्ताने आमच्या गावाने एक सांस्कृतिक वारसा ,परंपरेचा वारसा आणि एकीचा वारसा ,जपून ठेवला आहे .कोकणातली संस्कृती जपणे मध्ये माझ्याही गावाचा मोलाचा वाटा आहे याचा मला खूप अभिमान वाटतो🤎
    💖💖 श्री देव भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई चाबोलो 💖💖
    ‪@Kokan7869‬ @kokan @Jatra

ความคิดเห็น •