हा प्याला मज पासून कर दूर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • सर्व भजन रसिकांना सलाम ,
    आज या शाब्बाथ दिवशी आपल्या समोर पुन्हा एकवार भजन घेऊन येतांना खरोखर आनंद होत आहे . प्रभू येशू ला वध स्तंभावर खिळण्या अगोदर त्याने पित्याला विनंती केली की हा प्याला माझ्यापासून टळू दे पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेने होउ दे . हीच भावना भजन रुपात सादर करीत आहेत बंधू दिनकर खरात आणि त्यांना पखवाजावर साथ देत आहेत बंधू योहान गजभिवं. आणि भजनाला कोरस ची साथ देत आहेत भजन मंडळीतील सर्व लहान थोर .
    आपल्याला अनेक भजन रसिक व श्रोते मंडळी यांनी विनंती केली होती की भजनाचे शब्द टाका त्या विनंतीस मान देऊन येथून पुढे भजनाचे शब्द डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत . यात काही चूक असल्यास क्षमा असावी कारण अनेक पिढ्यांपासून ही भजने गायली जात आहेत त्यात काही शाब्दिक बदल अथवा शब्द वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही🙏🙏🙏🙏
    🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌺🌷🌺🌷🌺🌺
    भजनाचे बोल खालील प्रमाणे
    हा प्याला मजपासून कर दूर
    बापा , बापा (४) हा प्याला मजपासून कर दूर // धृ//
    का तू माझा त्याग ही केला (२)
    नाही तुझा मी शब्द मोडीला
    हीच जिवाला हूर हूर
    हा प्याला ........................ //१//
    माझ्या नव्हे पण तव इच्छेने (२)
    होऊ दे रे सर्व धीराने
    माझी न काही कुरकुर
    हा प्याला ........................ //२//
    आज तुला मी खास विनवितो (२)
    माझा आत्मा तव हाती देतो
    माझी न काही कुर कुर
    हा प्याला ................... //३//

ความคิดเห็น • 22